आदिवासी विकास विभाग म्हणजे काय गुंडांचा अड्डा हाय काय...?
आमच्या हक्कान्साठी आन्दोलन आणि तेही लोकशाही मार्गाने काढ़ने गैर ते काय..? म्हणजे आम्ही फक्त अत्याचारित म्हनुनच जगायचे आणि आपण आमच्या दारिद्र्याचे धिंडवडे काढत आपले बंगले वाढवायचे. आमचे आंदोलन हे त्या नाजायज औलादिंविरोधात आहे ज्या गरिबांच्या ताटातिल ओरबाडून त्यांना धमकावुन आपल्या खिशाचे वजन वाढवत आहेत. आज आम्हाला मारण्याची धमकी दिली...उद्या कदाचित आपण एखाद्याला मारालही....आम्हाला हे पण ठाव हाय की आम्हाला न्याय तो मिळायचा नाय....पन आजवर अनेक विकासाच्या प्रकल्पात मरनारे तर आम्हीच आहोत....आमच्याच मरणावर भाड्यान्नो तुमच्या आया बहिनिंचे नखरेल चोचले आपण पुरवत आहात. आम्हाला मारून....धमकी देवून निसर्गाच्या पोटातील आमची आर्तता आपण दाबू शकाल काय...? ज्वालामुखीगत आमच्या जखमा आता तप्त आहेत....त्यांच्यावरील खपल्या काढून आमच्या शिरांतिल लाव्हारुपी रक्ताचे पाट आपण विनाकारण वाहू देवू नका. नामदेव ढसाळ यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर लवड्यावर मारतो मी तुमच्या देशाचा विकास की जो गरीब आदिवासिंच्या भावना पायाखाली दाबुन...मारून उभा केला आहे. आमचे विद्यार्थी म्हणजे निसर्गाचे गीत आहे....त्यांच्यातील सुरांना योग्य संधी दिलीत तर बेहतर नाय तर तंट्या मामाचे उलगुलान आम्ही विसरलेलो नाहित हे ध्यानात घ्यावे. कायद्याच्या आडून गुंडांच्या मदतीने धमक्या काय देताय....ख-या बापाने काढलेल्या आपण औलादी आहात तर समोर माणसांत येवून बोला....तुमच्या बापाचे उपकार म्हणून तुम्ही आम्हाला सवलती देत नाहित...ते तुमचे कर्तव्य आहे....त्याचाच पगार भाड्यान्नो तुम्हास मिळत हाय. आम्हाला हक्काचे हवय आणि ते आम्ही मिळवणारच.....वेळ आणि काळ आज कदाचित आमचा नसेल पण उद्याचा सूर्य आमच्यासाठी उगवेल असा आशावाद मनात ठेवून आम्ही नितिने लढत आहोत. आमच्या एकतेला आणि प्रामाणिकपणाला आपण उगा असे डिवचु नका.....सम्पूर्ण समाजाला ते घातक ठरेल. आदिवासिंच्या योजना हव्यासापोटी स्वविकासासाठी वापरून घेणा-या आदिवासी विकास विभागाचा एक आदिवासी म्हणून मी जाहिर निषेध करतो. On Thursday, December 11, 2014 11:54:59 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > News..... > पहिले पान » ठाणे December 9, 2014 08:15:18 AM |Author दिलीप घुडे > > *विद्यार्थ्यांचं नाव, शिक्षकांचं गाव!* > > विद्यार्थ्यांना मिळणा-या पोषण व पूरक आहारावर मुख्याध्यापक, अधीक्षक व > प्रकल्प कार्यालयातील काही अधिकारी हात मारत असल्याने विद्यार्थ्यांना अपुरा व > निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांच्या आहेत. > > मुरबाड- तालुक्यातील आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून दर्जेदार > शिक्षण देण्यासाठी पाच सरकारी, तर तीन खासगी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या > आहेत. या शाळांतून तीन हजारच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु > विद्यार्थ्यांना मिळणा-या पोषण व पूरक आहारावर मुख्याध्यापक, अधीक्षक व > प्रकल्प कार्यालयातील काही अधिकारी हात मारत असल्याने विद्यार्थ्यांना अपुरा व > निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांच्या आहेत. > > मुरबाडमधील आदिवासीबहुल परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी माळ, मोरोशी, खुटल > (बा), मढ, काचकोली या सरकारी तर तळवली, झापवाडी व वाल्हिवरे या खासगी > आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या आश्रमशाळांतील अनागोंदीमुळे आदिवासी > मुलांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. सासणे आश्रमशाळेतील धान्याच्या > कोठीतील धान्याची तर नासधूस झाली आहे. > > या शाळेत विद्यार्थ्यांसाठी बेचव तर शिक्षकासांठी चमचमीत जेवण बनवले जाते. > महिन्यातून १५ दिवसांच्या अंतराने दोनदा प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम मटण > देण्याऐवजी महिन्या-दोन महिन्यातून एकदाच तेही अपुरेच दिले जात आहे. जिथे > मुलांच्या संख्येनुसार २५ ते ३० किलो मटण आणायला हवे तिथे केवळ १५ किलोच तेही > पोल्ट्रीतून आणले जाते. याशिवाय २-३ किलो बुंदी महिन्यातून एकदा, सफरचंद, > केळी, अंडी दररोज द्यायला हवीत, तीही दररोज न देता दिवसाआड दिली जात आहेत. > विद्यार्थ्यांना शाळेचे दोन व वसतिगृहाचे दोन अशा चार गणवेशांऐवजी केवळ दोनच > गणवेश दिले गेले आहेत. > > तेल, साबण, टूथपेस्ट दर १५ दिवसाला मिळायला हवी, मात्र विद्यार्थी या वस्तू > घरूनच आणतात. गेले तीन महिने न्हाव्यालाही आश्रमशाळेत बोलावणे केलेले नाही. > आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी घरून आणलेल्या मळकट बिछान्यावरच झोपतात. > आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना सकाळीच धरणाच्या > पाण्यात जाऊन आंघोळ करावी लागत आहे. सकाळी थंड पाण्याने आंघोळ करताना हुडहुडी > भरते म्हणून मुले आंघोळी करून शेकोटीही करतात. इयत्ता चौथीच्या वर्गातील सचिन > दरवडा या दोन्ही पायांनी अपंग मुलालाही ही शाळा गरम पाणी शाळेत उपलब्ध करून > देऊ शकलेली नाही. > > मुलींच्या प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुलींनाही थंड > पाण्याचा वापर करावा लागत आहे. सर्वच मुलींची प्रसाधनगृहात सुविधा होत > नसल्याने काही मुली भिंत व झाडाच्या आडोशाला आंघोळी करतात. रात्रीच्या वेळेस > या शाळेतील मुला-मुलींना केवळ शिपायाच्या व एका महिला कर्मचा-याच्या भरोशावर > सोडून शाळेचे अधीक्षक, मुख्याध्यापक घरी जातात. या शाळेतील अधीक्षकाच्या > मनमानी भ्रष्टाचारी कारभारात प्रकल्प कार्यालयातील अधिक-यांचाही हात असल्याने > या अधीक्षकाविषयी तक्रारी करूनही प्रकल्प अधिकारी कारवाई करत नसल्याचे बोलले > जाते. प्रत्यक्ष पटसंख्या व उपस्थिती यात दररोज मोठी तफावत असते. तरीही > पटसंख्येनुसार खोटी उपस्थिती दाखवून सर्वच मुलांच्या नावाने खर्च दाखवला जात > आहे. > > गैरहजर विद्यार्थ्यांची कित्येक महिन्यांपासून नोंदही केलेली नाही. मैदानात > विद्युतच्या तारा उघडय़ा आहेत. मुलांना खेळाचे साहित्य नाही. मुलींच्या > प्रसाधगृहाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. तर आउटलेटचे पाइप निखळल्याने > घाण आजूबाजूला पडून दरुगधी सुटली आहे. शाळेच्या एकाही खिडकीला काच नाही. > त्यामुळे मुला-मुलींना थंडी-वारा सहन करावा लागत आहे. स्वच्छ पाणी व > स्वच्छतागृहांची अत्यंत दुरवस्था असतानाही दुरुस्ती व उपक्रमांच्या नवाने > मोठया प्रमाणात सरकारी निधी लाटण्याचे काम केले गेले आहे. प्रथम सत्र संपले > तरीही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे या वर्गातील मुले > गणित व इंग्रजी या विषयात खूपच मागे आहेत. या शाळांतील ब-याचशा शिक्षकांना > टूरवर दाखवले जाते, मात्र ते प्रत्यक्ष नेमलेल्या शाळेत न जाता वैयक्तिक > कामासाठी गरहजर राहत असतात. टूरच्या नावाखाली भोजन भत्ता १२० रुपये व प्रवास > भत्ताही किमीनुसार मुख्याध्यापक व शिक्षक लाटत आहेत. आदिवासींच्या नावाने सुरू > असलेल्या या सरकारी आश्रमशाळा म्हणजे अधिकारी व कर्मचा-यांना कुरण म्हणून > मिळाल्या आहेत. प्रकल्प कार्यालय शहापूर यांच्या कडे खुद्द विद्यार्थ्यांनी > तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने आदिवासी विकास मंत्रालय या गंभीर समस्यांकडे > लक्ष देईल का, असा प्रश्न या शाळांतील विद्यार्थ्यांनी विचारला आहे. > > मुलांना बाहेर जाऊन आंघोळ करायला आम्ही सांगत नाही. कधी कधी मुली करतात आंघोळ > आडोशाला. गर्दी असेल तर, पण नेहमीच नाही. - एच. ए. म्हस्कर, प्रभारी > मुख्याध्यापक > > आपल्याला आपल्या घरातील दोन मुले नाही सांभाळता येत. इथे तर एवढी आहेत. > तेव्हा इकडे-तिकडे होणारच. मी ब-याच आश्रमशाळा फिरलोय. सगळीकडेच आहे असे. > मुलांना स्वतंत्र वसतिगृहाची आवश्यकता आहे. तसेही मला केवळ तीन दिवस झालेत. > मागच्यांनी काहीच नाही केले त्याला मी काय करू. – रवींद्र ए. फर्डे, > मुख्याध्यापक, आश्रमशाळा सासणे > > सर्व शाळांना सोयीसुविधांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. > सासणे आश्रमशाळेत बाथरूम आहेत. मुले बाहेर नाही गेली पाहिजेत. - लोमेश सलामे, > प्रकल्प अधिकारी, शहापूर > > या शाळेतील अधीक्षक प्रकल्प कार्यालयातील अधिका-यांच्या संगनमताने आर्थिक > अफरातफर करण्यात सराईत असल्याने त्यांना एकाच शाळेत सात वर्षे ठेवण्यात आले > आहे. - सुधाकर वाघ, सचिव, अदिवासी युवा संघटना, मुरबाड > > > > On Thursday, December 11, 2014 10:13:59 PM UTC+5:30, AYUSH activities > wrote: >> >> आज आश्रमशाळा, वसतिगृहे अप्रत्यक्षपणे आदिवासी विद्यार्थ्यांना नक्षलवादाचे >> धड़े देत आहेत......असे म्हणने खरे तर टोकाचे ठरेल परंतु हे वास्तव आपण मान्य >> करण्याचा समंजसपणा दाखवणार आहात का हे पाहणे उचित ठरेल. >> >> आदिवासी मुलांच्या शिक्षनाला पोषक वातावरण निर्माण करणे हे आश्रमशाळा व >> वसतिगृहांचे उद्दिष्ट होते. अगदी डोळस विचार केला तर बघा ज़रा आज आमचे >> विद्यार्थी खरच शिक्षण घेत आहेत का? >> >> कुठे तेल नाही...कुठे तेल आहे तर कपडे नाहित....कपडे आहेत तर पुस्तके >> नाहित....पुस्तके आहेत तर वह्या नाहित.....सर्व आहे पण गुरूजी नाही अहो असे >> सन्दर्भ देत बसलो तर पेनाची शाई कधी डोळ्यातील अश्रूंत बदलते हे कळत नाही. >> >> आता आमच्या मुलांना अन्याय म्हणजे नेमके काय? अन्यायाविरोधात लढले पाहिजे >> अशी भावना निर्माण झाली आहे. शेवटी टंट्या मामा, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे >> यांचा इतिहास आमची ही फुले जगु लागली आहेत. >> >> आश्रमशाळेत पूर्ण सुविधा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि सुविधा >> मिळाल्या पाहिजेत हा मुलांचा अधिकार आहे. हा अधिकार कोणी नाकारू शकत नाही. >> परंतु सरकार किंवा त्या पदांवर बसलेले डोमकावळे आपल्या स्वार्थापोटी काही >> सुविधा जाणीवपूर्वक मुलांना पुरवत नाहित. शासकीय आश्रमशाळेत आता कुठे सफरचंद >> आणि अंडी देवून मुलांचे मन