Shared on Fb by : Madhav Sarkunde <https://www.facebook.com/madhav.sarkunde>

आदिवासीची लायकी काढली......

सकाळी ९ च्या दरम्यान एम. बी. डाखोरे साहेब ह्यांचा वाशीमवरून फोन आला. आणि 
त्यांनी 
आपली खंत माझ्याजवळ व्यक्त केली. म्हणे केद्रीय समिती महाराष्ट्रात येऊ घातली 
आहे.ही 
समिती आदिवासींच्या प्रश्नासाठी खास करून येथे आहे. या समितीचे महाराष्ट्रातील 
सदस्य 
म्हणून आदिवासींच्या वतीने काम पाहणार आहेत डॉ बंग कि जे आदिवासी नाहीत. ते 
उच्च 
वर्णीय आहेत "सर्च" नावाची त्यांची संस्था आहे. गडचिरोली कडील भागात ते 
आदिवासींसाठी
काम करतात अशी बोलवा आहे. या समितीमध्ये काम करण्यासठी महाराष्ट्रातील एकही 
आदिवासी लायकीचा नाही ,असे केंद्र सरकारला आणि आमच्या राज्य सरकारला सुद्धा 
वाटले. 
म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रातून आदिवासीऐवजी गैरआदिवासीची निवड केली. ही 
आमच्यासाठी 
अत्यंत शरमेची गोष्ट आहे. या समितीचे इतर सदस्य बघा. १) प्रा वर्जिनस झासा २) 
डॉ जोसेफ
बारा ३) डॉ के के मीश्रा ४)मिस सुणीला बसंत ५) डॉ उषा रामनाथन. यापैकी कोण कोण 
आदिवासी 
आहेत? या प्रश्नाचा शोध तुम्ही घ्या .मित्र हो ! स्वतंत्र भारतातील ही 
आदिवासींची थट्टा आहे.
संपूर्ण भारतभर फिरून ही मंडळी सरकारला आदिवासीचा विकास कसा करा या संदर्भात 
काही 
सूचना करणार आहे म्हणे. आदिवासीचा विकास कसा करावा ? त्यांच्या काय अडचणी आहेत
हे या समितीमधील किती सदस्यांना ठाऊक आहे ? हा संशोधनाचा प्रश्न आहे. संस्था 
स्थापन 
करून आदिवासींच्या उत्थानाचे सोंग करून करोडोची निधी आपल्य घश्यात उतरविणारे 
ढोंगी आदिवासी सेवक आमचा विकास करणार आहेत का? 


*आज देशात ११ कोटीच्यावर आदिवासी आहेत. देशाचा विषय थोडा बाजूला ठेऊ. 
महाराष्ट्रीय म्हणून आपण आपल्या राज्याचा विचार करू. आपल्या राज्यात आज १ कोटी 
२३ लाख आदिवासी आहेत. यापैकी एक सुद्धा आदिवासी या समितीवर काम करण्याच्या 
लायकीचा नाही ? *महाराष्ट्रातील २५ 
आदिवासी आमदार शितनिद्रेत होती काय.? कि यांना न विचारातच बंग साहेबांच नाव
तिकड गेलय? .मित्र हो बघा आपली अशी अवस्था आहे.


-- 
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property 
Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/257b539e-ce8a-4f31-b516-90c02a45f441%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

Reply via email to