On Monday, April 6, 2015 at 9:25:09 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
shakti wrote:
>
> Apr 06, 2015 : News shared : 
>
> धनगर समाजाच्या आरक्षणाच्या तात्काळ निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
> आग्रही असतानाच, महाधिवक्ता आणि विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने हा निर्णय 
> केंद्र सरकारवर सोपवून भाजपने स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे, 
> मात्र आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी स्वपक्षीयांनाच आव्हान दिले 
> आहे. तसा प्रस्ताव पाठविण्याचा मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाला अधिकारच नाही, 
> अशी ठाम भूमिका सवरा यांनी घेतली आहे. 
> एखाद्या जातीचा अनुसूचित जमाती (एसटी)मध्ये थेट समावेश करण्याचा अधिकार 
> कोणत्याही सरकार वा न्यायालयास नाही, मात्र एखाद्या जातीबाबत भक्कम पुरावा 
> असल्यास त्या समाज वा जातीचा एसटीमध्ये समावेश करण्याबाबत सविस्तर प्रक्रिया 
> पूर्ण करून भारतीय राज्यघटनेतील कलम ३४२ नुसार राष्ट्रपतींना शिफारस करता 
> येते. त्यानुसार राज्यात ‘धनगड’ आणि ‘धनगर’ एकच असून अनुसूचित जमातीच्या यादीत 
> झालेल्या ‘प्रिंटिंग मिस्टेक’मुळे धनगर समाजास आरक्षण मिळालेले नसल्याचा दावा 
> या समाजाच्या नेत्यांकडून केला जात आहे. राजकीय दबावानंतर आता मुख्यमंत्री 
> देवेंद्र फडणवीस हेही या समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबत सकारात्मक 
> असून त्यांच्याच इच्छेनुसार सरकारने विधी व न्याय विभाग आणि राज्याचे 
> महाधिवक्ता सुनील मनोहर यांचा धनगर समाजास आरक्षण देण्याबाबतच्या वादावर 
> अभिप्राय मागविला होता. त्यानुसार पालघाट (जिल्हा थंडन) समुध्याय संरक्षण 
> समिती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ या खटल्याच्या निकालाच्या आधारे अनुसूचित 
> जमातीच्या प्रवर्गात धनगरांचा समावेश करण्याबाबत राज्यघटनेच्या कमल ३४२(२) 
> नुसार कार्यवाही करण्याची केंद्रास विनंती करणारा प्रस्ताव आदिवासी विभागाने 
> तयार करावा आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने तो पुढील कार्यवाहीसाठी 
> केंद्राला पाठवावा, असा अभिप्राय महाधिवक्ता सुनील मनोहर तसेच विधी व न्याय 
> विभागाने सरकारला दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
>
> आदिवासी विकासमंत्री विरोधात
> कोणत्याही जाती अथवा समाजाची अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची एक 
> प्रक्रिया असून त्याच्याबाहेर जाऊन कोणालाही निर्णय घेता येत नाही, असे 
> आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. एखाद्या 
> समाजाने एसटीमध्ये समावेश करण्याची मागणी केल्यानंतर त्यावर आदिवासी विकास 
> संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा अभिप्राय मागविला जातो. नंतर आदिवासी 
> विकासमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समिती त्यावर निर्णय घेते. त्यानंतर हा 
> प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविला जातो. त्यांच्या अभिप्रायानंतर 
> मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनजाती सल्लागार समितीसमोर पाठविला जातो. 
> या समितीने मान्यता दिल्यानंतर तो प्रस्ताव शिफारशींच्या स्वरूपात केंद्रास 
> पाठविला जातो. केंद्रातही खूप मोठी प्रक्रिया असून संसदेच्या मान्यतेनंतरच हा 
> प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविला जातो, मात्र कोणाच्या तरी अभिप्रायाने परस्पर 
> असा प्रस्ताव थेट केंद्रास पाठविता येणार नाही. शिवाय धनगर समाजात भटक्या 
> विमुक्तांचा समावेश असून एसटी प्रवर्गाचे फायदेच त्यांना मिळत असल्याने 
> धनगरांचा एसटीत समावेश कशाला, असा सवालही सावरा यांनी केला.1
>
>
>
>
> On Tuesday, March 31, 2015 at 10:15:22 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
> Shakti wrote:
>>
>>
>> आज विधान भवना समोर सर्व पक्षीय आमदारांचे “आदिवासी आरक्षण बचाव” धरणे 
>> आंदोलनात सहभगी झालेल्या सर्व १२ आमदारांचे आभार. आदिवासी अस्तित्वा साठी असाच 
>> आक्रमक पवित्र अपेक्षित आहे 
>>
>>
>>
>> <https://lh3.googleusercontent.com/-CdZXPUMmATU/VRrMw9u6xTI/AAAAAAAA7Gc/noOI6jDeGNE/s1600/11037222_1574714649474024_5065341504630026860_n.jpg>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>> On Monday, March 30, 2015 at 9:04:04 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>> Shakti wrote:
>>>
>>> अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटनाबाह्य दबावाचा जाहीर निषेध ! सकाळी १०.३० 
>>> वा, ३१/०३/२०१५ उद्या विधान भवना समोर सर्व पक्षीय आमदारांचे “आदिवासी आरक्षण 
>>> बचाव” धरणे आंदोलन होणार आहे. www.jago.adiyuva.in
>>>
>>>
>>>
>>> On Monday, March 30, 2015 at 12:56:36 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>> Shakti wrote:
>>>>
>>>> अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटना बाह्य पद्धतीने येणाऱ्या दबावाचा जाहीर 
>>>> निषेध ! 
>>>>
>>>>
>>>>
>>>> अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटना बाह्य पद्धतीने येणाऱ्या दबावाचा जाहीर 
>>>> निषेध ! 
