mahiti baddal dhanyewad Daada 2017-06-03 0:54 GMT+05:30 Warli Painting <[email protected]>:
> *|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मे २०१७ ||* > > जोहार ! > आज पर्यावरण, जैव वैविध्य, नैसर्गिक संसाधने, स्वावलंबी पणा, मानवी मूल्य जतन > करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. आणि > गेल्या हजारो वर्षा पासून जगभरातील आदिवासी समुदाय हे सगळे सहज दैनंदिन > जीवनशैलीत प्रत्येक्ष जगतो आहे, त्याचे जतन व संवर्धन करून आपल्या ग्रहाच्या > उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देवूया ! > > एके काळाचा स्वालंबी असलेला आदिवासी समजा अगदी नाजूक वळणावर आहे. पारंपारिक > ज्ञान, सांस्कृतिक संपदा, स्वायत्त अर्थव्यवस्था मजबुतीकरणाची त्वरित गरज > लक्षात घेता समाजातूनच पुढाकार घेणारी व्यवस्था तयार करण्याच्या हेतून > युवकांनी २००७ पासून सोशियल नेट्वर्किंग द्वारे प्रयत्न चालू केले. २०११ साली > संस्था म्हणून नोंदणी केली, आणि सध्या आपल्या सहकार्याने कार्य चालू आहे. > युवकांची उर्जा, ज्ञान, कौशल्य, एकत्रित रित्या सकारात्मक आणि रचनात्मक > कार्यासाठी उपयोगात आणून आदिवासी सशक्तीकरण विषयी जागरूकते साठी आयुश > प्रयत्नशील. > > आपण पारंपरिक ज्ञान जतन करून आर्थिक स्वावलंबन मजबुतीसाठी रोजगार निर्मिती चे > उपक्रम (आदिवासी कला जतन - वारली चित्रकला) राबवतो आहोत, त्या विषयी माहिती. > चित्र काढण्यासाठी गेरू (लाल माती), तांदळाचे पीठ, पाणी वापरले जाते. अगणित > पिढ्यानपासून जतन केलेले हे ज्ञान फक्त चित्रा पुरते मर्यादित न ठेवता सामाजिक > जीवन, शाश्वत विकासाला आदर्श दिशा म्हणून त्या विषयी जागरूकता आणि विविध कल्पक > प्रयत्नातून रोजगार निर्मिती चे प्रयत्न चालू आहेत. > > *मार्गदर्शक तत्व* - > माती (लाल माती, गेरू – सांस्कृतिक ओळख) : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा, > पारंपरिक ज्ञान जतन करून या विषयी जागरूकता करून प्रसार करणे > पाणी (तंत्रज्ञान आणि गती) : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास करून > स्पर्धात्मकता वाढवणे > चावूल (उर्जा आणि स्वावलंबन) : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक > स्वावलंबन मजबूत करणे > > या महिन्यातील काही घडामोडी उदाहरण म्हणून आपल्या माहिती साठी > > [अदिकला] > *१) पॅरिस येथे भारतीय आदिवासी कला प्रदर्शन - वारली चित्रकला* : गंजाड येथील > नामवंत, हुशार, मेहनती बंधू तुषार आणि मयूर वायेडा हे सध्या पॅरिस येथील > प्रदर्शनात वारली चित्रकला विषयी जागरूकता करत आहेत, हे प्रदर्शन १९ जून > पर्यंत चालणार आहे. आताच ते जपान येथील पारदर्शनात पण सहभागी झाले होते. > आपल्या परिचयात कुणी पॅरिस परिसरात असल्यास जरूर भेट द्यायला सांगावे. ठिकाण : > Salon Du Patheon > > *२) जर्मनी येथे वारली चित्रकलेचे प्रदर्शन* - गेल्या कित्त्येक वर्ष पासून > वारली चित्रकलेच्या आकर्षणामुळे भारतात येत असलेले जर्मनी चे निवृत्त > प्राचार्य लवकरच जर्मनी येथे वारली चित्रकलेचे प्रदर्शन भरवत आहेत, या पूर्वी > हि त्यांनी संजय दा यांची चित्रांचे प्रदर्शन जर्मनीत भरवले होते. या वेळेस ३ > कलाकार जर्मनी ला जाणार आहेत (सविस्तर माहिती कळविण्यात येईल) > > ३) *CSR उपक्रम मुंबई येथे प्राथमिक चर्चा बैठक* : भारतीय राष्ट्रीय भुगतान > निगम यांच्या