Re: AYUSH | वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया

2018-06-16 Thread Zhina Kuvra
लवकर ये बेसकरुं ये ददुहि वाट नांगत आहा

On Jun 6, 2018 12:48 AM, "SACHiNe SATVi"  wrote:

ho da, devalu. undya waghadet jayachu aahu 2 disa sathi


On Wednesday, June 6, 2018 at 12:47:03 AM UTC+5:30, Avinash Patil wrote:
>
> Sachin ..
> Devlas ka nahe India t
>
> 2018-06-04 0:24 GMT-04:00 Bhaiyaji Uike :
>
>> I AM HAPPY TO YOUR SOCIAL WORK
>>
>> 2018-06-01 21:49 GMT+05:30 SACHiNe SATVi :
>>
>>> वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया
>>>
>>> आज शेवटचा दिस कोरियाचा, उंद्या परत इयाचू ...
>>>
>>> [ *स्थानिक आदिवासी बोली भाषा* ]
>>> कव्हां भारतात येव ना घरा जावं असा झालाहें. गायचेन भलता आठव येय, घरचा धान
>>> खाया वाटलाहें. सामान गोलाटून बोचका बांधाया सुरवात केलीहे. हलूं हलू एक एक
>>> सामान नांगत होतुं, काही काही आठव येत होता डोक्यात. पका सामान झालाहे, दादूला
>>> बारका बारका पका सामान घिदेल आहे. त्याला हो खेलनी नीही पायजत, घरात ज्या
>>> सामान दिसल त्यासी खेलतो. इकडं दुकानात भलत्या बारक्या बारक्या क्रिएटिव्ह
>>> वस्तू दिसल्या, भलत्या भरून घितल्याहात.
>>>
>>> सामान त भरून नेवल, वस्तू नेवतील, आठवणी नेवतील, इकडचे फोटो नेवतील, वेग
>>> वेगल्या आयडिया नेवतील त्याचे आधारे भारताला सूचना करवतील. पण ये लोखांच्या
>>> चांगल्या सवई कस्याक आणू , का जेणेकरून भारतात हो लोखा बेस बेस रेहतीला.
>>>
>>> [ *साधारण मराठी भाषा* ]
>>> आज शेवटचा दिवस, उद्या भारताच्या प्रवासाला लागणार. काल संध्याकाळी
>>> ह्युंदाई कमर्शियल रिसर्च अँड डेव्हलोपमेंट चे डायरेक्टर सोबत डिनर झाला. आताच
>>> पॅकिंग पूर्ण झाली, दादू साठी खूप साऱ्या क्रिएटिव्ह वस्तू घेतल्या आहेत कारण
>>> त्याला खेळण्यांपेक्षा घरातल्या वस्तू आवडतात.
>>>
>>> कोरियात daiso नावाची दुकानांची चेन आहे, हि जपानी कंपनी आहे. या दुकानात
>>> घरात लागणारे सगळे लहान सहान वस्तू आणि सामान मिळते. डिझाईन, क्वालिटी खूप
>>> चांगल्या प्रतीची आणि किंमत पण परवडणारी. त्यामुळे या दुकानात नेहमी खूप गर्दी
>>> असते. आणि एकदा गेल्यावर, राहवतच नाही काही ना काही घेण्याची खूप इच्छा होते.
>>> कारण सगळ्या गोष्टी रोजच्या कामात येणाऱ्या आहेत. मनावर खूप ताबा ठेवला तरी
>>> मोठाली बॅग सामानानी भरली, तीनही वेळेस. असो येथे क्रिएटीव्हीटी वाढवणे आणि
>>> सामान्य जीवन सोप्प्या करणे याला खूप महत्व आहे. त्यानुसार सगळे डिझाईन केले
>>> जाते.
>>>
>>> कोरियाचे औद्योगिकरण, विकास, शहरीकरण, पर्यावरण, प्रसाशन, शिक्षण,
>>> जीवनशैली, परंपरा, जीवनमूल्य, इत्यादी अनेक गोष्टी जवळून बघतोय आणि अनुभवतोय
>>> गेल्या ११ वर्षांपासून. कोरियन विकासाला रॅपिड ग्रोथ सांगतात, त्याचे त्या
>>> प्रमाणे फायदे आहेत आणि तोटे पण आहेत. पण येथील इन्फ्रा विकासा सोबत पूरक
>>> मूल्य व्यवस्था आणि नागरिकांचे आचरण तसेच प्रसाशनाची भूमिका पण महत्वाची आहे.
