News for ref : *मुंबई :* आदिवासी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांना क्रीडा विभागाच्या स्पर्धांप्रमाणे दर्जा देण्याचा निर्णय राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.
आदिवासी क्षेत्रातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ मिळणार असून आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी खेळाडूंना 25 वाढीव क्रीडा गुण, पाच टक्के खेळाडू आरक्षण या सवलतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली आहे. आदिवासी खेळाडू हे आदिवासी विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होतात. मात्र या स्पर्धांना क्रीडा संचालनालयाची मान्यता नसल्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विजयी खेळाडूंना 25 वाढीव गुणांचा फायदा मिळत नव्हता. परंतु यासंदर्भात श्री. तावडे यांच्याकडे अनेक लोकप्रतिनिधी तसेच संघटनांनी आदिवासी खेळाडूंना विविध सवलती मिळण्यासाठी विनंती केली होती. यासंदर्भात श्री. तावडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आदिवासी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. -- Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends) Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/60641719-722d-4f21-b979-a2bbd72ee8e1%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

