(या भागात उठावाची माहिती दिली  आहे )
स्वातंत्र्याची हि लढाई सुसज्ज व सशस्त्र मार्गाने लढावी लागणार हे स्पष्ट
होते ,म्हणूनच सिदो ,कान्हू यांनी संथाळी  सैनिकांच्या अनेक तुकड्या तयार
केल्या होत्या . त्यापैकी एका तुकडीने फुदगीर गावावर हल्ला बोल केला व अनेक
इंग्रजांना देशोधडीला पाठवले.
तर सैन्याची दुसरी तुकडी साहिबगंज येथे रवाना झाली या तुकडीने इंग्रजांवर
आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मात्र इंग्रज व संथाळ  सैनिक यातील अंतर बरेच
जास्त असल्यामुळे हा प्रयत्न फसला. इंग्रज मात्र या आक्रमणा नंतर शांत बसणार
नव्हते ,त्यांनी त्वेषाने गोळीबार सुरु केला या गोळीबारात अनेक संथाळ सैनिक
धारातीर्थी पडले. आता मात्र या विद्रोहाने उग्र रूप धारण केले.
इंग्रज व संथाळ यात पैलपूर येथे घमासान युद्ध झाले. यात अनेक संथाल सैनिक शहीद
झाले मात्र सर्वात मोठे नुकसान झाले ते कान्हू यांच्या वीर मरणाने! कान्हू या
युद्धात शहीद झाले होते ।
यानंतर रघुनाथपूर ,संग्रामपूर ,बडहैत अशा ठिकाणी उठाव झाले , प्रचंड संख्येने
संथाळी सैनिक मारले गेले . इतकी जीवितहानी होवूनही संथाळ सैनिक मागे हटायला
तयार नाहीत हे पाहून  धूर्त इंग्रजांनी  या उठावाचा पाडाव करण्यासाठी फोड व
झोडा नीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. व बडहैत येथील एका व्यक्तीला आपल्या बाजूने
वळवून घेतले. व पुढे याच व्यक्तीने दिलेल्या माहितीमुळेच इंग्रज सिदो यांना
पकडू शकले . इतिहास साक्ष आहे कि,इग्रजांनी याच नीतीचा अवलंब करत अनेक
क्रांतिवीरांना बंदी बनवले होते.  आपला नेता पकडला गेला आहे तरी मनोधैर्य खचून
न देत ३०००० संथाल क्रांतिकारकांनी इंग्रजांना शरण न येण्याचे ठरविले.  मात्र
प्रचंड उपासमार व आजाराच्या संक्रमणामुळे हे क्रांतिकारक  बेहाल झाले  होते.
या क्रांतिकारकांवर  दहशत बसून त्यांनीआपल्याला  शरण यावे यासाठी इग्रजांनी
सिदो व त्यांच्या काही साथीदारांना उघडपणे फासावर चढवले परंतु ते न डगमगता
जयघोष करत फासावर चढले. हा उठाव गैर आदिवासिंविरुद्ध आहे असा खोटा समाज
पसरवण्यास इग्रजांनी सुरवात केली मात्र संथाळांच्या मनातली राष्ट्रभावना कधीच
शमली नाही.
या उठावात ३०००० च्या आसपास संथाली सैनिक व जनता मारली गेली. इतका प्रचंड
नरसंहार इतिहासात कदाचित घडला असेल . इतकेच काय या उठवत एकाच वडिलांचे ४
सुपुत्र इतकेच काय त्यांच्या २ मुली यांनी देखील उठावात भाग घेतला हि घटना
अद्वितीय आहे .हा उठाव 'संथाळ हुल' म्हणून ओळखला जावू लागला . व ३० जून हा
दिवस 'संथाळ हूल दिवस' म्हणून !!परन्तु इतिहासकारांनी शालेय
पाठ्यपुस्तकांमध्ये 'संथाळाचा उठाव' एव्हडीच काय ती नोंद घेतली.
