On Saturday, December 13, 2014 12:22:18 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote: > > > > > > > > On Saturday, December 13, 2014 12:19:56 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva > Shakti wrote: > > अरे या ऊपर काय हाल व्हावेत की मग आपले रक्त पेटून उठेल..... > > हा अन्याय आपणास आपला वाटत नाही का? > > हे उपोषण म्हणजे आपणास काय गुरुवारचा उपवास वाटत आहे काय... > > हा लढा आपलाच आहे ही भावना आपल्यात नाही काय... > > ही मुले म्हणजे आपणास काय अन्यायाच्या व्यासपीठावरील शोभेची फुले वाटत आहेत > काय... > > आज ही आहेत उद्या आपली यांच्या जागेवर असतील हा सामाजिक दृष्टिकोण आपल्यात > आहे काय... > > वास्तवाचे भान सर्वांनाच आहे.....तेवढी सामाजिकता आज प्रत्येकजण जोपासत > आहे.....फक्त माझ्यावरील संकटांसाठीच मी लढा देईल दुस-याचे मरण ते मला माझे > वाटत नाही हे दुर्दैव.... > > असा अन्याय फक्त आदिवासी समाजातच दिसतो कारण आम्हाला लाज वाटते आमच्याच > अन्यायाविरोधात आवाज उठवायला... > > लोक काय म्हणतील.... > > हा एकमेव विचार आम्हाला अन्यायाच्या विरोधात एक होवू देत नाही. बिरसाचे > उलगुलान करण्यासाठी याचा इलाज काय तो शोधावा लागेल... > > > > > > > > > > On Saturday, December 13, 2014 12:51:23 AM UTC+5:30, AYUSH activities > wrote: > > उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांकड़े बघण्याचा शिक्षित आदिवासी अधिकारी > वर्गाचा दृष्टिकोण......... > > प्रिय मित्रा, > आज तू उपोषणाला बसलास आणि लगेच पेन हातात घेतला..... > वसतीगृहातिल सोयी सुविधा तुला मिळत नाहित कारण तू आदिवासी आहेस.... > उपोषणास बसुनही बाळा तुझी चौकशी करायला कोणी येत नाही कारण तू आदिवासी > आहेस.... > आज तू मरनासन्न दवाखान्यात उपचार घेत आहेस तरी तुला सहानुभूति दर्शविण्यास > कोणी येत नाही कारण तू आदिवासी आहेस... > > तुझ्या मनातील दुःख तू आजपर्यन्त जसा गिळत होता गपगुमान तसाच आजही तू ते मनात > साठव कारण तू आदिवासी आहेस... > > तू सिकावे असे तुला वाटते हाच तुझा गुन्हा कारण तू आदिवासी आहेस... > > उपाशीपोटी मायबाप तुझे तू मिळतिल तशा निकृष्ट भाकरी मुकाट्याने खा कारण तू > आदिवासी आहेस... > > या देशात आदिवासी असणे हाच एक मोठा गुन्हा आहे की काय असे वाटले तर आश्चर्य > वाटू नये. न्याय मागण्यासाठी तुम्ही कितीही लढा दिला तरी तो तुम्हाला मिळनार > नाही कारण आदिवासी आणि न्याय या संकल्पनाच तुझ्यासाठी नाहित.... > > अत्यंत मोठे भयावह म्हणजे तुझ्या उदरात वाढले, नोकरीला लागले ते आमचे > अधिकारी, नेते आता आदिवासी हा लेबल स्वताच्या नावासमोर लावायला लाजत > आहेत...त्यांच्या या भडवेगिरिमुळे तुला न्याय देण्याचा विचार सहसा कुणाच्या > मनात येत नाही.... > > बाळा आज तू सम्पूर्ण समाजाच्या दुखाचे नेतृत्व करत आहेस....पण मला माफ कर > कारण मी तृतीयपंथी लोकांसारखा आता लोकांच्या टाळ्यान्त टाळ्या वाजविण्यात > समाधान मानत आहे....