Great initiative !!!

2017-06-13 11:06 GMT+05:30 Zhina Kuvra <[email protected]>:

> mahiti baddal dhanyewad Daada
>
> 2017-06-03 0:54 GMT+05:30 Warli Painting <[email protected]>:
>
>> *|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ मे २०१७ ||*
>>
>> जोहार !
>> आज पर्यावरण, जैव वैविध्य, नैसर्गिक संसाधने, स्वावलंबी पणा, मानवी मूल्य
>> जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे.
>> आणि गेल्या हजारो वर्षा पासून जगभरातील आदिवासी समुदाय हे सगळे सहज दैनंदिन
>> जीवनशैलीत प्रत्येक्ष जगतो आहे, त्याचे जतन व संवर्धन करून आपल्या ग्रहाच्या
>> उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देवूया !
>>
>> एके काळाचा स्वालंबी असलेला आदिवासी समजा अगदी नाजूक वळणावर आहे. पारंपारिक
>> ज्ञान, सांस्कृतिक संपदा, स्वायत्त अर्थव्यवस्था मजबुतीकरणाची त्वरित गरज
>> लक्षात घेता समाजातूनच पुढाकार घेणारी व्यवस्था तयार करण्याच्या हेतून
>> युवकांनी २००७ पासून सोशियल नेट्वर्किंग द्वारे प्रयत्न चालू केले. २०११ साली
>> संस्था म्हणून नोंदणी केली, आणि सध्या आपल्या सहकार्याने कार्य चालू आहे.
>> युवकांची उर्जा, ज्ञान, कौशल्य, एकत्रित रित्या सकारात्मक आणि रचनात्मक
>> कार्यासाठी उपयोगात आणून आदिवासी सशक्तीकरण विषयी जागरूकते साठी आयुश
>> प्रयत्नशील.
>>
>> आपण पारंपरिक ज्ञान जतन करून आर्थिक स्वावलंबन मजबुतीसाठी रोजगार निर्मिती
>> चे उपक्रम (आदिवासी कला जतन - वारली चित्रकला) राबवतो आहोत, त्या विषयी
>> माहिती. चित्र काढण्यासाठी गेरू (लाल माती), तांदळाचे पीठ, पाणी वापरले जाते.
>> अगणित पिढ्यानपासून जतन केलेले हे ज्ञान फक्त चित्रा पुरते मर्यादित न ठेवता
>> सामाजिक जीवन, शाश्वत विकासाला आदर्श दिशा म्हणून त्या विषयी जागरूकता आणि
>> विविध कल्पक प्रयत्नातून रोजगार निर्मिती चे प्रयत्न चालू आहेत.
>>
>> *मार्गदर्शक तत्व* -
>> माती (लाल माती, गेरू – सांस्कृतिक ओळख) : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा,
>> पारंपरिक ज्ञान जतन करून या विषयी जागरूकता करून प्रसार करणे
>> पाणी (तंत्रज्ञान आणि गती) : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास करून
>> स्पर्धात्मकता वाढवणे
>> चावूल (उर्जा आणि स्वावलंबन) : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक
>> स्वावलंबन मजबूत करणे
>>
>> या महिन्यातील काही घडामोडी उदाहरण म्हणून आपल्या माहिती साठी
>>
>> [अदिकला]
>> *१) पॅरिस येथे भारतीय आदिवासी कला प्रदर्शन - वारली चित्रकला* : गंजाड
>> येथील नामवंत, हुशार, मेहनती बंधू तुषार आणि मयूर वायेडा हे सध्या पॅरिस येथील
>> प्रदर्शनात वारली चित्रकला विषयी जागरूकता करत आहेत, हे प्रदर्शन १९ जून
>> पर्यंत चालणार आहे. आताच ते जपान येथील पारदर्शनात पण सहभागी झाले होते.
