खालील निवेदन मराठवाड्यातील संघटनानी /व्यक्तीनी  योग्य तो बदल करून ध्यावे ही
आदिशक्ती गृपची विनंती
प्रति
१.मा.प्रधान सचिव ,
  सामान्य प्रशासन ,महाराष्ट्र राजय
  मंत्रालय,
  मुंबइ
२.मा. प्रधान सचिव,
  आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य
   मुंबई
३. मा.आयुक्त ,
   आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थान,पुणे
   पुणे .

आदरनीय महोदय,

        विषय: सन २०१४ साली  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या
                 परीक्षेत अ. ज.  साठी  राखीव असलेल्या पदावर निवड
                  झालेल्या  उमेदवारांच्या  खोट्या /बोगस  अ.ज.च्या प्रमाण -
                  पत्रांची / वैधता प्रमाणपत्रांची फेर तपासणी करणे  व बोगस
                  उमेदवारांना नियुक्ती आदेश न देण्याबाबत   तसेच
                  अ. ज. चे   खोटे प्रमाणपत्र मिलविणा-या उमेदवारांवर  व हेतु
                  पुरस्कर असे  खोटे  प्रमाणपत्र देणा-या अधिका-यावर
                  कार्यवाही करणेबाबत
                  ----------–------+-------------------------
             महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१४ च्या निकालात  अनुसूचित
जमातीच्या  प्रवर्गातील एकूण निवड झालेल्या ४६ जागांपैकी  २५ उमेदवारांनी ते
अ.ज.चे असल्याचे बोगस/खोटे  जमातीचे प्रमाणपत्र  सादर केल्याचे  आमच्या पाहणीत
आढलून आले आहे.सामान्य प्रशासन विभाग ,महाराष्ट्र राज्य यानी या कथीत
उमेदवारांचा  अ. ज.चा  दावा संशयित ठरउन त्यांची नियुक्ति थांबविली असल्याचे
वृतही प्रसिद्ध झाले आहे.
            अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडतालणी समिति , औरंगाबाद च्या
कार्यक्षेत्रात  वरील २५ पैकी ११ उमेदवार  बोगस अ.ज.चे आहेत .या बोगस
उमेदवारांचा तपशील  पुढीलप्रमाणे आहे.
------------------------------------------------------------ अ.क्र.
उमेदवाराचे            सादर केलेले अ.ज.चे        उमेदवाराच्या ज्या
             नाव                      प्रमाणपत्र                 नातेवाइकास
जमातीचे
                                                                      खोटे
प्रमाणपत्र आहे
                                                                     त्याचे
नाव
---------------------------------------------------------- १.कांबले अमोल
जगन्नाथ       कोली महादेव        कांबले कविता जगन्नाथ
२. शिरगुरवार दिपक दत्तात्रय   मन्नेरवारलु                  ---
३.कांतीवार समीर शंकरराव        "                     कांतीवार स्रद्धा
शंकरराव
४.आंदेलवाढ अमोलकुमार           "                          ----
     देविदासराव
५.आनंद रामराव ऐंनवाड             "                         ----
६.अकुलवार रवि व्यंकटराव         "                          ----
७.गोविंदराव सोनल हनमंतराव      "                         -----
८.तोटावार मु कुंद व्यंकटराव         "                         -----
९.वाघमारे ऋषिकेश अरूण      कोलीमहादेव              ------
१०.गोरे श्रद्धाराणी भानुदास       -----                गारे पुजा भानुदास
११.मोतीबोने संभाजी बाबूराव   महादेव कोली      मोतीबोने अनिल बाबूराव.
            आम्ही अर्जदार  अ.ज. चे असुन औरंगाबाद पडतालणी समिती