भले माझ्या समोर माझा उघडा नागडा आदिवासी असला तरी माझ्या > मनात कोणतिहि भावना, आपुलकी वाटत नाही....कारण आता मी फक्त पार्टटाईम आदिवासी > आहे.....आरक्षणाचे लाभ मिळविण्यासाठी मी आदिवासी आहे.....अन्यथा तुमचे दुःख, > तुमची संस्कृती याच्याशी माझा संबंध नाही.....आता मला मी नोकरीला एका उच्च > पदावर असल्याने मी उच्च वर्णीय असल्यासारखे वाटत आहे म्हणून माझे आणि तुझे > दुःख वेगळे आहे....तुझे दुःख हे फक्त तुझेच आहे.... > > माझे ऐक आणि तू आदिवासी आहेस हे मान्य कर.....आणि एक गोष्ट लक्षात घे तू फक्त > अन्याय सहन करण्यासाठी जन्माला आला आहेस हे मनात कोरुन ठेव..... > > > > On Friday, December 12, 2014 11:35:57 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > > > On Friday, December 12, 2014 10:23:48 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > > > > Kalyan aani palghar hostel chya andolanatil vidyarthi uposhana darmyan > hospital madhe admit. Ajun hi adhikari aani prasashanala jaag nahi. Adivasi > samajachya bhavishya sathi ya andolanala la support karun vidyarthyana > sahkary karuya..www.jago.adiyuva.in > <http://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.jago.adiyuva.in%2F&h=xAQEzIKHO&enc=AZPlR2GpCnVyA5zo1F1MpgeEqSAAL9sZ9rr_eP2fKob27RlufcsPzcU0ItkZRYb7eVcqFcHdzj9974s-uac7dQug9cxVHTqXHWrz7ajGfWfx4fjKGGZmn69qmHLgm1Zuuqm9H0kg6xIt0jHMy0O65_T3> > > > > > > > > > > > > > On Friday, December 12, 2014 9:43:36 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > > <https://lh4.googleusercontent.com/-2WjMqHELBlk/VIsUIKl4A2I/AAAAAAAAI4Q/nhl4U45osDk/s1600/student%2Bnava%2Bkal%2B-%2BCopy.PNG> > > > On Friday, December 12, 2014 9:22:29 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > > आदिवासी विकास विभाग म्हणजे काय गुंडांचा अड्डा हाय काय...? > > आमच्या हक्कान्साठी आन्दोलन आणि तेही लोकशाही मार्गाने काढ़ने गैर ते काय..? > म्हणजे आम्ही फक्त अत्याचारित म्हनुनच जगायचे आणि आपण आमच्या दारिद्र्याचे > धिंडवडे काढत आपले बंगले वाढवायचे. > > आमचे आंदोलन हे त्या नाजायज औलादिंविरोधात आहे ज्या गरिबांच्या ताटातिल > ओरबाडून त्यांना धमकावुन आपल्या खिशाचे वजन वाढवत आहेत. > > आज आम्हाला मारण्याची धमकी दिली...उद्या कदाचित आपण एखाद्याला > मारालही....आम्हाला हे पण ठाव हाय की आम्हाला न्याय तो मिळायचा नाय....पन आजवर > अनेक विकासाच्या प्रकल्पात मरनारे तर आम्हीच आहोत....आमच्याच मरणावर > भाड्यान्नो तुमच्या आया बहिनिंचे नखरेल चोचले आपण पुरवत आहात. > > आम्हाला मारून....धमकी देवून निसर्गाच्या पोटातील आमची आर्तता आपण दाबू शकाल > काय...? ज्वालामुखीगत आमच्या जखमा आता तप्त आहेत....त्यांच्यावरील खपल्या > काढून आमच्या शिरांतिल लाव्हारुपी रक्ताचे पाट आपण विनाकारण वाहू देवू नका. > > नामदेव ढसाळ यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर लवड्यावर मारतो मी तुमच्या > देशाचा विकास की जो गरीब आदिवासिंच्या भावना पायाखाली दाबुन...