संथाळ हूल -हूल म्हणजे विद्रोह. सिदो  ,चांद  ,भैरो ,कान्हू हे चार मुर्मू
बंधु या विद्रोहाचे खरे शिल्पकार !साहिबगंज जिल्ह्यातील भोगनाडीह गावातील चुलू
संथाळा चे सुपुत्र !
भारताच्या उत्तर पूर्व भागात ईस्ट इंडिया कंपनी चे साम्राज्य स्थापित झाले
,आणि १७६५-६६ मध्ये बंगाल ,बिहार,उडीसा राज्यातील कर वसुलीचा अधिकार
कंपनीच्या हाती आला तर संरक्षण ,न्याय आणि दंड व्यवस्था या नवाबांच्या हाती
राहिल्या . अशा  दुहेरी शासन व्यवस्थेमुळे जनता अधिकच त्रस्त झाली होती.
कंपनीला केवळ कर वसुली करायची होती त्यांना जनतेच्या सुख दुखाशी काही लेणेदेने
नव्हते . हा काळ जनतेसाठी खूप भयावह होता ,जनतेवर इंग्रजांचे अत्याचार
दिवसेंदिवस वाढत चालले होते.
  संथाल स्त्री पुरुष रस्ते बांधणीच्या कामासाठी मजुरीवर जात होते,तेथे
त्यांना जबरदस्तीने धर्म व संस्कृती लुटली जात होती,जबरदस्तीने त्यांचे
ख्रिस्तीकरण करण्यात येत होते.  ५०%ते ५००% पर्यंत या जनतेला कर भरावा लागत
होता. यामुळे संथाळ आदिवासींमध्ये आक्रोश व संताप वाढू लागला.
हाच आक्रोश ,संताप जुन १८५५  मध्ये अशा प्रकारे बाहेर आला कि आज इतिहासात तो
संथाल हूल म्हणून प्रसिध्द आहे .
  संथालांवरील या अन्यायाविरुध्द आवाज उठवण्यास  सिदो, कान्हू,चांद ,आणि भैरो
या चार भावांनी सुरवात केली . त्यांनी लोकांना सांगितले कि,'देवी स्वयं येवून
तिने आम्हाला संथालांच्या या स्वातंत्रप्राप्तीचे नेतृत्व तुम्ही करा असे
सांगितले आहे '. 'महादेवाने आम्हाला ७ वेळा दर्शन देवून सांगितले आहे, कि
येणाऱ्या संकटांना तोंड देण्यास जनतेने तयार राहावे,  तरच स्वतंत्र  मिळू शकेल
.' या बोलण्याच्या जनतेच्या मनावर खोलवर परिणाम झाला व त्यांनी सिदो
,कान्हू,चंद ,भैरो यांना आपले नेते मानण्यास सुरवात केली . येथूनच विद्रोहाला
सुरवात झालि .
इग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सिदो ,कान्हू,चांद ,भैरो  यांनी  विविध योजना
क्लृप्त्या लढवल्या. 'जे लोक संथालांच्या या लढ्यात संथाली सेनेला अन्नाचा
पुरवठा करणार नाहीत त्यांना देशद्रोही घोषित केले जाईल व त्यांचा धान्य साठा
लुटला जाईल;  . इतकेच काय त्यांचा नारा होता कि जमीनदार , सावकार,पोलिस
,सरकारी कर्मचारी यांचा नाश होवो ."जे आम्हाला विरोध करणार त्यांचा आम्ही नाश
करू अशी त्यांनी प्रतिद्या घेतली . "
अखेर या अन्याय ,अत्याचार शोषण व स्वातंत्र्याच्या लढाईचा तो दिवस उगवलाच !३०
जून १८५५ रोजी पौर्णिमेच्या दिवशी जवळ पास १०,००० हजार संथाली आदिवासी जनता
तीर कमान  ,कोयता ,तलवार आदि शस्त्र घेवून संथाळ परगणाच्या भोगनाडीह गावात जमा
झाले व घोषणा केली कि , 'आमच्यावर कुणाची सत्ता नाही. कुणी राजा ,पोलिस व
इंग्रजांची आमच्यावर सत्ता नाही आमचे संथालांचे राज्य आजपासून स्थापित झाले
आहे ".व सिदो आणि कान्हू यांना सुबा म्हणजेच त्यांचे राजा बनवण्यात आले .
यादरम्यान एका छोट्याश्या घटनेने विद्रोहाची ठिणगी पाडली व पुढे ती वणवा बनून
पेटली.
दिघी गावाचे इंग्रज पोलिस अधिकारी व सावकार हे दोन संथाल कैद्यांना  पंचकाठी
मार्गे भागलपूर कडे घेवून जात असल्याची गुप्त खबर सिदो व कान्हू यांना लागली व
या कैद्यांना सोडवण्यासाठी ते या इंग्रज अधिकारयासमोर उभे ठाकले  , यावेळेस
त्यांना पकडून बंदी बनवण्याचे आदेश इंग्रजामार्फत देण्यात  आले. ,मात्र सिदो व
,कान्हू यांच्या सोबत आलेल्या  संथाल जनतेने जोरदार विरोध केला व या
प्रतिकारात पोलिस व सावकार मारले गेले .
येथूनच खर्या विद्रोहाला सुरवात झाली.

(संदर्भ -आदिवासी विर संपादक -जेलसिंग पावरा )
शब्दांकन -संचिता सातवी

( उर्वरित भागात या विद्रोहाचे सविस्तर विश्लेषण पहा )

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsGdqYy1nUrJ%3DeNWS2BeUPvfp-07PAQTfPb3FG8q6E1tw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to