zarkhand हूल बडे धूमधाम से मानाया

AYUSHonline team
www.adiyuva.in


2015-06-30 11:39 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:

> (या भागात उठावाची माहिती दिली  आहे )
> स्वातंत्र्याची हि लढाई सुसज्ज व सशस्त्र मार्गाने लढावी लागणार हे स्पष्ट
> होते ,म्हणूनच सिदो ,कान्हू यांनी संथाळी  सैनिकांच्या अनेक तुकड्या तयार
> केल्या होत्या . त्यापैकी एका तुकडीने फुदगीर गावावर हल्ला बोल केला व अनेक
> इंग्रजांना देशोधडीला पाठवले.
> तर सैन्याची दुसरी तुकडी साहिबगंज येथे रवाना झाली या तुकडीने इंग्रजांवर
> आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मात्र इंग्रज व संथाळ  सैनिक यातील अंतर बरेच
> जास्त असल्यामुळे हा प्रयत्न फसला. इंग्रज मात्र या आक्रमणा नंतर शांत बसणार
> नव्हते ,त्यांनी त्वेषाने गोळीबार सुरु केला या गोळीबारात अनेक संथाळ सैनिक
> धारातीर्थी पडले. आता मात्र या विद्रोहाने उग्र रूप धारण केले.
> इंग्रज व संथाळ यात पैलपूर येथे घमासान युद्ध झाले. यात अनेक संथाल सैनिक
> शहीद झाले मात्र सर्वात मोठे नुकसान झाले ते कान्हू यांच्या वीर मरणाने!
> कान्हू या युद्धात शहीद झाले होते ।
> यानंतर रघुनाथपूर ,संग्रामपूर ,बडहैत अशा ठिकाणी उठाव झाले , प्रचंड संख्येने
> संथाळी सैनिक मारले गेले . इतकी जीवितहानी होवूनही संथाळ सैनिक मागे हटायला
> तयार नाहीत हे पाहून  धूर्त इंग्रजांनी  या उठावाचा पाडाव करण्यासाठी फोड व
> झोडा नीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. व बडहैत येथील एका व्यक्तीला आपल्या बाजूने
> वळवून घेतले. व पुढे याच व्यक्तीने दिलेल्या माहितीमुळेच इंग्रज सिदो यांना
> पकडू शकले . इतिहास साक्ष आहे कि,इग्रजांनी याच नीतीचा अवलंब करत अनेक
> क्रांतिवीरांना बंदी बनवले होते.  आपला नेता पकडला गेला आहे तरी मनोधैर्य खचून
> न देत ३०००० संथाल क्रांतिकारकांनी इंग्रजांना शरण न येण्याचे ठरविले.  मात्र
> प्रचंड उपासमार व आजाराच्या संक्रमणामुळे हे क्रांतिकारक  बेहाल झाले  होते.
> या क्रांतिकारकांवर  दहशत बसून त्यांनीआपल्याला  शरण यावे यासाठी इग्रजांनी
> सिदो व त्यांच्या काही साथीदारांना उघडपणे फासावर चढवले परंतु ते न डगमगता
> जयघोष करत फासावर चढले. हा उठाव गैर आदिवासिंविरुद्ध आहे असा खोटा समाज
> पसरवण्यास इग्रजांनी सुरवात केली मात्र संथाळांच्या मनातली राष्ट्रभावना कधीच
> शमली नाही.
> या उठावात ३०००० च्या आसपास संथाली सैनिक व जनता मारली गेली. इतका प्रचंड
> नरसंहार इतिहासात कदाचित घडला असेल . इतकेच काय या उठवत एकाच वडिलांचे ४
> सुपुत्र इतकेच काय त्यांच्या २ मुली यांनी देखील उठावात भाग घेतला हि घटना
> अद्वितीय आहे .हा उठाव 'संथाळ हुल' म्हणून ओळखला जावू लागला . व ३० जून हा
> दिवस 'संथाळ हूल दिवस' म्हणून !!परन्तु इतिहासकारांनी शालेय
> पाठ्यपुस्तकांमध्ये 'संथाळाचा उठाव' एव्हडीच काय ती नोंद घेतली.