मारून उभा केला > आहे. > > आमचे विद्यार्थी म्हणजे निसर्गाचे गीत आहे....त्यांच्यातील सुरांना योग्य > संधी दिलीत तर बेहतर नाय तर तंट्या मामाचे उलगुलान आम्ही विसरलेलो नाहित हे > ध्यानात घ्यावे. > > कायद्याच्या आडून गुंडांच्या मदतीने धमक्या काय देताय....ख-या बापाने > काढलेल्या आपण औलादी आहात तर समोर माणसांत येवून बोला....तुमच्या बापाचे उपकार > म्हणून तुम्ही आम्हाला सवलती देत नाहित...ते तुमचे कर्तव्य आहे....त्याचाच > पगार भाड्यान्नो तुम्हास मिळत हाय. > > आम्हाला हक्काचे हवय आणि ते आम्ही मिळवणारच.....वेळ आणि काळ आज कदाचित आमचा > नसेल पण उद्याचा सूर्य आमच्यासाठी उगवेल असा आशावाद मनात ठेवून आम्ही नितिने > लढत आहोत. आमच्या एकतेला आणि प्रामाणिकपणाला आपण उगा असे डिवचु > नका.....सम्पूर्ण समाजाला ते घातक ठरेल. > > आदिवासिंच्या योजना हव्यासापोटी स्वविकासासाठी वापरून घेणा-या आदिवासी विकास > विभागाचा एक आदिवासी म्हणून मी जाहिर निषेध करतो. > > > > > > On Thursday, December 11, 2014 11:54:59 PM UTC+5:30, AYUSH activities > wrote: > > News..... > पहिले पान » ठाणे December 9, 2014 08:15:18 AM |Author दिलीप घुडे > > *विद्यार्थ्यांचं नाव, शिक्षकांचं गाव!* > > विद्यार्थ्यांना मिळणा-या पोषण व पूरक आहारावर मुख्याध्यापक, अधीक्षक व > प्रकल्प कार्यालयातील काही अधिकारी हात मारत असल्याने विद्यार्थ्यांना अपुरा व > निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांच्या आहेत. > > मुरबाड- तालुक्यातील आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून दर्जेदार > शिक्षण देण्यासाठी पाच सरकारी, तर तीन खासगी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या > आहेत. या शाळांतून तीन हजारच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु > विद्यार्थ्यांना मिळणा-या पोषण व पूरक आहारावर मुख्याध्यापक, अधीक्षक व > प्रकल्प कार्यालयातील काही अधिकारी हात मारत असल्याने विद्यार्थ्यांना अपुरा व > निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांच्या आहेत. > > मुरबाडमधील आदिवासीबहुल परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी माळ, मोरोशी, खुटल > (बा), मढ, काचकोली या सरकारी तर तळवली, झापवाडी व वाल्हिवरे या खासगी > आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या आश्रमशाळांतील अनागोंदीमुळे आदिवासी > मुलांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. सासणे आश्रमशाळेतील धान्याच्या > कोठीतील धान्याची तर नासधूस झाली आहे. > > या शाळेत विद्यार्थ्यांसाठी बेचव तर शिक्षकासांठी चमचमीत जेवण बनवले जाते. > महिन्यातून १५ दिवसांच्या अंतराने दोनदा प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम मटण > देण्याऐवजी महिन्या-दोन महिन्यातून एकदाच तेही अपुरेच दिले जात आहे. जिथे > मुलांच्या संख्येनुसार २५ ते ३० किलो