नक्की,..
लवकरच कृतीशील विचारमंथनाचा उपक्रम यावर राबविता येईल .


On May 14, 2018 7:20 PM, "AYUSH | adivasi yuva shakti" <adiy...@gmail.com>
wrote:

> ।। पालघर लोकसभा पोटातली निवडणूक ।।
>
> [आदिवासी बोली भाषा]
> बारीक होतुं त वेग वेगले ठिकाणी पार्ट्यांची चिन्ह ना घोषणा गेरू खाल भीतीवर
> लिहेल रेहेत. माना भलता आवड वाचया. याचा जिंदाबाद त्याचा मुर्दाबाद, यो जय, तो
> जय, आले रे आले, गेले रे गेले. ना काय ना काय. 
> मुरबाड/कासा/वानगाव/उधवा/तलासरी/डहाणू
> इत्यादी परिसरात हमखास नंगाया मिलत. तंव्हा भांडना हो फार होत, एक एक गाव
> पार्टी पार्टी चा दसां रेहे. एक गाव मिलून बीजे गांवासी कज्या करीत. मंगा हलूं
> हलूं एक कुटुंब एक पार्टी असा होत गेला, जसा काय धर्मच. आपली मानसा हो ओढी
> प्रामाणिक काय आजोबासनी जे चिनावर मत देत त्यावरूच त्याची पोरा ना त्याची
> पोराहो. पन आथा हलूं हलूं बदलाया लागलाहे, ओढा बदलाहे का एकेच घरात ३-४ पार्टी
> ची पदा. नेता हो जिकडं खाया मिलल तिकडं हिवरत, कव्हां यी पार्टी कव्हां ती
> पार्टी. लोखा बिचारी सगला सोडून यांचे नादाला लागून आपल्या आपल्यात कज्या
> करीत. ते खुस्याल मज्या करीत हिंडत. तय बेस मानसा निवडाल त बेस काम होल
> लेखांसाठी.
>
> [साधारण मराठी]
> पूर्वी एक गावाचा एक राजकीय पक्ष असायचा, नंतर एक कुटुंब एक पक्ष असायचे,
> नंतर एकाच घरात अनेक पक्षांची पदे बघायला मिळाली,  निवडणुकी आधी उमेदवारांच्या
> या पक्षातून त्या पक्षातल्या उड्या पण सगळ्यांनी बघितल्या. असो पक्ष/उमेदवार
> निवड प्रत्येकाचा वयक्तिक निर्णय, ज्याला जो योग्य वाटतो तो घ्यावा. पण
> आदिवासी समाज हितासाठी पुढील विषय गांभीर्याने विचार करावा हि अपेक्षा.
>
> आदिवासी समाजा समोर अगणित आव्हाने आहेत, रोज त्यात वाढ होतेच आहे. पालघर
> जिल्ह्याचे बोलायचे झाल्यास जल जंगल जमीन जीव या सोबत अस्तित्वाचाच प्रश्न
> समोर आहे. कदाचित याची जाणीव मोजक्यांनाच आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला पाणी
> देण्यासाठी ज्या गावाच्या जमिनीवर धरणे बांधलीत त्या गावांना ४० वर्षानंतर पण
> प्यायला पाणी नाही. वरून अक्राळ विक्राळ वाढत असलेले वसई विरार भायंदर
> उरलेल्या पाण्यावर ताव मारायला तयार आहेतच. चांगले शिक्षण मिळवून करियर बनावता
> यावे यासाठी आश्रम शाळांत काय होते आहे आपल्या समोर आहे. स्थानिक पातळीवरचे
> रोजगार डोळ्यांसमोर कसे पळवले जातात हे पण बघितलेय. रस्त्या/नाक्यावर च्या
> जमिनी कश्या कब्जा करून बिगर आदिवासींच्या वसाहती आणि गावे वसली आहेत सोबत
> वाढणारे गुन्हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय. विद्यार्थी/कर्मचारी आणि येथील काही
> लोप्रतिनिधी पण बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या प्रकरणातले आहेत. आरोग्य वीज पाणी
> रस्ते प्रशासन यांची सद्यस्थिती दिसतेय डोळ्यांसमोर. हे कमी कि काय "देश
> हिताचे" १४ पेक्षा जास्त मेगा प्रकल्प या परिसरात नियोजित आहेत, आणि त्यासाठी
> भूमी अधिग्रहण सगळ्या माध्यमातून सुरु आहे. सगळे लिहायला जागा कमी पडेल
> एव्हड्या समस्या आहेत.
>
> या सगळ्या परिस्थितीत येथील लोकप्रतिनिधी कसा असावा?
> पूर्ण समाजाचा आवाज, अपेक्षा, प्रसाशनाला धारेवर धरून आदिवासी समाज हितासाठी
> संविधानिक अधिकार, ध्येय, धोरणे राबविण्यासाठी, आदिवासी समाज हिताचे कार्य
> पुढे रेटणारा, निस्वार्थ हेतूने समाज हित प्राथमिकतेने जपणारा.
