<https://lh5.googleusercontent.com/-YaY6iFzM27U/U4zF-s62RdI/AAAAAAAAHdE/OZundtdV8Ig/s1600/nandore.jpg>


On Sunday, June 1, 2014 1:06:50 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
> अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित 
> आहेत....अच्छे दिन आनेवाले है म्हणणारे असोत वा हर हाथ शक्तिचा उहापोह करणारे 
> असोत कोणीही या कर्मचा-यांच्या मानसिकतेचा विचार करताना दिसत नाही. 
> आश्रमशालार्थ योजनेनुसार online पेमेंट करण्याच्या नावाखाली काही तांत्रिक 
> अड़चनी सांगुन सर्वांचे पेमेंट थाम्बवुन ठेवले आहेत. जून महिन्यात शाळा सुरु 
> होतील, आपण याच कर्मचा-यांकडून प्रामाणिक कामाची अपेक्षा करत असतो. अनेकदा 
> तक्रारीसुध्दा करतो. आज याच कर्मचा-यांना वेठबिगारांपेक्षा वाईट वागणूक दिली 
> जात आहे. यात आदिवासी विकास विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहायला 
> मिळत आहे. कारण राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा कर्मचा-यांचे नियमित पगार होत 
> असताना अनुदानित आश्रमशाळा कर्मचा-यांना अशी सावत्रपणाची का वागणूक दिली जात 
> आहे असा प्रश्नही सामान्य व्यक्तीला पडतो. 
>
> कर्मचा-यांना असा त्रास दिला तर उद्या याचा विपरीत परिणाम आदिवासी मुलांच्या 
> गुनवत्तेवर होईल. कदाचित आदिवासी भविष्य जाणीवपूर्वक अंधारात धकलण्याचे तर हे 
> षढयंत्र तर नाही ना असाही प्रश्न मनाला भेडसावतो. राज्यात आदिवासी विकास 
> विभागाचा निधि शिल्लक असताना कर्मचा-यांना त्याचे वाटप करण्यात इतकी अनास्था 
> दर्शविणा-या विभागाला आपले डोके ठिकाणावर ठेवून काम करावे लागेल. अन्यथा या 
> पापाचे प्रायश्चित्त करण्यास आपणास संधी मिळनार नाही.
>
>
>
> On Sunday, June 1, 2014 1:01:09 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
> <https://lh5.googleusercontent.com/-46N1Vrf--Co/U4rWrlA8RKI/AAAAAAAAHcs/HQvSo8v26aE/s1600/anudanit.jpg>
>
>
> On Wednesday, May 21, 2014 9:20:38 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>
> आदिवासी मुलींना शासकीय वसतिगृहात अपमानास्पद वागणूक
>
> 'सांगवी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गृहपालांकडून 
> विद्यार्थिनींना अपमानास्पद
> वागणूक मिळत आहे. त्यांना शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रकार होत असून, 
> त्यांचा छळ केला जात आहे,'
> अशी तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
> जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी,
> अशी मागणीही त्यांनी केली आहे.
> शकुंतला चव्हाण या वसतिगृहात गृहपाल या पदावर आहेत. वसतिगृहातील
> विद्यार्थिनींनी त्यांच्या विरोधात एकात्मिक आदिवासी विकास विभागालाही निवेदन 
> सादर केले आहे.
> विद्यार्थिनींना शासनाकडून स्टेशनरी, प्रोजेक्ट फाइल्स, इतर शैक्षणिक साहित्य
> यासाठी मिळणारा शैक्षणिक जमाखर्च पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला जात नाही; 
> तसेच
> त्यांचा मासिक भत्तादेखील जमा केला जात नाही. त्यांच्याकडून विद्यार्थिनींची 
> शैक्षणिक प्रमाणपत्रे
> गहाळ झालेली आहेत. याबाबत विद्यार्थिनींनी गृहपालांकडे विचारणा केल्यानंतर 
> त्यांचे बोलणे,
> समस्या व्यवस्थित ऐकून न घेता उलट त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. तसेच 
> कॉलेजमध्ये तुझी तक्रार करीन,
> वसतिगृहाचा प्रवेश रद्द करीन, अशा धमक्या त्या देत असल्याचा आरोप 
> विद्यार्थिनींनी केला आहे.
> वसतिगृहातील विद्यार्थिनी अतिशय दुर्गम व ग्रामीण भागातून शिक्षणासाठी 
> आलेल्या आहेत. येथे
> त्यांना चांगले शिक्षण व सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यावरच गदा येत 
> आहे. प्रचंड त्रास सहन करून करून
> त्यांना राहावे लागत असल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे असल्याचे परिषदेचे 
> मंत्री विवेकानंद उजळंबकर
> यानी निवेदनात म्हटले आहे.
> 'माझे वागणे नियमानुसारच'
> दरम्यान, 'विद्यार्थिनी सांगतात तशी परिस्थिती येथे नाही. त्यांना चांगलीच 
> वागणूक दिली जाते.
