thank u sir ...aaple margdarshan aamhala upyukt aahe ...kharya arthane rss
adivasicha chal karat aahe..
On Sunday, 29 May 2016 2:19 AM, 'Latari Madavi' via AYUSH | adivasi yuva
shakti <[email protected]> wrote:
आदिवासीना शासन का फसवीत आहे ? ‘’९ ऑगष्ट जागतिक मूलनिवासी
दिवस‘’ जगभरातमूलनिवासी दिवस साजरा करून आपले सांस्कृतिक मुळत्व
कायम ठेवण्याच्या प्रशासनावर दबावआणतात. कारण मूळनिवासी संकल्पना, ही
जगातल्यासर्व आदिवासीना जागतिक कायद्यानुसार नैतिकअधिकार [Fundamental Rights]
बहाल करते.दि.१६ सप्टे २००७ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या मूळनिवासीच्या
अधिकारजाहिरनाम्यावर भारत सरकारने स्वाक्षरी करून, आदिवासीबाबत वरवरची सहानुभूती
असल्याबाबत,जगाला दाखवली असली तरी, आदिवासीना मूळनिवासीचा दर्जा बहाल करण्यास भारत
प्रशसनाची भूमिकामात्र नकारात्मक आहे. भारतात, जागतिक मूळनिवासीदिवस शासकीय
स्तरावर साजरा केल्या जात नाही. मात्र, आश्चर्य आहे की, आदिवासीतील
पढेलिखे,बुद्धिवादी, लेखक, साहित्यकार, अधिकारी, समाज सेवक याना महाराष्ट्र शासन
मूर्ख बनवीतआहे. तीच चूक बार बार करतात आणि या वर्षीही,ही राजकीय नेते मंडळी घरी
बसले असले तरी त्यांचे पायिक मात्र, तीच चूक पुन्हा करणारआहे, व वर्षोनिवर्षे
करणार आहे. त्याची चर्चा होणे गरजेचे आहे. १] मूळनिवासीबाबत भारत
प्रशासनाची भूमिका नकारात्मक असतानाही, महाराष्ट्रात शासनस्तरावर हा सण साजराका
केल्या जातो ? महाराष्ट्र शासनात आद. मा. पिचड साहेब, आदिवासी
मन्त्रीअसताना, २०१२ पासून हा सण शासन स्तरावरून साजरा करीत असल्याचे चित्र उभे
करण्यात आले.त्यासाठी आदिवासी विकासाचा व आदिवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होऊ
घातलेला लाखोरुपयाचा फंड, या कार्यक्रमावर खर्च झालेला आहे. या विषयावर कोण्याही
तज्ञ मंडळीला संधीन देता, राजकीय फळीला मजबूत करण्यास, फंडाचा उपभोग करून घेतला
आहे. हासण महाराष्ट्रात ''जागतिक मूळनिवासी दिवस'' नाही तर, ''जागतिक
आदिवासी गौरव दिवस''म्हणून साजरा करतात. जगात असा कुठेच''आदिवासी गौरव दिवस
साजरा'' केल्या जात नाही, आदिवासीचा गौरव का केल्या जातो, हे मंत्रीमहोदय ही सांगू
शकत नाही. आदिवासी गौरव दिवस, ही तर आदिवासी समाजाची शुद्ध फसवणूक आहे.
अ] खरेच शासनास आदिवासीबाबत आदर वाटला असता तर, शासंनव्दारा मूळनिवासीच्या नावाने
संयुक्त राष्ट्र संघाकडून,भारत शासनास २००० कोटी [अंदाजे] मंजूर झालेत्यातून खर्च
केले असते. आदिवासी विद्यार्थीच्या तोंडातला घास छिनला नसता. यावर आम्हीमुंग गिळून
का बसलो आहो ? ब] महाराष्ट्रशासनव्दारा कमीत कमी, ९ ऑगष्टला सुट्टी
देऊनआपली सत्कृतता तरी दाखवली असती. सुट्टी जाहीर करण्याचे सोडा पण, शासन
स्तरावरून सुट्टीजाहीर करण्यासाठी मुख्य मन्त्री, प्रधान मन्त्री, राज्यपाल,
राष्ट्रपती यांचेकडे साधाप्रस्ताव सुद्धा पाठऊ शकले नाही.पण तसे झालेले नाही.
