On Wednesday, October 15, 2014 at 8:09:20 PM UTC+5:30, AYUSH activities
wrote:
>
>
> दिल्ली में आयोजित खिलाड़ी सम्मान समारोह में आदिवासी अंतर्राष्ट्रीय हॉकी
> खिलाडियों के साथ क्रम से लिलिमा मिंज, दीप ग्रेस एक्का, डी. के. चौहान,
> सुनीता लकड़ा, नमिता टोप्पो और बिरेन्द्र लकड़ा
> [image: दिल्ली में आयोजित खिलाड़ी सम्मान समारोह में आदिवासी अंतर्राष्ट्रीय
> हॉकी खिलाडियों के साथ क्रम से लिलिमा मिंज, दीप ग्रेस एक्का, डी. के. चौहान,
> सुनीता लकड़ा, नमिता टोप्पो और बिरेन्द्र लकड़ा]
>
> <https://www.facebook.com/photo.php?fbid=1570081849882216&set=gm.794728707257205&type=1>
> Like
> <https://www.facebook.com/groups/adivasi/pending/?ref=notif¬if_t=group_activity#>
>
>
> On Wednesday, August 22, 2012 12:51:28 AM UTC+5:30, AYUSH wrote:
>
> ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे मी
> खूप निराश झाले होते. मात्र आता अर्जुन पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप आनंद
> झाला आहे व नव्या उमेदीने मी आता सराव करणार आहे, असे ‘सावरपाडा एक्स्प्रेस’
> म्हणून ख्याती असलेली धावपटू कविता राऊत हिने सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा व
> आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविणाऱ्या कविताला लंडन
> ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्यात अपयश आले होते. त्यामुळे ती अतिशय निराश
> झाली होती. आता जागतिक मैदानी स्पर्धा (२०१३) व आशियाई क्रीडा स्पर्धा (२०१४)
> या स्पर्धामध्ये ती १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीवर लक्ष केंद्रित करीत
> आहे. ती सध्या नाशिक येथे विजिंदरसिंग या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली
> सराव करीत आहे.
> पुरस्काराची बातमी मला शनिवारी रात्री उशिरा कळली, त्यावेळी मी प्रवासात होते.
> घरी गेल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना अतिशय आनंद झाला. परंतु आमच्या गावातही
> जल्लोष करण्यात आला. अनेक जण माझ्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत गावाच्या
> वेशीजवळ माझी वाट पाहात होते. मी लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकले नाही याचे
> दु:खही त्यांना वाटत होते. मी गावात पोहोचल्यानंतर अनेकांनी मला मिठाई खायला
> दिली. अर्जुन पुरस्कार हा आमच्या आदिवासी भागाचाच गौरव आहे, असे कविताने
> सांगितले.
> कविता सध्या ओएनजीसी कंपनीत नोकरी करीत आहे. तिचे प्रशिक्षक विजिंदर सिंग
> यांनी कविताला मिळालेला अर्जुन पुरस्कार हा तिच्या कारकीर्दीचा गौरव असल्याचे
> सांगितले. ती आगामी आशियाई व जागतिक स्पर्धेत पदक मिळवील, अशीही खात्री
> त्यांनी व्यक्त केली.
>
>
>
> Original Link :
> http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245090:2012-08-19-18-34-27&catid=28:2009-07-09-02-01-56&Itemid=5
>
>
>
>
> Kavita’s facebook page : https://www.facebook.com/kaveeta.raut
>
>
>
>
>
> *From:* AYUSH [mailto:[email protected] <[email protected]>]
> *Sent:* 28 November 2010 21:58
> *To:* 'AYUSH on net'
> *Subject:* FW: [success story] सावरपाडय़ाची कविता!
>
>
>
>
>
> ‘कविताच्या चिंतेने रात्रभर आमचा डोळा लागत नाही
> सावरपाडा एक्सप्रेसची संघर्षमय कहाणी
> प्रज्ञा सदावर्ते
> [image: http://www.saamana.com/2010/November/28/Images/kavita-raut.jpg]
> नाशिक, दि. 27 - आशियाई स्पर्धेत कविताने रौप्यपदक जिंकल्याची बातमी
> कळल्यावर अख्खा सावरपाडा गाव आमच्या घरी धावला. कविता घरी कधी येणार, हाच
> प्रत्येकाचा सवाल होता. दोन वर्ष झाली आमची कविताशी भेट झाली नाही. तिला
> टीव्हीत पाहतो तेव्हा तिला कडकडून मिठी मारावीशी वाटते. ती फोन करते तेव्हा
> आमच्या तोंडून शब्दच फूटत नाहीत. परदेशात असलेल्या कविताकडे पुरेसे पैसे
> असतील का? ती कशी असेल? या चिंतेने रात्रभर डोळा लागत नाही. ती दूर असली तरी
> आमचा जीव तिच्याजवळ असतो. आम्हाला आता तिला भेटायचंय... ‘सावरपाडा एक्सप्रेस’
> म्हणून जगात यशाचा झेंडा रोवणार्या कविता राऊतचे आईवडील आपल्या लेकीची यशोगाथा
> सांगत होते. प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती कविताची चिंता आणि तिच्या भेटीची
> ओढ.