> नियमानुसार महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर मुलींनी वसतिगृह सोडणे 
> अपेक्षित आहे; परंतु
> स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थिनी परीक्षा संपल्यानंतरही 
> वसतिगृहातच राहात
> आहेत. त्यांना नियमानुसार खोली सोडण्यास सांगितले आहे,' असे वसतीगृहाच्या 
> गृहपाल शकुंतला चव्हाण
> यांनी स्पष्ट केले. 'गेल्या वर्षी घोडेगाव येथील आदिवासी विकास विभागातील 
> तत्कालीन सहायक प्रकल्प
> अधिकाऱ्यांना माझ्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 
> पकडले होते. तेव्हापासून ते
> मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. या विद्यार्थिनींना हाताशी धरून 
> त्यांनीच ही तक्रार
> द्यायला लावली आहे,' असेही त्यांनी नमूद केले.
>
> On Friday, April 11, 2014 11:27:12 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
>
>
>
>
>
>
> shared by :Pradeep Ambavane 
> <https://www.facebook.com/pradeep.ambavane?fref=photo> 
>
> On Thursday, April 10, 2014 9:37:15 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>
> कोवळी पानगळ....
>
> नुकतेच मागच्या महिन्यात एका शासकीय आश्रमशाळेतील आकरावीच्या वर्गात शिकणा-या 
> दोन मुलींनी आत्महत्या केली. सकाळ वर्तमानपत्रात बातमी वाचली आणि मन अगदी 
> सुन्न झाले....उद्याचा आदिवासी भविष्यकाळ असा मोकळ्या रानी रांडका होत असताना 
> पाहून लाज वाटत होती.....पण या आश्रमशाळा नावाच्या व्यवस्थ्येत याचे कुठेच 
> उत्तर मला दिसत नव्हते.....फक्त ७५,००० रुपयांचा चेक हे जर त्यावरचा रामबाण 
> उपाय असेल...तर मग आदिवासी विकास यातून नेमके काय साधणार याचा काळाकुट्ट अंधार 
> मनात भीतीची लाट निर्माण करत होता.
>
> बातमी वाचत असताना माझे मन काही ओळींवर पुन्हा पुन्हा जात होते....आणि 
> मनातल्या मनात स्वताला खात होते......त्यातील एक ओळ होती, पालकांनी कोणत्याही 
> प्रकारची जबाबदारी स्वीकारत पोस्टमोर्टेम करण्याची तसदी घेतली नाही. अहो ज्या 
> जीवांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले अशा या दोन मुली अशा ऐन तारुण्यात 
> आत्महत्या करतात आणि पालक शांत राहतात याचा नेमका काय अर्थ घ्यायचा.....विशेष 
> म्हणजे त्या दोन्ही मुली अनेक दिवस शाळेत गेलेल्या नव्हत्या.....विनापरवानगी 
> गैरहजेरी....आणि त्यात मुली...किती संवेदनशीलता असायला पाहिजे शाळेकडे आणि 
> पालकांकडे सुद्धा.....परंतु दोन्हींकडून असे काही घडलेले दिसत नाही. पालक जो 
> आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपली अर्धी भाकर नेहमीच राखून ठेवतो. आज तो असा 
> निष्काळजी पाहिल्यानंतर मन उद्विग्न झाल्याशिवाय राहत नाही.
>
> अनेक दिवस मुली गैरहजर म्हटल्यानंतर साहजिकच वर्गशिक्षकांनी ऐन परीक्षेत 
> हजेरी लावल्यानंतर पालकांना सोबत का आणले नाही अशी विचारणा केली.......पालक 
> शाळेत आलेच पाहिजे असा आग्रह होणे अपेक्षित होतेच...परंतु दुस-या दिवशीही मुली 
> शिक्षकांची अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत....शेवटी जबाबदारी आणि तीही 
> मुलींची म्हटल्यानंतर पुन्हा दुस-या दिवशी तीच सुचना....पालकांना सोबत आणलेच 
> पाहिजे.....तींस-या दिवशीही मुलींसोबत पालक आले नाहीत.....मग यात पालकांचा 
> निष्काळजीपणा म्हणावा कि मुलींचा निष्काळजीपणा ?
>
> शिक्षक आपला आग्रह मुलींकडे व्यक्त करत होते.....कारण आजचा काळ आश्रमशाळा 
> शिक्षकांच्या दृष्टीने तसा अगदीच परीक्षेचा आहे. मुलींच्या बाबतीत सांगायलाच 
> नको. पेपर संपल्यानंतर मुली ज्या आपल्या गावी गेल्या...त्या काही घरी 
> पोहचल्याच नाहीत......चौकशीअंती त्यांचे मृतदेह पालकांना आढळून आले. आत्महत्या 
> केली असे पालकांनीच घोषित केले. कोणत्याही प्रकारचा पंचनामा...पोस्टमोर्टेम न 
> करता अंत्यविधी करण्यात आला......इथे फक्त दोन मुलींचा मृत्यू झाला असे आपण जर 
> या प्रकरणाकडे पाहिले तर तो अगदीच भावी पिढीसाठी एक धोका ठरेल. निसर्गाने 
> प्रत्य
>
> ...

-- 
-----------------------------------------------------------------------
Warli Painting is Cultural Intellectual, Registered under IPR
Lets Save our traditional knowledge, Nature & resources, Cultural values, Lets 
do it together! (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f5ea0f7a-191e-4c1d-9d40-2bc6dc1bbea6%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to