दिल्ली में आयोजित खिलाड़ी सम्मान समारोह में आदिवासी अंतर्राष्ट्रीय हॉकी 
खिलाडियों के साथ क्रम से लिलिमा मिंज, दीप ग्रेस एक्का, डी. के. चौहान, 
सुनीता लकड़ा, नमिता टोप्पो और बिरेन्द्र लकड़ा
[image: दिल्ली में आयोजित खिलाड़ी सम्मान समारोह में आदिवासी अंतर्राष्ट्रीय 
हॉकी खिलाडियों के साथ क्रम से लिलिमा मिंज, दीप ग्रेस एक्का, डी. के. चौहान, 
सुनीता लकड़ा, नमिता टोप्पो और बिरेन्द्र लकड़ा]
<https://www.facebook.com/photo.php?fbid=1570081849882216&set=gm.794728707257205&type=1>
Like 
<https://www.facebook.com/groups/adivasi/pending/?ref=notif&notif_t=group_activity#>


On Wednesday, August 22, 2012 12:51:28 AM UTC+5:30, AYUSH wrote:
>
> ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे मी 
> खूप निराश झाले होते. मात्र आता अर्जुन पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप आनंद 
> झाला आहे व नव्या उमेदीने मी आता सराव करणार आहे, असे ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ 
> म्हणून ख्याती असलेली धावपटू कविता राऊत हिने सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा व 
> आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविणाऱ्या कविताला लंडन 
> ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्यात अपयश आले होते. त्यामुळे ती अतिशय निराश 
> झाली होती. आता जागतिक मैदानी स्पर्धा (२०१३) व आशियाई क्रीडा स्पर्धा (२०१४) 
> या स्पर्धामध्ये ती १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीवर लक्ष केंद्रित करीत 
> आहे. ती सध्या नाशिक येथे विजिंदरसिंग या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 
> सराव करीत आहे. 
> पुरस्काराची बातमी मला शनिवारी रात्री उशिरा कळली, त्यावेळी मी प्रवासात होते. 
> घरी गेल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना अतिशय आनंद झाला. परंतु आमच्या गावातही 
> जल्लोष करण्यात आला. अनेक जण माझ्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत गावाच्या 
> वेशीजवळ माझी वाट पाहात होते. मी लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकले नाही याचे 
> दु:खही त्यांना वाटत होते. मी गावात पोहोचल्यानंतर अनेकांनी मला मिठाई खायला 
> दिली. अर्जुन पुरस्कार हा आमच्या आदिवासी भागाचाच गौरव आहे, असे कविताने 
> सांगितले. 
> कविता सध्या ओएनजीसी कंपनीत नोकरी करीत आहे. तिचे प्रशिक्षक विजिंदर सिंग 
> यांनी कविताला मिळालेला अर्जुन पुरस्कार हा तिच्या कारकीर्दीचा गौरव असल्याचे 
> सांगितले. ती आगामी आशियाई व जागतिक स्पर्धेत पदक मिळवील, अशीही खात्री 
> त्यांनी व्यक्त केली.
>
>  
>
> Original Link : 
> http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245090:2012-08-19-18-34-27&catid=28:2009-07-09-02-01-56&Itemid=5
>  
>
>  
>
> Kavita’s facebook page : https://www.facebook.com/kaveeta.raut 
>
>  
>
>  
>
> *From:* AYUSH [mailto:[email protected] <[email protected]>] 
> *Sent:* 28 November 2010 21:58
> *To:* 'AYUSH on net'
> *Subject:* FW: [success story] सावरपाडय़ाची कविता! 