वळविण्याचा केविलवाना प्रयत्न केला जात आहे. >> अनिदानित आश्रमशालांची अवस्था वाईट आहे हे मात्र कोणताही अधिकारी मान्य करत >> नाही. कारण त्याचा खिसा गरम करण्याचे ते दूकान आहे. >> >> आज विद्यार्थी सुविधा मिळत नाहित म्हणून रस्त्यावर उतरत आहेत. न्यायासाठी >> सरकारी दार ठोठावत आहेत. पण यात त्यांच्या अभ्यासाचे नुकसान कसे भरुन काढणार >> याचा विचार कोणी करत नाही. उलट आंदोलन चिरडून टाकण्यासाठी दलालांची मदत घेतली >> जाते. यातून अनेकदा संघर्ष होत असल्याचे चित्र पहायला मिळते. हे असेच सुरु >> राहिले उद्या हीच मुले शस्त्र हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाहित हा धोका >> आपण समजुन घेतला पाहिजे. >> >> आज हातात अमुच्या >> क्रांतिचे लाल झेंडे >> आत्ताच सुधरा अन्यथा >> होतील बंदुकिचे दांडे >> अन्याय तुमचे कोट्यानकोटी >> जमवलिस माया खोटी >> आमच्या शांततेला उगा असे >> सहजगत्या नेवू नका >> बिरसाच्या उलगुलानाला >> बघण्याचे धाडस तुम्हात नाही >> एकदा आम्ही पेटलो >> जगणे सोडा तुमचे मोहमायावी >> मरणाची उसंत तुम्हा मिळनार नाही >> >> आदिवासिंच्या हक्काची पायमल्ली होत असल्याने समाजात विकासाची दरी वाढत आहे. >> त्यात आदिवासी विद्यार्थ्यांना होणा-या असुविधा हे क्रूर वास्तव भविष्यात >> भयानक बनणार आहे. तेव्हा वेळीच जागे होवून न्यायाला न्याय मिळाला पाहिजे ही >> अपेक्षा। >> >> >> On Thursday, December 11, 2014 10:11:40 PM UTC+5:30, AYUSH activities >> wrote: >>> >>> >>> From Social network >>> >>> सुधीर पाटिल हे आदिवासी आयुक्त पदी एक बुजगावणे.... >>> आदिवासी आयुक्त पद म्हणजे पैसे जमविण्याचे मशीन अशी एक मानसिकता या नराधम >>> अधिका-यांमध्ये असल्याने आदिवासी विकासाच्या दृष्टीने टाकली जाणारी पावले आपला >>> रस्ता बदलतात. >>> आपल्या सेवेचे 2-3 महीने शिल्लक असल्याने सुधीर पाटिल हे फक्त आणि फक्त >>> आदिवासींच्या टाळुवरील लोणी फस्त करण्यात व्यस्त आहेत. >>> >>> दिवाळी नंतर त्यांनी माया जमविण्याच्या उद्देशाने काही आश्रमशाळान्ना भेटी >>> दिल्या. सोयी सुविधा कमी असतील तर मोठे पाकिट आणि सुविधा पूर्ण असल्या तरी >>> adjustment हवीच. अशी आदिवासी समाजाचे लचके तोडनारी कुत्री आता आपण आवरायला >>> हवीत. यांचे दात यांच्याच घशात घातले गेले पाहिजे. >>> >>> आज आमचे विद्यार्थी कोणत्या आव्हानांना सामोरे जात आहेत याचा पूर्णपने >>> यांना विसर पडत असेल तर या प्रवृत्ती समाजहिताला घातक आहेत. या मोहमायारूपी >>> मनोवृत्ति चिरडून टाकण्यासाठी आदिवासी संघटना, कार्यकर्ते, विद्यार्थी, >>> नोकरदार वर्ग यांनी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.....अन्यथा आपला भविष्यकाळ हा >>> संपुष्टात आलेला असेल. >>> >>> राजकीय व्यक्ति खुप काही करतील ही अपेक्षाच आपण न केलेली बरी....कारण हेच >>> तर खरे आदिवासींच्या नावावर मलीदा गोळा करणारे नागोबा आहेत. यांच्या हरामी, >>> नीच कृतिंमुळे तर आदिवासींवर अन्याय करण्याचे धाडस सहज कोणीही करतो. आदिवासी >>> बचाव म्हणने हा यांचा राजकीय पटलावरील धंदा झाला आहे. त्यामुळे आदिवासींवरील >>> प्रत्येक अन्यायात या हरामखोरांचा छुपा पाठिंबा असतो. >>> >>> सुधीर पाटिल यांच्या सारख्या नीच प्रवृत्ति नष्ट करण्यासाठी आज पुढाकार >>> घेतला तर उद्याचा उगवणारा सूर्य हा आपला असेल....