Ata dhangarancha mudda punha chalu zala kai karaych ....apan
On 20-Jul-2015 10:06 PM, "AYUSH | adivasi yuva shakti" <ay...@adiyuva.in>
wrote:

> हरसूल च्या विद्रोहानंतर राजकीय चमकुगिरी ....
>
> टीचभर पोटाची खळगी आणि पोऱ्हां सोरांच्या भविष्याची चिंता म्हणून हरसूल
> परिसरातील आदिवासी समाज आपल्या मातीपासून पिंपळगाव, निफाड , येवला , नाशिक ,
> सिन्नर , दिंडोरी ,मालेगाव आदी विकसनशील तालुक्यांच्या मातीत राबराब राबतोय
> ... भात आवणी संपली कि भात कापणीला परतणारा आणि भात कापणी संपली कि राब
> पेटवायला परतणारा आदिवासी समाज वर्षातले १० महिने असतो कुठे याचा अभ्यास केला
> तर त्यांचे राहण्याचे ठिकाण रस्ता ,नाका , हेच आहेत जिथे जागा मोकळी दिसेल
> तिथे आपला संसार थाटायचा आणि रोजंदारीसाठी कुणी न्यायला येतेय का याची वाट बघत
> बसायचे . रोजगारासाठी कुणी सेठ सावकार न्यायला आलाच तर गुरा ढोरांचा लिलाव
> करून न्यावा तसा आमचा लिलाव करून नेतात आणि १५० ते १७५ रुपयात १२ तास ढोरागत
> राबवतात लेकीबाळीकडे कुणी कुत्र्यागत पाहतय तर बाया बापड्यांना कुणी भुकेल्या
> लांडग्यांच्या नजरेने नेहाळतय अश्यातही जीव मुठीत धरून रोजचं जगणं आणि जगून
> सुद्धा रोज थोडं थोडं मरण ...आमच्या व्यथा आमची परिस्थिती सरकारदरबारी माहित
> व्हावी , आमची बाजू कुणीतरी मांडावी म्हणून आम्ही आमच्याच लोकांना आमदार
> खासदार केलंय पण आता ते कुठं आमचे राहिलेत साहेब झालेत ते ... गाडीच्या काचा
> लावून मधूनच हात दाखवीत टाटा करून निघून जात्यात आणि त्यांच्या पोटाचा वाढता “
> घेर ” पाहून सरकार आमचा विकास ठरवितंय . नाशिक पासून अवघ्या ६० किलोमीटर
> अंतरावर असलेल्या आदिवासी भागाची हि व्यथा , हरसूल हि सर्वात जुनी बाजारपेठ
> मात्र येथे व्यापारी तेली ,मारवाडी , वाणी आणि मुसलमान , एरव्ही या परिसराकडे
> फारसे कुणाचे लक्ष नव्हते मात्र मागील आठवड्याभरापासून हरसुलची ओळख देश
> पातळीवर गेली , कुणी आदिवासी विरुद्ध मुसलमान दंगल म्हटले , कुणी हिंदू
> मुसलमान दंगल म्हटले , ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने रंग देण्याचा
> प्रयत्न केला .... अश्या घटनांची वाट पाहणारी राजकीय मंडळी आणि या घटनांचा
> आधार घेत आपली चमकुगिरी दाखवणारे दिडशहाण्या लोकांनी मात्र मोठी गर्दी केली
> राज्यातून ,देशातून हरसुलकडे येणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढला . पोलीस
> प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे येथे दंगल झाली मात्र त्यावर नियंत्रण देखील
> त्यांनीच केले मग नेत्यांचे काम काय होते येथे येण्याचे . जो तो स्वताची लाल
> करायला येत होता ... हरसूल गावात मी फिरलो ...स्थानिक लोक सुद्धा बाहेर दिसत
> नव्हते मग नेत्यांच्या मागे फिरणारी गर्दी कुठली ..? हे सर्व कार्यकर्ते देखील
> बाहेरून आणत होते . प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी रोजंदारीने काम
> करणार्या लोकांसारखे वापरले जात होते ...! येव्हडे नेते ,पुढारी , येऊन गेले
> ...! काय फायदा झाला हरसूल चा किंवा येथील आदिवासींचा ..... एरव्ही आदिवासी
> भागात कधीही कधीही न फिरणाऱ्या नेत्यांना एव्हडा पुळका आला का हर्सुलचा . या
> दंगलीमधून अर्थ काय काढला ...? जातीय दंगल ...? आदिवासी मुसलमान दंगल ...?
