*Raajoo Lakshman Thokal <https://www.facebook.com/rajuthokal9>, *Mahadevkoli 
Yuva

नाशिक येथे जागतीक आदिवासी गौरव दिन श्रावण सरींच्या बरसातीत उत्साहाने 
बहरला.....

"पद आणि सत्ता यांच्या माध्यामातून आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविले पाहिजेत. 
आदिवासी संस्कृती हि मानसिक व भौतिक अशा दोन्हीही अविश्कारांनी संपन्न आहे. 
आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय, राजकीय व संघटनात्मक 
पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. आदिवासी समाजाला गुणवत्तेसाठी सर्वोतोपरी 
मदत केली जाईल.त्यासाठी येणारा १००% खर्च राज्यसरकार करेल. मला आदिवासी 
संस्कृतीचे कौतुक करतो कारण या संस्कृतीमध्ये भोगवादी संस्कृतीला थारा नाही" 
असे उदगार राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजित पवार यांनी जागतीक आदिवासी 
गौरव दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र शासन 
यांच्यावतीने आदिवासी सांस्कृतिक परिषदेच्या अंतर्गत नाशिक येथे विविध 
कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

याप्रसंगी मा.श्री.मधुकरराव पिचड, मा.श्री.विजयकुमार गावित, मा.श्री.समीर 
भूजबळ, श्री.रवींद्र जाधव, श्री.उल्हास पाटील, जयंत जाधव, संभाजी सरकुंडे, 
जयश्री पवार व राज्यभारातून आलेले हजारो मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात "हैप्पी वेलकम...सबको शुभकामना" या आश्रमशाळेतील 
विद्यार्थिनींच्या सुमधुर गीतगायनाने झाली. त्यानंतर राजूर, ता.अकोले येथील 
इयत्ता १२ वी ची विद्यार्थिनी सोनाली साबळे हिने 'ऐ मेरे इतन के लोगो' हे गीत 
सादर करून सर्वांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त श्री संभाजी सरकुंडे साहेब यांनी केले. यात 
त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाने हा जागतिक आदिवासी दिन साजरा का करण्यास 
सुरुवात केली याची माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 
मा.श्री.अजित पवार हे होते.

आपल्या मनोगतात मा.श्री.हरिश्चंद्र चव्हाण यांनी मागण्यांची एक मोठी यादीच 
मान्यवरांसमोर सादर केळी. यात आदिवासी सेवक पुरस्कार हा ९ ऑगष्टला दिला जावा, 
राज्यात आदिवासी तरुणांसाठी क्रीडाप्रबोधिनी उभारली जावी, दि.११/११/२०११ च्या 
शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, दि.१८/०५/२०१३ रोजी बोगस 
आदिवासींसंबंधित जो निर्णय आहे आहे त्यास यापुढे स्टे न देता काटेकोर 
अंमलबजावणी केली जावी, कुपोषणाच्या प्रश्नावर ठोस पावले उचलावीत, आश्रमशाळा 
जेवणाचे टेंडर आदिवासी बचतगटांना देण्यात यावे अशा अनेक मागण्या त्यांनी सादर 
केल्या.

मा.श्री.समीर भूजबळ यांनी पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी इगतपुरी येथे मंजूर 
झाल्याची माहिती दिली. तसेच आदिवासी कला जोपासण्यासाठी इगतपुरी येथे ट्रेनिंग 
सेंटर मंजूर झाल्याची माहिती दिली.

श्रीमती जयश्री पवार यांनी आदिवासींच्या प्रामाणिकपणाचे जाहीर कौतुक केले. 
तसेच आदिवासी जीवनमान सुधारण्यासाठी मुलभूत सुविधांकडे लक्ष्य देण्याची गरज 
व्यक्त केली. शेती विकासासाठी प्रयत्न होण्याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले. 
कुमारी मातांमुळे कुपोषण अधिक आहे म्हणून त्याविषयी जाणीव जागृती होणे 
अपेक्षित आहे. तसेच घरकुलाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी केली.

मा.श्री.विजयकुमार गावित यांनी न्याय मिळविण्यासाठी आदिवासी समाजाने संघटीत 
होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.सरकारी निर्णयांची अंमलबजावणी 
होण्यासाठी संघटनाची गरज आहे.

आदिवासी विकास मंत्री मा.श्री. मधुकरराव पिचड साहेब यांनी आदिवासी समाजात 
हुंडा घेण्याची पध्दत नाही, आदिवासी समाजाची स्वताची बोलीभाषा आहे, रीतीरिवाज, 
कला, संगीत आहे म्हणून आदिवासी संस्कृती महान असल्याचे मत व्यक्त केले. 
कालचा-आजचा-उद्याचा आदिवासी यांचे चित्र त्यांनी आपल्या शब्दांद्वारे उभे 
केले. उद्याच्या आदिवासीला पुढे नेण्यासाठी शिक्षण घेण्याची गरज त्यांनी 
व्यक्त केली.....आणि शेवटी "एक तीर एक कमान...सर्व आदिवासी एक समान" असे 
म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

*कार्यक्रमातून काय साध्य झाले यावर कदाचित अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, 
संघटना, पत्रकार, लेखक, कवी आदींचे वेगवेगळे मत असेल परंतु मला एकाच म्हणावेसे 
वाटते चला कुठे तरी आता आदिवासी बोलता झाला आहे...आता तो स्वताच्या विचारांनी 
चालण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला प्रगतीच्या प्रवाहाबरोबर धावता करण्यासाठी 
अशा व्यापक कार्यक्रमांची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आदिवासींसाठी कुठेतरी 
सकारात्मक पावले पडत आहेत.*



On Wednesday, August 7, 2013 8:06:48 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
> Nice initiative, Let us celebrate at our location. Let us do it together! 
> *Innovative Idea :* Planing to organize online conference for online 
> tribal intellectuals. (VDO conference on Google hangout) soon will send link
>
> Thanks & regards 
> AYUSHonline team
>
> ---------- Forwarded message ----------
> From: sms
> Date: Wed, Aug 7, 2013 at 1:18 PM
> Subject: Fw: Adiwasi Gaurav Din 9 Aug 2013
> To: 
>
> **
> Dear all, please find here with the invitation card of world international 
> indigenous peoples day being celebrated on 9 th instant at Nashik. Come in 
> legion with friends & all.
> Com Trbl Dev Sarkunde
>
> ------------------------------
> *From: * Project Office ITDP Nashik 
> *Date: *Wed, 7 Aug 2013 12:38:59 +0530
> *To: *ashram schools
> *Subject: *Adiwasi Gaurav Din 9 Aug 2013
>
> Dear All
> As we have informed u to celebrate Adiwasi Gaurav Din on 9 Auguest 2013 at 
> ur place
> do needfull. 
>  
>
>  
>
>
> -- 
> Thanks and Regards,
>
>
> प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र. नाशिक
>
>
>
>

-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about 
Tribal empowerement & Developement, Let us do it together 

Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/2ffc5e9c-f9c6-41fb-86c8-9c51741bfdca%40googlegroups.com?hl=en.


Reply via email to