तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री  आदिवासी माणूस असेल

महाराष्ट्रातील राजकारणात एकूण आमदारांपैकी २५ आमदार आदिवासी ( अनुसूचित जमाती
) आरक्षित क्षेत्रातुन निवडणूक लढून निवडून येतात. राजकारणात आणि सरकार स्थापन
करण्यासाठी खरं तर हि संख्या खूपच मोठी आहे. बहुमताच्या वेळी  समजा १/२ आमदार
जरी जरी फुटले तरी खुर्ची मिळत नाही हि सत्यता आहे . आमदार फुटीच्या प्रकरणाने
अनेकवेळा देशात सरकार गडाडले आहे आहे महाराष्ट्रातही सरकारला  अनेकवेळा
खुर्च्या खाली करायची वेळ आली आहे पण “सेटल्मेंट” प्रकारामुळे सर्व प्रकार
दाबला गेला . आज महाराष्ट्रात आदिवासी आमदारांची संख्या लक्षात घेतली तर २५
आमदार म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय सत्तेचा पाया म्हणावा लागेल हा पाया जर
ढासळत राहिला तर वर्षाला सरकारे बदलतील आणि रोज राजकीय भूकंप होत राहतील मात्र
निवडणूक आली कि , उमेद्वारी अर्ज भरताना अनुसूचित जमाती या राखीव जागेचा
उल्लेख करायचा आदिवासी आदिवासी म्हणून मिरवायचे , उमेद्वारी अर्ज भरायला
जातानी आपल्या सर्व आदिवासी समर्थकांना सोबत घेवून बोंबा मारत अर्ज भरायचा,
आदिवासी आदिवासी करत आदिवासींच्या समस्यांवर क्षणभर प्रकाश टाकत आदिवासी
माणसाची सहानुभूती मिळवायची आणि आदिवासी मतांवर निवडून येत आमदार व्हायचं
,उमेद्वारी अर्ज भरून अगदी मातादांच्या संध्याकाळ पर्यंत आमच्या आदिवासी
उमेद्वाराला “मी आदिवासी असल्याचा गर्व” असतो एकदा मतदान संपले,यदाकदाचित
निवडून आला कि गल्लीतल्या राम्या चा रामराव साहेब होतो आणि  पायी फिरून
मतदानाची भिक मागणारा आमचा नेता येव्हडा उडतो कि त्याचे पाय जमिनीला लागत
नाही. गल्ली गल्ली , खेडेपाडे वाड्यावस्त्या पायी फिरून लोकांची सहानुभूती
मिळवून मोठा झालेला आमचा नेता नंतर वाड्या वस्त्यांचे दर्शनही करत नाही. आज
महाराष्ट्रात एकही आदिवासी आमदार नाही असे मी मानेल कारण आजचे आमदार हे कुणी
राष्ट्रवादीचा आहे तो “दादाला” विचारल्याशिवाय लग्न झालेल्या स्वताच्या पोराला
हनिमून ला सुद्धा पाठवत नाही . कुणी कॉंग्रेस चा आहे तो हायकमांड ला
विचारल्याशिवाय झोपतही नाही. कुणी शिवसेनेचा आहे तो घरी रोज जन्मदात्या “आई
बापाला “ लाथा घालून बाहेर “ हेच माझे दैवत ...! हेच माझे दैवत ..!” करत बसलाय
. कुणी बीजेपी चा पाळलेला कुत्रा आहे तो बीजेपी आणि R S S च्या मागे लागून हाप
चड्डी सांभाळतोय तर कुणी कट्टर मनसे आहे आणि कुणी कुणी तर चक्क अपक्ष शिवाय
राजकीय पक्ष तिकीट वाटप करतांनी आणि उमेद्वारी जाहीर करातांनी खरोखर आदिवासी
सेवक कोण याचा अभ्यास करत नाही फक्त कोण आपल्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता (
गुलाम ) हे पाहून उमेद्वारी देतात .आज “ कट्टर आदिवासी दिसेनासा झालाय. आमच्या
नेत्यांनी , पुढार्यानी , आमदारांनी आपली कट्टरता फक्त उमेद्वारी अर्ज
भरण्यापुरतीच टिकवून ठेवलीय . आज आपण छातीठोकून म्हणतो कि, आम्ही स्वतंत्र
झालोय , आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय पण विचार करा तुम्ही आम्ही फक्त शरीराने
आणि कृत्याने स्वतंत्र आहोत आणि विचारांनी मात्र “ गुलाम “ आणि एकवेळ शारीरिक
गुलामगिरीमधून माणूस लवकर आणि सहज मुक्त होवू शकतो पण वैचारिक गुलामगिरीमधून