> हिंदू मुसलमान दंगल ...? आरे मुर्खानो ज्या भागाची मालकीच आदिवासींची आहे तिथे
> कशी जातीय दंगल होणार , जरा ईतिहासाची पाने चाळा ...ऐतिहासिक वास्तुसंग्राह्लय
> चाळा ... मग तुम्हाला समजेल आदिवासींनी आजपर्यंत कधीही दंगल केली नाही , एका
> वेळच्या जेवणाची चिंता आम्हाला वेळ कुठे आहे दंगली करायला ...आदिवासी
> संस्कृतीने , परिस्थितीने आदिवासी माणसाला दंगली करायला नाहि शिकवले , ईतिहास
> आहे साक्षीला आज पर्यंत आदिवासी माणसांनी विद्रोह केलाय , व्यवस्थेच्या
> विरोधात , अन्यायाच्या विरोधात , अत्याच्याराच्या विरोधात , राघोजीचा ईतिहास
> वाचा... , बिरसाचा ईतिहास ज्या पुस्तकात लिहिलाय त्या पुस्तकाची पाने चाळा.. ,
> तंट्याचा ईतिहास अभ्यासा ...! आपल्या हक्कासाठी दिलेली आरोळी हि दंगल कशी असू
> शकेल ...! हरसूल परिसरात झालेली हि दंगल नव्हती हा देखील एक विद्रोहच होता
> ...! अन्यायाच्या विरोधात ...अत्याच्याराच्या विरोधात ...! व्यवस्थेच्या
> विरोधात ...! पण राजकीय लोकांनी स्वार्थासाठी आणि येथील पोलीस प्रशासनाने
> स्वताचे पाप लपवायला याला धार्मिक रंग देऊन जातीची पेटलेली मशाल आदिवासींच्या
> हातात दिली . ज्याच्या त्याच्या परीने ज्यांनी त्यांनी अर्थ लावला आणि मूळ
> मुद्दा दडवण्याचा प्रयत्न केला ...! आदिवासी समाज वनात राहणारा आहे पण तो
> वनवासी नाही ..! तो या मातीचा मूळ मालक आहे ....! राजकीय लोकांनी त्यांची
> चमकुगिरी थांबवावी ......! आणि या विद्रोहाला कुणीही जात धर्म असा मुलामा देऊन
> दंगलीच्या नावावर विकायला काढू नये हीच विनंती ...!
>
>
> विजयकुमार घोटे
> ०९६२३७०१७०९
>
>
> On Sunday, July 19, 2015 at 11:41:23 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>>
>> हरसूल दंगलीचा मुख्य सूत्रधार API “ किर्तीकर ”
>>
>> हरसूल ता. त्र्यंबकेश्वर एक महत्वाची बाजारपेठ , स्वातंत्र्यपूर्वकाळात
>> देवाजी राउत नावाच्या क्रांतीकाराने १८ व्या शतकात इंग्रजांची लाखो रुपयांची
>> तिजोरी लुटून पेठ प्रांतातल्या गरीब आदिवासी जनतेला वाटली होती एके काळी
>> ऐतिहासिक ठिकाण असलेलेले हरसूल सध्याची मोठी बाजारपेठ आहे एक लहान तालुका
>> म्हटले तरी चालेल . स्थानिक आदिवासी ९५% तर ५ % व्यापारी म्हणून आलेले आणि
>> नंतर येथेच रहिवाशी म्हणून आदिवासींच्या मानगुटीवर बसलेले मुस्लीम ,तेली,
>> मारवाडी ,वाणी लोक आज या हरसूल परिसरात लोकांची करोडो रुपयांची मालमत्ता झालीय
>> आणि येथील आदिवासी माणूस आजही पायी आठवडे बाजाराला येतोय . आदिवासी भाग असूनही
>> आदिवासी संस्कृती कमी हित असून मजीद ,आणि चर्च चे वारे या परिसरात जोरात
>> फोफावत आहे ,अनेक ख्रिस्चन लोकांनी धर्मांतरचे दुकान सुरु केले आहे तर विश्व
>> हिंदू परिषद ,बजरंग दल, धर्म जागरण परिषद , यांनी आपल्या आदिवासी पोरांना