>>>>
>>>> आदिवासी विकास मंत्री ना. विष्णु सवरा यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी 
>>>> राज्यभरात राज्यभर आंदोलन. 
>>>> आदिवासी सर्व पक्षीय आमदार / खासदार, पं स/जि प सदस्य/ लोकप्रतिनिधी, 
>>>> सामाजिक संस्था, संघटना, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, नोकरदार, 
>>>> व्यावसायिक, 
>>>> शेतकरी, कामगार, युवक, युवती, महिला, जेष्ठ नागरिक, इ यांच्या वतीने राज्यभर 
>>>> रस्ता रोको, मोर्चे,आंदोलन.
>>>>
>>>>
>>>>
>>>> AYUSHonline team
>>>> www.adiyuva.in
>>>>
>>>>
>>>> 2015-03-29 23:25 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>
>>>> :
>>>>
>>>>>
>>>>> आज दि २९/ ३ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब यांचा 
>>>>> अध्यक्षतेखाली नाशिक येथे शासकीय विश्राम ग्रहात झलेल्या बैठकीत सर्व नाशिक 
>>>>> जिल्हा आदिवासी संघटना प्रतिनिधीची बैठक झाली...
>>>>> या बैठकी मध्ये धनगर आरक्षण विरुद्ध आंदोलन करण्याचा भाग म्हणून 
>>>>> राज्यभरात निदर्शन ,मोर्चे ,रास्तारोक, करून धनगर आरक्षणाला विरोध करायचा 
>>>>> आणि 
>>>>> त्यांची सुरवात म्हणून नाशिक मधून दि.९ / ४ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव 
>>>>> पिचड 
>>>>> साहेब, नामदार पद्माकर दादा वळवी,खासदार हरिचंद्र चव्हाण साहेब, आमदार जीव 
>>>>> पांडू गावित साहेब ,आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिवराम झोले साहेब,माजी 
>>>>> आमदार पांडुरंग बाबा गांगड, माजी आमदार रामदास चारोस्कर, यांचा नेतृत्वात 
>>>>> सर्व 
>>>>> आदिवासी संघटना यांचा प्रमुख उपस्तीत भव्ये मोर्चाचे आयोजन करण्याचे नियोजन 
>>>>> करण्याचे ठरविले आहे.
>>>>> दि.९ / ४ / २०१५ रोजी गोल्फ क्लब मैदान येथून दुपारी १ वाजता सदर मोर्चा 
>>>>> आदिवासी विकास विभाग या मार्गावरून -जिल्हापरिषद -शालीमार -मार्गे 
>>>>> जिल्हाधिकार 
>>>>> कार्यालय नाशिक येथे घेवून जाण्याचे ठरले आहे. सदर बैठकीत आदिवासी बचाव कृती 
>>>>> समितचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा.अशोक बागुल सर ,किसन ठाकरे, पंकज ठाकरे, अखिल 
>>>>> भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव,चंद्रभान पोटींदे 
>>>>> ,प्रभाकर फसाळे,सोनिया जावळे ,नाडेकर ताई,गौरी ताई लहंगे(पुणे),आदिवासी 
>>>>> महादेव 
>>>>> कोळी समाज संघटना नाशिक यांचा वतीने कार्यअध्यक्ष दीपक श्रीखंडे, अध्यक्ष 
>>>>> शहर 
>>>>> पृथ्वीराज अंडे,अध्यक्ष ग्रामीण प्रवीण कडाळे,स्वप्नील सताळे,कैलास शार्दुल 
>>>>> हजर होते.
>>>>> नामदार मधुकर राव पिचड यांनी बैठकीत बोलतान सांगितले की नामदार विष्णुजी 
>>>>> सावरा साहेब ( आदिवासी विकास मंत्री ) हे धनगर आरक्षणा विरुद्ध आहेत तशी 
>>>>> त्यांनी विधान सभेत विरोधी पक्षाने उपस्तीत केलेल्या प्रश्नाला उत्तर देतान 
>>>>> धनगर आरक्षण देण्यास विरोध केला...धनगर आदिवासी समाजाचे घटनेने ठरवून दिलेले 
>>>>> निकष आहेत त्यात धनगर समाज बसत नाही आणि धनगर समाजाला आरक्षण देता येणार 
>>>>> नाही.... नामदार विष्णुजी सावरा साहेबांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आपण 
>>>>> राज्यभरात आदिवासी समाज आदिवासी संघटनाचा वतीने मोर्चे,रास्तारोक,आंदोलन 
>>>>> करणार 
>>>>> आहोत नाशिक मध्ये ९ एप्रिल २०१५ रोजी होणार्या आंदोलनास जास्तीत जास्त 
>>>>> संख्येने हजर राहून आंदोलन यशस्वी करावे असे कार्येकार्त्याना बोलतान नामदार 
>>>>> पिचड साहेब बोलले आपकी जय ....जय आदिवासी
>>>>>
>>>>> -- 
>>>>> सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक 
>>>>> आदिवासी बेरोजगार मेळावा" 
>>>>> (१४/०४/२०१५ सकाळी १० वाजता) स्थळ कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर.
>>>>> संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | 
>>>>> www.jago.adiyuva.in 
>>>>> (share with your friends) 
>>>>>  
>>>>> Learn More about AYUSH online at : 
>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>> --- 
>>>>> You received this message because you are subscribed to the Google 
>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send 
>>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>>>>> To view this discussion on the web visit 
>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/e8db26dc-8b95-49f1-b725-ce29e99100ae%40googlegroups.com
>>>>>  
>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/e8db26dc-8b95-49f1-b725-ce29e99100ae%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>> .
>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>>
>>>>
>>>>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7ed4ad4f-b0b1-4606-9eac-79ae540f9a0a%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to