http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/05/28/article601699.ece/MAHARASHTRA-MP-Who-not-spent-ther-fund?slide=5&utm_source=vuukle&utm_medium=referral#.VWqfU-fPzEw

2015-05-26 8:35 GMT-07:00 Chintaman Vanaga <chintaman.van...@gmail.com>:

> पालघरमध्ये विकासाची गंगा वाहती होईल - अॅड. चिंतामण वनगा
>
> ‘अब की बार’ च्या घोषणा देत पालघरच्या मतदारांनी आम्हाला भरघोस मताधिक्याने
> विजयी केले. त्यानंतर मी माझ्या मतदारसंघातील सागरी, नागरी व डोंगरी भागातील
> प्रलंबित प्रश्‍न रेटून नेण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघातील अनेक मुख्य
> समस्यांना मी हात घातला असून आगामी काळात हे प्रश्‍न निश्चित मार्गी लागतील.
> माझ्या खासदार निधीचा पैसा मी दुर्गम भागातील विकासाकरिता वापरला. धानोशी
> (ता. जव्हार ) येथील गावाला मी दत्तक घेतले असून आदिवासी वस्तीकडे जाणार्‍या
> रस्त्यांच्या उभारणीवर खर्च करीत आहे. आदिवासी काढत असलेले वारली पेन्टीग हे
> जगभरात प्रसिद्ध असून ही चित्रकला पद्धत कौशल्य विकास (स्कील डेव्हलपमेंट) या
> अंतर्गत घेतल्यास देशातील अनेक आदिवासी तरुणांना रोजगाराचे दालन खुले होईल,
> असे म्हणणे मी लोकसभेत आग्रहीपणे मांडले. या सूचनेकडे सरकार सकारात्मकदृष्ट्या
> पाहात आहे.
>
> देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे नीट
> पुनर्वसन झाले नाही; प्रकल्पपिडीतांना नोकरीत समाविष्ट केले गेले नाही, याकडे
> मी सरकारचे लक्ष वेधले. मासेमारी व्यवसायातील अनेक खलाश्यांना पाकिस्तान सरकार
> पकडून तुरुंगामध्ये डांबून ठेवते. अशा मच्छीमारांची सुटका होण्यासाठी दिल्ली
> सरकारने संवाद वाढवून त्यासाठी करार करण्याची मागणी केली आहे.
>
> एकीकडे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग व दुसरीकडे अपूर्ण अवस्थेमधील
> सागरी महामार्ग असताना; या दोघांमधील १५ किलोमीटरच्या अंतरामध्ये तिसर्‍या
> मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गाची गरज काय? असा माझा प्रश्न आहे. तो मी संसदेत
> उपस्थित केला आहे. सागरी मार्ग पूर्ण करून तो दक्षिणेपर्यंत नेण्याची गरज
> असल्याचे माझे मत आहे. वाढवण, आलेवाडी याठिकाणी होऊ पाहणार्‍या बंदरांमुळे
> तारापूर अणुशक्ती केंद्राला धोका संभवत असल्याने या प्रकल्पांना माझा विरोध
> असल्याचे मी केंद्राला कळविले आहे. भूसंपादन विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर
> जव्हार-मोखाडा भागात नव्याने औद्योगिक वसाहती उभारण्याच्या प्रस्तावाचा
> पाठपुरावा मी करणार आहे. (shared by esakal)
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAEFLEeswE5NXK5UExxxKrwa806FsqOJtDQG5wvT5H3nF8_kf8A%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAEFLEeswE5NXK5UExxxKrwa806FsqOJtDQG5wvT5H3nF8_kf8A%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>



-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: chet...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2TQkmsiV%3D0ceWkNiOV5he8RVrXR_JwR-CW4qVH%2Bh7%2BF8w%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to