very true santosh, some people purposley use girijan also
we are adivasi

2015-06-25 10:31 GMT+05:30 Santosh Gedam <geda...@gmail.com>:

> I think you should not use "Vanvasi" word considering following points.
> 1) Vanvasi meaning Forest Dweller; R u refering to all the tribes & castes
> who r forest dwellers?
> 2) Which forest, type of forest u r refering to RF, PF, etc? How have u
> define forest?
> 3) Forest of which time period r u referring? Cos forest cover is
> dwindling.
> 4) In Constituent Assembly debate & much before that Dr. Ambedkar
> proclaimed tribes as "Aboriginals" Adivasis. On what rationality, u r
> subsituting & giving them this perceived derogatory term of Vanvasi?
> Few more points for correction assuming u know it not & what u wrote was
> not deliberate.
> 1) Castes & tribes r different; I wont explain pls research.
> 2) Tribes local administrative system & caste panchayats of modern days r
> different. I know it. U pls read more.
> 3) Ur story of Katkaris has too many gross assumptions to create a story
> where Britishers look complete Villain, but the reality cd be different
> demanding deeper & systematic investigation.
>
> Best,
> Santosh
> On Jun 23, 2015 5:54 PM, "e vansakha quarterly magazine" <
> evansa...@gmail.com> wrote:
>
>> कातकरी म्हणजे कोण ?
>> चलो जलाये दीप वहा
>> जहा अभीभी अंधेरा है!
>> (वनवासी कल्याण आश्रम)
>>
>> ८ जून २०१५ रोजी वनवासी कल्याण आश्रमाने पुणे येथे "मुळशी" जवळ "माले" या
>> गावात, कातकरी मुलांसाठी विशेष वसतिगृह सुरु केले. राष्ट्रीय सर्वांगीण
>> ग्रामविकास संस्था यांच्या बरोबर आपण हे वसतिगृह चालवीत आहोत. भोर येथील
>> वसतिगृहात देखील नव्याने भरती करताना प्रामुख्याने कातकरी मुले कशी घेत येतील
>> असा प्रयत्न आश्रमाचे कार्यकर्ते करीत आहेत. या निमित्ताने कातकरी म्हणजे कोण
>> आणि त्यांच्याकरिता असे विशेष प्रयत्न करायची गरज काय?, हे आश्रमाच्या
>> कार्यकर्ते, देणगीदार आणि हितचिंतक या सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख
>> लिहीत  आहे.
>>
>> राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था ही  संस्था मुळशी तालुक्यातील दुर्गम
>> भागात शिक्षण, बचतगट, कौशल्य विकास इत्यादी क्षेत्रात काम करते. एकदा माझी
>> पत्नी सौ. विदुलाचे व्याख्यान संस्थेच्या पिरंगुट येथील  हिम्मत शाळेत होते.
>> परिसरातल्या बचत गटातल्या सदस्य महिला याकरिता जमल्या होत्या. माझे काम वाहन
>> चालकाचे होते. पुण्यातून संस्थेचे सचिव अनिलजी व्यास, सौ. पूनमजी मेहता आणि
>> अन्य कार्यकर्त्या आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर कार्यक्रम सुरु होता. मी
>> आणि व्यास सर तिकडे  प्रवेश नसल्यामुळे खाली गप्पा मारत थांबलो होतो. चर्चा
>> हळूहळू कातकरी या विषयावर आली. मुळशी तालुक्यातील कातकरी मुलांसाठी काय करता
>> येईल? वेगळे वसतिगृह, वेगळे केंद्र चालू करता येईल का? अशी चर्चा करता करता
>> व्यास सर म्हणाले कि संस्थेचे माले-मुळशी इथले वसतिगृह या कामासाठी वापरता
>> येईल आणि तिथून जवळच सेनापती बापटांच्या नावाने चालणारी शाळा आणि आय.टी.आय.
>> आहे. तिथे मुले शिकू शकतील.