>> आपल्या परिचयात कुणी पॅरिस परिसरात असल्यास जरूर भेट द्यायला सांगावे. ठिकाण :
>> Salon Du Patheon
>>
>> *२) जर्मनी येथे वारली चित्रकलेचे प्रदर्शन* - गेल्या कित्त्येक वर्ष पासून
>> वारली चित्रकलेच्या आकर्षणामुळे भारतात येत असलेले जर्मनी चे निवृत्त
>> प्राचार्य लवकरच जर्मनी येथे वारली चित्रकलेचे प्रदर्शन भरवत आहेत, या पूर्वी
>> हि त्यांनी संजय दा यांची चित्रांचे प्रदर्शन जर्मनीत भरवले होते. या वेळेस ३
>> कलाकार जर्मनी ला जाणार आहेत (सविस्तर माहिती कळविण्यात येईल)
>>
>> ३) *CSR उपक्रम मुंबई येथे प्राथमिक चर्चा बैठक* : भारतीय राष्ट्रीय भुगतान
>> निगम यांच्या मुंबई येथील कार्यालयात उपक्रम विषयी प्राथमिक प्रस्थाव सादरीकरण
>> बैठक मुंबईच्या कार्यालयात झाली. सध्या प्राथमिक प्रस्तावावर चर्चा सुरु आहे.
>> ऑगस्ट मध्ये पुढील उच्च स्थरीय बैठक होणार आहे त्यात निर्णय होईल. जर हा
>> प्रस्थाव मान्य झाल्यास ३ वर्षासाठी रोजगार निर्मितीच्या उपक्रमासाठी आयुश ला
>> सहकार्य दिले जणार आहे
>>
>> *४) प्रदर्शन : वस्त्र मंत्रालया च्या भौगोलिक उपदर्शनी चे दिल्ली येथे
>> प्रदर्शन* -
>> प्रथमच वस्त्र मंत्रालयाच्या टेक समिती (“TEXTILES COMMITTEE”) तर्फे
>> देशभरातील नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनाचे प्रदर्शन १ ते १५ मे दरम्यान दिल्ली
>> येथे दिल्ली हाट येथे आयोजित करण्यात आले होते. आयुश तर्फे या प्रदर्शनात ४
>> कलाकार सहभागी झाले होते. राजेश दा रडे (आलोंडे, विक्रमगड तालुका), जाणू दा
>> रावते (रायतली, तालुका डहाणू), विजय दा वाडू (गांजाड, तालुका डहाणू), कमलेश दा
>> धुलसाडा (गोखाडी) सहभागी झाले होते.
>>
>> *५)राष्ट्रीय कार्यशाळा : “भौगोलिक उपदर्शनी कायद्या अंतर्गत बौधिक संपदा
>> विसेषतः वस्त्र आणि कलाकृती यांचे संरक्षण” या विषयावर दिल्ली येथे राष्ट्रीय
>> कार्यशाळा*– दिल्ली येथील कान्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया च्या सभागृहात ५ ते ६
>> मे रोजी “TEXTILES COMMITTEE” तर्फे आयोजित भौगोलिक उपदर्शनी विषयावर तसेच
>> संबधित विविध तांत्रिक बाजू आणि विविध विषयवार मार्गदर्शन केले. आदिवासी
>> समाजातील पारंपारिक ज्ञान आणि त्यातून आर्थिक स्वावलंबन सशक्तीकरण चे प्रयत्न
>> अधिक प्रभावी बनविण्य करिता या कार्यशाळेत आयुश तर्फे सचिन सातवी आणि डॉ सुनिल
>> पऱ्हाड सहभागी झाले होते. कार्यशाळेचे उदघाटन वस्त्र मंत्रायलच्या केंद्रीय
>> मंत्री स्मृती झुबीन इराणी, केंद्रीय राज्य मंत्री अजय तमता, सचिव रश्मी
>> वर्मा, अतिरिक्त सचिव पुष्पा सुब्रमणियन, विकास आयुक्त वस्त्र/हस्तकला अलोक
>> कुमार, वस्त्र समिती सचिव अजित चव्हाण यांच्या उपस्थित कार्यशाळेची सुरवात
>> झाली. या क्षेत्रातील विविध अनुभवी आणि तज्ञ यांचे विविध विषयावर सविस्तर
>> मार्गदर्शन झाले.
>> प्रश्नोत्तर सेशन दरम्यान आयुश तर्फे पारंपरिक ज्ञान जतन करण्याची आवश्यकता
>> आणि बौद्धिक संपदा जतन करण्यासाठी चे आदिवासी युवकांचे प्रयत्न (वारली
>> चित्रकलेचे भौगोलिक उपदर्शन नोंदणी) यांना शासनाचा उदासीन रिस्पॉन्स (शासनाची
>> कोणतीही मदत नाही) मिळाल्याची खंत व्यक्त करून, अशा पारंपरिक ज्ञान जतन व
>> रोजगार निर्मिती साठी शासकिय स्थरावर अधिक प्रभावी उपाय योजना आणि अंमलबजावणी
>> होण्याची अपेक्षा मांडली.