मटण आणायला हवे तिथे केवळ १५ किलोच तेही > पोल्ट्रीतून आणले जाते. याशिवाय २-३ किलो बुंदी महिन्यातून एकदा, सफरचंद, > केळी, अंडी दररोज द्यायला हवीत, तीही दररोज न देता दिवसाआड दिली जात आहेत. > विद्यार्थ्यांना शाळेचे दोन व वसतिगृहाचे दोन अशा चार गणवेशांऐवजी केवळ दोनच > गणवेश दिले गेले आहेत. > > तेल, साबण, टूथपेस्ट दर १५ दिवसाला मिळायला हवी, मात्र विद्यार्थी या वस्तू > घरूनच आणतात. गेले तीन महिने न्हाव्यालाही आश्रमशाळेत बोलावणे केलेले नाही. > आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी घरून आणलेल्या मळकट बिछान्यावरच झोपतात. > आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना सकाळीच धरणाच्या > पाण्यात जाऊन आंघोळ करावी लागत आहे. सकाळी थंड पाण्याने आंघोळ करताना हुडहुडी > भरते म्हणून मुले आंघोळी करून शेकोटीही करतात. इयत्ता चौथीच्या वर्गातील सचिन > दरवडा या दोन्ही पायांनी अपंग मुलालाही ही शाळा गरम पाणी शाळेत उपलब्ध करून > देऊ शकलेली नाही. > > मुलींच्या प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुलींनाही थंड > पाण्याचा वापर करावा लागत आहे. सर्वच मुलींची प्रसाधनगृहात सुविधा होत > नसल्याने काही मुली भिंत व झाडाच्या आडोशाला आंघोळी करतात. रात्रीच्या वेळेस > या शाळेतील मुला-मुलींना केवळ शिपायाच्या व एका महिला कर्मचा-याच्या भरोशावर > सोडून शाळेचे अधीक्षक, मुख्याध्यापक घरी जातात. या शाळेतील अधीक्षकाच्या > मनमानी भ्रष्टाचारी कारभारात प्रकल्प कार्यालयातील अधिक-यांचाही हात असल्याने > या अधीक्षकाविषयी तक्रारी करूनही प्रकल्प अधिकारी कारवाई करत नसल्याचे बोलले > जाते. प्रत्यक्ष पटसंख्या व उपस्थिती यात दररोज मोठी तफावत असते. तरीही > पटसंख्येनुसार खोटी उपस्थिती दाखवून सर्वच मुलांच्या नावाने खर्च दाखवला जात > आहे. > > गैरहजर विद्यार्थ्यांची कित्येक महिन्यांपासून नोंदही केलेली नाही. मैदानात > विद्युतच्या तारा उघडय़ा आहेत. मुलांना खेळाचे साहित्य नाही. मुलींच्या > प्रसाधगृहाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. तर आउटलेटचे पाइप निखळल्याने > घाण आजूबाजूला पडून दरुगधी सुटली आहे. शाळेच्या एकाही खिडकीला काच नाही. > त्यामुळे मुला-मुलींना थंडी-वारा सहन करावा लागत आहे. स्वच्छ पाणी व > स्वच्छतागृहांची अत्यंत दुरवस्था असतानाही दुरुस्ती व उपक्रमांच्या नवाने > मोठया प्रमाणात सरकारी निधी लाटण्याचे काम केले गेले आहे. प्रथम सत्र संपले > तरीही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे या वर्गातील मुले > गणित व इंग्रजी या विषयात खूपच मागे आहेत. या शाळांतील ब-याचशा शिक्षकांना > टूरवर दाखवले जाते, मात्र ते प्रत्यक्ष नेमलेल्या शाळेत न जाता वैयक्तिक > कामासाठी गरहजर राहत असतात. टूरच्या नावाखाली भोजन भत्ता १२० रुपये व प्रवास > भत्ताही किमीनुसार मुख्याध्यापक व शिक्षक लाटत आहेत. आदिवासींच्या नावाने सुरू > असलेल्या या सरकारी आश्रमशाळा म्हणजे अधिकारी व कर्मचा-यांना कुरण म्हणून > मिळाल्या