कार्यक्षेत्रातील  कायमचे रहिवासी आहोत.स्थानिक निवासी असल्यामुले  आम्हाला
ख-या आदिवासी  समाजाची जाण आहे. ख-या आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आम्ही सतत
जागरूक आहोत.आम्ही आपल्या निदर्शनास
आणू इच्छीतो की,
१)   क्रमांक २ आणि ४ ते ९ वरील उमेदवारांचे मन्नेरवारलू  जमातीचे खोटे
प्रमाणपत्र हे पडतालणी समिति औरंगाबाद चे तत्कालीन सह आयुक्त श्री. व.सू.पाटील
यानी दिले आहे तर क्रमांक १,३ आणि ११ वर नमूद केलेल्या  उमेदवारांचे  महादेव
कोली जमातीचे खोटे प्रमाणपत्र  हे  त्यांच्या नातेवाइकांना  श्री .व .सु
.पाटील ,तत्कालीन  सहआयुक्त  यानी दिलेल्या खोट्या महादेव कोली या
प्रमाणपत्राच्या आधारे दिले आहे . क्रमांक १० वरील  उमेदवार गोरे
श्रद्धाराणी  भानुदास यानाही  अ .ज.चे खोटे प्रमाणपत्र त्यांचे नातेवाइक  गोरे
पुजा भानुदास याना श्री व सु पाटील यानी  दिलेल्या  खोट्या अ.ज.च्या
प्रमाणपत्राच्या आधारावर दिले आहे.श्री. व. सु. पाटील यानी हेतू पुरस्कर
जातींचे खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्धल विविध स्तरावर त्यांची चौकशी चालू आहे.
२)  वरील ज्या उमेदवारांनी मन्नेरवारलू या अ. ज .चे असल्याचे वैधता
प्रमाणपत्र  सादर केले आहे ते त्या अ.ज.चे नसून ते मन्नेरवार,मुन्नुरवार,
मुन्नेरकापू,कापेवार,तेलंगी,फुलमाली  या विशेष मागास प्रवर्गातील  जातीपैकी
आहेत .
३) वरील उमेदवाराना  मन्नेरवारलू  या जातीचे  प्रमाणपत्र देताना  उपविभागीय
अधिकारी यानी  महसुली अभिलेख, रक्ताच्या नात्यांची तपासणी, आप्तभाव,
वंशशाश्रीय नातेसंबंध तपासले नाहीत याची खात्री आम्हाला आहे.
४)   मराठवाड्यातील  उस्मनाबाद, नांदेड,लातूर आदि जिल्ह्यांमध्ये हिंदू जाती
व्यवस्थेत बारा बलूतेदारांपैकी "कोली"ही जात असून  त्या जातीचे लोक आदिवासीना
मिलणा-या सवलती मिलण्यासाठी  स्वतःला कोली महादेव समजतात .या कोली जातीच्या
उमेदवारांनी खोट्या दस्तऐवजाच्या आधारे  महादेव कोली जमातीचे प्रमाणपत्र
लबाडीने मिलविले आहे  असेही आमच्या निदर्शनास आले आहे.
     आदिवासी विकास विभाग  आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे  यानी
अनुक्रमे २४.४.१९८५ व २२.११.१९९४  च्या  पत्राद्वारे  जमातीचे प्रमाणपत्र
देणा-या अधिका-यांच्या लक्षात ही गोष्ठ   आणुन दिली होती की  नामसादृष्याचा
फायदा घेउन काही बिगर आदिवासी लोक  अ.ज.चे  प्रमाणपत्र घेउन  आदिवासींसाठी
असलेल्या सवलती  घेत आहेत. मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करून  बिगर  आदिवासीना
अ.ज.चे प्रमाणपत्र संबंधित अधिका-यानी दिल्याचेही  उघड झाले  आहे.
       सारांश, वरील उमेदवार हे अनुसूचित जमातीच्या यादीत मोडत नसून त्यानी
अ.ज.चे खोटे प्रमाणपत्र  संबंधीत  उपविभागीय स्तरावरील  अधिकारी  व पडतालणी
समितीतील अधिकारी यांच्या संगमताने मिलविले आहे .सबब  आपणास विनंती करण्यात
येते की  प्रमाणपत्राच्या अचूकतेविषयी  लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी व सर्व
दोषी व्यक्तिंवर अधिनियम क्रमांक २३ च्या तरतुदीनुसार  कार्यवाही करावी .
चौकशी पूर्ण होईपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना शासन सेवेत रूजू करून
घेण्यास मनाई करावी हि विनंती.
                 सविनय सादर

आपले स्नेहांकित,

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjTRroJcEF_E75biKq%2BY1AEhK7ZaEc7ojZRciLNQ0h3VX6HHA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to