Re: AYUSH | ।। पालघर लोकसभा पोटातली निवडणूक ।।

2018-05-23 Thread vishnu shelke
नक्की,..
लवकरच कृतीशील विचारमंथनाचा उपक्रम यावर राबविता येईल .


On May 14, 2018 7:20 PM, "AYUSH | adivasi yuva shakti" 
wrote:

> ।। पालघर लोकसभा पोटातली निवडणूक ।।
>
> [आदिवासी बोली भाषा]
> बारीक होतुं त वेग वेगले ठिकाणी पार्ट्यांची चिन्ह ना घोषणा गेरू खाल भीतीवर
> लिहेल रेहेत. माना भलता आवड वाचया. याचा जिंदाबाद त्याचा मुर्दाबाद, यो जय, तो
> जय, आले रे आले, गेले रे गेले. ना काय ना काय. 
> मुरबाड/कासा/वानगाव/उधवा/तलासरी/डहाणू
> इत्यादी परिसरात हमखास नंगाया मिलत. तंव्हा भांडना हो फार होत, एक एक गाव
> पार्टी पार्टी चा दसां रेहे. एक गाव मिलून बीजे गांवासी कज्या करीत. मंगा हलूं
> हलूं एक कुटुंब एक पार्टी असा होत गेला, जसा काय धर्मच. आपली मानसा हो ओढी
> प्रामाणिक काय आजोबासनी जे चिनावर मत देत त्यावरूच त्याची पोरा ना त्याची
> पोराहो. पन आथा हलूं हलूं बदलाया लागलाहे, ओढा बदलाहे का एकेच घरात ३-४ पार्टी
> ची पदा. नेता हो जिकडं खाया मिलल तिकडं हिवरत, कव्हां यी पार्टी कव्हां ती
> पार्टी. लोखा बिचारी सगला सोडून यांचे नादाला लागून आपल्या आपल्यात कज्या
> करीत. ते खुस्याल मज्या करीत हिंडत. तय बेस मानसा निवडाल त बेस काम होल
> लेखांसाठी.
>
> [साधारण मराठी]
> पूर्वी एक गावाचा एक राजकीय पक्ष असायचा, नंतर एक कुटुंब एक पक्ष असायचे,
> नंतर एकाच घरात अनेक पक्षांची पदे बघायला मिळाली,  निवडणुकी आधी उमेदवारांच्या
> या पक्षातून त्या पक्षातल्या उड्या पण सगळ्यांनी बघितल्या. असो पक्ष/उमेदवार
> निवड प्रत्येकाचा वयक्तिक निर्णय, ज्याला जो योग्य वाटतो तो घ्यावा. पण
> आदिवासी समाज हितासाठी पुढील विषय गांभीर्याने विचार करावा हि अपेक्षा.
>
> आदिवासी समाजा समोर अगणित आव्हाने आहेत, रोज त्यात वाढ होतेच आहे. पालघर
> जिल्ह्याचे बोलायचे झाल्यास जल जंगल जमीन जीव या सोबत अस्तित्वाचाच प्रश्न
> समोर आहे. कदाचित याची जाणीव मोजक्यांनाच आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला पाणी
> देण्यासाठी ज्या गावाच्या जमिनीवर धरणे बांधलीत त्या गावांना ४० वर्षानंतर पण
> प्यायला पाणी नाही. वरून अक्राळ विक्राळ वाढत असलेले वसई विरार भायंदर
> उरलेल्या पाण्यावर ताव मारायला तयार आहेतच. चांगले शिक्षण मिळवून करियर बनावता
> यावे यासाठी आश्रम शाळांत काय होते आहे आपल्या समोर आहे. स्थानिक पातळीवरचे
> रोजगार डोळ्यांसमोर कसे पळवले जातात हे पण बघितलेय. रस्त्या/नाक्यावर च्या
> जमिनी कश्या कब्जा करून बिगर आदिवासींच्या वसाहती आणि गावे वसली आहेत सोबत
> वाढणारे गुन्हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय. विद्यार्थी/कर्मचारी आणि येथील काही
> लोप्रतिनिधी पण बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या प्रकरणातले आहेत. आरोग्य वीज पाणी
> रस्ते प्रशासन यांची सद्यस्थिती दिसतेय डोळ्यांसमोर. हे कमी कि काय "देश
> हिताचे" १४ पेक्षा जास्त मेगा प्रकल्प या परिसरात नियोजित आहेत, आणि त्यासाठी
