पालघरमध्ये विकासाची गंगा वाहती होईल - अॅड. चिंतामण वनगा

‘अब की बार’ च्या घोषणा देत पालघरच्या मतदारांनी आम्हाला भरघोस मताधिक्याने
विजयी केले. त्यानंतर मी माझ्या मतदारसंघातील सागरी, नागरी व डोंगरी भागातील
प्रलंबित प्रश्‍न रेटून नेण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघातील अनेक मुख्य
समस्यांना मी हात घातला असून आगामी काळात हे प्रश्‍न निश्चित मार्गी लागतील.
माझ्या खासदार निधीचा पैसा मी दुर्गम भागातील विकासाकरिता वापरला. धानोशी (ता.
जव्हार ) येथील गावाला मी दत्तक घेतले असून आदिवासी वस्तीकडे जाणार्‍या
रस्त्यांच्या उभारणीवर खर्च करीत आहे. आदिवासी काढत असलेले वारली पेन्टीग हे
जगभरात प्रसिद्ध असून ही चित्रकला पद्धत कौशल्य विकास (स्कील डेव्हलपमेंट) या
अंतर्गत घेतल्यास देशातील अनेक आदिवासी तरुणांना रोजगाराचे दालन खुले होईल,
असे म्हणणे मी लोकसभेत आग्रहीपणे मांडले. या सूचनेकडे सरकार सकारात्मकदृष्ट्या
पाहात आहे.

देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे नीट पुनर्वसन
झाले नाही; प्रकल्पपिडीतांना नोकरीत समाविष्ट केले गेले नाही, याकडे मी
सरकारचे लक्ष वेधले. मासेमारी व्यवसायातील अनेक खलाश्यांना पाकिस्तान सरकार
पकडून तुरुंगामध्ये डांबून ठेवते. अशा मच्छीमारांची सुटका होण्यासाठी दिल्ली
सरकारने संवाद वाढवून त्यासाठी करार करण्याची मागणी केली आहे.

एकीकडे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग व दुसरीकडे अपूर्ण अवस्थेमधील सागरी
महामार्ग असताना; या दोघांमधील १५ किलोमीटरच्या अंतरामध्ये तिसर्‍या
मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गाची गरज काय? असा माझा प्रश्न आहे. तो मी संसदेत
उपस्थित केला आहे. सागरी मार्ग पूर्ण करून तो दक्षिणेपर्यंत नेण्याची गरज
असल्याचे माझे मत आहे. वाढवण, आलेवाडी याठिकाणी होऊ पाहणार्‍या बंदरांमुळे
तारापूर अणुशक्ती केंद्राला धोका संभवत असल्याने या प्रकल्पांना माझा विरोध
असल्याचे मी केंद्राला कळविले आहे. भूसंपादन विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर
जव्हार-मोखाडा भागात नव्याने औद्योगिक वसाहती उभारण्याच्या प्रस्तावाचा
पाठपुरावा मी करणार आहे. (shared by esakal)

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAEFLEeswE5NXK5UExxxKrwa806FsqOJtDQG5wvT5H3nF8_kf8A%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to