मुंबई येथील कार्यालयात उपक्रम विषयी प्राथमिक प्रस्थाव सादरीकरण > बैठक मुंबईच्या कार्यालयात झाली. सध्या प्राथमिक प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. > ऑगस्ट मध्ये पुढील उच्च स्थरीय बैठक होणार आहे त्यात निर्णय होईल. जर हा > प्रस्थाव मान्य झाल्यास ३ वर्षासाठी रोजगार निर्मितीच्या उपक्रमासाठी आयुश ला > सहकार्य दिले जणार आहे > > *४) प्रदर्शन : वस्त्र मंत्रालया च्या भौगोलिक उपदर्शनी चे दिल्ली येथे > प्रदर्शन* - > प्रथमच वस्त्र मंत्रालयाच्या टेक समिती (“TEXTILES COMMITTEE”) तर्फे > देशभरातील नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनाचे प्रदर्शन १ ते १५ मे दरम्यान दिल्ली > येथे दिल्ली हाट येथे आयोजित करण्यात आले होते. आयुश तर्फे या प्रदर्शनात ४ > कलाकार सहभागी झाले होते. राजेश दा रडे (आलोंडे, विक्रमगड तालुका), जाणू दा > रावते (रायतली, तालुका डहाणू), विजय दा वाडू (गांजाड, तालुका डहाणू), कमलेश दा > धुलसाडा (गोखाडी) सहभागी झाले होते. > > *५)राष्ट्रीय कार्यशाळा : “भौगोलिक उपदर्शनी कायद्या अंतर्गत बौधिक संपदा > विसेषतः वस्त्र आणि कलाकृती यांचे संरक्षण” या विषयावर दिल्ली येथे राष्ट्रीय > कार्यशाळा*– दिल्ली येथील कान्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया च्या सभागृहात ५ ते ६ > मे रोजी “TEXTILES COMMITTEE” तर्फे आयोजित भौगोलिक उपदर्शनी विषयावर तसेच > संबधित विविध तांत्रिक बाजू आणि विविध विषयवार मार्गदर्शन केले. आदिवासी > समाजातील पारंपारिक ज्ञान आणि त्यातून आर्थिक स्वावलंबन सशक्तीकरण चे प्रयत्न > अधिक प्रभावी बनविण्य करिता या कार्यशाळेत आयुश तर्फे सचिन सातवी आणि डॉ सुनिल > पऱ्हाड सहभागी झाले होते. कार्यशाळेचे उदघाटन वस्त्र मंत्रायलच्या केंद्रीय > मंत्री स्मृती झुबीन इराणी, केंद्रीय राज्य मंत्री अजय तमता, सचिव रश्मी > वर्मा, अतिरिक्त सचिव पुष्पा सुब्रमणियन, विकास आयुक्त वस्त्र/हस्तकला अलोक > कुमार, वस्त्र समिती सचिव अजित चव्हाण यांच्या उपस्थित कार्यशाळेची सुरवात > झाली. या क्षेत्रातील विविध अनुभवी आणि तज्ञ यांचे विविध विषयावर सविस्तर > मार्गदर्शन झाले. > प्रश्नोत्तर सेशन दरम्यान आयुश तर्फे पारंपरिक ज्ञान जतन करण्याची आवश्यकता > आणि बौद्धिक संपदा जतन करण्यासाठी चे आदिवासी युवकांचे प्रयत्न (वारली > चित्रकलेचे भौगोलिक उपदर्शन नोंदणी) यांना शासनाचा उदासीन रिस्पॉन्स (शासनाची > कोणतीही मदत नाही) मिळाल्याची खंत व्यक्त करून, अशा पारंपरिक ज्ञान जतन व > रोजगार निर्मिती साठी शासकिय स्थरावर अधिक प्रभावी उपाय योजना आणि अंमलबजावणी > होण्याची अपेक्षा मांडली. > > कार्यशाळेत झालेले विषय > Technical Session I – Legal Framework & Registration Process > Technical Session II – Promotion and Marketing GI Products > Technical Session III – Quality Assurance of GI Marked Products > Technical Session IV – Raising Awareness and strengthening enforcements > Technical Session V – Activation of Producer groups and take benefits of > GI Registration > > *६) महिला विशेष* - > परंपरागत आदिवासी समाज महिला सशक्तीकरण किंवा स्त्री पुरुष समानता या करिता > आदर्श मानले जाते. पण सध्या बदलत चाललेल्या (इत्तारांचे अंधानुकरण) घडामोडी > मुळे समाजात असलेले स्त्री चे महत्व