> भूमी अधिग्रहण सगळ्या माध्यमातून सुरु आहे. सगळे लिहायला जागा कमी पडेल
> एव्हड्या समस्या आहेत.
>
> या सगळ्या परिस्थितीत येथील लोकप्रतिनिधी कसा असावा?
> पूर्ण समाजाचा आवाज, अपेक्षा, प्रसाशनाला धारेवर धरून आदिवासी समाज हितासाठी
> संविधानिक अधिकार, ध्येय, धोरणे राबविण्यासाठी, आदिवासी समाज हिताचे कार्य
> पुढे रेटणारा, निस्वार्थ हेतूने समाज हित प्राथमिकतेने जपणारा.
>
> पण आपल्याकडे खूप अगदी ठराविक पद्धतीने ठरवून प्रत्येक पक्षातून, त्यांना
> अपेक्षित काम/भाषा बोलणारे अनुकूल प्रतिनिधी बनवले जातात (तुरळक अपवाद वगळता).
> कधी अर्ध शिक्षित, कधी दूरवरून आयात केलेले, तर कधी सामाजिक कार्याशी नाळ
> नसलेले असतात.
>
> वयक्तिक पातळीवर आपले पूर्वीचे खासदार चिंतामण दादा वनगा यांच्याशी अनेक
> विषयांवर चर्चा व्हायची. खासकरून स्थानिक रोजगार निर्मिती, वारली चित्रकला चे
> बौद्धिक सपंदा हक्क, कलाकारांचा मोबदला, स्थानिक आदिवासी नेतृत्व, भविष्यातील
> आव्हाने, सध्याच्या समस्या, इत्यादी. समाज म्हणून आदिवासी समाजाचे नेतृत्व
> तयार व्हावे यासाठी ते आग्रही होते, या संदर्भात लवकरच काही कार्यक्रम सुरु
> करण्याचा त्यांचा मानस होता. ते ज्या परिस्थितून ज्या वातावरणात तयार
> झाले/घडले. त्यांनी समाजा/पक्षासाठी जो त्याग करून स्वतःची एक ओळख तयार केली,
> बऱ्यापैकी अनेक प्रामाणिक प्रयत्न केले. अगदी जेव्हा लागेल तेव्हा
> पक्षाच्या/सरकार च्या विरोधात जाऊन स्पष्ट भूमिका घेतली. पाणी परिषद,
> भूमिसंपादन, किंवा इत्तर असे त्यांचे विरोधक हि हे मान्य करतात. (वयक्तिक
> रित्या डहाणू नोटिफिकेशन संदर्भात त्यांची भूमिका न पटणारी होती. या विषयवार
> त्यांना कळवले पण होते सविस्तर चर्चा ठरली होती). त्यांचे अचानक जाणे
> धक्कादायक होते. असो...
>
> या वेळेस पण दुर्दैवाने लोकसभेसाठी विश्वासाचे एक हि नाव चर्चेत नाही, कि
> ज्याकडून सामान्य लोकांच्या, आदिवासी समाजाच्या अपेक्षा पूर्ण होतील. जर
> आदिवासी नेतृत्वासाठी आपण चांगला पर्यायच तयार करू शकत नाही तर बाकीचे खूप
> लांब आहे, येथे फक्त पक्ष जिंकेल आदिवासी समाज हिताचा विचार नाही. कदाचित कुणी
> एक खासदार बनेल त्याचे कुटुंब पुढे जाईल, त्यांचे कार्यकर्त्यांचा फायदा होईल,
> त्यांच्या नातेवाईकांचा फायदा होईल, त्यांचे गाववाले (तालुका/जिल्हावाले)
> फायदा करून घेतील, त्यांची पार्टी पुढे जाईल. पण येथील स्थानिक आदिवासी
> समाजाचे काय? कोण वाली ?
>
> मतदान करून, चांगला पर्याय निवडा, योग्य पर्याय नसेल तर पर्याय तयार करण्याचा
> कामाला लागा.
> वयक्तिक/राजकीय लाभासाठी निवडणुक ऋतूला तयार होणारे नेतृत्व पेक्षा, सामाजिक
> चळवळीतला, समाजासाठी झोकून दिलेला, समाजाशी प्रामाणिक, अधिकार यांचा अभ्यास,
> कणखर आणि नेतृत्वगुण निपुण. त्याला पक्ष असेल नसेल तरी चालेल पण आदिवासी समाज
> हितासाठी सर्वस्वी पणाला लावणारा पर्याय तयार करूया.
>
> उदाहरण, जसे डॉ सुनिल दादा पऱ्हाड जो आपले करियर सोडून निस्वार्थ पूर्ण वेळ
> आदिवासी समाजासाठी देतोय. जल जंगल जमिन आणि अस्तित्व हीच एक दिशा बनवून स्वतः
> प्रयत्न करतोय