आहेत. प्रकल्प कार्यालय शहापूर यांच्या कडे खुद्द विद्यार्थ्यांनी > तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने आदिवासी विकास मंत्रालय या गंभीर समस्यांकडे > लक्ष देईल का, असा प्रश्न या शाळांतील विद्यार्थ्यांनी विचारला आहे. > > मुलांना बाहेर जाऊन आंघोळ करायला आम्ही सांगत नाही. कधी कधी मुली करतात आंघोळ > आडोशाला. गर्दी असेल तर, पण नेहमीच नाही. - एच. ए. म्हस्कर, प्रभारी > मुख्याध्यापक > > आपल्याला आपल्या घरातील दोन मुले नाही सांभाळता येत. इथे तर एवढी आहेत. > तेव्हा इकडे-तिकडे होणारच. मी ब-याच आश्रमशाळा फिरलोय. सगळीकडेच आहे असे. > मुलांना स्वतंत्र वसतिगृहाची आवश्यकता आहे. तसेही मला केवळ तीन दिवस झालेत. > मागच्यांनी काहीच नाही केले त्याला मी काय करू. – रवींद्र ए. फर्डे, > मुख्याध्यापक, आश्रमशाळा सासणे > > सर्व शाळांना सोयीसुविधांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. > सासणे आश्रमशाळेत बाथरूम आहेत. मुले बाहेर नाही गेली पाहिजेत. - लोमेश सलामे, > प्रकल्प अधिकारी, शहापूर > > या शाळेतील अधीक्षक प्रकल्प कार्यालयातील अधिका-यांच्या संगनमताने आर्थिक > अफरातफर करण्यात सराईत असल्याने त्यांना एकाच शाळेत सात वर्षे ठेवण्यात आले > आहे. - सुधाकर वाघ, सचिव, अदिवासी युवा संघटना, मुरबाड > > > > On Thursday, December 11, 2014 10:13:59 PM UTC+5:30, AYUSH activities > wrote: > > आज आश्रमशाळा, वसतिगृहे अप्रत्यक्षपणे आदिवासी विद्यार्थ्यांना नक्षलवादाचे > धड़े देत आहेत......असे म्हणने खरे तर टोकाचे ठरेल परंतु हे वास्तव आपण मान्य > करण्याचा समंजसपणा दाखवणार आहात का हे पाहणे उचित ठरेल. > > आदिवासी मुलांच्या शिक्षनाला पोषक वातावरण निर्माण करणे हे आश्रमशाळा व > वसतिगृहांचे उद्दिष्ट होते. अगदी डोळस विचार केला तर बघा ज़रा आज आमचे > विद्यार्थी खरच शिक्षण घेत आहेत का? > > कुठे तेल नाही...कुठे तेल आहे तर कपडे नाहित....कपडे आहेत तर पुस्तके > नाहित....पुस्तके आहेत तर वह्या नाहित.....सर्व आहे पण गुरूजी नाही अहो असे > सन्दर्भ देत बसलो तर पेनाची शाई कधी डोळ्यातील अश्रूंत बदलते हे कळत नाही. > > आता आमच्या मुलांना अन्याय म्हणजे नेमके काय? अन्यायाविरोधात लढले पाहिजे अशी > भावना निर्माण झाली आहे. शेवटी टंट्या मामा, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांचा > इतिहास आमची ही फुले जगु लागली आहेत. > > आश्रमशाळेत पूर्ण सुविधा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि सुविधा मिळाल्या > पाहिजेत हा मुलांचा अधिकार आहे. हा अधिकार कोणी नाकारू शकत नाही. परंतु सरकार > किंवा त्या पदांवर बसलेले डोमकावळे आपल्या स्वार्थापोटी काही सुविधा > जाणीवपूर्वक मुलांना पुरवत नाहित. शासकीय आश्रमशाळेत आता कुठे सफरचंद आणि अंडी > देवून मुलांचे मन वळविण्याचा केविलवाना प्रयत्न केला जात आहे. अनिदानित > आश्रमशालांची अवस्था वाईट आहे हे मात्र कोणताही अधिकारी मान्य करत नाही. कारण > त्याचा खिसा गरम करण्याचे ते दूकान