>>> येथील प्रशासक, नेतृत्व, उद्योजग, नोकरदार, व्यावसायिक, सामान्य नागरीक
>>> प्रत्येक जन त्यांचे काम नियमा नुसार प्रामाणिक करतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी
>>> चांगल्या पद्धतीने मेंटेन आहेत. सार्वजनिक आणि वयक्तिक पण प्रत्येक जण
>>> जाबदारीने वापरतात. असो प्रत्येक गोष्टीच्या २ साईड असतात, इथल्या पण काही
>>> वाईट (न पटणाऱ्या) गोष्टी आहेत.  असो यांना हवे तशे त्यांच्या प्राथमिकतेने ते
>>> करत आहेत.
>>>
>>> आणि भारत म्हणून आपण? प्रत्येक जन वेग वेगळ्या दिशेने ओढायचा प्रयन्त
>>> करतोय, कुणीच समाधानी नाही.
>>> आपल्याना सर्वात आधी आपल्या *प्राथमिकता ठरावाव्या लागतील. एक बेस लाईन
>>> ठरवावी लागेल आणि त्यानुसार सुनियोजित पणे उपक्रम राबवावे लागतील. नाही तर खूप
>>> मोठा वर्ग विकासापासून दूर राहील आणि आर्थिक विषमता, असमानता, गुन्हेगारी वाढत
>>> राहील. पर्यावरण खराब होत राहील आणि नैसर्गिक आपत्ती, आजार, आरोग्याचे प्रश्न
>>> वाढत राहतील*.
>>>
>>> आपल्याना भौतिक गोष्टींवर जितके भर देतोय तितकाच भर आपल्या व्यवस्था
>>> प्रभावी करण्यात आणि लोकात संवेदना जागवणे महत्वाचे वाटते. कारण जरी सुपर
>>> फास्ट हायवे, प्रशस्त परिसर, यंत्र आले आणि ते *वापरण्यात शिस्त नसेल संवेदना
>>> नसेल तर अपघात आणि त्रासच जास्त होईल*. (सध्याचे अपघातांचे आकडे, प्रदूषणाचे,
>>> भ्रष्टाचाराचे, गुन्ह्यांचे, अत्याचाराचे आकडे बघावे)
>>>
>>> [ *दोन शब्द सामाजिक* ]
>>> विज्ञान वापरासाठी विवेक हवा. त्यासाठी आपल्यात मूल्य असायला हवीत, संस्कार
>>> असायला हवेत. काही चांगल्या गोष्टी पण होत आहेत पण दुर्दैवाने काही घडामोडी
>>> बघितल्यावर मन सुन्न होते.
>>>
>>> कुपोषित बालकांचा मृत्यू, आश्रम शाळेत विषबाधा/अत्याचार, वसतिगृहात
>>> भ्रष्ट्राचार, शिक्षणाची सुमार गुणवत्ता, महाविद्यालयात शिष्यवृत्ती नाही,
>>> अपुरी आरोग्य सेवा, योजना मधला अपहार, वाढती गुन्हेगारी आणि असुरक्षितता,
>>> बोगसांचा भरणा, जमिनींचे हस्तांतरण, वाढती बेरोजगारी, वाढणारे बाहेरचे लोंढे,
>>> वाढणारी झोपडपट्टी, प्रदूषण, रोगराई, जमिनीची गुणवत्ता, अन्न पदार्थातील भेसळ,
>>> अमली पदार्थ आणि वाढते व्यसन, वाढती आर्थिक विषमता, भेदभाव, शेतकरी आणि
>>> कामगारांशी दुजाभाव, बुडते पारंपरिक उद्योग, इत्यादी *यादी वाढते आहे*.
>>>
>>> नक्की काय करतोय आपण? कोणत्या दिशेला जातो आहोत?
>>>
>>> भले प्राथमिकतेने बुलेट ट्रेन आणाल, ऑटोमॅटिक गाड्या आणाल, मोठे मोठे
>>> प्लांट लावाल, कारखाने काढाल, करोडो अब्ज मध्ये संपत्ती गोळा कराल. पण *जर
>>> सर्व सामान्यांचे जीवन अधिक सुखकर होणार नसेल तर नक्कीच हा विकास परवडणारा आहे
>>> असे वाटत नाही*.  तुम्हाला काय वाटते ?
>>>
>>> (या कोरियन लोकांची शिस्त आणि मूल्य बॅग मध्ये भरून आणता अली असती तर
>>> नक्कीच आणली असती)... असो खूप झाले, भेटूया भारतात आल्यावर.
>>>
>>> ... dahanu calling!!!
>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
>>> ayush.html
>>> ---
>>> You 

