आदिवासी दिवसा निमित्त सर्व ग्रुप सभासदास एक अपिल :- जसे तुम्ही जाणता की आदिवासी एकता परिषद स्वाभिमानी व स्वावलंबी आदिवासींची संघटना आहे. कोणत्याही सरकारी योजना, राजकीय पक्ष,नेता,यांच्याकडुन देणगी किंवा निधि स्वीकारत नाहीं,त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्ष,नेते व सरकार यांना बांधिल न राहता फक्त आदिवासी समाजासाठी लढणारी अशी बहुदा एकमेव वैचारिक चळवळ आहे !म्हणतात ना, "ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी !" आएप फक्त आदिवासींकडुन कष्टाचे एक-एक रुपया चळवळीसाठी जमा करुन निधि जमवते जेणे करुन सर्व सामान्य आदिवासी बंधु भगिनींनासुद्धा आदिवासी एकता परिषद हक्काची व चळवळ स्वतची वाटते कारण ती स्वतःच्या कष्टाच्या पैसातुन उभी राहिली आहे ! आज प्रत्येक ग्रुप मेंबरला अपिल करित आहे की या वर्षी आएप फक्त आदिवासी दिवस साजरा न करता आदिवासी दिवसाच्या माध्यमातुन आपण भूमि अधिग्रहण बिल,मुंबई-दिल्ली बुलेट ट्रेन,सुपर हायवे,औद्योगिक पट्टा,धरणे यासारख्या आदिवासींना प्रचंड प्रमाणात विस्थापित करुन अस्तित्व नष्ट करणा-या प्रकल्पाविरोधात चळवळ उभी करत आहे.अस्तित्वाची हि लढाई लढत असताना समाजाच्या या लढ्यात आपलासुद्धा जास्तीत जास्त सहभाग द्या. लढा मजबूत बनवण्यासाठी निधि दान करावा ! आपल्या विभागातील कार्यकर्त्यांकडे जागतिक आदिवासी दिवस निधी साठी देणगी बुके उपलब्ध आहेत कृपया त्यांच्यासी संपर्क साधा किंवा ओफिसला भेट द्या. किंवा संपर्क करा. +919960879780- आप.विनोद दुमाडा आएप,पालघर।। जय आदिवासी।।जोहार जिंदाबाद।।
संपूर्ण पालघर जिल्ह्यात आदिवासी दिवस व येणारी संकटे या विषयी जागृती करण्यासाठी,प्रत्येकाला समजावे यासाठी 100-150 फ्लेक्स बॅनर लावावे असे टार्गेट ठेवले आहे.अंदाजे 40,000/- खर्च अपेक्षित आहे !संघटनेच्या 100 हितचिंतकांनी जरी फक्त 500/- रु.निधी दिले तरी 50,000/- रु. सहज जमा होतात ! इतरांच्या निधीतुन मंडप,साउंड याचा खर्च भागवता येईल ! जास्तित जास्त निधी जमा करुन आदिवासी अस्तित्व टिकवण्यास व संस्कृति जगासमोर आनण्यास हातभार लावा. http://www.adivasiektaparishad.org/ -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMrDCLnycF%2B0DtPMFFhfZYaj8rKcsydkGGRdVAEiQDt4dEoAdg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

