kuni ya sandarbhat bolat ka nahiye?
 
 
---------------------------------------------------------------------------------------------
 
 
आदिवासी विभागाचा तालीबानी फतवा 
 - - 
बुधवार, 19 जून 2013 - 02:45 AM IST 
     
  
 
नाशिक - आदिवासी विभागाच्या बदनामीचे कारण पुढे करत आदिवासी विभागाने 
वसतीगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालीबांनी फतवा जारी केला 
आहे. विभागाने एक आदेश काढुन या विद्यार्थ्यासांठी संहीता तयार केली असुन 
विद्यार्थ्यांना यापुढे आपल्या समस्या प्रसार माध्यमांसमोर मांडता येणार 
नाहीत.यासोबतच कोणतीही संघटना अथवा मोर्चे काढण्यास विद्यार्थ्यांना प्रतिबंध 
करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांनी या नियमांचे उल्लघन केल्यास त्यांना घरचा 
रस्ता दाखविला जाणार आहे.त्यामुळे आदिवासी संघटनामंध्ये संतापाची भावना पसरली 
आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी विद्यार्थ्यांना सबुरीचा 
सल्ला दिला आहे.

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतीगृहांच्या सोयीसुविधांबद्दल 
विद्यार्थ्यांकडुन नेहमीच मोर्चे काढले जातात.तर प्रसार माध्यमांकडेही तक्रारी 
केल्या जातात.त्यामुळे विभागाची बदनामी होत असल्याचा दावा करत या विभागातील 
चाणाक्ष बाबुनी विद्यार्थ्यासांठी एक तालीबानी संहीता तयार केली आहे.वसतीगृह 
प्रवेशाच्या 11 नोव्हेबंर 2011 च्या एका आदेशात सुधारणा करत चालु वर्षासाठी 
नवीन बदल केलेत त्यात अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत.या नव्या आदेशानुसार 
वसतीगृहातील विद्यार्थ्यांना यापुढे सोयी सुविधांबद्दल आपल्या तक्रारी केवळ 
गृहपालाकडेच मांडता येणार आहेत.प्रसारमाध्यामकडे तक्रार केल्यास, मोर्चे 
काढल्यास,अन्नत्याग केल्यास अथवा संघटनामंध्ये भाग घेतल्यास विद्यार्थ्यांवर 
निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.त्यामुळे 
विद्यार्थ्यांमंध्ये संतापाची भावना असुन आम्ही आमच्या संमस्या कोणाकडे 
मांडाव्यात असा सवाल केला आहे.

‘आदिवासी विभागाने असे तालीबानी फतवे काढण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या 
प्रश्‍नाकडे लक्ष दिले द्यावे,लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार 
आहे.त्यामुळे हा निर्णय योग्य नाही.ठेकेदार आणि गृहपालाचे संबध असल्याने आमचे 
कोणीच ऐकत नाही.म्हणुनच आम्हाला आंदोलने करावे लागतात किव्‌ां 
प्रसारमांध्यमाकडे जावे लागते.‘‘‘‘
....जयसिंग पवार,आदिवासी विद्यार्थी,नाशिक

‘विभागाच्या अशा प्रकारच्या निर्णयाची तक्रार विद्यार्थ्यांनी आजच माझ्याकडे 
केली आहे.त्यामुळे यात लक्ष घालणार असुन असे प्रतिबंध घालणे चुकीचे 
आहे,प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे.अशा जाचक अटींनी तो हिरावुन 
घेतला जावु शकतो.त्यामुळे आपण त्यात दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करू.‘‘
....मधुकर पिचड,आदिवासी विकास मंत्री
 
 
ref : 
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5128165973532521561&SectionId=13&SectionName=उत्तरमहाराष्ट्र&NewsDate=20130619&Provider=-&NewsTitle=आदिवासी
 विभागाचा तालीबानी 
फतवा 
 
 

-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.


Reply via email to