>>
>> कार्यशाळेत झालेले विषय
>> Technical Session I – Legal Framework & Registration Process
>> Technical Session II – Promotion and Marketing GI Products
>> Technical Session III – Quality Assurance of GI Marked Products
>> Technical Session IV – Raising Awareness and strengthening enforcements
>> Technical Session V – Activation of  Producer groups and take benefits of
>> GI Registration
>>
>> *६) महिला विशेष* -
>> परंपरागत आदिवासी समाज महिला सशक्तीकरण किंवा स्त्री पुरुष समानता या करिता
>> आदर्श मानले जाते. पण सध्या बदलत चाललेल्या (इत्तारांचे अंधानुकरण) घडामोडी
>> मुळे समाजात असलेले स्त्री चे महत्व या विषयी पुन्हा जागरूकता करण्याचे
>> प्रयत्न होणे गरजेचे आहे. सुयीन, सवासीन, धवलेरी, कऱ्हवली, इत्यादींचे
>> सांस्कृतिक महत्व सोबत महिलांचा सामाजिक कार्यात सहभाग, आर्थिक सशक्तीकरण या
>> साठी एक नवीन उप्रकम चालू करतो आहोत.
>> ज्यांना कुणाला पिशवी शिवणे, पर्स शिवणे, वस्तूवर चित्र काढणे, कपड्यावर
>> चित्र काढणे, कागदाच्या वस्तू बनवणे, सोंगे बनवणे, बांबूच्या वस्तू बनवणे,
>> गवताच्या शोभिवंत वस्तू, टोपी, संगीत साहित्य, पारंपरिक खेळाचे साहित्य,
>> ग्रीटिंग कार्ड, पत्रिका, शुभेच्छा पत्र, भिंतीवर चित्र काढणे, इत्यादी
>> कार्याची आवड आहे आणि त्यात रोजगार करू इच्छितात अश्या निवडक ५० महिलांचा चा
>> गट बनवून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क
>> करून नाव नोंदणी करावी, आपल्या संपर्कातल्या कलाकारांना कळवावे.
>>
>> ७) *सुवास ट्रस्ट साडी चित्रीकरण प्रकल्प* -  सुवास ट्रस्ट तर्फे साडीवर
>> चित्र काढण्यासाठी चर्चा पूर्ण झाली प्रायोगिक तत्वावर २ नमुने संजय दा पऱ्हाड
>> करत आहेत, त्यानुसार सविस्तर चर्चा करण्यात येईल. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास
>> कोईंबतूर, सुरत, पश्चिम बंगाल येथून सिल्क आणि कॉटन च्या साड्या
>> चित्रीकरणासाठी पाठवल्या जातील. ट्रस्ट ची टीम लवकरच डहाणू ला भेट देऊन पुढील
>> औपचारीकता पूर्ण करतील.
>>
>> ८) *बेंगलोर येथील हॉटेल चेन ला वारली चित्र सजावट हवी आहे* -  प्राथमिक
>> चर्चा चालू आहे, त्यांना त्यांच्या चेन मध्ये असलेल्या हॉटेल्स मध्ये वारली
>> चित्र हवी आहेत. सध्या काही नमुना चित्रे पाठवली आहेत. यशस्वी झाल्यास एकत्रित
>> चित्र बनविण्यासाठी काम उपलब्ध होईल
>>
>> ९) *चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया*
>> वारली चित्र/आदिवासी कलाकृती विक्री साठी आपले स्वतःचे संकेत स्थळ आहेच (
>> www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी
>> अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-
>>
>> (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय ,
>> एक्स्पोर्ट्स इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com,
>> artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com,
>> theartbazaar.in, BuffyFish, Unexplora, Puro Kraft, हस्त वेमा. ->> यादी
>> आणखीन वाढते आहे.