>> हाताशी धरून हिंदू धर्म पेरायला सुरुवात केलीय त्यातूनच बरेच कट्टर हिंदू तरुण
>> आदिवासी घराघरात दिसायला लागलेत मूळ मुद्दा मागच्या आठवड्यात येथे झालेली दंगल
>> ,काल हरसूल परिसरात फेरफटका मारला स्थानिक लोकांशी चर्चा केली , येथील पोलीस
>> स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना भेटलो . ज्या
>> खुनाच्या गुन्ह्यामुळे  दंगल उसळी त्या गावात गेलो  खर तर हि जातीय दंगल
>> म्हणताच येणार नाही मात्र येथे कर्तव्यावर हजर असलेले API  “ किर्तीकर ” यांचा
>> मोठा हात असून हेच त्या दंगलीला कारणीभूत आहेत हे प्रत्येकजण सांगतो . हरसूल
>> गाव एक मोठी बाजारपेठ तर हरसूल ला लागून सर्व गावे आदिवासी आहेत हरसूल परिसर
>> हा अवैध्य धंद्यांची खाण , बरोबरच “ किर्तीकर ” नावाचा व्हायरस या परिसरात
>> आल्यापासून मारामारी करा ,खून करा आणि पैसे देऊन सुटा असे बोधवाक्य झाले
>> त्यातून गुन्हेगारी अधिक बळावली हरसूल परिसरात जवळपास २५ देशी दारूचे गुत्ते
>> आहेत ते सर्व अवैध्य ,एका गुत्यावाल्याने सांगितले कि २० हजार रुपये महिन्याला
>> हप्ता द्यावा लागतो. म्हणजे ५ लाख रुपये महिना दारू मधून शिवाय येथे चालणारी
>> अवैध्य वाहतूक येथे जवळपास १०० खाजगी वाहने चालतात ,एका गाडीवाल्याकडून महिना
>> ४ ते ५ हजार समजा  हजार धरला तरी ४ लाख ,हॉटेल व्यावसायिक यांचेकडून प्रत्येकी
>> ३ ते ४ हजार रुपये म्हणजे १ लाख रुपये ,शिवाय साप्ताहिक मटका , जुगार यातून
>> महिना २ ते ३ लाख व हरसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अश्याच अवैध्य
>> धंद्यांतून ३ लाख रुपये महिना . म्हणजे पैसे कमावण्याच्या बाबतीत सहपोलीस
>> निरीक्षक किर्तीकर यांची कमाई १५ लाख रुपये , नावाप्रमाणेच कीर्ती करणारे
>> किर्तीकर यांच्या किर्तीमधून दंगल घडली अशी कि , भगिरत चौधरी २० याचा मृतदेह
>> जुबेर शेख याच्या विहिरीत सापडला , पंचनामा करून शेवविच्छेदन करून त्याचा
>> रिपोर्ट बदलला व आकस्मित मृत्यूची नोंद केली. खून होत असतानी प्रत्यक्ष
>> पाहणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीने तसा जबाब दिला तरी मात्र जुबेर शेख कडून आर्थिक
>> देवाणघेवाण झाल्याने किर्तीकर यांनी चौधरीच्या नातेवाईकांना धमकावून जबाब
>> नोंदवले नाहीत . ३/४ दिवस भगीरत च्या नातेवाईकांनी विनंती करूनही गुन्हा नोंद
>> होत नाही म्हणून परिसरातील सर्व आदिवासी गावांनी एकत्र येत मोर्चा काढला , खरे
>> तर मोर्चा येथील सरकारी डॉक्टर आणि पोलीस यांचे विरोधात शांततेच्या मार्गाने
>> निघाला होता मात्र “ किर्तीकर” ने रात्री साउथ चा अक्शन चित्रपट पाहिलेला
>> असावा त्यातून बोध घेत मोर्चेकरी लोकांना खाक्या दाखवायला म्हणून पोलीस बळाचा
>> वापर केला , मग मात्र जमावाने उग्र रूप धारण करत आपला आदिवासी बाणा दाखवला