क] भारत सरकारनेमूळनिवासीच्या अधिकार जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करून
आंतरराष्ट्रीय पातळीवर आदिवासीहक्काचे आम्हीही संरक्षण करतो, असे फसवे चित्र उभे
करून भारतीय आदिवासीचा विस्वासघातकेला आहे. भारत सरकार जर मूळनिवासीच्या अधिकार
जाहीर नाम्यावर स्वाक्षरी करू शकते,तर आदिवासीना संविधानात ''मूळनिवासी'' म्हणून
जाहीर का करीत नाहीत ? ड] या बाबतकोणताही आदिवासी मन्त्री, खासदार,
आमदार संसदेत, विधिमंडळ, मंत्रालयात ब्रशब्दही काढीत तर नाहीच पण समाजात सुद्धा
साधी चर्चाही करीत नाही. याला काय म्हणावे? या उलट मात्र, बोगसआदिवासी इश्यूवर
मन्त्री, आमदार, खासदार मरमिटून उभे होतात. हा प्रश्न तर राजकीय लोकांनाचसोडविता
येतो, पण सोडविन्याची त्यांची इच्छा नाही, फक्त आदिवासीना मोर्च्यात उभे करून
आपल्या पाठीमागे किती लोक उभेआहे, ते ते शासनास दाखविण्याचे काम करतात. ही भयानक
भावनात्मक खेळी राजकीय मंडळी मागील३५ वर्षा पासून भोळ्या आदिवासीसोबत खेळीत आहे.
मूळनिवासी काय आहे ? मूळनिवासीइश्यू आदिवासीना संविधानात दिलेल्या
तरतुदी पेक्षा आधीक शक्तीशाली व प्रभावी आहे. १] भरताची घटना
ही''राज्यघटना'' आहे, तीला ''राष्ट्र घटना '' असे म्हटल्या जात नाही. मात्र
मूळनिवासीसंकल्पना ही ''एक स्वराष्ट्र'' आहे. मूळनिवासी संकल्पना वांशिक गणावर
आधारित आहे. आणिभारत देशातील जाती व्यवस्थेच्या बाहेरील आहे. त्याची गण पद्धती,
टोटेम, संस्क्रुती,परंपरा,चालीरिती, पारंपारिक कायदे, बौद्धिक संपदा, जंगल जमीन,
भूभाग व त्यावरील नैसर्गिकइ. चे अधिकार ''मूळनिवासी'' नावाने मिळतात. जगात ज्याना
मूळनिवासीचा दर्जा मिळाला आहे, त्याना वरील अधिकारमिळतात, मात्र भारतातल्या
आदिवासीना फक्त आरक्षण मिळते, त्यातही बोगसचा भरणाच भरणाअसतो. २] अ]
मूळनिवासीचादर्जा बहाल झाला तर, आदिवासीना स्वनिर्धानाचे अधिकार [Rights
ofself-determination] मिळतात. स्वनिर्धानाचे अधिकार हे संविधानातील ५ व ६ व्या
परिशीष्टातील तरतुदीपेक्षाही अधिक सक्षमअधिकार आहे. ब] संविधानातील५ व
६ व्या परिशीष्टातील स्वायत्त व स्वप्रशासन,उपयोजना, विकास योजना इ. जगात कोणत्याच
देशात नाही, ते भारताच्या आदिवासीना आहे. मात्र,मूळनिवासी दर्जा मिळाल्यास
आदिवासीना ‘’स्वनिर्धानाचे’’ अधिकार मिळणार आहे. स्वनिर्धानाचेअधिकार हे आदिवासीना
संपूर्ण स्वतंत्र बहाल करणारी प्रक्रिया आहे. त्याव्दारे सांस्कृतिकओळख, पारंपारिक
कायदे निर्माण करता येणार आहे. ३] मूळनिवासीसंकल्पने व्दारा,
कोलंबसच्या काळापासून आदिवासीच्या हड्पलेल्या जमिनी, भूभाग, जंगल,निसर्गसंपदा,
पारंपारिक कायदा, सांस्कृतिक ओळख, आदिवासीना बहाल होणार आहे. आदिवासीच्याजंगल, व
जमीनच्या निसर्ग संपदामध्ये, देशाच्या एकूण संपती पैकी ८० टक्के संपती
आदिवासीभागात आहे, ते वापस मिळण्यास मार्ग सुकर होणार आहे. ४] मूळनिवासी संकल्पना
ही एक वांशिक लोकसमुहाचे ''राष्ट्राचा'' दर्जाबहाल करणारी प्रक्रिया आहे.