> इग्रजांनी बांधलेला पकौड येथील martela टॉवर या उठावाचे प्रतिक आहे ..
> अशाप्रकारे जंगलतरी जिल्हा बिहार च्या (सध्या झारखंड )संथाळ परगणा नावाने
> प्रसिध्द झाला. या  व्यापक क्रांतीनंतर जंगलतरी जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार
> गव्हर्नर च्या हाती देण्यात आला .
> या क्रांतीकारकांना व साहसी संथाळी जनतेला मानाचा जोहार !!
> आज संथाल हूल दिवस । सिदो ,कान्हू ,चांद ,भैरो यांचा इतिहास आपल्याला माहित
> नाही हि फार खेदाची बाब आहे .  हा लेख लिह्ण्यामागचा उद्देश हाच कि इतिहासाने
> नोंद घेतली असेल नसेल पण आदिवासी म्हणून आपल्या क्रांतिकारकांचा  इतिहास
> आपल्याला माहित असावाच व आपण तो आपल्या पुढच्या पिढीस देण्यास सक्षम असले
> पाहिजे . केवळ आज whtsupp वर व facebook वर thums up किंवा like करून विसरून न
> जाता हा शालेय मुलांपर्यंत पोचवावा इतकाच आग्रह !
> सिदो कान्हू  खुड खुडी भितोरे
> चांद भैरो घोडा युपो रे
> देखो रे चांद रे ,भैरो रे
> घोड भैरो मुलिने मुलिने
>
> संदर्भ -आदिवासी वीर (संपादक -जेल सिंग पावरा )
> शब्दांकन _संचिता सातवी
> On 30 Jun 2015 10:31, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <ay...@adiyuva.in>
> wrote:
>
>> संथाळ हूल -हूल म्हणजे विद्रोह. सिदो  ,चांद  ,भैरो ,कान्हू हे चार मुर्मू
>> बंधु या विद्रोहाचे खरे शिल्पकार !साहिबगंज जिल्ह्यातील भोगनाडीह गावातील चुलू
>> संथाळा चे सुपुत्र !
>> भारताच्या उत्तर पूर्व भागात ईस्ट इंडिया कंपनी चे साम्राज्य स्थापित झाले
>> ,आणि १७६५-६६ मध्ये बंगाल ,बिहार,उडीसा राज्यातील कर वसुलीचा अधिकार
>> कंपनीच्या हाती आला तर संरक्षण ,न्याय आणि दंड व्यवस्था या नवाबांच्या हाती
>> राहिल्या . अशा  दुहेरी शासन व्यवस्थेमुळे जनता अधिकच त्रस्त झाली होती.
>> कंपनीला केवळ कर वसुली करायची होती त्यांना जनतेच्या सुख दुखाशी काही लेणेदेने
>> नव्हते . हा काळ जनतेसाठी खूप भयावह होता ,जनतेवर इंग्रजांचे अत्याचार
>> दिवसेंदिवस वाढत चालले होते.
>>   संथाल स्त्री पुरुष रस्ते बांधणीच्या कामासाठी मजुरीवर जात होते,तेथे
>> त्यांना जबरदस्तीने धर्म व संस्कृती लुटली जात होती,जबरदस्तीने त्यांचे
>> ख्रिस्तीकरण करण्यात येत होते.  ५०%ते ५००% पर्यंत या जनतेला कर भरावा लागत
>> होता. यामुळे संथाळ आदिवासींमध्ये आक्रोश व संताप वाढू लागला.
>> हाच आक्रोश ,संताप जुन १८५५  मध्ये अशा प्रकारे बाहेर आला कि आज इतिहासात तो
>> संथाल हूल म्हणून प्रसिध्द आहे .