>
>  
>
>  
>
> ‘कविताच्या चिंतेने रात्रभर आमचा डोळा लागत नाही
> सावरपाडा एक्सप्रेसची संघर्षमय कहाणी
> प्रज्ञा सदावर्ते
> [image: http://www.saamana.com/2010/November/28/Images/kavita-raut.jpg]
> नाशिक, दि. 27 - आशियाई स्पर्धेत कविताने रौप्यपदक जिंकल्याची बातमी 
> कळल्यावर अख्खा सावरपाडा गाव आमच्या घरी धावला. कविता घरी कधी येणार, हाच 
> प्रत्येकाचा सवाल होता. दोन वर्ष झाली आमची कविताशी भेट झाली नाही. तिला 
> टीव्हीत पाहतो तेव्हा तिला कडकडून मिठी मारावीशी वाटते. ती फोन करते तेव्हा 
> आमच्या तोंडून शब्दच फूटत नाहीत. परदेशात असलेल्या कविताकडे पुरेसे पैसे 
> असतील का? ती कशी असेल? या चिंतेने रात्रभर डोळा लागत नाही. ती दूर असली तरी 
> आमचा जीव तिच्याजवळ असतो. आम्हाला आता तिला भेटायचंय... ‘सावरपाडा एक्सप्रेस’ 
> म्हणून जगात यशाचा झेंडा रोवणार्‍या कविता राऊतचे आईवडील आपल्या लेकीची यशोगाथा 
> सांगत होते. प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती कविताची चिंता आणि तिच्या भेटीची 
> ओढ.
> कविताने रा्रकुलमधील कास्यपदकापाठोपाठ चीनमध्ये आशियाई स्पर्धेत रौप्य आणि 
> कास्य पदक जिंकून मराठीचा झेंडा फडकविला आणि नाशिक जिल्ह्यातील 
> त्र्यंबकेश्‍वरातील 
> सावरपाडा हा दुर्गम आदिवासी भाग पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर ठळकपणे चमकला. 
> दै. ‘सामना’ प्रतिनिधीने तिचे वडील रामदास राऊत आणि आई सुमित्रा यांची 
> सावरपाड्यात जाऊन भेट घेतली. तेव्हा त्यांनी कविताच्या संघर्षमय भरारीचा पटच 
> उलगडला.
> विजयेंद्र सिंग यांनी हेरलं ‘झाकलं माणिक’[image: 
> http://www.saamana.com/2010/November/28/Images/27NPH13.jpg]
> कविताचे धावण्यातले गुण हेरले ते नाशिक येथील प्रशिक्षक विजयेंद्र सिंग 
> यांनी. तिने एका स्पर्धेत बक्षीस मिळाल्यावर विजयेंद्र सिंग कविताच्या घरी 
> गेेले. 
> कविता फार नाव कमवील, शिकण्यासाठी तिला मी घेऊन जातो असे सांगितल्यावर कविताच्या 
> आईवडिलांनी त्यांना स्प नकार दिला, पण सिंग यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 
> गावकर्‍यांना ते भेटले. कविता देशात नाव कमावील असा विश्‍वास त्यांनी दिला. 
> त्यानंतर 
> गावकर्‍यांनी कविताचे वडील रामदास राऊत यांची समजूत काढली आणि ते तिला घेऊन 
> गेले. तिला मुलीसारखे सांभाळले. तिच्या प्रशिक्षणासाठी दिवसरात्र क केले. 
> * तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवावे
> ती बारा वर्षांची असतानाच धावण्याच्या शर्यतीत जिल्हा पातळीवर चमकली. 
> त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. जिद्द व मेहनतीने राज्य आणि रा्रीय 
> स्पर्धेत आपला ठसा उमटविला. आता तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवावं, हीच 
> आमची इच्छा आहे. दोन वर्षात तिची भेट नाही. तिला पाहण्यासाठी जीव तुटतो 
> म्हणूनच तिला भेटण्यासाठी आता रविवारी 28 तारखेला बंगळुरूला आम्ही जाणार 
> आहोत. सुमित्रा राऊत सांगत होत्या. त्याच वेळी लेकीच्या पराक्रमाने 
> त्यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रूही हळूच वाट काढत होते. 
