हरसूल च्या विद्रोहानंतर राजकीय चमकुगिरी ....
टीचभर पोटाची खळगी आणि पोऱ्हां सोरांच्या भविष्याची चिंता म्हणून हरसूल परिसरातील आदिवासी समाज आपल्या मातीपासून पिंपळगाव, निफाड , येवला , नाशिक , सिन्नर , दिंडोरी ,मालेगाव आदी विकसनशील तालुक्यांच्या मातीत राबराब राबतोय ... भात आवणी संपली कि भात कापणीला परतणारा आणि भात कापणी संपली कि राब पेटवायला परतणारा आदिवासी समाज वर्षातले १० महिने असतो कुठे याचा अभ्यास केला तर त्यांचे राहण्याचे ठिकाण रस्ता ,नाका , हेच आहेत जिथे जागा मोकळी दिसेल तिथे आपला संसार थाटायचा आणि रोजंदारीसाठी कुणी न्यायला येतेय का याची वाट बघत बसायचे . रोजगारासाठी कुणी सेठ सावकार न्यायला आलाच तर गुरा ढोरांचा लिलाव करून न्यावा तसा आमचा लिलाव करून नेतात आणि १५० ते १७५ रुपयात १२ तास ढोरागत राबवतात लेकीबाळीकडे कुणी कुत्र्यागत पाहतय तर बाया बापड्यांना कुणी भुकेल्या लांडग्यांच्या नजरेने नेहाळतय अश्यातही जीव मुठीत धरून रोजचं जगणं आणि जगून सुद्धा रोज थोडं थोडं मरण ...आमच्या व्यथा आमची परिस्थिती सरकारदरबारी माहित व्हावी , आमची बाजू कुणीतरी मांडावी म्हणून आम्ही आमच्याच लोकांना आमदार खासदार केलंय पण आता ते कुठं आमचे राहिलेत साहेब झालेत ते ... गाडीच्या काचा लावून मधूनच हात दाखवीत टाटा करून निघून जात्यात आणि त्यांच्या पोटाचा वाढता “ घेर ” पाहून सरकार आमचा विकास ठरवितंय . नाशिक पासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी भागाची हि व्यथा , हरसूल हि सर्वात जुनी बाजारपेठ मात्र येथे व्यापारी तेली ,मारवाडी , वाणी आणि मुसलमान , एरव्ही या परिसराकडे फारसे कुणाचे लक्ष नव्हते मात्र मागील आठवड्याभरापासून हरसुलची ओळख देश पातळीवर गेली , कुणी आदिवासी विरुद्ध मुसलमान दंगल म्हटले , कुणी हिंदू मुसलमान दंगल म्हटले , ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने रंग देण्याचा प्रयत्न केला .... अश्या घटनांची वाट पाहणारी राजकीय मंडळी आणि या घटनांचा आधार घेत आपली चमकुगिरी दाखवणारे दिडशहाण्या लोकांनी मात्र मोठी गर्दी केली राज्यातून ,देशातून हरसुलकडे येणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढला . पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे येथे दंगल झाली मात्र त्यावर नियंत्रण देखील त्यांनीच केले मग नेत्यांचे काम काय होते येथे येण्याचे . जो तो स्वताची लाल करायला येत होता ... हरसूल गावात मी फिरलो ...स्थानिक लोक सुद्धा बाहेर दिसत नव्हते मग नेत्यांच्या मागे फिरणारी गर्दी कुठली ..? हे सर्व कार्यकर्ते देखील बाहेरून आणत होते . प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी रोजंदारीने काम करणार्या लोकांसारखे वापरले जात होते ...! येव्हडे नेते ,पुढारी , येऊन गेले ...! काय फायदा झाला हरसूल चा किंवा येथील आदिवासींचा ..... एरव्ही आदिवासी भागात कधीही कधीही न फिरणाऱ्या नेत्यांना एव्हडा पुळका आला का हर्सुलचा . या दंगलीमधून अर्थ काय काढला ...? जातीय दंगल ...? आदिवासी मुसलमान दंगल ...? हिंदू मुसलमान दंगल ...? आरे मुर्खानो ज्या भागाची मालकीच आदिवासींची आहे तिथे कशी जातीय दंगल होणार , जरा ईतिहासाची पाने चाळा ...ऐतिहासिक वास्तुसंग्राह्लय चाळा ... मग तुम्हाला समजेल आदिवासींनी आजपर्यंत कधीही दंगल केली नाही , एका वेळच्या जेवणाची चिंता आम्हाला वेळ कुठे आहे दंगली करायला ...आदिवासी संस्कृतीने , परिस्थितीने आदिवासी माणसाला दंगली करायला नाहि शिकवले , ईतिहास आहे साक्षीला आज पर्यंत आदिवासी माणसांनी विद्रोह केलाय , व्यवस्थेच्या विरोधात , अन्यायाच्या विरोधात , अत्याच्याराच्या विरोधात , राघोजीचा ईतिहास वाचा... , बिरसाचा ईतिहास ज्या पुस्तकात लिहिलाय त्या पुस्तकाची पाने चाळा.. , तंट्याचा ईतिहास अभ्यासा ...! आपल्या हक्कासाठी दिलेली आरोळी हि दंगल कशी असू शकेल ...! हरसूल परिसरात झालेली हि दंगल नव्हती हा देखील एक विद्रोहच होता ...! अन्यायाच्या विरोधात ...