>
> पण आपल्याकडे खूप अगदी ठराविक पद्धतीने ठरवून प्रत्येक पक्षातून, त्यांना
> अपेक्षित काम/भाषा बोलणारे अनुकूल प्रतिनिधी बनवले जातात (तुरळक अपवाद वगळता).
> कधी अर्ध शिक्षित, कधी दूरवरून आयात केलेले, तर कधी सामाजिक कार्याशी नाळ
> नसलेले असतात.
>
> वयक्तिक पातळीवर आपले पूर्वीचे खासदार चिंतामण दादा वनगा यांच्याशी अनेक
> विषयांवर चर्चा व्हायची. खासकरून स्थानिक रोजगार निर्मिती, वारली चित्रकला चे
> बौद्धिक सपंदा हक्क, कलाकारांचा मोबदला, स्थानिक आदिवासी नेतृत्व, भविष्यातील
> आव्हाने, सध्याच्या समस्या, इत्यादी. समाज म्हणून आदिवासी समाजाचे नेतृत्व
> तयार व्हावे यासाठी ते आग्रही होते, या संदर्भात लवकरच काही कार्यक्रम सुरु
> करण्याचा त्यांचा मानस होता. ते ज्या परिस्थितून ज्या वातावरणात तयार
> झाले/घडले. त्यांनी समाजा/पक्षासाठी जो त्याग करून स्वतःची एक ओळख तयार केली,
> बऱ्यापैकी अनेक प्रामाणिक प्रयत्न केले. अगदी जेव्हा लागेल तेव्हा
> पक्षाच्या/सरकार च्या विरोधात जाऊन स्पष्ट भूमिका घेतली. पाणी परिषद,
> भूमिसंपादन, किंवा इत्तर असे त्यांचे विरोधक हि हे मान्य करतात. (वयक्तिक
> रित्या डहाणू नोटिफिकेशन संदर्भात त्यांची भूमिका न पटणारी होती. या विषयवार
> त्यांना कळवले पण होते सविस्तर चर्चा ठरली होती). त्यांचे अचानक जाणे
> धक्कादायक होते. असो...
>
> या वेळेस पण दुर्दैवाने लोकसभेसाठी विश्वासाचे एक हि नाव चर्चेत नाही, कि
> ज्याकडून सामान्य लोकांच्या, आदिवासी समाजाच्या अपेक्षा पूर्ण होतील. जर
> आदिवासी नेतृत्वासाठी आपण चांगला पर्यायच तयार करू शकत नाही तर बाकीचे खूप
> लांब आहे, येथे फक्त पक्ष जिंकेल आदिवासी समाज हिताचा विचार नाही. कदाचित कुणी
> एक खासदार बनेल त्याचे कुटुंब पुढे जाईल, त्यांचे कार्यकर्त्यांचा फायदा होईल,
> त्यांच्या नातेवाईकांचा फायदा होईल, त्यांचे गाववाले (तालुका/जिल्हावाले)
> फायदा करून घेतील, त्यांची पार्टी पुढे जाईल. पण येथील स्थानिक आदिवासी
> समाजाचे काय? कोण वाली ?
>
> मतदान करून, चांगला पर्याय निवडा, योग्य पर्याय नसेल तर पर्याय तयार करण्याचा
> कामाला लागा.
> वयक्तिक/राजकीय लाभासाठी निवडणुक ऋतूला तयार होणारे नेतृत्व पेक्षा, सामाजिक
> चळवळीतला, समाजासाठी झोकून दिलेला, समाजाशी प्रामाणिक, अधिकार यांचा अभ्यास,
> कणखर आणि नेतृत्वगुण निपुण. त्याला पक्ष असेल नसेल तरी चालेल पण आदिवासी समाज
> हितासाठी सर्वस्वी पणाला लावणारा पर्याय तयार करूया.
>
> उदाहरण, जसे डॉ सुनिल दादा पऱ्हाड जो आपले करियर सोडून निस्वार्थ पूर्ण वेळ
> आदिवासी समाजासाठी देतोय. जल जंगल जमिन आणि अस्तित्व हीच एक दिशा बनवून स्वतः
> प्रयत्न करतोय. आदिवासींच्या प्रत्येक प्रश्नासाठी धडपडतोय.
> *आहेत का असे पर्याय आपल्याकडे? अशांना आपण मजबूत करू शकतो? अश्यांची आणखीन
> मोठी फळी तयार करू शकतो का?
>
> असे नेतृत्व आपल्याना लोकप्रतिनिधी म्हणून समाजातून पुढे आणता येईल का?*
>
> आपले मत कळवावे .... जोहार !
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/d6522b2c-7dba-422a-8718-5246ff239555%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d6522b2c-7dba-422a-8718-5246ff239555%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAC68%2BBANL8dAOhrTn7JmMEWy2rX9wybooTTc%3Dh9YRyEHhT4EVg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to