> कविताने रा्रकुलमधील कास्यपदकापाठोपाठ चीनमध्ये आशियाई स्पर्धेत रौप्य आणि
> कास्य पदक जिंकून मराठीचा झेंडा फडकविला आणि नाशिक जिल्ह्यातील
> त्र्यंबकेश्वरातील
> सावरपाडा हा दुर्गम आदिवासी भाग पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर ठळकपणे चमकला.
> दै. ‘सामना’ प्रतिनिधीने तिचे वडील रामदास राऊत आणि आई सुमित्रा यांची
> सावरपाड्यात जाऊन भेट घेतली. तेव्हा त्यांनी कविताच्या संघर्षमय भरारीचा पटच
> उलगडला.
> विजयेंद्र सिंग यांनी हेरलं ‘झाकलं माणिक’[image:
> http://www.saamana.com/2010/November/28/Images/27NPH13.jpg]
> कविताचे धावण्यातले गुण हेरले ते नाशिक येथील प्रशिक्षक विजयेंद्र सिंग
> यांनी. तिने एका स्पर्धेत बक्षीस मिळाल्यावर विजयेंद्र सिंग कविताच्या घरी
> गेेले.
> कविता फार नाव कमवील, शिकण्यासाठी तिला मी घेऊन जातो असे सांगितल्यावर कविताच्या
> आईवडिलांनी त्यांना स्प नकार दिला, पण सिंग यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले.
> गावकर्यांना ते भेटले. कविता देशात नाव कमावील असा विश्वास त्यांनी दिला.
> त्यानंतर
> गावकर्यांनी कविताचे वडील रामदास राऊत यांची समजूत काढली आणि ते तिला घेऊन
> गेले. तिला मुलीसारखे सांभाळले. तिच्या प्रशिक्षणासाठी दिवसरात्र क केले.
> * तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवावे
> ती बारा वर्षांची असतानाच धावण्याच्या शर्यतीत जिल्हा पातळीवर चमकली.
> त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. जिद्द व मेहनतीने राज्य आणि रा्रीय
> स्पर्धेत आपला ठसा उमटविला. आता तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवावं, हीच
> आमची इच्छा आहे. दोन वर्षात तिची भेट नाही. तिला पाहण्यासाठी जीव तुटतो
> म्हणूनच तिला भेटण्यासाठी आता रविवारी 28 तारखेला बंगळुरूला आम्ही जाणार
> आहोत. सुमित्रा राऊत सांगत होत्या. त्याच वेळी लेकीच्या पराक्रमाने
> त्यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रूही हळूच वाट काढत होते.
> * शाळेने ट्रॅकसूट परत मागितला
> प्रशिक्षक विजयेंद्र सिंग यांनी तिला नाशिकला नेण्याचे ठरविले. तेव्हा
> हरसूलच्या शाळेतून तिचा दाखला काढण्यासाठी त्यांना जिल्हाधिकार्यांपर्यंत
> जावे लागले. इतकेच नव्हे शाळेने तिला दिलेला ट्रॅकसूट मागून घेतला आणि
> आमच्याकडून सहाशे रुपये घेतले, अशी कटू आठवण रामदास राऊत यांनी यावेळी
> सांगितली.
> * कविताची भरारी
> रा्रीय पातळीवरील बहुतांश विक्रम आज कविताच्या नावावर आहेत. मुंबई, पुणे,
> दिल्लीसह
> इतर मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानी महिला गटात ती अव्वल ठरली आहे. फेडरेशन कप, नॅशनल
> चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षात तिने पदकांची लयलूट केली आहे.
> त्यात भोपाळ आंतरराज्य स्पर्धेतील दोन कास्यपदके, 48व्या रा्रीय खुल्या
> स्पर्धेतील पदके, आंतरराज्य रेल्वे स्पर्धेतील सुवर्णपदके अशी पदकांची संख्या
> मोठी आहे. जपानच्या वर्ल्ड क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली
> हिंदुस्थानी
> महिला आहे. एशियन चॅम्पियनशिप 2004मध्ये तिने रौप्यपदक पटकावले होते.
> *
>
> ...
--
सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी
बेरोजगार मेळावा" (30/04/2015 सकाळी 10.30 वाजता) स्थळ पालघर.
संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in
(share with your friends)
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/93be452a-fb8c-4771-99ef-a7beb279a58f%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.