>>
>> पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कार्यकर्त्यांसमोर हा प्रस्ताव मांडला, तसे
>> सर्वजण उत्साहाने तयार झाले. वारली चित्रकार आणि "रंगावधूत" हा वारली आणि
>> लाकडी वस्तू उत्पादनाचा लघुउद्योग सांभाळणाऱ्या अनिल वाघमारेचा लहान भाऊ सुनील
>> वाघमारे आणि मावळातला आपला कार्यकर्ता नारायण ठिकडे हे दोघे माल्याला जाऊन
>> राहायला तयार झाले. पुणे जिल्ह्यातील कातकरी समाजातील सर्व कार्यकर्ते या
>> प्रस्तावाने इतके आनंदित झाले कि सर्वांनी माले परिसरातील वाड्यांवर प्रवास
>> सुरु केला. प्रत्येक  कातोडीतून विद्यार्थी आले पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे.
>> त्याला प्रयत्नांची जोड या सर्व कार्यकर्त्यांनी दिली आहे त्यामुळे सर्वत्र
>> उत्साहाचे वातावरण आहे.
>>
>> वेगवेगळ्या जिल्ह्यात विखुरलेल्या कातकरी समाजाला एकत्र आणणारी कोणतीही
>> यंत्रणा आज आपल्याकडे उपलब्ध नाही. एखाद्या भागातील माणसावर काही अन्याय झाला
>> तर त्याची माहिती अन्य कातोड्यांवर पोचत नाही आणि त्यावर काही प्रतिक्रियाही
>> उमटत नाही. कातकरी समाजात काम करणे सरकारी यंत्रणेलाही अतिशय अवघड जाते.
>> त्याचं उत्साह कातोडी वस्तींवर गेल्यावर मावळून जातो. सरकारी यंत्रणा आणि
>> कातकरी समाज यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याची गरज आहे. मुळातच कातकरी समाज
>> हा थोडा वेगळा राहणाऱ्या वृत्तीचा आहे. सरकारी अधिकारी आला असे समजले की
>>  निम्मी माणसे गायब होतात. जातीचा दाखला मिळवण्याच्या अर्जावर सही करायला
>> बोलावले तरी समोर येत नाहीत. अशा माणसांना स्वत:चा हक्क मिळवण्यासाठी पुढे
>> आणायचे हे खरे आव्हान आहे.
>>
>> भारतामध्ये विशिष्ठ उद्योगामुळे एखाद्या समुदायाला ओळखण्याची अनेक उदाहरणे
>> आहेत. उदा.- तांबट, लोहार, कुंचीकोरवी इत्यादी. खरे तर सर्वच माणसे सर्व कामे
>> शिकू शकतात आणि उदरनिर्वाह करू शकतात. परंतु आपल्या इथल्या जीवनपद्धतीत एकेका
>> समुदायाला एकेक काम उदरनिर्वाहाचे साधन म्हणून विकसित झाले आणि अन्य कौशल्ये
>> स्वत:साठी वापरायची अशी प्रथा पडली. उदाहरणार्थ, बांबूच्या चटया, टोपल्या
>> बनविण्याची कला गावात सर्वांना येते, ते स्वत: वस्तू बनविण्याकरिता अथवा
>> दुरुस्तीकरिता वापरतात, परंतु त्या वस्तू बनवून विकण्याचा व्यवसाय फक्त बुरुड
>> करतात.
>>
>> भिल्लांच्या जनजातीमधील जी पोटजात कात बनविण्याचा व्यवसाय करीत असे, ती
>> जनजाती कातकरी, कातोडी अथवा काथोडी या नावाने ओळखली जाउ लागली. त्यांच्याकडे
>> बांबूच्या वस्तू बनविण्याची कला, मासे पकडण्याची कला, मध काढण्याची कला,
>> शिकारीची कला, अशा विविध कला व कौशल्ये होती. पण त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन
>> होते कात बनविणे आणि विकणे. अन्य कौशल्ये फक्त स्वत:च्या उपयोगासाठी आणि
>> मनोरंजनासाठी.
