Any link, from where we can see this great movie

On Tuesday, December 29, 2015 at 12:40:33 AM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
shakti wrote:
>
> 'आमचा गाव, आम्हिच सरकार' फ़िल्म ठरली
> नासिक फ़िल्म फेस्टिवलचे आकर्षण-
>
>
>          'पेसा कायदा, वन अधिकार आणि सक्षम ग्रामसभा' यांबद्दल माहिती 
> देणाऱ्या विजयकुमार घोटे (नाशिक) दिग्दर्शित  'आमचा  गाव, आम्हिच सरकार' 
> फ़िल्मचे 'अंकुर' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सन 2015 चा सर्वोत्कृष्ट 
> चित्रपट म्हणून गौरव करण्यात आला.
>          सामजिक बांधीलकी जपणारी व सामाजिक प्रबोधन करणारी एकमेव फ़िल्म 
> म्हणून प्रथम पसंती मिळणे आणि गौरव होणे ही उल्लेखनीय आणि प्रशंसनीय बाब आहे.
> एका वेगळ्या थाटणीची फ़िल्म म्हणून गौरव झाला असून एका वेगळ्या विषयाला स्पर्श 
> करून त्यांनी अप्रतिम दिर्गदर्शन/सादरीकरणाचा प्रत्यय देवून तमाम आदिवासी 
> बांधवांचे, चाहत्यांचे तसेच उपस्थित फ़िल्म जगताचे मन जिंकले व वाहवा मिळवली.
>
> 🔹आदिवासी लोकशाही कशी असते..?
> 🔹भारताच्या लोकशाहिचा कशाप्रकारे वापर करायचा..?
> 🔹संविधानाची पुरेपूर अंमलबजावणी कशी करायची..?
> 🔹गाव प्रशासन कसे असावे..?
> यावर चित्रीत ही परिपूर्ण फिल्म या फ़िल्म फेस्टिवलचा कुतुहलाचा आणि वेगळेपण 
> जपणारा विषय ठरला. 
>  वर्षभर केलेल्या छायाचित्रणामध्ये सदर टीमने गडचिरोली जिल्ह्यातील 
> 'मेंढालेखा' गावातील आदिवासी संस्कृती, त्याठिकाणचे होळी-दिवाळी यांसारखे 
> सण-उत्सव, लग्नसराई, आदिवासी परंपरा-चालीरिती, बांबू कटाई, गाव व्यवस्थापन, 
> दैनंदिन लोकजीवन या सर्व बाबींवर  प्रकाश टाकणारी व एक चांगला विषय मांडणारी 
> एकमेव फ़िल्म म्हणून झालेला गौरव साऱ्या आदिवासी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट 
> आहे. फ़िल्म फेस्टिवलच्या संयोजकांनी अशा चांगल्या सामाजिक  विषयांचे व सामाजिक 
> बांधीलकी जपणाऱ्या विषयांचे नेहमीच स्वागत राहील असा विश्वास देवून 'श्री 
> विजयकुमार घोटे' यांना सन्मानचिन्ह व स्मुर्तीचषक देवून गौरविण्यात आले.
>
>           सदर 'आमचं गांव आम्हीच  सरकार' या  फिल्मच्या मेकिंगसाठी 
> ग्रामस्थ-मेंढालेखा यांच्या परवानगी व सहकार्याने तसेच श्री. एकनाथ भोये सर, 
> श्री. बाळासाहेब जाधव, श्री. प्रभाकर फसाळे, श्री.अतुल धांडे( यशोदा 
> प्रतिष्ठान,अकोले), मानस चैरीटेबल फाउंडेशन, कार्तिक स्वामी आदिवासी 
> बहुउद्देशीय मंडळ नाशिक या सर्वांच्या प्रयत्नाने अतिशय चांगली फ़िल्म झाली 
> असून लवकरच ही फ़िल्म महाराष्ट्राच्या पेसा अंतर्गत येणाऱ्या 4500 ते 5000 
> गावांमधुन दाखवली जाणार आहे विशेषतः महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम हाती घेणार 
> असल्याचा विश्वासही दर्शवला आहे. ही समस्त आदिवासी समाज्यासाठी अभिमानाची बाब 
> आहे.
>
>           त्यांच्या समस्त टीमला केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी व पुढील 
> यशस्वी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
>
>
> दिनेश भोईर🙏🏽🌿🌿
> 9860396300
> वाडा, पालघर.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/0911b3de-da92-4bc3-8878-883b870f922f%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to