अत्याच्याराच्या विरोधात ...! व्यवस्थेच्या विरोधात ...! पण राजकीय लोकांनी स्वार्थासाठी आणि येथील पोलीस प्रशासनाने स्वताचे पाप लपवायला याला धार्मिक रंग देऊन जातीची पेटलेली मशाल आदिवासींच्या हातात दिली . ज्याच्या त्याच्या परीने ज्यांनी त्यांनी अर्थ लावला आणि मूळ मुद्दा दडवण्याचा प्रयत्न केला ...! आदिवासी समाज वनात राहणारा आहे पण तो वनवासी नाही ..! तो या मातीचा मूळ मालक आहे ....! राजकीय लोकांनी त्यांची चमकुगिरी थांबवावी ......! आणि या विद्रोहाला कुणीही जात धर्म असा मुलामा देऊन दंगलीच्या नावावर विकायला काढू नये हीच विनंती ...! विजयकुमार घोटे ०९६२३७०१७०९ On Sunday, July 19, 2015 at 11:41:23 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > हरसूल दंगलीचा मुख्य सूत्रधार API “ किर्तीकर ” > > हरसूल ता. त्र्यंबकेश्वर एक महत्वाची बाजारपेठ , स्वातंत्र्यपूर्वकाळात > देवाजी राउत नावाच्या क्रांतीकाराने १८ व्या शतकात इंग्रजांची लाखो रुपयांची > तिजोरी लुटून पेठ प्रांतातल्या गरीब आदिवासी जनतेला वाटली होती एके काळी > ऐतिहासिक ठिकाण असलेलेले हरसूल सध्याची मोठी बाजारपेठ आहे एक लहान तालुका > म्हटले तरी चालेल . स्थानिक आदिवासी ९५% तर ५ % व्यापारी म्हणून आलेले आणि > नंतर येथेच रहिवाशी म्हणून आदिवासींच्या मानगुटीवर बसलेले मुस्लीम ,तेली, > मारवाडी ,वाणी लोक आज या हरसूल परिसरात लोकांची करोडो रुपयांची मालमत्ता झालीय > आणि येथील आदिवासी माणूस आजही पायी आठवडे बाजाराला येतोय . आदिवासी भाग असूनही > आदिवासी संस्कृती कमी हित असून मजीद ,आणि चर्च चे वारे या परिसरात जोरात > फोफावत आहे ,अनेक ख्रिस्चन लोकांनी धर्मांतरचे दुकान सुरु केले आहे तर विश्व > हिंदू परिषद ,बजरंग दल, धर्म जागरण परिषद , यांनी आपल्या आदिवासी पोरांना > हाताशी धरून हिंदू धर्म पेरायला सुरुवात केलीय त्यातूनच बरेच कट्टर हिंदू तरुण > आदिवासी घराघरात दिसायला लागलेत मूळ मुद्दा मागच्या आठवड्यात येथे झालेली दंगल > ,काल हरसूल परिसरात फेरफटका मारला स्थानिक लोकांशी चर्चा केली , येथील पोलीस > स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना भेटलो . ज्या > खुनाच्या गुन्ह्यामुळे दंगल उसळी त्या गावात गेलो खर तर हि जातीय दंगल > म्हणताच येणार नाही मात्र येथे कर्तव्यावर हजर असलेले API “ किर्तीकर ” यांचा > मोठा हात असून हेच त्या दंगलीला कारणीभूत आहेत हे प्रत्येकजण सांगतो . हरसूल > गाव एक मोठी बाजारपेठ तर हरसूल ला लागून सर्व गावे आदिवासी आहेत हरसूल परिसर > हा अवैध्य धंद्यांची खाण , बरोबरच “ किर्तीकर ” नावाचा व्हायरस या परिसरात > आल्यापासून मारामारी करा ,खून करा आणि पैसे देऊन सुटा असे बोधवाक्य झाले > त्यातून गुन्हेगारी अधिक बळावली हरसूल परिसरात जवळपास २५ देशी दारूचे गुत्ते > आहेत ते सर्व अवैध्य ,एका गुत्यावाल्याने सांगितले कि २० हजार रुपये महिन्याला > हप्ता द्यावा लागतो. म्हणजे ५ लाख रुपये महिना दारू मधून शिवाय येथे चालणारी > अवैध्य वाहतूक येथे जवळपास १०० खाजगी वाहने चालतात ,एका गाडीवाल्याकडून महिना > ४ ते ५ हजार समजा हजार धरला तरी ४ लाख ,हॉटेल व्यावसायिक यांचेकडून प्रत्येकी > ३ ते ४ हजार रुपये म्हणजे १ लाख रुपये ,शिवाय साप्ताहिक मटका , जुगार यातून > महिना २ ते ३ लाख व हरसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अश्याच अवैध्य > धंद्यांतून ३ लाख रुपये महिना . म्हणजे पैसे