|| *वारली चित्रकला उपक्रम* : ३१ ऑगस्ट २०२० ||
आपल्या माहितीसाठी उपक्रम माहिती. *१) GI राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये सहभाग* विषय : “Geographical Indications - Protection & Promotion in India” २० ऑगस्ट रोजी, या कॉन्फरन्स मध्ये *"GI संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचे साधन"* या विषयावर आयुश तर्फे सचिन सातवी पेनॅलिस्ट म्हणून सहभाग घेतला. आयोजक : Department for Promotion of Industry and Internal Trade (Ministry of Commerce and Industry) Chair on IPR & CIPRA- *National Law School of India University,* Bangalore In Association with GI Controller General of Patents, Designs & Trademarks, India. *२) NCERT तर्फे १२ला हस्तकला विषयावर धडा* स्थानिक हस्तकला विषयी एक धडा १२च्या पुस्तकात घेतला जातो आहे. यात धोकरा, पिठोरा, गोंड, तेरेकोटा, मधुबनी, मिथिला, पठचीत्र, पिचवयी चित्रकला सोबत वारली चित्रकलेचाही समावेश करण्यात आला आहे, त्या बद्दल *संबंधितांनी हाय रिझोल्युशन फोटो ची मागणी केली होती. आयुश तर्फे ते जमा करण्या आले.* *३) हस्तशिल्प विकास आयुक्तालय तर्फे शिबीर* आयुश च्या नोंदणीकृत कलाकारांसाठी वस्त्र मंत्रालयाच्या हस्तशिल्प विकास आयुक्तालया मार्फत विशेष शिबीर आयोजित करण्यात येत आहे. आयुक्तालयातील अधिकारी शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या *संपर्कातील सगळ्या कलाकारांना कळवून शिबिराचा लाभ घ्यावा* *दिवस* : ४ सप्टेंबर २०२०, शुक्रवार *वेळ* : सकाळी १० ते २ पर्यंत *ठिकाण* : आयुश वारली चित्रकला केंद्र खंबाळे, बिरसा मुंडा हाऊस शेजारी, ता डहाणू, जि पालघर https://g.page/Warlipaintingkhambale?share *आयोजक* : Handicraft Development Commission, Ministry of Textile *४) आदिवासी लोणचे चटणी निर्मिती* करोनाच्या प्रभावामुळे हस्तकला क्षेत्र प्रभावित झाले आहे. आवश्यक पर्याय निर्मित म्हणून समन्वयक पुढाकार घेऊन आदिवासी चटणी, लोणचे चा उपक्रम सुरु करीत आहेत. फीडबॅक नुसार त्याला मोठे स्वरूप देण्यात येईल. सध्या *खारातले शिंद, करटोल, टेटवि, खारेशेंग माध्यमातून सुरवात केली आहे.* इच्छुक गटांना नमुना जमा करण्यास कळविले आहे. [COVID Response] *५) पारंपरिक आदिवासी खेळणी निर्मिती* पारंपरिक खेळणी निर्मिती विषयावर अभ्यास गट तयार करतो आहोत, सदर विषयात *रुची असलेल्यांनी आयुश समन्वयकांशी संपर्क साधावा.* कलाकारांसाठी पर्यायी उपक्रम नियोजन करतो आहोत. [COVID Response] *६) आदिवासी उद्यमीता सशक्तीकरण प्रस्थाव* हस्तकला, वनोपज, शेती माध्यमातून *आदिवासी उद्यमीतेला हातभार लावण्यासाठी इन्होवेटिव्ह योजने अंतर्गत १० प्रस्थाव मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स ला जमा करण्यात आले.* ठाणे, पालघर जिल्हा (महाराष्ट्र), दादरा नगर हवेली, दमण दीव, वलसाड जिल्हा (गुजरात) या क्षेत्रासाठी उपक्रम प्रास्तवित केलेत. *पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मिती* आणि त्यातुन *आर्थिक स्वावलंबन* पर्याय मजबूत करूया. Lets do it together, जल जंगल जमिन जीव.... आदिवासीत्व, जोहार ! _____________________________ आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T02_W9hRARY2TN9%2B3YCWpGhSjCCtb2m_q701YzBTvB7Ug%40mail.gmail.com.