>>
>> या समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे वर्णन करायचे झाले तर,
>> इंग्रजांच्या पूर्वीचा काळ आणि इंग्रजांच्या आगमनानंतरचा काळ अशी विभागणी
>> करावी लागेल. इंग्रज येण्यापूर्वी हा समाज महाराष्ट्र व गुजरात यांच्या
>> सीमाभागातील, "खैराची"  व इतर विपुल वृक्षसंपदा असणाऱ्या भागात स्थायिक होता.
>> झाडांची उपलब्धता कमी अधिक होईल त्याप्रमाणे त्यांचे स्थानिक स्थलांतर होत
>> असे. परंपरागत पद्धतीने घरातील मुले, विविध कौशल्ये आत्मसात करीत असत. कात
>> बनवणे हे प्रगत कौशल्य आहे. यामध्ये झाडाची निवड, कात बनवण्याच्या
>> प्रक्रियेसाठी जागेची निवड, झाडांची कटाई, झाडामधील योग्य भागांचे वर्गीकरण,
>> झाडाचा अर्क काढण्याची रासायनिक प्रक्रिया, उष्णतेचा योग्य वापर, अर्काच्या
>> वड्या पाडण्याचे कौशल्य, उत्पादन खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याशी
>> वाटाघाटी करण्याचे आणि हा व्यवहार स्वत:ला फसवून न घेता पूर्ण करण्याची हातोटी
>> अशा विविश गुणवत्तेचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे कि कातकरी माणूस हा विविध
>> आणि अवघड कौशल्यांनी युक्त आहे.
>>
>> स्वाभाविकपणे कातकरी समाजाकडे एकेकाळी पुरेशी धनसंपत्ती होती. त्याचप्रमाणे
>> मध, लाकूड, कंदमुळे, प्राण्यांची शिकार अशा जंगलात उपलब्ध होणाऱ्या  विविध
>> गोष्टी त्याला भरपूर प्रमाणात मिळायच्या. जातपंचायतीच्या रूपाने स्वत:ची
>> न्यायव्यवस्था कातकऱ्यांकडे  होती. आज जरी ही  जातपंचायत व्यवस्था बदनाम झाली
>> असली तरी, त्या काळी ही एक चांगली व्यवस्था होती.
>>
>> इंग्रजांच्या आगमनानंतर कातकरी समाजाची आर्थिक व्यवस्था विस्कटून गेली.
>> इंग्रजांनी गावातील शेत  जमिनींची नोंदणी करून महसुलाची व्यवस्था बसवली. खाजगी
>> जंगले नोंदवून त्यांची महसुलाची व्यवस्था बसवली. कातकरी समाज ज्या जंगलात
>> वावरत होता ते खाजगी नसून समाजाचे होते, सामाईक होते. हा समाज साधारणपणे
>> शासकीय यंत्रणेच्या समोर जाणारा नसल्याने, तो जंगलावर स्वत:चे नाव लावण्यास
>> पुढे आला नाही. इंग्रजांनी वनखाते निर्माण करून ही सर्व जंगले स्वत:च्या
>> ताब्यात घेतली. इथून कातकऱ्यांचे दुष्टचक्र चालू झाले. ताब्यात घेतलेल्या या
>> जंगलांवर इंग्रजांनी कंत्राटदार नेमले. जंगल संपत्तीची लुट करून इंग्रज
>> सरकारची तिजोरी भरायची हा या कंत्राटदारांचा उद्योग होता. आजवर कातकरी समाज
>> आपल्या गरजेप्रमाणे खैराची झाडे तोडून, आपल्याला आवश्यक तितक्या धना पुरता कात
>> बनवीत असे. आता मात्र इंग्रजांच्या अमर्याद लोभापायी वारेमाप जंगलतोड सुरु
>> झाली. तोडलेल्या लाकडाचा मालक इंग्रज होता. त्याचे पैसे भरण्याची क्षमता
>> कातकऱ्याकडे नव्हती.
>>
>> इथे बोहरी आणि पारशी कंत्राटदार पुढे आले. काताचे कारखाने यांनी चालू केले
>> आणि कातकरी हा मजूर बनून तेथे राबू लागला. कारखाने इतक्या वेगाने खैर संपवू
>> लागले कि, आपला मूळ प्रदेश सोडून अन्य प्रदेशात जसे कारखाने स्थलांतरित होऊ
>> लागले, तसे कातकरीही  स्थलांतरित होऊ लागले. म्हणून आज कातकरी रत्नागिरीपासून
>> सुरत पर्यंत आणि पूर्वेला पुणे जिल्ह्यात देखील आढळतो.