मुक्त होण्यासाठी वैचारिक क्रांतीची गरज असते तीच आपल्या लोकांमध्ये कुठे दिसत
नाही. आज आपले लोकप्रतिनिधी आरक्षित जागावरून निवडून येतात याचा अर्थ असा नाही
कि त्यांची लोकप्रियता खूप आहे ते लोकांच्या मागे सावलीसारखे उभे असतात,
पाहिजे तेव्हा लोकांच्या मदतीला धावून येतात त्यांचे निवडून येण्याचे कारण हेच
कि ,आपल्याच काही आदिवासी माणसांना राजकीय पक्षानी लादलेल्या विचारांच्या
ओझ्याखाली दाबून उभे करायचे, एकमेकांच्या विरोधात भडकवायचे , आपलेच लोक आपल्या
विरोधात उभे करून पुन्हा पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमच्यात लढाया करायला
लावायच्या मग हि मानसिक गुलामगिरी नाही मग काय आहे . आम्ही किती दिवस फक्त
आमदार होण्यासाठी लढायचे अरे “ शंड “ लोकांनो लढाई अशी लढा कि तुमचा इतिहास
लिहायला कागद कमी पडतील. स्वार्थ आणि पाच वर्षासाठी का तुम्ही तुमचा समाज
राजकीय पक्षाच्या दावणीला बांधता तुम्ही आहातच गुलाम पण तुमच्यासाठी सारा समाज
का गहाण ठेवता . गुलामिलाही काही मर्यादा असतात त्या मर्यादा आता तुम्ही पूर्ण
ओलांडल्यात आता “गुलामी “ या शब्दाला सुद्धा “गुलाम” असल्याची लाज वाटतेय तो
शब्द देखील आता विद्रोह करायच्या मागे आहे मात्र तुमच्यातली गुलामी वृत्ती
अजूनही ठिणगी इतकी सुलगेना. फक्त आमदार होण्यात आणि यांचे झेंडे धरण्यातच
आयुष्य घालवाल का ? पक्त थोडे आत्मचिंतन करा ( आत्मसन्मान जिवंत असेल तर ) आणि
ठरवा घ्या विद्रोहाची मशाल राजकीय पक्ष डालून ठेवा कोंबडयासारखे द्या नारा जय
आदिवासी आणि म्हणा एकदा जय बिरसा कुणीच कोणत्या पक्षाची उमेद्वारी घेवू नका
फक्त आदिवासी म्हणून लढा द्या क्रांती काय असते कळेल लोकांना ज्या दिवसी २५
आदिवासी आमदार हे कट्टर आदिवासी म्हणून निवडून येतील त्या दिवसी
महाराष्ट्रातली सत्ता एखाद्या “ वारांगना “ सारखी आदिवासी माणसाच्या झोपडीत
पाहिजे तिथे ,पाहिजे तेव्हा येवून बसेल. खुर्ची तर तुमच्या दारात मुजरा करेल
आणि स्वताला महाराष्ट्राचे मालक समजणारे आदिवासी शब्द ऐकताच नाक ओठ मोडणारे
सत्ताधारी तुमच्या चप्पला उचलायला धावतील . आदिवासी आदिवासी म्हणून हिणवणारे
तुम्हाला सलाम ठोकतील . पण आमची अवस्था अशी झालीय कि “ एक नाही एकात आणि बाप
नाही लेकात “ . आज महाराष्ट्रातील आदिवासी समाज एक आहे आणि एक राहणार फक्त
त्यात राजकारण आणि पंचवार्षिक निवडणूक आली कि दुजाभाव निर्माण होतो . राजकीय
पक्ष त्यांच्या विचारणी आपल्यात संघर्ष करायला लावतात आणि आम्ही त्यांची
हुजुरेगिरी करतोय आम्ही एकसंघ झालो तर नक्की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा
आदिवासी माणूस असेल .अश्यक्य काहीच नाही फक्त आत्मचिंतन करा आणि एकमेकांच्या
सोबतीने लढाईला सुरुवात करा . सत्ता तुमची गुलाम असेल .

                 विजयकुमार घोटे                          ०९६२३७०१७०९

http://vidrohiadivasi.in/2015/02/22/%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82/

-- 
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form 
at :www.event.adiyuva.in (share with your friends) 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CANaaVH%3DhaaDLCe3%2BK1fNW_BpPic1RvqKODmcN1sW9viZamdgpQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to