Re: AYUSH | || आयुश उपक्रम - सूचना : नोव्हे २०१६ ||

2017-02-24 Thread vishnu shelke
नमस्ते सरजी, महोदय यापूर्वी आपले वारंवार लेटेस्ट अप डेट्स व माहिती बातम्या
येत असत आजकाल फारसे काही पाठवत नाहीत कृपया पाठवावे हि विनंती आपला
 आण्णाभाऊ शेळके


2016-11-11 0:08 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti :

> *|| आयुश उपक्रम - सूचना : नोव्हे २०१६ ||*
>
> आदिवासी समाजात असलेल्या नैसर्गिक स्वावलंबी, मेहनती, प्रामाणिक, सामाजिक
> एकोपा, वैज्ञानिक दृष्टीकोन, पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक ठेवा इत्यादींचे
> जतन करून सामाजिक चळवळ मजबुती च्या जागरुकते साठी आपण गेली १० वर्षे विविध
> माध्यमातून प्रयत्न करत आहोत. (संकल्पना १९९९ पासून, ऑनलाईन २००७ पासून,
> नोंदणी २०११ पासून)
>
> विविध क्षेत्रातील संपर्क वाढवून ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी कामी यावे
> या हेतूने आपण विविध उपक्रम राबवतो आहोत. आपल्या माहिती साठी
>
> *१) महाराष्ट्र कला महोत्सव । आदिवासी परंपरा प्रदर्शन आणि प्रात्येक्षिक*
> दादर येथे रवींद्र नाट्यमंदिर येथे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवात
> आदिवासी परंपरा आणि कला याच्या प्रदर्शनासाठी आयुश ला निमंत्रित केले गेले
> आहे.  त्या निमित्ताने पुढील कार्यक्रमांचे नियोजन आहे (११ ते १३ नोव्हेंबर )
> वारली चित्रकलेचे प्रदर्शन, प्रात्येक्षिक प्रशिक्षण : सकाळी ११ ते ७
>  (सामाजिक संदेश देणारी चित्रांचे प्रदर्शन, आणि प्राथमिक चित्रकला शिकवणी)
> पारंपरिक आदिवासी नृत्य प्रदर्शन , प्रात्यक्षिक : सायंकाळी ६ ते ९  (कर्डन,
> गंजाड येथील नृत्य ग्रुप सहभागी
>
> आदिवासी समाजात असलेले पारंपारिक ज्ञान आणि सांस्कृतिक ओळख या विषयी शहरी
> माणसात जागरूकते साठी हा कार्यक्रम उपयोगी होईल.
> त्या निमित्ताने मुंबईत असल्यानी कार्यक्रमाला भेट देऊन आपल्या कलाकारांना
> प्रोत्साहित करावे.
>
> *२) आदिवासी नेतृत्व परिचय : झारखंड येथील कार्यकर्ते महाराष्ट्र दौऱ्यावर*
> झारखंड मधील बिशुनपूर चे आमदार चामर लिंडा हे देशभरातील आदिवासी
> लोकप्रतिनिधींना भेटत आहेत, आदिवासी प्रश्नावर राष्ट्रीय पातळीवर
> लोकप्रतिनिधींचा दबाव गट तयार करण्यासाठी असा प्रयत्न गरजेचा आहे. १९-२०
> नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोकप्रतिनिधींशी त्यांची भेट करून
> देण्यात येईल. २१ रोजी पुणे येथे काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा , नाशिक/नागपूर
> येथील आदिवासी नेतृत्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यास ते इच्छुक आहेत. त्यांना
> स्थानिक लोकप्रतिनिधी/कार्यकरते यांच्याशी भेट करून देण्यासाठी आपल्या पैकी
> कुणी दायित्व घेण्यास इच्छुक असल्यास संपर्क करावा.
>
> *३) अभ्यास कार्यशाळेत आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व । इच्छुक प्रतिनिधींनी
> संपर्क करावा*
> वसुधैव कुटुंबक तर्फे अयोजीत कार्यशाळे साठी आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व
> करण्या साठी विचारणा करण्यात आली आहे. कार्यशाळेचा विषय आहे *“Religions and
> Medical Ethics Collaborating for Peace and Harmony in this World”.*
> यात आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक प्रतिनिधींनी संपर्क करावा
> (कार्यशाळे विषयी माहिती शेवटी दिली आहे). पेपर जमा करणे आवश्यक आहे. या
> कार्यशाळेत १२ वेग वेगळे धर्म त्यांचे विचार मांडणार आहेत. प्रथम विचार
> मांडण्याची संधी धर्म पूर्व संस्कृती आदिवासी समाजाच्या प्रतिनिधीना मिळणार
> आहे. २०१४ च्या कार्यशाळेत अशोक भाई चौधरी, २०१५ ला प्रांजन राऊत यांनी
> आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व केले होते.
>
>
> आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in)
> नोंदणी करून सहभागी होवू शकता. या विषयावर आपले मार्गदर्शन आणि अभिप्राय
> अपेक्षित आहे. Lets do it together!
>
> AYUSHonline team
> www.adiyuva.in । ० ९२४६ ३६१ २४९
>
> AYUSHonline team
> www.adiyuva.in
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/CAHMsEBuXci80mE1W46J5cDqvE_jPodqExXHZw3W59mYxy61-jw%
> 40mail.gmail.com
> 
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAC68%2BBDq4kXMwez02%2Brfe%3DvMCn9y046%3DOY7ffMvg86q9LYmPAA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.


Re: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ ||

2016-06-13 Thread vishnu shelke
Wish you all the best .Salute to your devotion and unstoppable efforts
Annabhau Shelke

2016-06-08 22:05 GMT+05:30 Warli Painting :

> || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ || पर्यावरण जतन आणि मानवी
> मुल्य या साठी जग आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांच्या कडे आशेने बघत असताना
> आपल्या नवीन पिढीची नाळ आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित
> प्रयत्नांची आवशक्यता आहे. आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल
> जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून
> सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी एकत्रित पुढाकार घेवूया. त्या साठी वेग
> वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम
> यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया. आपल्या
> माहिती साठी 1) इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ -
> "वारली चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती प्रत्येक्ष आदिवासी परंपरा आणि संस्कृती
> बद्दल चुकीची माहिती पाठात आल्या बद्दल संदर्भात (सवसिन / धवलेरी, वारली
> चित्र). सदर पाठ मध्ये उल्लेख आलेल्या आदिवासी परंपरा यातील दुरुस्ती करून,
> आदिवासी समाजात असेलेल स्रियांचे महत्व अधोरेखित करावे या साठी मुख्यमंत्री,
> शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सन्शॊधन
> मंडळ, आदिवासी संशोधन व प्रशीक्षण संस्था, श्री विद्या प्रकाशन (लेखक : गोविंद
> गारे) यांचे वारली चित्र संस्कृती पुस्तक यांना निवेदन दिले आहे. २) वारली
> चित्र विक्री साठी करार चर्चा : - चित्र विक्री साठीचा करार आणि संबधित चर्चे
> साठी इन्फ़ीस्त्रायीद्स (Infistrides) कंपनी तर्फे बरोदडा येथून अभिषेक आणि
> संकेत आयुश भेटी साठी ३जून रोजी वाघाडी येथे आले होते. संजयदा पऱ्हाड, वनश्या
> दा भूजड, संदीप दा भोइर, अभिजित दा पिलेना, सचिन सातवी यांच्या सोबत वाघाडी
> येथे चर्चा झाली. आदिवासी कलाकारांच्या वस्तू विक्री साठी त्यांच्या कंपनी
> तर्फे असेलेले उपक्रम आणि विक्री चक्र यावर सविस्तर चर्चा झाली आणि चित्र
> वस्तू नमुने परीक्षण केले. करारा वर चर्चा चालू आहे. - दिल्ली येथील नवरंग
> क्रियेशन यांनी वारली चित्र खरेदी साठी चौकशी केली आहे. त्यांच्या सोबत चर्चा
> चालू आहेत - आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध
> कंपन्या सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील,
> इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती,
> इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स
> विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). आदिवासी
> कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी
> उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान
> चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together! ३) वारली चित्र संस्कृती आणि
> परंपरा या विषयी चर्चा : - वारली चित्रकला आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या
> अभ्यासा साठी निफ्ट-मुंबई (National Institute of Fashion Technology) येथून
> प्रा निकिता आणि ८ विद्यार्थी / विद्यार्थिनी हे १ जून रोजी डहाणू येथे आले
> आहेत. डहाणू येथे सचिन सातवी यांनी आदिवासी परंपरा, संस्कृती, वारली चित्रकला,
> आयुश चे उपक्रम या विषयी माहिती दिली. डहाणू येथे १० दिवस राहून विविध कलाकार
> यांची भेट घेत आहेत. (जिव्या सोमा म्हसे, संपत दा ठाणकर, संजय दा पऱ्हाड,
> शर्मिला ताई घाटाळ, अभिजित दा पिलेना, यांची भेट घेतली) - महाराष्ट्रातील
> आदिवासींवर डॉक्युमेंट्री बावण्याच्या उद्देशाने आदिवासी जीवन शैली, कला ,
> संस्कृती या विषयी अधिक माहिती जाणून घेण्य साठी इंग्लंड येथील आर एफ एस
> इंटरटेंटमेंट (RFS Entertainment) कंपनीच्या भारताच्या विभागाच्या एम डी
> श्रीमती वरुणा राणा (India Got Talent - Director) यांनी २९ मे रोजी तलासरी
> येथे भेट देवून स्थनीक आमदार आणि वसतिगृह यांना भेट दिली. २मे रोजी वाघाडी
> येथे आयुश ला भेट देवून वारली चित्रकला उपक्रमा विषयी अधिक वितृत चर्चा. तसेच
> संपत दादा ठाणकर यांच्या सोबत चर्चा केली. ६ जून रोजी संपत दा ठाणकर यांची
> आदिवासी परंपरा, संस्कृती आणि विविध सामाजिक समस्या या विषयावर मुलाखत चित्रित
> करण्यात आली. ४) कलाकृती विक्री साठी वस्तू छायाचित्रण : वनश्या दा भूजड
> यांच्या विविध नमुना वस्तूंचे चित्रीकरण करण्यात आले. लाकडी वस्तू, कारागिरी,
> बांबू वस्तू, वारली चित्रकला वस्तू विविध संकेतस्थळावर विक्री साठी ज्या
> कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने
> वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून द्यावे. छाया चित्रन करून संकेत
> स्थळावर विक्री साठी ठेवण्यात येयील किवा संबधित मार्गदर्शन केले जायील. ५)
> कलाकृती विक्री : - चित्र विक्री साठी एक महिना चर्चे नंतर, ३० एप्रिल रोजी
> चेन्नई येथील क्राफ्ट कंपनी ला काही नमुना चित्र पाठवले होते. त्यातील
> चित्रांची निवड होवून लवकरच २०० चित्रांची मागणीदेत आहेत. सध्या प्राथमिक ५०
> नमुने बनविणे चालू केले आहे. २५ चित्रे पुरुष चित्रकारांचा गट संजय दा पऱ्हाड
> यांच्या नेतृत्वात तसेच २५ चित्रे महिलां चित्रकारांचा गट शर्मिला ताई घाटाळ
> यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहेत. - मुंबई येथील मेहता परिवाराला वारली
> चित्र ने साकारलेली एक नवीन पद्धतीची भेट वस्तू निर्मिती साठी चर्चा चालू आहे.
> संजय दा पऱ्हाड या निर्मिती विषयक चर्चे साठी उद्या मुंबई (अंधेरी) येथे भेट
> देत आहेत. नवीन वस्तू निर्मिती साठीच्या कल्पकता आणि तंत्रज्ञान यांचा पुयोग
> करून व्यापकता वाढवण्या साठी उपयोगात येयील - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण
> संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात
> असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी सं

Re: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० मे २०१६ ||

2016-06-08 Thread vishnu shelke
Congratulations sirji 
   wish you all the best to your team and your devotion ...
can you arrange one or two days basic informational & skilled
free training workshop for tribal youth of Pune city ? If possible please
send me details...
  yours  faithfully
Annabhau  Shelke
  President of ADIM YOUNG  GLADIATORS

2016-05-30 23:21 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti :

> || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० मे २०१६ ||
>
>
>
> आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांचे जगभर कौतुक होत असताना आपली नवीन पिढीची
> नाळ या आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवशक्यता आहे.
> तसेच आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य
> विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून सकारात्मक आणि रचनात्मक
> कार्यासाठी एकत्रित पुढाकार घेवूया.
>
>
>
> त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक आणि सकारात्मक कार्य करणारे
> ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी
> प्रयत्न करूया.
>
>
>
> आपल्या माहिती साठी
>
>
>
> 1) वारली हाट निर्मिती चर्चा :
>
> - वारली चित्रकला उपक्रम आणि रोजगार निर्मिती आणि आदिवासी  युवकांची भूमिका
> या साठी जिल्हाधिकारी भेटीच्या पूर्व तयारी चर्चा २४ एप्रिल रोजी चारोटी येथे
> पार पाडली. चित्रकार, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, बेरोजगार युवा सहभागी झाले
> होते.
>
> - २५ एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकारी अभिजित भांगर यांच्या सोबत आयुश टिम चे
> प्रतिनिधी यांची चर्चा पार पडली. पारंपारिक ज्ञानाचा उपयोग करून (वारली
> चित्रकला) रोजगार निर्मिती विषयी आणि आयुश चे उपक्रम या संदर्भात एक तास चर्चा
> झाली.
>
>
>
> २) आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रदर्शन :
>
> २१ ते २३ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणाऱ्या "ग्लोबल एक्झिबिशन ओन सर्विसेस
> २०१६" - Global Exhibition  on Services 2016 मध्ये बौद्धिक संपदा विभागा
> (Intellectual Property India) तर्फे वारली चित्रकला प्रदर्शन आणि
> प्रात्यक्षिका साठी आयुश तर्फे संजय पऱ्हाड सहभागी झाले होते. अंतराष्ट्रीय
> पातळीवरील प्रदर्शनातील औद्योगिक कार्यक्रमाचा अनुभव मिळाला.
>
>
>
> ३) वारली चित्र एकत्रित मागणी :
>
> चित्र विक्री साठी एक महिना चर्चे नंतर, ३० एप्रिल रोजी चेन्नई येथील क्राफ्ट
> कंपनी ला काही नमुना चित्र पाठवले होते. त्यातील चित्रांची निवड होवून लवकरच
> २०० चित्रांची मागणीदेत आहेत. सदरची मागणी १००चित्रे पुरुष चित्रकारांचा गट
> संजय दा पऱ्हाड यांच्या नेतृत्वात तसेच १०० चित्रे महिलां चित्रकारांचा गट
> शर्मिला ताई घाटाळ यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहोत. (संपर्क करून सदर
> कार्यात सहभागी होवू शकता )
>
>
>
> ४) वारली चित्र विक्री साठी करार चर्चा :
>
> चित्र विक्री साठीचा करार आणि संबधित चर्चे साठी इन्फ़ीस्त्रायीद्स
> (Infistrides) कंपनी तर्फे बरोदडा येथून अभिषेक आणि संकेत आयुश भेटी साठी ३जून
> रोजी वाघाडी येथे येत आहेत. आदिवासी कलाकारांच्या वस्तू विक्री साठी त्यांच्या
> कंपनी तर्फे असेलेले उपक्रम या विषयी चर्चा होणार आहे.
>
>
>
> ५) वारली चित्र संस्कृती आणि परंपरा या विषयी चर्चा :
>
>  - वारली चित्रकला आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या अभ्यासा साठी निफ्ट-मुंबई
> (National Institute of Fashion  Technology) येथून प्रा निकिता आणि ८
> विद्यार्थी हे १ जून रोजी डहाणू येथे येत आहेत. येथे १० दिवस राहून विविध
> कलाकार/अभ्यासक/आयुश सोबत चर्चा आणि अभ्यास करून विस्तृत अहवाल तयार केला
> जायील.
>
> - महाराष्ट्रातील आदिवासींवर डॉक्युमेंट्री बावण्याच्या उद्देशाने आदिवासी
> जीवन शैली, कला , संस्कृती या विषयी अधिक माहिती जाणून घेण्य साठी इंग्लंड
> येथील आर एफ एस इंटरटेंटमेंट (RFS Entertentment) कंपनीच्या भारताच्या
> विभागाच्या एम डी श्रीमती वरुणा राणा यांनी २९ मे रोजी तलासरी येथे भेट देवून
> स्थनीक आमदार आणि वसतिगृह यांना भेट दिली. २मे रोजी वाघाडी येथे आयुश ला भेट
> देवून वारली चित्रकला उपक्रमा विषयी अधिक वितृत चर्चा. तसेच संपत दादा ठाणकर
> यांच्या सोबत चर्चा होणार आहे.
>
>
>
> ६) शासकीय पातळीवर आदिवासी कला अभ्यासक्रम निर्मिती :
>
> आदिवासी  कला आणि पारंपारिक ज्ञान यांच्या आधारे विविध रोजगार निर्मिती
> अभ्यासक्रम निर्माण करण्या हेतू केंद्रीय कौशल्य आणि इंतरप्रेनरशिप विकास
> विभाग  (Ministry of Skill Development and Entrepreneurship Development)
> तर्फे आयुश ला अभ्यास भेट देण्या साठी उच्च अधिकारी गट  डहाणू - वाघाडी येणार
> आहे. सदर विषयी चर्चेत सहभागी होण्या साठी इच्छुक अभ्यासकांनी संपर्क करावा
> (पहिली बैठक मुंबई येथे झाली होती). लवकरच दिल्ली कार्यालयातून तारीख कळवली
> जायील
>
>
>
> ७) कलाकृती विक्री साठी वस्तू छायाचित्रण :
>
> लाकडी वस्तू, कारागिरी, बांबू वस्तू, वारली चित्रकला वस्तू विविध
> संकेतस्थळावर विक्री साठी ज्या कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण
> करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून
> द्यावे. छाया चित्रन करून संकेत स्थळावर विक्री साठी ठेवण्यात येयील किवा
> संबधित मार्गदर्शन केले जायील. सदर उपक्रमात इच्छुक
> छायाचित्रकार/चित्रकार/फोटो एडिटिंग सहभाग घेवून सहकार्य करू शकतात.
>
>
>
> ८) कलाकृती विक्री :
>
> आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research &
> Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे
> "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या
> जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी
> ठेवू शकतात.
>
>
>
> ९) कलाकृती विक्री :
>
> आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या सोबत
> करार/नोंदणी  करण्यात आले आहेत. (

Re: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : 7 फेब्रुवारी २०१६ ||

2016-02-09 Thread vishnu shelke
मनापासून अभिनंदन .आगे बढो हम आपके साथ है


2016-02-07 10:21 GMT+05:30 Warli Painting :

> || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : 7 फेब्रुवारी २०१६ ||
> आदिवासी समाजाची जीवनमूल्य आणि पारंपरिक ज्ञान यांच्याकडे जग आदर्श मार्ग
> म्हणून बघत असताना  आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन
> जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून
> सकारात्मक आणि रचनात्मक पुढाकार घेण्याची गरज आहे.
> हे प्रयत्न सर्व पातळी वरून होने गरजेचे आहे. त्या साठी विविध
> संस्था/संघटना/ग्रुप यांनी एकमेकांना पूरक प्रयत्न करायला हवे. अखंड आदिवासी
> समाज एक कुटुंब हि या भावनेने केलेले नक्कीच समाजा साठी हिताचे राहील.
>
> आपल्या माहिती साठी
> 1) ५/०२ रोजी मुंबई मध्ये स्किल डेवेलोप्मेंट आणि इंत्रेप्रेनार्शीप
> डेवलोपमेंट खात्यातील अधिकाऱ्यासोबत प्राथमिक चर्चा झाली. वारली चित्रकलेचा
> अभ्यासक्रम निर्मिती आणि आदिवासी युवकांसाठी रोजगारनिर्मिती साठीचा उपक्रम
> शासकीय स्थरावर राबविण्या संदर्भात विचार विनिमय झाले. (संदर्भ - संसदेत
> खासदारांनी कौशल्य विकास मंत्रालयाला प्रश्न केला होता. वारली चित्रकला चा
> उपयोग करून कौशल्य विकास आणी रोजगार निर्मिती करता येता येयील का? त्या साठी
> ते मंत्रालय या संदर्भात चर्चा आणि तपासणी करत असताना त्यांनी आयुश ला संपर्क
> केला.) या मिटिंग मध्ये आयुश तर्फे चेतन गुराडा (मुंबई युनिवर्सिटी,
> प्राध्यापक), प्रांजन राऊत (एअर इंडिया, अभियंता), बबलू वाहुत (बेस्ट,
> अभियंता) यांनी सहभाग घेतला. लवकरच पुढील माहिती कळवली जायील
>
> 2) आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे परिसरात असलेल्या आदिवासी
> कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत
> कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून
> त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात.
>
> 3) ६/०२ रोजी आदिवासींची स्वतःचे (E Commerce Website) ओन लयीन विक्री संकेत
> स्थळावर पेमेंट गेटवे चे इंटिग्रेशन साठी पेयू मनी सोबत करार आज पूर्ण करण्यात
> आला
>
> 4) आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या
> सोबत करार/नोंदणी  करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, इंडिया
> कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, इत्यादी)
> आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी
> ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249).
> आणि आता आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य
> करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि
> पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे.  Lets do it together!
>
> 5) ६/०२ रोजी आदिवासी विकास प्रकल्पांचा अधिक विस्तृत अभ्यास करण्या करिता
> आयुश तर्फे सचिन सातवी यांनी “राष्ट्रीय ग्राम विकास एवं पंचायत राज संस्था”
> हैदराबाद (NIRD – National Institute of Rural Development and Panchayat Raj)
> येथे एक वर्षाच्या  Post Graduate Diploma In Tribal Development Management
>  दुरस्त अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. यात देशभरातील विविध क्षेत्रात कार्य
> करणाऱ्या तज्ञांचा समावेश आहे. हा अनुभव आयुश तर्फे घेतल्या जाणाऱ्या
> कार्यक्रम आणि आदिवासी समाजा साठी च्या उपक्रमांना नक्कीच उपयोग होईल.
>
> # आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता किवा स्वयंसेवक म्हणून येथे
> (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता
>
> आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक
> जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू
> शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय लागली
> पाहिजे" आयुश चा हाच एक उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी
> स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि
> निस्वार्थ समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. त्या मुळे आयुश
> हे करेल आयुश ते करेल अशी अपेक्षा करण्या पेक्षा जे आपल्याना समाज हिता साठी
> योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया.  हेच आयुश आहे.  Lets do it
> together!
>
>  AYUSHonline team
> www.adiyuva.in | www.warli.in
>
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuemDLTX%3D61YOcGWDtk7h8AzOjCdwNqhqgMOGvqZNiVdg%40mail.gmail.com
> 
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discuss

Re: AYUSH | १७ जमातींचा अभ्यास

2015-10-29 Thread vishnu shelke
Dhanyawad sirji ..I will try to circulate all this information to
tribal tehsil area ..by fb watsapp and as print media ...as
pamplate and also trying to make its informational audio cd .which
will be listen in rural area ...and local market  and wadya ...pade
...of Ambegaon...Khed..Maval...Junner..Akole...Igatpuri
 one more time thanks ...and keep countinue to send me such
informations ...which is most useful to tribal impowerment  and awareness
about our rights and duties thank you so much .ADIM YOUNG
GLADIATOR...