ही बाब, १९२५पासून मोठ्या गांभिर्यानी, सूत्रबद्धपणे आदिवासीविरुद्ध निर्मित
केली जात आहे. भारत देशात, हिंदू एकजात, हिंदूधर्म, हिंदू परंपरा,
हिंदूकायदे,‘’हिंदूराष्ट्र’’ ही संकल्पना समोर येत आहे. ती साकार करण्यास, भारतात
आदिवासी एकचअसा घटक अडसर होतो आहे. त्यामुळे भारतात मूळनिवासी दिन साजरा न करता
''जागतिक आदिवासीगौरव दिन’’ साजरा करण्यास RSS व्दारा उभी केलेलीसामाजिक कुटनिती
आहे. RSS च्या मते, आदिवासीम्हणजे असविधानिक आहे. आदिवासी एवजी ‘’वनवासी’’ शब्द
त्याना सुकर वाटतो. आदिवासी आणिबोगस आदिवासी हा तर हिंदूच्या जातीचा
जमावळाअसल्याचे त्याना वाटते. आदिवासीचे वांशिक समूह, व सांस्कृतिक ओळख नष्ट
करण्यास, त्यानाआदिवासी म्हणूनच प्रोजेक्ट करणे, सोयीची वाटते.कारण त्यामुळे
आदिवासीना सहजपणेवनवासी बनविता येते. त्यामुळे, मूळनिवासीचा दर्जा नाकारणे, व बोगस
आदिवासीना, घुसविणेहे कार्य पद्धतशीरपणे RSS व्दारे घडवून आणल्या जात आहे.
मात्र, आदिवासीच्याचळवळी राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर, नाचून फक्त बोगस
आदिवासी इश्यूवर, आपसात भांडत आहे.कारण या आंदोलनामुळे कोणाच्याही केसाला धक्का
लागत नाही, मात्र उस्तव, जत्रा सारखेचित्र उभे करून, आदिवासीना मूर्ख बनवीत,
गुमराह करीत आहे. त्यामुळे, आदिवासी तरुण वर्ग,सामाजिक चळवळी पासून दूर दूर जावून
आदिवासीच्या मुलभूत प्रश्नावर पूर्णपणे अलिप्त होतआहे. आदिवासीत वैचारिक आंदोलन
उभे होऊदिल्या जात नाही. यावर राजकीय पुढारी फारच जागृतपणे आदिवासीना त्याच्या
मुलभूत प्रश्नावरव हक्कावर आदिवासीचे आंदोलन उभे होऊ देत नाही.इंग्रजांची नीती
वापरून, आपल्या मतासाठी, आदिवासीना जाती जातीत वाटून ठेवण्यात यशस्वीझाले आहे.
यावर आदिवासीने आजच जागृत झाले पाहिजे. त्यासाठी ‘’९ ऑगष्ट जागतीक मूळनिवासी
दिवस’’ हा अराजकीयव स्वखर्चाने साजरा करून, त्याची नोंद संयुक्त राष्ट्र संघात आणि
जागतिक लोक समुहासमोरझाली पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांना न बोलाविता व राजकीय
फंड न घेता सामजिक आंदोलनाव्दारेनाशिक येथे ‘’जागतिक मूळनिवासी दिवस‘’ आयोजित
करण्यात येत आहे. इछुकानी संपर्क कारवां.संपर्क मोबाईल न.९८५०५१७९७१, ८८६२०९२१२७
लटारी मडावी.--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1735562151.761831.1464463171116.JavaMail.yahoo%40mail.yahoo.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1938789459.7951.1467280351966.JavaMail.yahoo%40mail.yahoo.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.