या विषयी पुन्हा जागरूकता करण्याचे > प्रयत्न होणे गरजेचे आहे. सुयीन, सवासीन, धवलेरी, कऱ्हवली, इत्यादींचे > सांस्कृतिक महत्व सोबत महिलांचा सामाजिक कार्यात सहभाग, आर्थिक सशक्तीकरण या > साठी एक नवीन उप्रकम चालू करतो आहोत. > ज्यांना कुणाला पिशवी शिवणे, पर्स शिवणे, वस्तूवर चित्र काढणे, कपड्यावर > चित्र काढणे, कागदाच्या वस्तू बनवणे, सोंगे बनवणे, बांबूच्या वस्तू बनवणे, > गवताच्या शोभिवंत वस्तू, टोपी, संगीत साहित्य, पारंपरिक खेळाचे साहित्य, > ग्रीटिंग कार्ड, पत्रिका, शुभेच्छा पत्र, भिंतीवर चित्र काढणे, इत्यादी > कार्याची आवड आहे आणि त्यात रोजगार करू इच्छितात अश्या निवडक ५० महिलांचा चा > गट बनवून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क > करून नाव नोंदणी करावी, आपल्या संपर्कातल्या कलाकारांना कळवावे. > > ७) *सुवास ट्रस्ट साडी चित्रीकरण प्रकल्प* - सुवास ट्रस्ट तर्फे साडीवर > चित्र काढण्यासाठी चर्चा पूर्ण झाली प्रायोगिक तत्वावर २ नमुने संजय दा पऱ्हाड > करत आहेत, त्यानुसार सविस्तर चर्चा करण्यात येईल. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास > कोईंबतूर, सुरत, पश्चिम बंगाल येथून सिल्क आणि कॉटन च्या साड्या > चित्रीकरणासाठी पाठवल्या जातील. ट्रस्ट ची टीम लवकरच डहाणू ला भेट देऊन पुढील > औपचारीकता पूर्ण करतील. > > ८) *बेंगलोर येथील हॉटेल चेन ला वारली चित्र सजावट हवी आहे* - प्राथमिक > चर्चा चालू आहे, त्यांना त्यांच्या चेन मध्ये असलेल्या हॉटेल्स मध्ये वारली > चित्र हवी आहेत. सध्या काही नमुना चित्रे पाठवली आहेत. यशस्वी झाल्यास एकत्रित > चित्र बनविण्यासाठी काम उपलब्ध होईल > > ९) *चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया* > वारली चित्र/आदिवासी कलाकृती विक्री साठी आपले स्वतःचे संकेत स्थळ आहेच ( > www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी > अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही- > > (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , > एक्स्पोर्ट्स इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, > artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, > theartbazaar.in, BuffyFish, Unexplora, Puro Kraft, हस्त वेमा. ->> यादी > आणखीन वाढते आहे. > (आवश्यक निधी अभावी warlikala.com या ई कॉमर्स वेबसाईट चे नूतनीकरण न > केल्याने सध्या बंद आहे. ) > > *१०) आयुश संचय निधीसंकलन आणि सहकार्य* : > - आयुश ची डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC class ३) २ वर्ष मर्यादा > बनविण्यासाठी अभिजित पिलेना यांनी आर्थिक सहकार्य केले > - वारली चित्र वस्तूंची माहिती B-B संबंध वाढविण्यासाठी इंडिया मार्ट वर > सशुल्क १ महिन्याचे सभासदत्व साठी संजय दा पऱ्हाड यांनी सहकार्य केले > - मुंबई अंधेरी येथील कलाकार आणि वेबसाईट बनवणारे जाहिद शेख यांनी वारली > चित्रकलेची वेब साईट डिझाईन करून देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. सध्या या > विषयी सविस्तर चर्चा चालू आहे > - टोरोंटो - कॅनडा येथून मंगेश मोकाशी जे बौद्धिक संपदा कायदा कंपनीत नोकरी > करीत आहेत, त्यांनी विदेशात होणाऱ्या अनधिकृत वारली चित्रकला कलाकृती ना > कायदेशीर नोटीस पाठविण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे, सविस्तर > चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येईल > - मुंबई येथून फ्री प्रेस मधून जानवी पाल या महाराष्ट्रातील कला आणि संस्कृती > जतन या विषयावर लेख लिहत आहेत त्यात वारली चित्र संस्कृती बद्दल > प्रतिक्रियांसाठी मुलाखत घेतली > > ११) *सहकार्य आणि सहभाग*: > सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने > सहभागी होवू शकता. ओन लायीन : मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, नवीन आयडिया > देणे, जाहिरात करणे > तांत्रिक सहकार्य : चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर करणे > उपक्रम सहभाग व दायित्व : प्रत्येक्ष मार्गदर्शन, उपक्रमात स्वयंसेवक म्हणून > सहभागी होणे, उपक्रमाचे नेतृत्व करणे, > ग्रामीण संपर्क : नवीन कलाकारांना जोडणे, युवाना मार्गदर्शन, संपर्क वाढवणे, > आर्थिक साहाय्य : वर्गणी देवून सभासद होणे, वार्षिक/मासिक स्वरुपात आयुश संचय > निधी मध्ये संकलन करणे, आर्थिक सहकार्य कारानार्यासोबत संपर्क करून देणे > > *#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* : > https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli > > आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.join.adiyuva.in) > नोंदणी करून सहभागी होवू शकता. > > आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक > जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना प्रोत्साहन मिळू > शकेल. *"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच > आयुश चा उद्देश आहे. समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेवून खारीचा वाटा उचलयची > सवय ला प्रोत्साहन देवूया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ वृत्तीने > समाजाच्या हिता साठी एकत्रित आणि पुरक प्रयत्न होत राहतील. > > आपण पण आपल्या परिसरात असेच उप्रकम चालू करावे, किंवा असे विविध समाजोपयोगी > उपक्रम आहेत त्यात सक्रीय सहभागी व्हा, किंवा किमान अशा उपक्रमांना पाठबळ > द्या. *आपल्या उर्जा/ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हि > प्रामाणिक इच्छा!* > > Lets do it together! > AYUSHonline team > www.adiyuva.in | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९ > > Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional > knowledge and cultural Intellectual of Adivasi community! > Aim of this Initiative through Warli Painting > माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge > पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote > Traditional knowledge through New technology > चावूल : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its > sustainable economy by employment generation > > -- > Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ > ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/ > msgid/adiyuva/CAHMsEBtcNqQVwvK63TwJ2L9cUe8iH2Vm%3DndSSJKxWdRjLYCv-g% > 40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtcNqQVwvK63TwJ2L9cUe8iH2Vm%3DndSSJKxWdRjLYCv-g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2Bn3ob-F_ToRycKATrJbmCnaa8a4mtVaXdiVJ%3DpuDBKaNF8jLQ%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