Re: AYUSH |

2018-06-16 Thread Yogini S
I guess there are watershed management projects going on by org. Such as
NAREGA and Vasundhara.
DO NOT KNOW THE RESULT OF SUCH ACTIVITIES THOUGH.

On Wed, 6 Jun 2018, 00:46 Parag Patil,  wrote:

> मला वाटते कि जर Mr मनोज गव्हर्नमेंट चा कोणता तरी प्रोजेक्ट राबवत असतील तरच
> त्यांना मदत करणे ठीक आहे. पिण्यासाठी पाणी आणि स्वच्चता याच्यासाठी सरकारी
> यंत्रणा आहे. त्यामुळे अश्या खाजगी कामापेक्षा सरकारी खात्यांवर भरोसा केलेला
> कधिही चांगला.
>
> (मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग  वॉटर अँड सॅनिटेशन : यांची हि जबाबदारी आहे. )
>
> या संदर्भातील  आर्टिकल खूप महत्वाचे वाटते. कृपया एकदा वाचावे.
>
> Article link
> 
>
> थँक यु .
>
> *Parag Patil*
> PhD Student
> Discipline of Chemical Engineering
> 
> Indian Institute of Technology, Gandhinagar
>
> *+91-9421178717 / 8169904690*  |LinkedIn
> 
>
>
> 2018-05-16 15:29 GMT+05:30 vijay Wadhiya :
>
>> मला तरी माहीत नाही हे ठिकाण
>>
>> On Tue, May 15, 2018, 7:35 PM KUSUM ALAM  wrote:
>>
>>> उत्तम कार्य
>>> On 13 May 2018 7:13 p.m., "reshma lakhat" 
>>> wrote:
>>>
 पालघर मध्ये अशी कोणती गाव आहेत की जिथं जमिनीत पाणी राहत नाही , आणि
 जिथल्या आपल्या माणसाना पाणी मिळत नाही आहे, आणि ह्या साठी डोंबिवली चे मनोज
 पांचाळ तिथल्या गावात सुरंग लावून मोठ्ठा खट्टा करणार आहेत , मला माझा ओळखीचा
 माणसाने मॅसेज केला होता , की मनोज सरांचा ह्या कामात मदत करा,
 पण मला जेवढा माहीत आहे की आज पर्यंत आपल्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम
 झालेला नाही आहे , पण कदाचित आता होत पण असावा , पण मी खूप गोंधळात आहे की
 गावात मोठ्ठा खड्डा करण्यासाठी गावची परमिशन घेतली आहे की नाही , का आपल्या
 आदिवासीच्या नावाचा कोणी वापर नाही ना करत आहेत।
  तसे पाहिले तर मनोज सरांचे काम चांगले आहे डोंबिवलीत , कुठे ही मोठा
 प्रचार न करता ते सामाजिक कार्य करतात।।
 पण ह्या मेसज ने मी थोडे गोंधळात आहे ।। जर तुम्हाला काही माहीत असेल तर
  मनोज पांचाळ जे कार्य करणार आहेत त्या बद्दल तर मला ही त्याची महिती
 द्यावी। जेणे करून आम्हीही त्यांना काही मदत करू शकतो।

 --
 Learn More about AYUSH online at :
 http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
 ---
 You received this message because you are subscribed to the Google
 Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
 To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
 an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
 To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
 Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
 To view this discussion on the web visit
 https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFqT-1kBOmcNfO9VbDXndo4K%3DXobyFUdD2suA%2BtF%3Db0jkSi6oQ%40mail.gmail.com
 
 .
 For more options, visit https://groups.google.com/d/optout.