कमावण्याच्या बाबतीत सहपोलीस > निरीक्षक किर्तीकर यांची कमाई १५ लाख रुपये , नावाप्रमाणेच कीर्ती करणारे > किर्तीकर यांच्या किर्तीमधून दंगल घडली अशी कि , भगिरत चौधरी २० याचा मृतदेह > जुबेर शेख याच्या विहिरीत सापडला , पंचनामा करून शेवविच्छेदन करून त्याचा > रिपोर्ट बदलला व आकस्मित मृत्यूची नोंद केली. खून होत असतानी प्रत्यक्ष > पाहणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीने तसा जबाब दिला तरी मात्र जुबेर शेख कडून आर्थिक > देवाणघेवाण झाल्याने किर्तीकर यांनी चौधरीच्या नातेवाईकांना धमकावून जबाब > नोंदवले नाहीत . ३/४ दिवस भगीरत च्या नातेवाईकांनी विनंती करूनही गुन्हा नोंद > होत नाही म्हणून परिसरातील सर्व आदिवासी गावांनी एकत्र येत मोर्चा काढला , खरे > तर मोर्चा येथील सरकारी डॉक्टर आणि पोलीस यांचे विरोधात शांततेच्या मार्गाने > निघाला होता मात्र “ किर्तीकर” ने रात्री साउथ चा अक्शन चित्रपट पाहिलेला > असावा त्यातून बोध घेत मोर्चेकरी लोकांना खाक्या दाखवायला म्हणून पोलीस बळाचा > वापर केला , मग मात्र जमावाने उग्र रूप धारण करत आपला आदिवासी बाणा दाखवला > समोर येईल त्या पोलिसाला धोपटून काढले हि धुम्मचक्री बराच वेळ सुरु असल्याचे > प्रत्यक्ष दर्शी सांगतात तसे whaatsaap व्हिडीओ मी जमा केलेत . किर्तीकरने > केलेल्या फायरिंग मध्ये रामदास बुधर या तरुणाचा मृत्यु झाल्याने जमाव संतप्त > झाला व दुकानांची मोडतोड केली . किर्तीकर हा साक्षात लाचखोरीचा पुतळा आहे हे > यावरून लक्षात येते .पैशाची लालच न ठेवता इमानदारीत काम केले असते तर हरसूल वर > हि वेळ आलीच नसती . किर्तीकर येथे आल्यापासून ६ ते सात खुनाचे गुन्हे झालेत > मात्र एकही गुन्ह्यांचा तपास अध्याप लागला नाही संशयितांना चौकशी करून सोडून > दिले त्याचा जाबजबाब देखील पोलीस ठाण्यात नाही . म्हणजे खून करा आणि पैसे द्या > त्यात किर्तीकर सोबत काम करणारे कर्मचारी देखील चिरीमिरी घेण्यात पटाईत झाले > आहेत . हरसूल ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी सांगतो कि या पोलीस ठाण्यात एव्हडा > लाचखोर अधिकारी कधीच आलेला नसेल . लाचखोर भाडखावू पोलीस अधिकारी किर्तीकर याला > आपल्या कर्तव्याची जाणीव कधी होणार कुणास ठावूक , उद्या व्यापारी संघटना > नुकसानभरपाईसाठी मोर्चा काढत आहेत , आज पर्यंत ज्या आदिवासींच्या जीवावर मोठे > झाले त्यांच्या विरोधात मोर्चा काढतांना या लोकांनी थोडी लाज बाळगावी शिवाय हा > मोर्चा प्रशासनाच्या विरोधात असेल तर मग हे सर्व दुकानदार काळ्या बाजाराने > आणलेले रेशनिंग तांदूळ , गहू ,साखर , तेल अश्या वस्तू विकून त्याबदल्यात > किर्तीकर ला हप्ते दयायचे याची आठवण असुद्या ... काल पूर्ण परिसर फिरलो , फोटो > सोबत ज्या ज्या व्यक्तींशी चर्चा केली त्या त्या व्यक्तींचे व्हिडीओ पण शूटिंग > करून ठेवले अर्थात आपले शूटिंग केले जातेय याची भनक या लोकांना नव्हती नाहीतर > हे सर्व उघड बोलले नसते , किर्तीकर सारखे लाचखोर आणि निर्ल्लज पोलीस अधिकारी > ग्रामीण आदिवासी भागात आहेत म्हणून आदिवासी माणूस आज नक्षलवादी म्हणून ओळखला > जातोय , आमची शांतता या लोकांनीच भंग केलीय , आदिवासी माणूस कधी पेटत नाही आणि > पेटला तर विझत नाही हेच हरसूल दंगलीत दिसते , नाहीतर ग्रामीण आदिवासी भागात एक > वेळच्या रोजगाराची मारामारी दंगल करायला वेळ आहे कुणाला ....! किर्तीकर वर > योग्य ती कारवाई व्हावी ...न्यायालयीन चौकशी सुरु आहे पण हल्ली न्याय पण विकत > मिळतो . > विजयकुमार घोटे > ०९६२३७०१७०९ > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7c583858-1163-4598-a635-665ad75db4fe%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