इग्रजांनी बांधलेला पकौड येथील martela टॉवर या उठावाचे प्रतिक आहे ..
अशाप्रकारे जंगलतरी जिल्हा बिहार च्या (सध्या झारखंड )संथाळ परगणा नावाने
प्रसिध्द झाला. या  व्यापक क्रांतीनंतर जंगलतरी जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार
गव्हर्नर च्या हाती देण्यात आला .
या क्रांतीकारकांना व साहसी संथाळी जनतेला मानाचा जोहार !!
आज संथाल हूल दिवस । सिदो ,कान्हू ,चांद ,भैरो यांचा इतिहास आपल्याला माहित
नाही हि फार खेदाची बाब आहे .  हा लेख लिह्ण्यामागचा उद्देश हाच कि इतिहासाने
नोंद घेतली असेल नसेल पण आदिवासी म्हणून आपल्या क्रांतिकारकांचा  इतिहास
आपल्याला माहित असावाच व आपण तो आपल्या पुढच्या पिढीस देण्यास सक्षम असले
पाहिजे . केवळ आज whtsupp वर व facebook वर thums up किंवा like करून विसरून न
जाता हा शालेय मुलांपर्यंत पोचवावा इतकाच आग्रह !
सिदो कान्हू  खुड खुडी भितोरे
चांद भैरो घोडा युपो रे
देखो रे चांद रे ,भैरो रे
घोड भैरो मुलिने मुलिने

संदर्भ -आदिवासी वीर (संपादक -जेल सिंग पावरा )
शब्दांकन _संचिता सातवी
On 30 Jun 2015 10:31, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <ay...@adiyuva.in>
wrote:

> संथाळ हूल -हूल म्हणजे विद्रोह. सिदो  ,चांद  ,भैरो ,कान्हू हे चार मुर्मू
> बंधु या विद्रोहाचे खरे शिल्पकार !साहिबगंज जिल्ह्यातील भोगनाडीह गावातील चुलू
> संथाळा चे सुपुत्र !
> भारताच्या उत्तर पूर्व भागात ईस्ट इंडिया कंपनी चे साम्राज्य स्थापित झाले
> ,आणि १७६५-६६ मध्ये बंगाल ,बिहार,उडीसा राज्यातील कर वसुलीचा अधिकार
> कंपनीच्या हाती आला तर संरक्षण ,न्याय आणि दंड व्यवस्था या नवाबांच्या हाती
> राहिल्या . अशा  दुहेरी शासन व्यवस्थेमुळे जनता अधिकच त्रस्त झाली होती.
> कंपनीला केवळ कर वसुली करायची होती त्यांना जनतेच्या सुख दुखाशी काही लेणेदेने
> नव्हते . हा काळ जनतेसाठी खूप भयावह होता ,जनतेवर इंग्रजांचे अत्याचार
> दिवसेंदिवस वाढत चालले होते.
>   संथाल स्त्री पुरुष रस्ते बांधणीच्या कामासाठी मजुरीवर जात होते,तेथे
> त्यांना जबरदस्तीने धर्म व संस्कृती लुटली जात होती,जबरदस्तीने त्यांचे
> ख्रिस्तीकरण करण्यात येत होते.  ५०%ते ५००% पर्यंत या जनतेला कर भरावा लागत
> होता. यामुळे संथाळ आदिवासींमध्ये आक्रोश व संताप वाढू लागला.
> हाच आक्रोश ,संताप जुन १८५५  मध्ये अशा प्रकारे बाहेर आला कि आज इतिहासात तो
> संथाल हूल म्हणून प्रसिध्द आहे .
