Supper On Mon, May 13, 2019, 3:32 PM SACHiNe SATVi <wagh...@gmail.com> wrote:
> वयक्तिक अनुभव : *महना झाला कोरियात* > > [ *स्थानिक आदिवासी भाषा* ] > _ये वेलस कोरियातले गावात रेहून नांगु असा करून नामयान्ग ला रेहेतूं. खोली हो > बेस आहे. आजूबाजूला झाडां आहांत, शेत आहे, डोंगरी आहे. शेतात काम करणारी > माणसां दिसत, नांगतूच रेहे त्यांना. कव्हां कव्हां मस्त पाखरां येत आरडत आरडत. > डोंगरी तोडून ना मोठा रस्ता बांधाया घीदेल आहे, बठीच जोढी जमीन लाग तोढीच > काहडेल. बाजूचे झाडाला हात हो नीही लावेल. ना ये जागेतला ऐकून एक झाड बठाच > उचलून बीजेकडे नेन लावेल. गायचेन बांधकाम करताना हो एकदम पडदं लावून घिजत > आवाज, धूल नीही जाया पायाज तय. आजू बाजूला नांगसील त काहीच व्याट नीही करेल._ > > _जव्हां वेल मिल तंव्हा ओगाच नंगातूच रेहे त्यांना काय करीत कसाक करीत. > डंफरातसी माती निज तंव्हा हो फडक्याखाल ढाकुन निजं. झाडां हो बठालीच मुलांचे > हारी माती सकट किरनाखाल हुचलून टरकात ठेवीत. त्याला लागाया नाय पायाज त > फांद्या चे आजूबाजूला दोऱ्या बांधीत. पालवी पाडाय नीही पायज त त्यालाहो जाला > दसां लावून ठेवीत, ना बिजेंकडे नेण बाठीच लावीत. ओढी कालजी दसी करीत. भलता वखत > ताव नंगातूच होतुं त्यांची जुगुत. असा हो नीही का त्यांचेकड झाडा नीही, भलती > झाडा, आखा डोंगरी, मैदाना झाडाखाल भरेल. तर्ही हो भलती कालजी करीत. डोक्यात > भारतातला विचार आला ना जड दसां झालां डोका, ओग्यानूच आलू खोलेत ना बसून > रेहलू._ > > [ *साधी मराठी* ] > एक महिना झाला कोरियात येऊन. या यावेळेस येथील ग्रामीण जीवन अनुभवावे यासाठी > नामयान्ग या ठिकाणी राहतो आहे. माझ्या खोलीच्या खिडकीतून खूप छान डोंगराचे > दृश्य दिसते. पक्ष्यांची बरीच वर्दळ आहे, जवळच शेत आहे तिथे शेतीची काम करताना > शेतकरी दिसतात. भौतिक विकासाला पर्याय नाही, येथे हि सुरु आहे खूप मोठ्या > वेगाने. तिथून मोठा रस्ता बांधत आहेत, त्यांना लागणारा ठराविक भाग डोंगरातून > त्यांनी खोदून काढला आहे, पण ते करताना शेजारील एक फूट अंतरावरच्या जमिनीला > काहीही धक्का/हानी झालेली दिसली नाही. कुठेच सिमेंट/प्लास्टिक चे > अर्धवट/टाकलेले भाग दिसले नाही. > > या बांधकामात येणारे वृक्ष पण मूळ आणि सोबत असलेल्या माती सकट खूप अलगद क्रेन > ने ट्रक मध्ये वेवस्तीत बांधून दुसरी कडे नेवून लावताना दिसले. साधी माती दगड > ट्रक मधून नेताना पूर्ण कापडाने गुंडाळून नेत होते जेणेकरून माती उडणार > नाही/रस्त्यावर पडणार नाही. गेल्या रविवारी सोल (कोरियाची राजधानी) शहरात > वाहणाऱ्या नाल्या लागत सहज फेर फटका मारावा म्हणून ५ किमी चालत होतो. खूप > चांगल्या पद्धतीने नाल्याच्या दोन्ही बाजूने चालण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी, > बसण्यासाठी विशेष सोय केलेली दिसली. पाणी अगदी नितळ वाहत होते, त्यात अनेक > मासे होते, पक्षी होते, हिरवळ होती. असो बारीक सारीक खूप निरीक्षणे आहेत, सगळे > लिहणे शक्य नाही. पण *त्यांच्या सहज वागण्यात/विकासाच्या वेगात/देशाच्या > प्रगतीत निसर्ग/पर्यावरण याला जपून घेण्याची भावना अनुभवायला मिळते.* यातील > काही फोटो स्टेटस वर बघू शकता. > > *आपला भारताचा विचार केला तर मन सुन्न होते.* "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे" फक्त > पुस्तकातच असावे कदाचित. नदी ची पूजा करणारी संस्कृती म्हणे आपली. कोणत्याही > शहरात/जवळून वाहणाऱ्या नदी ची अवस्था बघवत नाही. जल जंगल जमीन आणि जैव > वैविध्यता तर जशी फ्री लॉटरी असल्या प्रमाणे मर्जीतल्या उद्योजकांना ठेवलेले > आंदन. *हजारो वर्षांपासून पर्यावरण जतन करत राहणाऱ्या आदिवासींना मात्र > वास्तव्याचे पुरावे मागली जातात, जंगले खाली करून पाहिजेत असावीत* त्यांना. का > असे होत असावे? > > [ *दोन शब्द सामाजिक* ] > सध्या आपल्याना गांभीर्याने विचार करणे गरजेचे वाटते. भले आपली सांस्कृतिक > मूल्य/पारंपरिक ज्ञान खूप महत्वाचे आहे, मूल्यवान आहे. सध्या आपण प्रत्येक्ष > आचरणात काय आणतो आहोत? भविष्यात कोणत्या दिशेने वाटचाल असेल हे पण महत्वाचे > आहे. काळ वेळे प्रमाणे अनेक गोष्टी बदलत राहतील, काळानुरूप बदलणे निसर्ग नियमच > आहे. आवश्यक तो बदल करून आपली मूल्य जतन व्हावी जेणेकरून संपूर्ण मानव जमात, > जीव श्रुष्टि, पर्यावरण, जल जंगल जमीन आनंदाने गुण्या गोविंदाने राहू शकतील. > हा एक आदर्श मार्ग म्हणून सगळे जग आशेने बघत आहे. > > आणि त्यासाठी खूप दूर जायची गरज नाही, आपल्या आदिवासी मूल्यांतुन ती ऊर्जा > अनादी काळापासून मिळते आहे. > > *सध्याच्या वेगाने बदलत्या काळात, ती मूल्य टिकवणे शक्य आहे का? कशी टिकवावी?* > > तुम्हाला काय वाटते लिहावे. जोहार ! > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgbLsBMW8OWZ_-RMx7kMdXnWqbG%3Do6Y1eaTo79Y9u7-6XA%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgbLsBMW8OWZ_-RMx7kMdXnWqbG%3Do6Y1eaTo79Y9u7-6XA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAGEaO8wk1rtRCLBdcpDcPvRfyPJamL-h%3D2aFETmG63T9-S62zg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.