आहे. > > आज विद्यार्थी सुविधा मिळत नाहित म्हणून रस्त्यावर उतरत आहेत. न्यायासाठी > सरकारी दार ठोठावत आहेत. पण यात त्यांच्या अभ्यासाचे नुकसान कसे भरुन काढणार > याचा विचार कोणी करत नाही. उलट आंदोलन चिरडून टाकण्यासाठी दलालांची मदत घेतली > जाते. यातून अनेकदा संघर्ष होत असल्याचे चित्र पहायला मिळते. हे असेच सुरु > राहिले उद्या हीच मुले शस्त्र हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाहित हा धोका > आपण समजुन घेतला पाहिजे. > > आज हातात अमुच्या > क्रांतिचे लाल झेंडे > आत्ताच सुधरा अन्यथा > होतील बंदुकिचे दांडे > अन्याय तुमचे कोट्यानकोटी > जमवलिस माया खोटी > आमच्या शांततेला उगा असे > सहजगत्या नेवू नका > बिरसाच्या उलगुलानाला > बघण्याचे धाडस तुम्हात नाही > एकदा आम्ही पेटलो > जगणे सोडा तुमचे मोहमायावी > मरणाची उसंत तुम्हा मिळनार नाही > > आदिवासिंच्या हक्काची पायमल्ली होत असल्याने समाजात विकासाची दरी वाढत आहे. > त्यात आदिवासी विद्यार्थ्यांना होणा-या असुविधा हे क्रूर वास्तव भविष्यात > भयानक बनणार आहे. तेव्हा वेळीच जागे होवून न्यायाला न्याय मिळाला पाहिजे ही > अपेक्षा। > > > On Thursday, December 11, 2014 10:11:40 PM UTC+5:30, AYUSH activities > wrote: > > > From Social network > > सुधीर पाटिल हे आदिवासी आयुक्त पदी एक बुजगावणे.... > आदिवासी आयुक्त पद म्हणजे पैसे जमविण्याचे मशीन अशी एक मानसिकता या नराधम > अधिका-यांमध्ये असल्याने आदिवासी विकासाच्या दृष्टीने टाकली जाणारी पावले आपला > रस्ता बदलतात. > आपल्या सेवेचे 2-3 महीने शिल्लक असल्याने सुधीर पाटिल हे फक्त आणि फक्त > आदिवासींच्या टाळुवरील लोणी फस्त करण्यात व्यस्त आहेत. > > दिवाळी नंतर त्यांनी माया जमविण्याच्या उद्देशाने काही आश्रमशाळान्ना भेटी > दिल्या. सोयी सुविधा कमी असतील तर मोठे पाकिट आणि सुविधा पूर्ण असल्या तरी > adjustment हवीच. अशी आदिवासी समाजाचे लचके तोडनारी कुत्री आता आपण आवरायला > हवीत. यांचे दात यांच्याच घशात घातले गेले पाहिजे. > > आज आमचे विद्यार्थी कोणत्या आव्हानांना सामोरे जात आहेत याचा पूर्णपने यांना > विसर पडत असेल तर या प्रवृत्ती समाजहिताला घातक आहेत. या मोहमायारूपी > मनोवृत्ति चिरडून टाकण्यासाठी आदिवासी संघटना, कार्यकर्ते, विद्यार्थी, > नोकरदार वर्ग यांनी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.....अन्यथा आपला भविष्यकाळ हा > संपुष्टात आलेला असेल. > > राजकीय व्यक्ति खुप काही करतील ही अपेक्षाच आपण न केलेली बरी....कारण हेच तर > खरे आदिवासींच्या नावावर मलीदा गोळा करणारे नागोबा आहेत. यांच्या हरामी, नीच > कृतिंमुळे तर आदिवासींवर अन्याय करण्याचे धाडस सहज कोणीही करतो. आदिवासी बचाव > म्हणने हा यांचा राजकीय पटलावरील धंदा झाला आहे. त्यामुळे आदिवासींवरील > प्रत्येक अन्यायात या हरामखोरांचा छुपा पाठिंबा असतो. > > सुधीर पाटिल यांच्या सारख्या नीच प्रवृत्ति नष्ट करण्यासाठी आज पुढाकार घेतला > तर उद्याचा उगवणारा सूर्य हा आपला असेल....