|| *सामाजिक गुंतवणूक* : आयुश उपक्रम ||


१) *ISRN अंत्योदय बेस्ट प्र्यक्टिस मध्ये निवड* :
इंडियन सोसिअल रिस्पॉन्सिबीलीटी नेटवर्क तर्फे अंत्योदय बेस्ट प्रॅक्टिसेस
मध्ये आयुश ची निवड झाली आहे. त्या साठी संस्थेच्या वाटचालीची आणि उपक्रमांचा
व्हीडिओ डोक्यूमेंटरी रेकॉर्डिंग साठी दिल्ली हुन ६ जनांची टीम आली होती. २-३
सप्टेंबर रोजी त्यांनी विविध माहिती घेऊन मुलाखत आणि उपक्रम रेकॉर्ड केले.
त्यात आयुश ची सुरवात, पार्श्वभूमी, कार्य पद्धती, सध्याची उपक्रम, भविष्यातील
दिशा, इत्यादी विविध विषयावर सचिन दा सातवी, डॉ सुनिल दा पर्हाड यांच्याशी
चर्चा तसेच सवासीन, धवलेरी, कलाकार, संजय दा व समन्वयक यांचे रेकॉर्डींग
करण्यात आले. हि डॉक्युमेंट्री ISRN मार्फत प्रसारित करण्यात येईल. मिनिस्ट्री
ऑफ कल्चर तर्फे पुढील मार्गदर्शन या राष्ट्रीय पातळीवरील निवडक बेस्ट
प्रॅक्टिसेस साठी देण्यात येईल. १९९९ > २००७ > २०११ > २०१९ *आयुश च्या या
अविरत प्रवासात साथ/सहभाग/मार्गदर्शक असलेल्यांचे कौतुक आणि अभिनंदन!*

२) *L&T पब्लिक ट्रस्ट प्रतिनिधी भेट* :
३० ऑगस्ट रोजी लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चे वरिष्ठ अधिकारी
यांनी आयुश कला केंद्र खंबाळे येथील कार्यालयात भेट देऊन सध्याच्या वारली
चित्रकला उपक्रमांविषयी माहिती घेतली. भविष्यात या उपक्रमांसाठी सहकार्य
करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात येईल.

३) *टाटा रिऍलिटी CSR बैठक* :
३० ऑगस्ट रोजी वारली चित्रकला उपक्रमांविषयी अधिक माहिती आणि भविष्यातील
संभाव्य उपक्रम या विषयी चेतन दा गुराडा यांनी टाटा रिऍलिटी च्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांना मुंबई येथील कार्यालयात प्रेझेन्टेशन देऊन चर्चा केली. येत्या
काही दिवसात कला केंद्राला भेट देण्याचे ठरविले आहे

४) *जर्मनीत कलावस्तू प्रदर्शन* :
बांधघर येथील विकास दा महाला हे सध्या नोकरी निमित्त जर्मनी ला आहेत. सामाजिक
कार्याला हातभार म्हणून वारली चित्रकला कालावस्तूंचे प्रदर्शन तेथे व्हावे
यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्या संबंधित प्राथमिक चर्चेसाठी १ सप्टेंबर रोजी
राजू दा भगत, रीना ताई भगत, माधुरी ताई गावित हे खंबाळे कला केंद्रात
प्रत्येक्ष भेट देऊन आणि विकास दा यांनी टेलिफोनिक डिस्कशन मधून भाग घेतला.
लवकरच त्या विषयी सविस्तर नियोजन करण्यात येईल

..................................................................
_आदिवासीत्व जपून समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी समाज,
स्वयंसेवक, संस्था, शासकीय, खाजगी अशा विविध माध्यमांचे एकत्रीत स्वरूपात आयुश
ची प्रायोगिक प्लॅटफॉर्म बांधनी आकार घेतेय._

आयुश चे हे निरंतर प्रयत्न सुरु आहेतच, आपण पण *सहभागी होऊन त्याचे स्वरूप
मोठे करूया. Let's do it together!* जल जंगल जमीन जीव....जोहार !

_____________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
आयुश | आदिवासी युवा शक्ती | .adiyuva.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1qeWrV42yCeKkwi1_3k%3DuMizbzfCt2YTGUtDdWb-ehvA%40mail.gmail.com.

Reply via email to