>>   संथालांवरील या अन्यायाविरुध्द आवाज उठवण्यास  सिदो, कान्हू,चांद ,आणि
>> भैरो या चार भावांनी सुरवात केली . त्यांनी लोकांना सांगितले कि,'देवी स्वयं
>> येवून तिने आम्हाला संथालांच्या या स्वातंत्रप्राप्तीचे नेतृत्व तुम्ही करा
>> असे सांगितले आहे '. 'महादेवाने आम्हाला ७ वेळा दर्शन देवून सांगितले आहे, कि
>> येणाऱ्या संकटांना तोंड देण्यास जनतेने तयार राहावे,  तरच स्वतंत्र  मिळू शकेल
>> .' या बोलण्याच्या जनतेच्या मनावर खोलवर परिणाम झाला व त्यांनी सिदो
>> ,कान्हू,चंद ,भैरो यांना आपले नेते मानण्यास सुरवात केली . येथूनच विद्रोहाला
>> सुरवात झालि .
>> इग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सिदो ,कान्हू,चांद ,भैरो  यांनी  विविध योजना
>> क्लृप्त्या लढवल्या. 'जे लोक संथालांच्या या लढ्यात संथाली सेनेला अन्नाचा
>> पुरवठा करणार नाहीत त्यांना देशद्रोही घोषित केले जाईल व त्यांचा धान्य साठा
>> लुटला जाईल;  . इतकेच काय त्यांचा नारा होता कि जमीनदार , सावकार,पोलिस
>> ,सरकारी कर्मचारी यांचा नाश होवो ."जे आम्हाला विरोध करणार त्यांचा आम्ही नाश
>> करू अशी त्यांनी प्रतिद्या घेतली . "
>> अखेर या अन्याय ,अत्याचार शोषण व स्वातंत्र्याच्या लढाईचा तो दिवस उगवलाच
>> !३० जून १८५५ रोजी पौर्णिमेच्या दिवशी जवळ पास १०,००० हजार संथाली आदिवासी
>> जनता तीर कमान  ,कोयता ,तलवार आदि शस्त्र घेवून संथाळ परगणाच्या भोगनाडीह
>> गावात जमा झाले व घोषणा केली कि , 'आमच्यावर कुणाची सत्ता नाही. कुणी राजा
>> ,पोलिस व इंग्रजांची आमच्यावर सत्ता नाही आमचे संथालांचे राज्य आजपासून
>> स्थापित झाले आहे ".व सिदो आणि कान्हू यांना सुबा म्हणजेच त्यांचे राजा
>> बनवण्यात आले .
>> यादरम्यान एका छोट्याश्या घटनेने विद्रोहाची ठिणगी पाडली व पुढे ती वणवा
>> बनून पेटली.
>> दिघी गावाचे इंग्रज पोलिस अधिकारी व सावकार हे दोन संथाल कैद्यांना  पंचकाठी
>> मार्गे भागलपूर कडे घेवून जात असल्याची गुप्त खबर सिदो व कान्हू यांना लागली व
>> या कैद्यांना सोडवण्यासाठी ते या इंग्रज अधिकारयासमोर उभे ठाकले  , यावेळेस
>> त्यांना पकडून बंदी बनवण्याचे आदेश इंग्रजामार्फत देण्यात  आले. ,मात्र सिदो व
>> ,कान्हू यांच्या सोबत आलेल्या  संथाल जनतेने जोरदार विरोध केला व या
>> प्रतिकारात पोलिस व सावकार मारले गेले .
>> येथूनच खर्या विद्रोहाला सुरवात झाली.
>>
>> (संदर्भ -आदिवासी विर संपादक -जेलसिंग पावरा )
>> शब्दांकन -संचिता सातवी
>>
>> ( उर्वरित भागात या विद्रोहाचे सविस्तर विश्लेषण पहा )
>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsGdqYy1nUrJ%3DeNWS2BeUPvfp-07PAQTfPb3FG8q6E1tw%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsGdqYy1nUrJ%3DeNWS2BeUPvfp-07PAQTfPb3FG8q6E1tw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuyfr5d8dJHWwua%2BmsyZjtuBQqkiTy5rhfr_v1OAQgWyA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to