Vidrohi Adivasi <https://www.facebook.com/vidrohi.adivasi?fref=nf>
8 hrs <https://www.facebook.com/vidrohi.adivasi/posts/1436626663282824> ·  
<https://www.facebook.com/#>

राज्यातील अनेक अनुदानित आश्रमशाळान्मध्ये आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत 
आहेत. पण बघा किती दुर्दैव की या शाळान्मध्ये आमच्या विद्यार्थ्यांना जेवण 
वाढणे, वसतिगृह खोल्या सफाई, संडास बाथरूम स्वच्छता, प्रसंगी चपात्या बनविणे 
आदि कामे करावी लागतात.

अगदी दुर्गम भागात अशी कामे कदाचित आपल्या डोळ्याआड जावू शकतात. परंतू 
विद्येचे माहेरघर असणा-या पुणे जिल्ह्यात अशी कामे करावी लागणे हे किती 
दुर्दैवी आहे.

विशेष म्हणजे घोड़ेगाव प्रकल्प कार्यालयाचे नवनिर्वाचित अधिकारी डॉ. पिचड साहेब 
हे आदिवासी आहेत.

आदिवासी मुलांच्या सदाफूलीसारख्या कळ्या ते तरी फुलवू शकतील काय?

तरुण अधिकारी लाभणे आदिवासी मुलांचे सौभाग्य....त्यात तो आदिवासी 
विचारांचा.....आता बघू अनुदानित आश्रमशाळेत आमच्या मुलांना वर्षाला दोन शालेय 
ड्रेस, महिन्याला नियमित तेल साबण मिळते का ?

दोन महिन्यात एकदाच साहित्य आणि अनुदान मात्र प्रत्येक महिन्याचे हां अन्याय 
आदिवासी मुलांनी किती दिवस झेलायचा?

जेवणातिल सोंडे बाजुला करून आमच्या मुलांनी का खावे?

100 पेजेस वह्या त्याही फक्त 32 पानी, दोघात एक पुस्तक असे आमच्या मुलांनी का 
शिकावे?

अनुदान 100 टक्के पदरात पडत असताना संस्थांचा हां अन्याय आदिवासी मुलांच्या 
नशिबात अजुन किती काळ असणार?

¶आदिवासी शिक्षण.....मूलनिवासी रक्षण !!!

गर्व आदिवासी....मी मूलनिवासी

झाड़ाझडती करा आश्रमशालांची....!!!

आदिवासी शिक्षणाचे रोपटे जरी यांच्या कुशीत वाढत असले तरी अनेक विकृतिंची बीजे 
आज यांच्या उदारातुन आमच्या मुलांच्या रक्तात पेरलि जात आहेत.

या वृत्ति ठेचा लवकर.....