>>
>> एका संपन्न, कौशल्यपूर्ण, आरोग्यपूर्ण व्यावसायिक समाजाचे अशा रीतीने
>> दरिद्री; कुपोषित मजूर समाजामध्ये रुपांतर इंग्रजांमुळे झाले. हे होत असताना
>> अन्य समाज आपले हितसंबंध राखताना इतक्या व्यग्र होता कोणी कातकरी लोकांना
>> त्याबाबत जागृत देखील केले नाही. आपल्या नावावर कोठेही जमिनीचा एखादा साधा
>> तुकडा मिळवण्यातदेखील कातकरी समाज अपयशी ठरला, हीच त्याची शोकांतिका आहे.
>>
>> हळूहळू काताच्या छोट्या कारखान्यांचे भव्य कारखान्यात रुपांतर झाले. कातकरी
>> माणसाकडे असलेल्या कौशल्यांची नव्या कारखान्यांना गरज नव्हती. त्यामुळे हळूहळू
>> कातकरी माणूस या व्यवसायातून बाहेर फेकला गेला. कटाची भट्टी बंद पडली आणि मग
>> सुरु झाल्या विटांच्या भट्ट्या, कोळशाच्या भट्ट्या आणि सर्वात शेवटी दारूच्या
>> भट्ट्या. कोळसा आणि विटांच्या भट्ट्यात कातकरी हा मजूर असतो कारण भांडवल खूप
>> लागते. दारूच्या भट्टीसाठी एकतर भांडवल कमी लागते आणि दुसरे म्हणजे हा
>> पोलिसांच्या धाकाखालील धंदा असल्याने, गावकरी कातकऱ्यांना या धंद्यासाठी
>> भांडवल देतात, आणि भट्टी चालू करण्यास प्रोत्साहन देतात. हा धंदा करणाऱ्या
>> माणसाच्या घरात भरपूर पैसा खेळतो पण स्वास्थ्य मुळीच नसते, कारण संपूर्ण
>> गावावरून ओवाळून टाकलेली माणसे तिथे येत असतात आणि घरातील माणसांनाही वाईट
>> व्यसने लागतात.
>>
>> वाडीतील छोटी मुले शाळेत जाताना दिसतात, त्यातील बरीचशी मुले मध्येच शाळा
>> सोडतात आणि माध्यमिक शाळेत तर तुरळक कातकरी मुले दिसतात. इतर मुलांच्या मानाने
>> त्यांना घरी मिळणाऱ्या सुविधा या फारच कमी असतात. मासे पकडायला, खेकडे पकडायला
>> जाणे अशी विविध प्रलोभने असतात. त्यामुळे शिक्षणात लक्ष कमी आणि प्रगतीही
>> कमी.या सर्व परिस्थितीतही पदवी मिळेपर्यंत शिक्षण घेणारी कातकरी मुले पाहिली
>> की खरोखर त्यांचा अभिमान वाटतो. या अशाच मुलांना पुढील आयुष्यात स्थिर होता
>> यावे यावर देखील आश्रमाचा भर आहे, प्रयत्न आहे.
>>
>> पनवेलच्या आश्रमातून शिकलेला अनिल वाघमारे हा विद्यार्थी वारली चित्रकला
>> शिकून आज तोच त्याचा व्यवसाय म्हणून काम करत आहे. त्याच्या व्यवसायात
>> त्याच्याच गावच्या अजून दोन कातकरी मुलांना रोजगार मिळाला आहे. आश्रमाचे एक
>> विद्यार्थी एकनाथ वाघे हे आता शिक्षक झाले आहेत. पनवेल अर्बन बँकमध्ये काम
>> करणारे सुदाम पवार हे आश्रमाचे विद्यार्थी तर आहेतच परंतु आता ते आश्रमाच्या
>> विश्वस्त मंडळाचे सदस्यही आहेत. अशी उदाहरणे अनेक आहेत पण समाजाला बदलाच्या
>> वाटेवर घेऊन जाण्यास त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.गरज आहे आपण सर्वांनी
>> त्यांचे हात बळकट करण्याची.