अन्यथा अमावस्येची काळी रात्र >>> तर आपल्या पाचविलाच पुजलेली आहे. >>> >>> आपल्या आजच्या पायासमोरील सुखाकडे बघू नका आपला उद्याचा तरुण बघा....आज >>> शिक्षण निट मिळाले तर तो उद्या समाजाचे सक्षम नेतृत्व करू शकेल. पाण्यासारखा >>> पैसा आदिवासी विकासात खर्च केला जात असल्याचे चित्र एकीकडे उभे केले जाते आणि >>> वास्तव मात्र जगाला समजण्यापलिकडे आम्हाला भोगावे लागते. आज आमचे विद्यार्थी >>> सोयी सुविधांसाठी आंदोलन करत आहेत. हेच चित्र असेच चालु राहिले तर यांच्यातील >>> गुणवत्ता एक वेगळ्या आणि घातक वळणावर जावू शकते. आज यांनी आंदोलनाचा मार्ग >>> स्विकारलाय....उद्या हातात झेंडे घेतील....आणि तरीही काही बदल होत नसेल तर >>> झेंडे कधी बन्दुकित बदलतील हे आम्हालाही कळनार नाही. >>> >>> आदिवासींचे भविष्य जाणीवपूर्वक नष्ट केले जात असताना आपण आपल्या घरात गप्प >>> कसे बसु शकता.... >>> >>> रहायला माडी >>> फिरायला गाडी >>> बायकोला साडी >>> >>> अरे सोडा हे भौतिक सुखातले किड्यागत जगणे.....ज़रा माणुस म्हणून आदिवासी >>> समाजाच्या दुखांचा विचार करा....ज्या समाजाने जगाला आयुर्वेद असेल वा असेल >>> संस्कारांचे देणं.....खुप काही दिले आहे. आज तो समाज सरकारी लांडग्यांच्या >>> हल्ल्यात अडकलाय.....त्याचा आर्त टाहो आपण ऐका आणि सुधीर पाटिल सारखे जे कोणी >>> बुजगावणे आदिवासी पदांवर काम करत असतील त्यांना जाब विचारा । >>> >>> From Social network >>> >>> On Thursday, December 11, 2014 12:42:37 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva >>> Shakti wrote: >>>> >>>> विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे कि, प्राथमिक सुविधा साठी आंदोलन करत >>>> बसावे ? >>>> सावधान! ठराविक पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांचे (आदिवासी समाजाचे) >>>> भविष्य नष्ट केले जाते आहे >>>> आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या श्री. सुधिर >>>> पाटील, अप्पर आयुक्त ठाणे, आदिवासी विकास विभाग यांचा जाहीर निषेध ! >>>> विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास टाळाटाळ, कार्यालय समोर आदिवासी >>>> वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे उपोषण >>>> >>>> >>>> >>>> >>>> On Wednesday, December 10, 2014 11:32:53 PM UTC+5:30, AYUSH Adivasi >>>> Yuva Shakti wrote: >>>>> >>>>> 10/12/2014 >>>>> Urgent attention please... Serious Issues for student/hostel >>>>> facilities.. all students are on hunger strike.. ATC gave appointment but >>>>> now avoiding meeting to student... ATC avoiding to meet students. >>>>> Student >>>>> decided to hunger till meet to atc. Please cover this issue. Help tribal >>>>> students. >>>>> Location.. thane (additional tribal commissioner, ATC) tribal dev dept >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> >>>>> https://www.facebook.com/Ahram.shala >>>>> >>>>> -- ----------------------------------------------------------------------- Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/88811180-2ce2-427b-88b9-b85ab6c7218a%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.