स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा लाभ घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवावे - शैलेश नवालमंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३*ठाणे : *प्रकल्प कार्यालयाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित युवक-युवतींसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात येत असून, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन स्वतःचे उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
प्रकल्प कार्यालय, डहाणूच्या वतीने अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींसाठी आयोजित स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी तलासरीचे तहसीलदार गणेश सांगळे, केंद्रप्रमुख श्री. मोहिते यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी श्री. नवाल म्हणाले, अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित युवक-युवतींना विविध स्पर्धा परीक्षा तसेच युपीएससी, एमपीएससी परीक्षेसाठी इच्छुक युवक-युवतींना प्रशिक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे विद्यार्थ्यांना पैसे व शैक्षणिक सामुग्रीची कमतरता पडू देणार नाही. विद्यार्थांनी गावागावात अभ्यासगट (स्टडी सर्कल) सुरू करावेत. त्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके पुरवण्यात येतील. तलासरीचे तहसीलदार श्री. सांगळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, त्यांचे विषय, अभ्यास कसा करावा, विविध पदभरती याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे, पुस्तके याबाबत शंका विचारल्या. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, यांच्या कार्यक्षेत्रातील डहाणू, पालघर, तलासरी आणि वसई या चार तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच विविध स्पर्धा परीक्षांकरिता हे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. Pics : https://www.facebook.com/media/set/?set=a.562420570513680.1073741831.136313376457737&type=1 On Friday, October 4, 2013 10:16:01 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > mpsc/upsc च्या शिबीरची वेळ बदलून रविवार दि.06/10/2013 रोजी सकाळी 11:00वा. > केली आहे.ठिकाण:-डहाणू आगार,वेळेवर मित्रांसह उपस्थित राहणे. > for details Contact Dr. Sunil Parhad (9271 417 182) > > Organizer : ITDP Dahanu > -- ----------------------------------------------------------------------- Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/660fda3c-9cd6-4e9c-8aa4-31ed899b3500%40googlegroups.com.