>>
>> कातकरी समाज सध्या पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कुलाबा, ठाणे व पालघर
>> जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळतो. या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी
>> कातकरी समाजात मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य करण्याची खरोखर मुख्य निकड आहे. आपण
>> पुढील उपक्रम हाती घेऊ शकता:-
>>
>> १) एखाद्या कातोडी मधील सर्व मुले शाळेत जातील यासाठी प्रयत्न करणे
>> २) मुलींची लग्ने योग्य वय झाल्यावरच करण्यासाठी प्रबोधन, जनजागरण करणे
>> ३) कातोडीतील महिलांकडून झोपडीत करून घेण्यासारखी छोटी कामे शोधून, त्यांना
>> शिकवून, रोजगार निर्माण करून देणे
>> ४) "नाग्या कातकरी" या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्याची माहिती सर्वांपर्यंत
>> पोहोचवणे
>> ५) कातोडीमध्ये "सुंदर माझे घर" अशी स्पर्धा घेऊन, काही गृहोपयोगी बक्षिसे
>> वितरीत करून एकप्रकारे कातोडी स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करणे
>> ६) संस्कार वर्ग चालवणे
>> ७) दारू गाळण्याचा उद्योग करणाऱ्या कुटुंबांना प्रबोधन करणे, त्यांना
>> पर्यायी उद्योग देणे
>> ८) शिक्षित व अर्धशिक्षित मुला-मुलींना छोटे अभ्यासक्रम, प्रशिक्षण देऊन,
>> नोकऱ्या मिळवून देणे, तसेच छोटे व्यवसाय स्थापन करून देणे
>> ९) घरे बांधण्यासाठी जागा मिळवून त्यांच्या मालकीची करून देणे, स्थिर वसाहत
>> करणे
>> १०) लग्नातील अवास्तव खर्च टाळण्यासाठी प्रबोधन करणे, सामूहिक विवाहासारखे
>> उपक्रम राबवणे
>> ११) कातकरी मुला-मुलींसाठी खेळाच्या स्पर्धा भरवणे, प्रोत्साहनपर बक्षिसे
>> वितरीत करणे
>>
>> आपण स्वत: कातकरी वस्त्यांवर प्रवास केलात, तर आपल्या अनुभवानुसार आपल्याला
>> इतर अन्य उपक्रमही सुचू शकतील आणि आपण ते ही करू शकाल. कल्याण आश्रमामध्ये
>> कातकरी जनजाती मधील अनेक कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे कातकरी
>> समाजात काम करणारे अनेक शहरी कार्यकर्ते आहेत. आपण या सर्वांचे सहकार्य घेऊ
>> शकता. आम्ही आपल्या बरोबर काम करण्यास निश्चितच उत्सुक आहोत आणि तयार आहोत.
>>
>> आपले नम्र,
>>
>> नरेंद्र विश्वनाथ पेंडसे – ७७०९०१३२३२ (7709013232)
>> ऋषभ मुथा -  ९३२५०९३८४० (9325093840)
>> सचिन कुलकर्णी – ९९२१५७४१०८ (9921574108)
>>
>> www.vanvasi.org
>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF3GS2yHELvS3_%2BZNkLCCyDb0oRwjL718zw0UXBwh%2B4Wan3y1A%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF3GS2yHELvS3_%2BZNkLCCyDb0oRwjL718zw0UXBwh%2B4Wan3y1A%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>  --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADnEKGwE%3Dxh%3D89GnXw5dvHCsnBFq%2BOfqV9p81BiHT7_-pwKvdA%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADnEKGwE%3Dxh%3D89GnXw5dvHCsnBFq%2BOfqV9p81BiHT7_-pwKvdA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>



-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: chet...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2RTyqq_rUxxXqUfTF7EV04sA7wE-HtYXwWUKqc7Y_nQxw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to