>> समोर येईल त्या पोलिसाला धोपटून काढले हि धुम्मचक्री बराच वेळ सुरु असल्याचे
>> प्रत्यक्ष दर्शी सांगतात  तसे whaatsaap व्हिडीओ मी जमा केलेत . किर्तीकरने
>> केलेल्या फायरिंग मध्ये रामदास बुधर या तरुणाचा मृत्यु झाल्याने जमाव संतप्त
>> झाला व दुकानांची मोडतोड केली . किर्तीकर हा साक्षात लाचखोरीचा पुतळा आहे हे
>> यावरून लक्षात येते .पैशाची लालच न ठेवता इमानदारीत काम केले असते तर हरसूल वर
>> हि वेळ आलीच नसती . किर्तीकर येथे आल्यापासून ६ ते सात खुनाचे गुन्हे झालेत
>> मात्र एकही गुन्ह्यांचा तपास अध्याप लागला नाही संशयितांना चौकशी  करून सोडून
>> दिले त्याचा जाबजबाब देखील पोलीस ठाण्यात नाही . म्हणजे खून करा आणि पैसे द्या
>>  त्यात किर्तीकर सोबत काम करणारे कर्मचारी देखील चिरीमिरी घेण्यात पटाईत झाले
>> आहेत . हरसूल ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी सांगतो कि या पोलीस ठाण्यात एव्हडा
>> लाचखोर अधिकारी कधीच आलेला नसेल . लाचखोर भाडखावू पोलीस अधिकारी किर्तीकर याला
>> आपल्या कर्तव्याची जाणीव कधी होणार कुणास ठावूक , उद्या व्यापारी संघटना
>> नुकसानभरपाईसाठी  मोर्चा काढत आहेत , आज पर्यंत ज्या आदिवासींच्या जीवावर मोठे
>> झाले त्यांच्या विरोधात मोर्चा काढतांना या लोकांनी थोडी लाज बाळगावी शिवाय हा
>> मोर्चा प्रशासनाच्या विरोधात असेल तर मग हे सर्व दुकानदार काळ्या बाजाराने
>> आणलेले रेशनिंग तांदूळ , गहू ,साखर , तेल अश्या वस्तू विकून त्याबदल्यात
>> किर्तीकर ला हप्ते दयायचे याची आठवण असुद्या ... काल पूर्ण परिसर फिरलो , फोटो
>> सोबत ज्या ज्या व्यक्तींशी चर्चा केली त्या त्या व्यक्तींचे व्हिडीओ पण शूटिंग
>> करून ठेवले अर्थात आपले शूटिंग केले जातेय याची भनक या लोकांना नव्हती नाहीतर
>> हे सर्व उघड बोलले नसते , किर्तीकर सारखे लाचखोर आणि निर्ल्लज पोलीस अधिकारी
>> ग्रामीण आदिवासी भागात आहेत म्हणून आदिवासी माणूस आज नक्षलवादी म्हणून ओळखला
>> जातोय , आमची शांतता या लोकांनीच भंग केलीय , आदिवासी माणूस कधी पेटत नाही आणि
>> पेटला तर विझत नाही हेच हरसूल दंगलीत दिसते , नाहीतर ग्रामीण आदिवासी भागात एक
>> वेळच्या रोजगाराची मारामारी दंगल करायला वेळ आहे कुणाला ....! किर्तीकर वर
>> योग्य ती कारवाई व्हावी ...न्यायालयीन चौकशी सुरु आहे पण हल्ली न्याय पण विकत
>> मिळतो .
>>  विजयकुमार घोटे
>>  ०९६२३७०१७०९
>>
>  --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7c583858-1163-4598-a635-665ad75db4fe%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7c583858-1163-4598-a635-665ad75db4fe%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJ36add9KPkYC2F2AnVjSCHG_tUBYD094EH5%2B5q17D-aeZijNg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to