अन्यथा अमावस्येची काळी रात्र तर > आपल्या पाचविलाच पुजलेली आहे. > > आपल्या आजच्या पायासमोरील सुखाकडे बघू नका आपला उद्याचा तरुण बघा....आज > शिक्षण निट मिळाले तर तो उद्या समाजाचे सक्षम नेतृत्व करू शकेल. पाण्यासारखा > पैसा आदिवासी विकासात खर्च केला जात असल्याचे चित्र एकीकडे उभे केले जाते आणि > वास्तव मात्र जगाला समजण्यापलिकडे आम्हाला भोगावे लागते. आज आमचे विद्यार्थी > सोयी सुविधांसाठी आंदोलन करत आहेत. हेच चित्र असेच चालु राहिले तर यांच्यातील > गुणवत्ता एक वेगळ्या आणि घातक वळणावर जावू शकते. आज यांनी आंदोलनाचा मार्ग > स्विकारलाय....उद्या हातात झेंडे घेतील....आणि तरीही काही बदल होत नसेल तर > झेंडे कधी बन्दुकित बदलतील हे आम्हालाही कळनार नाही. > > आदिवासींचे भविष्य जाणीवपूर्वक नष्ट केले जात असताना आपण आपल्या घरात गप्प > कसे बसु शकता.... > > रहायला माडी > फिरायला गाडी > बायकोला साडी > > अरे सोडा हे भौतिक सुखातले किड्यागत जगणे.....ज़रा माणुस म्हणून आदिवासी > समाजाच्या दुखांचा विचार करा....ज्या समाजाने जगाला आयुर्वेद असेल वा असेल > संस्कारांचे देणं.....खुप काही दिले आहे. आज तो समाज सरकारी लांडग्यांच्या > हल्ल्यात अडकलाय.....त्याचा आर्त टाहो आपण ऐका आणि सुधीर पाटिल सारखे जे कोणी > बुजगावणे आदिवासी पदांवर काम करत असतील त्यांना जाब विचारा । > > From Social network > > On Thursday, December 11, 2014 12:42:37 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva > Shakti wrote: > > विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे कि, प्राथमिक सुविधा साठी आंदोलन करत बसावे ? > सावधान! ठराविक पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांचे (आदिवासी समाजाचे) भविष्य > नष्ट केले जाते आहे > आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या श्री. सुधिर पाटील, > अप्पर आयुक्त ठाणे, आदिवासी विकास विभाग यांचा जाहीर निषेध ! > विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास टाळाटाळ, कार्यालय समोर आदिवासी वसतिगृहातील > विद्यार्थ्यांचे उपोषण > > > > > On Wednesday, December 10, 2014 11:32:53 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva > Shakti wrote: > > 10/12/2014 > Urgent attention please... Serious Issues for student/hostel facilities.. > all students are on hunger strike.. ATC gave appointment but now avoiding > meeting to student... ATC avoiding to meet students. Student decided to > hunger till meet to atc. Please cover this issue. Help tribal students. > Location.. thane (additional tribal commissioner, ATC) tribal dev dept > > > > > > > > > > ...
-- ----------------------------------------------------------------------- Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/3fa9ac44-f2df-4504-9024-9ea6a832dd18%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.