।। वारली चित्रकला उपक्रम : जन सहयोग निवेदन ।।
क्राऊड फंडिंग क्रमांक -१ : १३ जून २०१७

सांस्कृतिक ओळख, पारंपरिक ज्ञान, बौद्धिक संपदा जतन सोबत रोजगार निर्मिती करून
समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबुती साठी प्रयत्न करीत आहोत. आपल्या सगळ्यांच्या
सहयोगाने हे उपक्रम आपण अधिक प्रभावी करू शकतो.

सध्याचे अति आवश्यक ४ विषय दिले आहेत, या साठी आपण सहयोग करून हा उपक्रम पुढे
नेऊ शकतो. या साठी सदर विषयातील तज्ञ् व्यक्ती आपली सेवा, वेळ, मार्गदर्शन देऊ
शकतात. किंवा इत्तर जण आर्थिक सहयोग करून सहभागी होऊ शकता.

क्रमांक १) वारली पेंटिंग चे लोगो असलेल्या ट्रेड मार्क नोंदणी विरोधात आक्षेप
नोंदविणे
नेदरल्यांड येथील फर्स्ट टेक्नॉलॉजि या कंपनीने वारली पेंटिंग असलेले दिवे या
साठी ट्रेडमार्क मुंबई येथील बौद्धिक संपदा विभागा तर्फे प्रकाशित जनरल मध्ये
 सदर प्रकरण प्रकाशित केले गेले आहे (५ जून २०१७), नियमा नुसार ऑकटोम्बर
पर्यंत या विषयी आक्षेप नोंदवू शकतो.

सदर कला आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान आणि बौद्धिक संपदा आहे, यावर कोणतीही
संस्था/कंपनी/व्यक्ती स्वामित्व मिळवू शकत नाही. वारली चित्रकलेचे बौद्धिक
संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शनी मध्ये नोंद हि झालेली आहे. त्या साठी
आपण सदर कार्यालयात लीगल एक्स्पर्ट मार्फत आक्षेप नोंदविणार आहोत.

अपेक्षित खर्च : रु ७,७००/- ( ऑनलाईन अर्ज फी २,७००, लीगल एक्स्पर्ट IPR
ऍटर्नी मार्फत निवेदन आलेखन फी ५,०००)
मर्यादा  : ३० ऑगस्ट २०१७ पर्यंत

क्रमांक २) वारली कलेचे बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शनी मध्ये
स्पेशल प्रोटेक्शन साठी नोंद करणे :
वारली चित्रकलेची नेहमी होणारी कॉपी आणि आदिवासी कलाकारांना डावलून इतरत्र
बनवली जाणाऱ्या वस्तूवर कायदेशीर बंदी आणण्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन नोंद
केल्याने अधिक प्रभावी पणे उपयोगात आणले जाऊ शकते

त्यासाठी चेन्नई येथील बौद्धिक संपदा - भौगोलिक उपदर्शनी कार्यालयात अर्ज करून
पुढील प्रक्रिया करावी लागेल.
सादर प्रकरणी आपण आर्थिक सहाय साठी आदिवासी विकास विभागाशी संपर्क करून
प्रयत्न करणार आहोत.
अपेक्षित खर्च : रु. २५,००० (फॉर्म फी २५,०००/-)
वेळ मर्यादा :  निधी जमा झाल्या प्रमाणे

क्रमांक ३) वारली चित्रकलेची इ कॉमर्स वेबसाईट रिणीव करणे
सुरवातीला प्रायोगिक तत्वावर बनविण्यात आलेली  वारली पेंटिंग ची ए कॉमर्स
वेबसाईट रिनिव करणे बाकी आहे, मुदत निघून गेल्याने सदर ची वेबसाईट बंद आहे.

अपेक्षित खर्च : रु १५,०००/- (डोमेन, सर्वर, AMC, मेंटेनन्स फी)
वेळ मर्यादा :  निधी जमा झाल्या प्रमाणे

क्रमांक ४) वारली चित्रकलेचे खंबाळे येथे कला बँक / विक्रीकेंद्र निर्माण
लहानसे एकत्रित भांडार आणि विक्री केंद्र निर्माण करण्यासाठी लागणारे साधन
सामुग्री, साहित्य, साहाय्य करून आपण हे केंद्र उभारण्यास साहाय्य करू शकता.
वेळ मर्यादा : सहयोग मिळण्या प्रमाणे

इच्छुकांनी खाली दिलेल्या खात्यावर साहाय्य निधी जमा/ट्रान्सफर करावे.
खात्याचे नाव : आदिवासी युवा सेवा संघ (Adivasi Yuva Seva Sangh)
खाते क्रमांक : 00000031919096256
शाखा : डहाणू रोड (Dahanu Road)
खाते प्रकार : चालू खाते (Current Account)
IFSC : SBIN0000354

नोंद :
१. ट्रान्सफर केल्यावर आपले नाव, संपर्क क्रमांक, राशी, कोणत्या उपक्रमासाठी
सहयोग हे पुढील नंबर वर sms करावा.
२. जमा राशी, खर्च, सहयोगी यांचे तपशील ओनलाईन प्रकाशित केला जाईल


आदिवासी युवा शक्ती । आदिवासी युवा सेवा संघ
www.adiyuva.in | www.warli.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsuBZPxjUo6r1SNcj-vrsOriUt%2BR4K6nVfn6evgV4q64Q%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to