©विद्रोही
जन्म आदिवासी...धर्म आदिवासी...कर्म आदिवासी ।।



On Thursday, June 5, 2014 12:09:16 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
> जव्हारच नाही तर घोड़ेगाव प्रकल्पात सुध्दा अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी, 
> शिक्षक यांचे पगार रखडले आहेत.
>
> जर शिक्षक हे समाधानी नसतील तर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शैक्षणिक 
> कार्यावर झाल्याशिवाय राहणार नाही.
>
> निधि तर सरकारी आहे मग चार चार महीने का पगार रखडले जातात....? त्यात ज्यांनी 
> कर्ज घेतलेले असते त्यांच्यावर व्याजाचा बोजा वाढत जावून त्याच्या मनस्तापात 
> भर पड़ते.
>
> पण याची चर्चा करून काय उपयोग....आश्रमशाळा कर्मचारी हे पिळवनुक भोगत आलेत 
> आणि भोगतच राहणार असेच चित्र आहे.
>
> यात वाटोळे आदिवासी मुलांचेच होत आहे.
>
>
>
>
> On Tuesday, June 3, 2014 12:14:22 AM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
> <https://lh5.googleusercontent.com/-YaY6iFzM27U/U4zF-s62RdI/AAAAAAAAHdE/OZundtdV8Ig/s1600/nandore.jpg>
>
>
> On Sunday, June 1, 2014 1:06:50 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
> अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित 
> आहेत....अच्छे दिन आनेवाले है म्हणणारे असोत वा हर हाथ शक्तिचा उहापोह करणारे 
> असोत कोणीही या कर्मचा-यांच्या मानसिकतेचा विचार करताना दिसत नाही. 
> आश्रमशालार्थ योजनेनुसार online पेमेंट करण्याच्या नावाखाली काही तांत्रिक 
> अड़चनी सांगुन सर्वांचे पेमेंट थाम्बवुन ठेवले आहेत. जून महिन्यात शाळा सुरु 
> होतील, आपण याच कर्मचा-यांकडून प्रामाणिक कामाची अपेक्षा करत असतो. अनेकदा 
> तक्रारीसुध्दा करतो. आज याच कर्मचा-यांना वेठबिगारांपेक्षा वाईट वागणूक दिली 
> जात आहे. यात आदिवासी विकास विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे पाहायला 
> मिळत आहे. कारण राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा कर्मचा-यांचे नियमित पगार होत 
> असताना अनुदानित आश्रमशाळा कर्मचा-यांना अशी सावत्रपणाची का वागणूक दिली जात 
> आहे असा प्रश्नही सामान्य व्यक्तीला पडतो. 
>
> कर्मचा-यांना असा त्रास दिला तर उद्या याचा विपरीत परिणाम आदिवासी मुलांच्या 
> गुनवत्तेवर होईल. कदाचित आदिवासी भविष्य जाणीवपूर्वक अंधारात धकलण्याचे तर हे 
> षढयंत्र तर नाही ना असाही प्रश्न मनाला भेडसावतो. राज्यात आदिवासी विकास 
> विभागाचा निधि शिल्लक असताना कर्मचा-यांना त्याचे वाटप करण्यात इतकी अनास्था 
> दर्शविणा-या विभागाला आपले डोके ठिकाणावर ठेवून काम करावे लागेल. अन्यथा या 
> पापाचे प्रायश्चित्त करण्यास आपणास संधी मिळनार नाही.
>
>
>
> On Sunday, June 1, 2014 1:01:09 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
> <https://lh5.googleusercontent.com/-46N1Vrf--Co/U4rWrlA8RKI/AAAAAAAAHcs/HQvSo8v26aE/s1600/anudanit.jpg>
>
>
> On Wednesday, May 21, 2014 9:20:38 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>
> आदिवासी मुलींना शासकीय वसतिगृहात अपमानास्पद वागणूक
>
> 'सांगवी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गृहपालांकडून 
> विद्यार्थिनींना अपमानास्पद
> वागणूक मिळत आहे. त्यांना शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रकार होत असून, 
> त्यांचा छळ केला जात आहे,'
> अशी तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
> जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी,
> अशी मागणीही त्यांनी केली आहे.
> शकुंतला चव्हाण या वसतिगृहात गृहपाल या पदावर आहेत. वसतिगृहातील
> विद्यार्थिनींनी त्यांच्या विरोधात एकात्मिक आदिवासी विकास विभागालाही निवेदन 
> सादर केले आहे.
> विद्यार्थिनींना शासनाकडून स्टेशनरी, प्रोजेक्ट फाइल्स, इतर शैक्षणिक साहित्य
> यासाठी मिळणारा शैक्षणिक जमाखर्च पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला जात नाही; 
> तसेच
> त्यांचा मासिक भत्तादेखील जमा केला जात नाही. त्यांच्याकडून विद्यार्थिनींची 
> शैक्षणिक प्रमाणपत्रे
> गहाळ झालेली आहेत. याबाबत विद्यार्थिनींनी गृहपालांकडे विचारणा केल्यानंतर 
> त्यांचे बोलणे,
> समस्या व्यवस्थित ऐकून न घेता उलट त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. तसेच 
> कॉलेजमध्ये तुझी तक्रार करीन,
> वसतिगृहाचा प्रवेश रद्द करीन, अशा धमक्या त्या देत असल्याचा आरोप 
> विद्यार्थिनींनी केला आहे.
> वसतिगृहातील विद्यार्थिनी अतिशय दुर्गम व ग्रामीण भागातून शिक्षणासाठी 
> आलेल्या आहेत. येथे
> त्यांना चांगले शिक्षण व सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असून, त्यावरच गदा येत 
> आहे. प्रचंड त्रास सहन करून करून
> त्यांना राहावे लागत असल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे असल्याचे परिषदेचे 
> मंत्री विवेकानंद उजळंबकर
> यानी निवेदनात म्हटले आहे.
> 'माझे वागणे नियमानुसारच'
> दरम्यान, 'विद्यार्थिनी सांगतात तशी परिस्थिती येथे नाही. त्यांना चांगलीच 
> वागणूक दिली जाते.
> नियमानुसार महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर मुलींनी वसतिगृह सोडणे 
> अपेक्षित आहे; परंतु
> स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थिनी परीक्षा संपल्यानंतरही 
> वसतिगृहातच राहात
> आहेत. त्यांना नियमानुसार खोली सोडण्यास सांगितले आहे,' असे वसतीगृहाच्या 
> गृहपाल शकुंतला चव्हाण
> यांनी स्पष्ट केले. 'गेल्या वर्षी घोडेगाव येथील आदिवासी विकास विभागातील तत्
>
> ...

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/37b98802-a25e-4ca4-869d-273940457a44%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to