>>> --
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAGjjkf-KQjR5OwKUpKSEqufoWGtDy%3D%3DmS6UBMEKVoimy5aiRg%40mail.gmail.com
>>> 
>>> .
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF6NJ%3DWZBV%3D236mBsnkQaguh9Dk9KCYUtMxVaAHg-PhCb8E6Sw%40mail.gmail.com
>> 
>> .
>>
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and 

AYUSH | || वारली चित्रकला उमक्रम माहिती १६ जून २०१८ ||

2018-06-16 Thread AYUSH | adivasi yuva shakti
|| वारली चित्रकला उमक्रम माहिती १६ जून २०१८ ||

१) [प्रथमच]आंतराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग :
एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ हँडीक्राफ्ट (EPCH) तर्फे मलेशिया, कोलालंपूर 
येथे होणाऱ्या १६व्या जागतिक भारतीय महोत्सवात (९ ते १७ जून पर्यंत) आयुश 
तर्फे संजय दा पऱ्हाड व जयवंत दा सोमन सहभागी झाले आहेत. या वेळेस वेगळ्या 
वेगळ्या कलाकारांनी कलाकृती जमा केलेले अंदाजे ११०० प्रोडक्ट्स प्रदर्शनात 
नेल्या आहेत. आदिवासी विकास विभाग च्या साहाय्याने महाराष्ट्रातील आदिवासी 
कलाकारांचे इत्तर प्रोडक्ट्स महा ट्राईब्स या उपक्रमा अंतर्गत या प्रदर्शनात 
नेली आहेत. 

आदिवासी विकास विभाग चे प्रिंसिपल सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी यांनी 
प्रदर्शनाला भेट देऊन परिस्तिथी जाणून घेतली. गेल्या आठवड्यात मलेशियातील 
सिनिअर आर्टिस्ट नी स्टॉल ला भेट दिली होती, आज भारतीय हाय कमिशन नी भेट दिली. 

हा अनुभव भविष्यातील जागतिक स्थरावर आदिवासी कलाकृती च्या उपक्रम, कौशल्य 
विकास, वस्तू निर्माण नियोजनासाठी कामी येईल. 
फोटो बघण्यासाठी लिंक - 
https://www.facebook.com/media/set/?set=a.2019760364760709.1073741855.112669762136455=1=ba7baf70f8
 
 
*२) फॅशन टेक्नॉलॉजी च्या अभ्यासकांची भेट*
नॅशनल फॅशन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथील १२ विद्यार्थी आणि त्यांचे 
प्रशिक्षक १ आठवड्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी डहाणू येथे आले होते. वारली 
चित्रकला चे मोटिव्ह आणि आदिवासी सांस्कृतिक संपदा जाणून घेतली. ते वारली 
चित्रकला आणि फॅशन संदर्भात डिझाईन प्रस्ताव बनवत आहेत. वेती येथे संदीप माधव 
भोईर यांच्या घरी संदीप दा भोईर, कल्पेश दा वावरे, दिलीप दा विघ्ने, सदानंद दा 
पुंजारा, किरण दा गोरवाला, शांता दि भोईर, पुष्कर भोईर, सचिन दा सातवी यांनी 
मार्गदर्शन केले 
फोटो बघण्यासाठी लिंक - 
https://www.facebook.com/media/set/?set=a.2019705244766221.1073741854.112669762136455=1=580f39ab4e
 

*३) नैसर्गिक प्रोडक्स्ट च्या बॉक्स वर डिझाईन*
काही नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन प्रोडक्स्ट च्या बॉक्स वर वारली पेन्टिंग ची 
थीम डिझाईन करण्यासाठी विचारणा आली आहे. थीम वर डिस्कशन सुरु आहे.



जास्तीत जास्त कलाकारांना जोडून, एकत्रित प्रयत्न मजबूत करूया. रोजगार 
निर्मितीतून युवकांत सकारात्मकता पसरवण्यासाठी प्रयत्न करूया. सध्या हे 
क्षेत्र एक करियर साठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून एक पर्याय मजबूत करूया.

आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू विविध पर्यायी व्यवस्था मजबुतीकरण 
प्रयत्न करतो आहोत. आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन 
करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे. 
जल जंगल जमीन जीव सोबत आपली स्वायत्त आदिवासी अर्थव्यवस्था मजबूत करूया. आपण 
पण आपल्या परिसरात आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम 
उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात अधिक प्रभावी करण्यासाठी 
मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया. Lets do it together!
जोहार ! 

आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ay...@adiyuva.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/a0d6adce-99fc-4d48-a06d-ea98bd64a23e%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.