>> (आवश्यक निधी अभावी warlikala.com या ई कॉमर्स वेबसाईट चे नूतनीकरण न
>> केल्याने सध्या बंद आहे.  )
>>
>> *१०) आयुश संचय निधीसंकलन आणि सहकार्य* :
>> - आयुश ची डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC class ३) २ वर्ष मर्यादा
>> बनविण्यासाठी अभिजित पिलेना यांनी आर्थिक सहकार्य केले
>> - वारली चित्र वस्तूंची माहिती B-B संबंध वाढविण्यासाठी इंडिया मार्ट वर
>> सशुल्क १ महिन्याचे सभासदत्व साठी संजय दा पऱ्हाड यांनी सहकार्य केले
>> - मुंबई अंधेरी येथील कलाकार आणि वेबसाईट बनवणारे जाहिद शेख यांनी वारली
>> चित्रकलेची वेब साईट डिझाईन करून देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. सध्या या
>>  विषयी सविस्तर चर्चा चालू आहे
>> - टोरोंटो - कॅनडा येथून मंगेश मोकाशी जे बौद्धिक संपदा कायदा कंपनीत नोकरी
>> करीत आहेत, त्यांनी विदेशात होणाऱ्या अनधिकृत वारली चित्रकला कलाकृती ना
>> कायदेशीर नोटीस पाठविण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे, सविस्तर
>> चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येईल
>> - मुंबई येथून फ्री प्रेस मधून जानवी पाल या महाराष्ट्रातील कला आणि
>> संस्कृती जतन या विषयावर लेख लिहत आहेत त्यात वारली चित्र संस्कृती बद्दल
>> प्रतिक्रियांसाठी मुलाखत घेतली
>>
>> ११) *सहकार्य आणि सहभाग*:
>> सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने
>> सहभागी होवू शकता. ओन लायीन : मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, नवीन आयडिया
>> देणे, जाहिरात करणे
>> तांत्रिक सहकार्य : चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर करणे
>> उपक्रम सहभाग व दायित्व : प्रत्येक्ष मार्गदर्शन, उपक्रमात स्वयंसेवक म्हणून
>> सहभागी होणे, उपक्रमाचे नेतृत्व करणे,
>> ग्रामीण संपर्क : नवीन कलाकारांना जोडणे, युवाना मार्गदर्शन, संपर्क वाढवणे,
>> आर्थिक साहाय्य : वर्गणी देवून सभासद होणे, वार्षिक/मासिक स्वरुपात आयुश
>> संचय निधी मध्ये संकलन करणे, आर्थिक सहकार्य कारानार्यासोबत संपर्क करून देणे
>>
>> *#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* :
>>  https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli
>>
>> आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.join.adiyuva.in)
>> नोंदणी करून सहभागी होवू शकता.
>>
>> आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक
>> जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना  प्रोत्साहन मिळू
>> शकेल. *"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच
>> आयुश चा उद्देश आहे. समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेवून खारीचा वाटा उचलयची
>> सवय ला प्रोत्साहन देवूया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ वृत्तीने
>> समाजाच्या हिता साठी एकत्रित आणि पुरक प्रयत्न होत राहतील.
>>
>> आपण पण आपल्या परिसरात असेच उप्रकम चालू करावे, किंवा असे विविध समाजोपयोगी
>> उपक्रम आहेत त्यात सक्रीय सहभागी व्हा, किंवा किमान अशा उपक्रमांना पाठबळ
>> द्या. *आपल्या उर्जा/ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हि
>> प्रामाणिक इच्छा!*
>>
>> Lets do it together!
>> AYUSHonline team
>> www.adiyuva.in | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९
>>
>> Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional
>> knowledge and cultural Intellectual of Adivasi community!
>> Aim of  this Initiative through Warli Painting
>> माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
>> पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote
>> Traditional knowledge through New technology
>> चावूल : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its
>> sustainable economy by employment generation
>>
>> --
>> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
>> ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to [email protected].
>> To post to this group, send email to [email protected].
>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/ms
>> gid/adiyuva/CAHMsEBtcNqQVwvK63TwJ2L9cUe8iH2Vm%3DndSSJKxWdRjLYCv-g%40mail.
>> gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtcNqQVwvK63TwJ2L9cUe8iH2Vm%3DndSSJKxWdRjLYCv-g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/CA%2Bn3ob-F_ToRycKATrJbmCnaa8a4mtVaXdiVJ%
> 3DpuDBKaNF8jLQ%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2Bn3ob-F_ToRycKATrJbmCnaa8a4mtVaXdiVJ%3DpuDBKaNF8jLQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>



-- 
Parag Patil,

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUcLtX1quwZQU%3DvjF6%3DVywkq9xcZtAKV7m9OcwPa9%2BBBk4g%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to