2015-10-29 13:57 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti :

> १७ जमातींचा अभ्यास
>
> पूर्वीच्या राज्य शासनाच्या दिनांक ६.८.२०१४ च्या प्रस्तावास अनुसरून केंद्र
> शासनाने अनुच्छेद २७५(१) अंतर्गत अनुदान या योजनेखाली सन २०१४-२०१५ या वर्षी
> एकून १७ योजनांखाली ११७०१.३० लक्ष निधी उपलब्ध केला आहे .त्यातील ८ क्रमांकावर
> Research Studies (TRTI) Ethnographic study of 17 tribes ही योजना आहे व
> मंजुर खर्च १०० लाख आहे.
> या योजनेच्या मार्गदर्शक सूचनाना मंजूरी देणे बाकी होते . विद्दमान शासनाने
> ९.९.२०१५ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत .
> त्यात अभ्यासाची उद्दीष्ट्टये पुढीलप्रमाणे ठरविण्यात आलेली आहेत.
> १. आदिवासींची मूलभूत ओळख आणि इतिहास यांचा अभ्यास करणे,
> २. जास्त लोकसंख्या असलेल्या आदिवासी क्षेत्रात प्रत्यक्ष भेटी देणे,
> ३. त्यांची शारीरीक वैशिष्ठ्ये ,भाषा ,साहित्य यांचा अभ्यास करणे,
> ४. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणे,
> ५.पर्यावरण, स्वच्छता,आरोग्य,रोग आणि त्यावरील उपचारपध्दती याबाबतच्या
> जीवनपद्धती आणि सवयी जाणून घेणे,
> ६. जीवनातील महत्वाचे प्रसंगी म्हणजे जन्म,लग्न,मृत्यू इ.बाबतचा त्यांचा
> दृष्ट्टीकोन आणि पध्दती समजून घेणे,
> ७.त्यांच्या धर्मामाबाबतच्या संकल्पना,रितीरीवाज ,देवदेवता, श्रद्धा आणि
> चालीरीती याचा अभ्यास
> ८. आंतर सामुदायिक संबंध समजून घेणे,
> ९. समुदायातील नातेसंबंधांच्या विविध पैलूंचा अभ्यास करणे,
> १०. सामाजिक नियंत्रण,प्रतिष्ट्ठा आणी नेतृत्व संरचना अभ्यासणे,
> ११. यामध्ये होत असलेल्या सामाजिक,सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करणे,
> १२. त्यांच्यामध्ये सामाजिक,आर्थिक आणि क्षैक्षणिक विकासामुले झालेले बदल
> स्वीकारणे.
> महाराष्ट्र राज्याच्या अनु. जमातीच्या यादीतील कथीत १७ जमाती सर्वाना माहित
> आहेत. ६सप्टेंबर १९५० ला महाराष्ट्रातील आदिवासी जमातीची यादी प्रसिद्ध झालेली
> होती त्यात २४ जमाती होत्या त्यात १९७६ पर्यंत २३ जमातीचा समावेश केला आहे व २
> जमातीना २००३ मध्ये वगलले आहे. Anthropological survey of India मध्ये या १७
> जमातींचा अभ्यास आहे.
>
>
>
>
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/30e3e60a-77cb-4bf9-b402-0dda3c24d95e%40googlegroups.com
> 
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAC68%2BBAAdpLMowKeDpThG%2Bi2rKVWL0B5PV7vA_4GDfyECJU53Q%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.


Re: AYUSH | Re: आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष...

2015-08-25 Thread vishnu shelke
आपले नियमितपणे  येणारे मेल मी जाणीवपूर्वक वाचतो. त्यामुळे आपल्या आदिवासी
समाजाशी संबंधित घडामोडी समजतात व ज्ञानातही भर पडते .त्यासाठी मनापासून
धन्यवाद ...!...समाज अधिक जागृत व सजग होण्यासाठी मी हि माहिती अधिक
लोकांपर्यंत फेस बुक व्होट्स अप च्या माध्यमातून पाठविण्याचा प्रयत्न करून
समाजाप्रती आपले काही अंश उत्तर दायित्व निभावण्याचा प्रयत्न
करतोजगाच्या पाठीवर जिथे जिथे क्रांती घडून आली त्यापाठीमागे सर्वात
मोठा सिंहाचा वाट आहे तो विचारवंतांचा ..कोणतीही क्रांतीची सुरुवात
सर्वप्रथम वैचारिक क्रांतीने होते...आपण त्याच मार्गाने मार्गक्रमण
करत आहात..आपणास शुभेच्छा..जय आदिवासी .! जय मूलनिवासी ...!

2015-08-24 23:36 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti :

>
>
>
>
>
>
>
>
>
> On Monday, August 24, 2015 at 9:01:09 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva
> shakti wrote:
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>> विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून प्राथमिक सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन
>> करावे लागते हाच सरकारचा पराभव! आदिवासी म्हटले की आजकाल सरकारला अडचण वाटत
>> असणार त्यामुळे आंदोलन करणारे आदिवासी विनाविलंब तुरुंगात टाकण्याचा धडाका
>> लावत आहे. जर आदिवासी विकास निधी लाटणाऱ्या भ्रष्ट प्रणाली विरुद्ध एव्हडी
>> तत्परता दाखवली तर आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यास हातभार लागेल यात
>> शंका नाही ! www.jago.adiyuva.in
>>
>>
>> On Sunday, August 23, 2015 at 9:53:05 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva
>> shakti wrote:
>>>
>>> आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष...
>>>
>>> शिक्षण ही आदिवासी मुलांची गंभीर समस्या...निसर्गातल्या फुलांचा विचार केला
>>> तर खरी अडचण. जन्मत: खेळायला, बागडायला सोबत असणारा निसर्ग म्हणजे खरा गुरु
>>> आणि प्रेरणेचा स्त्रोत. जगण्याच्या कला खरं तर निसर्गातुन सर्वोत्तम शिकता
>>> येतात. परंतु अलीकडे आधुनिकतेच्या वा-यामध्ये मुलांना शाळेतले शिक्षण मिळाले
>>> पाहिजे हा अट्टहास.
>>>
>>> शिक्षण म्हणजे साक्षरता होवू शकते पण ज्ञान नाही. ज्ञान मिळविण्याचा तो एक
>>> मार्ग होवू शकतो. आई वडिल यांच्या पासून दूर...आपल्या जंगल अनुभूति विसरून चार
>>> भिंतींच्या आत पुस्तकात डोके घालून शिकायचे म्हणजे आदिवासी मुलांना डोईजड
>>> वाटले नाही तर नवलचस्वच्छंदी जीवन जगणारी चिमुरडी मुलं झाडांच्या
>>> अंगाखांद्यावर बागडताना खरे तर अनेक मुल्ये आत्मसात करत असतात. झाडे, फळे,
>>> फुले, फुलपाखरे, वेली, प्राणी, साप अशा विविध सोबत्यांसोबत प्रेमाच्या अथांग
>>> सागरात स्वताला झोकुन देतात. हे वास्तव सोडून एक दम आश्रमशाळेत ते पण बाजुला
>>> उंच भिन्तिंचे कुंपण, शालेय शिस्त आणि त्यासाठी डोळे वटारून बघणारे शिक्षक यात
>>> मुलं रमतील असे कोणतेच वातावरण नाही. जे निसर्गात सहज मिळतं ते इथं संघर्ष
>>> करून बळजबरीने आत्मसाथ करावे लागते. ही मानसिकता आज पर्यन्त समजुन न घेणारे
>>> दूर देशातील शिक्षक मग नेहमी आरडा ओरड करणार "ह्या मुलांना काही कळत नाही",
>>> "ही मुले खुप गैरहजर असतात", "ह्या मुलांना शिस्त नाही", "पालकांना सुध्दा
>>> काही कळत नाही", "काय यांचे कपडे मळालेले, फाटलेले", "दगड परवडले पण ही मुले
>>> नको"...या न अशा विविध टिपन्या झेलत मुलांना मनावर दगड ठेवून पुस्तकातले जे
>>> कधी त्यांना आपले वाटत नाही ते शिकावे लागते. मग जाते ते सर्व
>>> डोक्यावरून...त्यात मुलांची काय चुक.
>>>
>>> पाठ्यपुस्तकातील धडा ओळखिचा वाटावा...आपुलकीचा वाटावा असे काही नसतेच
>>> पुस्तकांतसर्व काही शहरीमुलांच्या दृष्टीकोनातुन कल्पनेतिल. भाषेचा
>>> विचार केला तर अगदी नवखी. त्यात शिकवणारे शिक्षक हे त्या भाषेलाच चिकटून
>>> असणारे कधी आदिवासी बोली भाषेला आपलेसे न माणणारे मग मुलांना ते पण परकेच
>>> वाटणारजिथे आपले काही आहे असे वाटत नाही, तिथे ज्ञान तरी मुलं कसे गृहण
>>> करणार.
>>>
>>> आता दुरदर्शनच्या युगात आदिवासी गावे थोड़ी जागृत व्हायला लागली आहेत.
>>> पूर्वी जे दिले जायचे तेच आमच्या नशिबात आहे असे मानून सारा अन्याय सहन केला
>>> जायचा. परंतु आता जगाचा अभ्यास करणारी दृष्टी विकसीत होवू लागली आहे. आपल्याला
>>> काय मिळायला हवे याचा विचार करणारी पीढ़ी पुढे येवू लागली आहे. नेमका याचाच
>>> त्रास आता प्रशासनाला होताना दिसतोय.
>>>
>>> ज्यांच्या घरी खायला नाही त्यांना आम्ही खायला देतोय असा आव आणणारे आदिवासी
>>> विकास खाते आणि त्यांची वसतिगृहे आता संघर्षाची केंद्रे बनत आहेत. कारण पूर्वी
>>> निसर्गात वाढणारी ही मुले शाळेत, वसतिगृहात मुकाट्याने सारं काही सहन करत असत.
>>> परंतु आता ह्या कोंडवाड्यान्ना भेदुन बाहेर पडण्याचा विचार मुलान्मध्ये रुजत
>>> आहे. तूटपूंज्या सुविधा देवून मालदार झालेले अधिकारी यांना मुलांचा आजचा
>>> विद्रोह सलत आहे. काही अधिकारी तर आगीत तेल ओतून मुलांना त्यांनी केलेल्या
>>> आंदोलनासाठी तुरुंगात डाम्बत आहेत. जो आवाज इंग्रज दाबू शकले नाहिततो
>>> उलगुलान दाबण्याचा प्रयत्न करणा-या समाजद्रोही विकृती वेळीच ठेचन्याची गरज
>>> आहे. जे हक्काचे आहे ते लुबाडून विद्यार्थ्यांना कायद्याच्या बेडित अडकवणारे
>>> हे धाडस करू शकतात, कारण आमच्यातला तो बिरसा, राघोजी, तंट्या, झलकारीबाई आम्ही
>>> विसरून स्वकेंद्री जीवन जगु लागलो आहोत.
>>>
>>> स्वातंत्र्याची चिंगारी ज्या आदिवासींनी पेटविली आज त्यांचे वारस असे
>>> शांतहा सर्व खेळ जे परकीय शिक्षण आम्ही घेतले त्याचाच आहे. मला काय त्याचे
>>> ही प्रवृत्ती वाढली. नोकरीला असणारे, कायद्याची जाण असणारे अनेक आहेत आदिवासी
>>> समाजात...आज त्यांच्या समर्पणाची, त्यागाची गरज आहे.
>>>
>>> पनवेल येथील मुलांनी आपणास सुविधा मिळाव्यात म्हणून आन्दोलन केले. त्यांचे
>>> काय चुकले? याचा विचार अगोदर होणे गरजेचे आहे. आमच्या ताटातील हिसकावून घेणारे
>>> अधिकारी माज आल्यागत कायद्याची भाषा करत आहेत. खरे तर यांच्यावर अनुसूचित
>>> जमातीच्या विद्यार्थ्