>   संथालांवरील या अन्यायाविरुध्द आवाज उठवण्यास  सिदो, कान्हू,चांद ,आणि भैरो
> या चार भावांनी सुरवात केली . त्यांनी लोकांना सांगितले कि,'देवी स्वयं येवून
> तिने आम्हाला संथालांच्या या स्वातंत्रप्राप्तीचे नेतृत्व तुम्ही करा असे
> सांगितले आहे '. 'महादेवाने आम्हाला ७ वेळा दर्शन देवून सांगितले आहे, कि
> येणाऱ्या संकटांना तोंड देण्यास जनतेने तयार राहावे,  तरच स्वतंत्र  मिळू शकेल
> .' या बोलण्याच्या जनतेच्या मनावर खोलवर परिणाम झाला व त्यांनी सिदो
> ,कान्हू,चंद ,भैरो यांना आपले नेते मानण्यास सुरवात केली . येथूनच विद्रोहाला
> सुरवात झालि .
> इग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सिदो ,कान्हू,चांद ,भैरो  यांनी  विविध योजना
> क्लृप्त्या लढवल्या. 'जे लोक संथालांच्या या लढ्यात संथाली सेनेला अन्नाचा
> पुरवठा करणार नाहीत त्यांना देशद्रोही घोषित केले जाईल व त्यांचा धान्य साठा
> लुटला जाईल;  . इतकेच काय त्यांचा नारा होता कि जमीनदार , सावकार,पोलिस
> ,सरकारी कर्मचारी यांचा नाश होवो ."जे आम्हाला विरोध करणार त्यांचा आम्ही नाश
> करू अशी त्यांनी प्रतिद्या घेतली . "
> अखेर या अन्याय ,अत्याचार शोषण व स्वातंत्र्याच्या लढाईचा तो दिवस उगवलाच !३०
> जून १८५५ रोजी पौर्णिमेच्या दिवशी जवळ पास १०,००० हजार संथाली आदिवासी जनता
> तीर कमान  ,कोयता ,तलवार आदि शस्त्र घेवून संथाळ परगणाच्या भोगनाडीह गावात जमा
> झाले व घोषणा केली कि , 'आमच्यावर कुणाची सत्ता नाही. कुणी राजा ,पोलिस व
> इंग्रजांची आमच्यावर सत्ता नाही आमचे संथालांचे राज्य आजपासून स्थापित झाले
> आहे ".व सिदो आणि कान्हू यांना सुबा म्हणजेच त्यांचे राजा बनवण्यात आले .
> यादरम्यान एका छोट्याश्या घटनेने विद्रोहाची ठिणगी पाडली व पुढे ती वणवा बनून
> पेटली.
> दिघी गावाचे इंग्रज पोलिस अधिकारी व सावकार हे दोन संथाल कैद्यांना  पंचकाठी
> मार्गे भागलपूर कडे घेवून जात असल्याची गुप्त खबर सिदो व कान्हू यांना लागली व
> या कैद्यांना सोडवण्यासाठी ते या इंग्रज अधिकारयासमोर उभे ठाकले  , यावेळेस
> त्यांना पकडून बंदी बनवण्याचे आदेश इंग्रजामार्फत देण्यात  आले. ,मात्र सिदो व
> ,कान्हू यांच्या सोबत आलेल्या  संथाल जनतेने जोरदार विरोध केला व या
> प्रतिकारात पोलिस व सावकार मारले गेले .
> येथूनच खर्या विद्रोहाला सुरवात झाली.
>
> (संदर्भ -आदिवासी विर संपादक -जेलसिंग पावरा )
> शब्दांकन -संचिता सातवी
>
> ( उर्वरित भागात या विद्रोहाचे सविस्तर विश्लेषण पहा )
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsGdqYy1nUrJ%3DeNWS2BeUPvfp-07PAQTfPb3FG8q6E1tw%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsGdqYy1nUrJ%3DeNWS2BeUPvfp-07PAQTfPb3FG8q6E1tw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBumMr0Lq-txWUO%3D48mRcGOZZK6uuutxuGqbJQt-mbd2zQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to