> * शाळेने ट्रॅकसूट परत मागितला
> प्रशिक्षक विजयेंद्र सिंग यांनी तिला नाशिकला नेण्याचे ठरविले. तेव्हा 
> हरसूलच्या शाळेतून तिचा दाखला काढण्यासाठी त्यांना जिल्हाधिकार्‍यांपर्यंत 
> जावे लागले. इतकेच नव्हे शाळेने तिला दिलेला ट्रॅकसूट मागून घेतला आणि 
> आमच्याकडून सहाशे रुपये घेतले, अशी कटू आठवण रामदास राऊत यांनी यावेळी 
> सांगितली.
> * कविताची भरारी
> रा्रीय पातळीवरील बहुतांश विक्रम आज कविताच्या नावावर आहेत. मुंबई, पुणे, 
> दिल्लीसह 
> इतर मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानी महिला गटात ती अव्वल ठरली आहे. फेडरेशन कप, नॅशनल 
> चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षात तिने पदकांची लयलूट केली आहे. 
> त्यात भोपाळ आंतरराज्य स्पर्धेतील दोन कास्यपदके, 48व्या रा्रीय खुल्या 
> स्पर्धेतील पदके, आंतरराज्य रेल्वे स्पर्धेतील सुवर्णपदके अशी पदकांची संख्या 
> मोठी आहे. जपानच्या वर्ल्ड क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली 
> हिंदुस्थानी 
> महिला आहे. एशियन चॅम्पियनशिप 2004मध्ये तिने रौप्यपदक पटकावले होते.
> * सावरपाड्यात अजूनही ना पाणी ना रस्ते
> रा्रकुल व चीनमधील आशियाई स्पर्धेच्या वेळी सावरपाड्यातील रहिवाशांनी आमच्या 
> घरी टीव्हीसमोर कविताला पाहण्यासाठी गर्दी केली होती. तिथं ती जिंकल्यावर 
> मोठ्या माणसांचे पाय आमच्या घराला लागले. दिवाळीच्या आधी आणि नंतरही घरासमोर 
> फटाके फुटले. कविताने देशाचं नाव मोठं केलं, आम्ही कधी मोठे शहर पाहिले नाही. 
> बंगळुरू पाहण्यासाठी कविताने 28 नोव्हेंबरला बोलावलं असलं तरी आम्हाला तिला 
> भेटण्याचीच 
> जास्त ओढ आहे. कविता रामदास राऊत, सावरपाडा, पोस्ट - खरशेत, ता. त्र्यंबकेश्‍वर 
> हा पत्ता आता आंतररा्रीय पातळीवर झळकलाय, पण तिचे गाव सावरपाड्याला जोडणार्‍या 
> रस्त्याची दुर्दशा असून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा फक्त फलक आहे. वीस 
> वर्षांपासून 
> पाणी योजना अजून रखडलेली आहे.
> * आठ दिवस फक्त पपईवर
> कविता मुळात काळू आहे. आता कधीतरी घरी येते तेव्हाही शांत बसत नाही. 
> हलाखीच्या परिस्थितीतही तिने सावरपाड्यात चौथीपर्यंत शिक्षण घेतले. चप्पल, 
> बुटांचा 
> तिने हट्ट धरला नाही. अनवाणी धावतच जिल्हा पातळीवरील स्पर्धांपर्यंत अव्वल होती. 
> तेव्हापासून आतापर्यंत ती दूर राहते. सुरुवातीला महारा्राबाहेर होणार्‍या 
> स्पर्धेसाठी 
> काही स्पर्धक विमानाने यायचे. आमची कविता तीन दिवस आधी निघायची, रेल्वेने 
> प्रवास करीत स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायची. एकदा मलेशियात स्पर्धेसाठी गेली 
> तेव्हा तिथलं खाणं तिला आवडलं नाही. पपई खाऊन तिने आठ दिवस काढले. दिल्लीत 
> आल्यावरच 
> अन्न खाल्लं. म्हणूनच तिच्या काळजीने आमचा जीव तुटतो... सुमित्राबाई सांगत 
> होत्या.
> * *आदिवासी धावपटूंना आर्थिक मदतीची* *गरज*
> <span lang=HI style='font-size:12.0pt;font-family:"Mangal",
> ...

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/91218e47-d558-4101-b91c-a9c8f4280d60%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to