कोळी भाजी

 कोळी भाजीचा सण जेठ (जेष्ठ) महिन्यात साजरा करतात. पाउस पडल्या नंतर कोलीभाजी
निघाली कि गावकरी एकत्र येऊन वाघोबाची भगता (गाव पुजारी) कडून पूजा केली जाते.
जमलेले गावकरी प्रसाद वाटून खातात. तसेच गावातील पाड्या-पाड्यावर, घर घरात
सर्व लोक आपल्या कुलदेवाला दिवा लावून, शेतावरच्या देवाला सेंदूर लावून सर्व
कुटुंबातली माणसे एकत्र बसून कोलीभाजी खाण्याचा कार्यक्रम करतात. कुटुंबातली
वयस्कर व्यक्ती सर्वांच्या हातावर कोळी भाजी देवून सर्वाना उद्देशून म्हणतो
"चार महिन्यांची रात आली आहे, कोणी भांडण तंटा करू नका, शेतीची चांगली लागवड
करा, सुख दुखात एकमेकांना मदत करा, आता कोळीभाजी खावूया". वडील माणसाकडून
कोळीभाजी घेतल्या नंतर पाया पडतात आणि सर्वजन कोळीभाजी खातात. जेवण झाल्यावर
कामड नाच करतात. या दिवशी कामडी नाचला सुरवात होते. या सणाला घरातले सगळे तसेच
सगळे नातेवायिक, सगे सोयरे एकत्र येतात.तसेच या कोळीच्या सणाला नवीन लग्न करून
दिलेल्या मुलीना व जावयांना खास आमंत्रण करून बोलावले जाते, अशा प्रकारे हा सण
साजरा केला जातो.

नवीन पिढी ने हे आपले सण आणि परंपरा जपत आपल्या समाजाची सांस्कृतिक वारासेचे
जतन करणे गरजेचे आहे. सध्या आश्रम शाळेत पण एकत्रित साजरे केले जावेत या साठी
प्रयत्न केले गेले तरच पुढील पिढी पर्यंत हि आपली आदिवासी संस्कृती जपली
जायील.

आदिवासी संस्कृती जतन करून, परंपारिक सण एकत्र येउन साजरे करुन आपला समाज एक
कुटुंब हि भावना तयार करुयात

 AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in



 My family likes this exotic herbal vegetable very much! This is the first
vegetable we get in the forest after arrival of monsoon. Womenfolk of
village respectfully bring it from the forest. We welcome it with a small
function and treat it as an auspicious blessing from the mother nature. We
call it koli bhaji.






AYUSHonline team
www.adiyuva.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtcfPyCHEaYULzr05X5xknZSOz_Ns38n%3Dh9Xg%3DTd%3DBMNg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to