जेव्हा देशाला गरज होती

आदिवासी सर्वात पुढे होता

आज आदिवासींना देशाची गरज होती

प्रत्येक जण धनगरांत बसला होता



On Sunday, July 27, 2014 11:02:15 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
>
>
> महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर 
> मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाच्या जातीचा दाखला (जारी करणे व 
> पडताळणी नियमन) कायदा २०००, कलम ११-१(अ)नुसार, जो कोणी खोटी माहिती देऊन किंवा 
> खोटे विधान किंवा दस्तऐवज किंवा कोणत्याही इतर फसवणुकीच्या मार्गाने (other 
> fraudulent means) खोटे प्रमाणपत्र प्राप्त करील, तो कमीत कमी सहा महिने ते 
> दोन वर्षे कठोर कारावास अथवा दोन हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंत दंड 
> अथवा दोन्ही शिक्षांस पात्र राहील. 
> (According to the THE MAHARASHTRA SCHEDULED CASTES, SCHEDULED TRIBES, 
> DE-NOTIFIED TRIBES (VIMUKKTA JATIS), NOMADIC TRIBES, OTHER BACKWORD CLASSES 
> AND SPECIAL BACKWARD CATEGORY (REGULATION OF ISSUANCE AND VERIFICATION OF)) 
> CASTE CERTIFICATE ACT 2000, Section 11-1(a), Whoever obtains a false 
> certificate by furnishing false information or filling false statement or 
> documents or by any other fraudulent means, shall on conviction be punished 
> with rigourous imprisonment for a term which shall not be less than six 
> months but which may extend upto two years or with fine which shall not be 
> less than two thousand rupees, but which may extend upto twenty thousand 
> rupees or both.)
>
> वरील कायद्यानुसार फसवणुकीच्या मार्गाने (by other fraudulent means) धनगर 
> बांधव अनुसूचित जमातीचे आरक्षणाचा फायदा मिळवू पाहत आहेत. तेव्हा या 
> कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली त्यांचेवर कदाचित केस करता येऊ शकते. 
> मात्र याच कायद्याच्या कलम ११(२) नुसार थेट कोर्टात केस दाखल करता येत नाही. 
> अशी केस फक्त एखादी चौकशी समिती अथवा सदर समितीने नियुक्त केलेला एखादा 
> अधिकारी हाच करू शकतो. तेव्हा या कायद्याच्या उल्लंघनाबद्दल अशा प्रकारे केस 
> करता येईल काय याचा कायदेतज्ञांशी मसलत करून विचार करता येईल. तसेच अशाच 
> स्वरूपाच्या इतर कायद्यांतील कलमांनुसार काही गुन्हे दाखल करता येतील का 
> हेदेखील कायदेतज्ञांशी विमर्श करून ठरवता येईल. 
> आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. तेव्हा केवळ धनगर बांधवांची मागणी 
> ही चुकीची कशी आहे हे दाखवून देण्याचा बचावात्मक पवित्रा न घेता कायद्याच्या 
> चौकटीतून अशा प्रकारे आक्रमकतेने हा लढा लढला पाहिजे. - 
> Rahul C Bhangare
>
> On Saturday, July 26, 2014 9:36:51 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>>
>> See all pics/VDO at link. also sin online petition at www.adiyuva.in 
>>
>>
>> <https://lh4.googleusercontent.com/-aqqqO42DQkg/U9PR9dKH3SI/AAAAAAAA47w/tv-qt7vl5Q4/s1600/home+pae.png>
>>
>>
>> VDO : http://www.adiyuva.in/2014/07/blog-post_21.html 
>> Pics : 
>> https://www.facebook.com/media/set/?set=a.571462489546159.150501.100000472403313&type=1
>>  
>>
>>
>>
>>
>> On Saturday, July 26, 2014 9:29:05 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
>> wrote:
>>>
>>> आज आनंदी आनंद झाला, माझा आदिवासी एक झाला
>>>
>>> आज जरी आम्ही शांत, उद्याचे आम्हीच विक्रांत
>>>
>>> *धनगर आदिवासी असल्याचा जावई शोध लावणारांचा धिक्कार असो*
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>> On Saturday, July 26, 2014 9:16:03 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>> Shakti wrote:
>>>>
>>>> अनुसूचित जमाती आणि धनगर यांतील फरक
>>>>
>>>> १) व्यवसाय:
>>>>
>>>> अनुसूचित जमातींचा कोणताही वंशपरंपरागत अर्थार्जनाचा व्यवसाय नसतो. अगदी 
>>>> अलीकडच्या काळात ते स्थायी शेती करू लागले आहेत. मात्र धनगर हे वंशपरंपरेने 
>>>> पशुपालक आहेत. धनगरांकडे मेंढ्या, शेळ्या, म्हशी, घोडे असे मोठ्या भांडवली 
>>>> किंमतीचे पशु असतात. ते पशुआधारित दुधाचा व्यवसाय, लोकरीचा व्यवसाय, पशुमांस 
>>>> विकण्याचा व्यवसाय, सुत कातण्याचा व्यवसाय, शेळी मेंढी पालन हे व्यवसाय करून 
>>>> अर्थार्जन करतात. अनुसूचित जमातीचे लोक जे पशु पाळतात ते व्यवसाय म्हणून 
>>>> नव्हे 
>>>> तर वैयक्तिक उपयोगासाठी पाळतात. जसे शेतीसाठी बैल किंवा राखणीसाठी कुत्रा 
>>>> वगैरे. त्यामुळे आर्थिक मिळकतीसाठी पशु पाळणारे धनगर अनुसूचित जमाती या 
>>>> वर्गीकरणात बसत नाहीत.
>>>>
>>>> २) भौगोलिक प्रदेश:
>>>>
>>>> अनुसूचित जमातीचे निकष ठरविण्यासाठी संविधानाच्या ३४२व्या कलमात असे 
>>>> स्पष्ट लिहिले आहे की त्यांचा वास्तव्याचा प्रदेश हा पृथक असायला हवा 
>>>> (Geographical isolation). याचा अर्थ असा की अनुसूचित जमातीच्या लोकांचा 
>>>> वास्तव्याचा प्रदेश हा एका छोट्या भौगोलिक क्षेत्रातच सीमित असून, तो इतर 
>>>> नागरी वस्तीपासून पूर्णत: अलिप्त असतो. अनुसूचित जमातींच्या गावांत शक्यतो 
>>>> केवळ एकाच जमातीच्या माणसांची वस्ती असते.
>>>>
>>>> याउलट धनगर हे नेहमी स्थलांतर करीत असल्याने त्यांचा कोणताही भौगोलिक 
>>>> प्रदेश निश्चित नाही. धनगरांची वसतिस्थाने ही वेगळी असली तरी ती पृथक/अलिप्त 
>>>> नसतात (non-isolated). त्यांची वस्ती ही नेहमी इतर नागरी वस्त्यांच्याच 
>>>> सान्निध्यात असते. मराठा आणि इतर उच्चवर्णीय जातींतच धनगर समाजाची वस्ती आहे, 
>>>> त्यामुळे त्या वस्त्या पृथक म्हणजेच isolated ठरत नाहीत. आणि भौगोलिक 
>>>> प्रदेशाचा पृथक (isolated) असणे हा सर्वात महत्वाचा निकष ते पूर्ण करू शकत 
>>>> नसल्यामुळे ते अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.
>>>>
>>>> महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जमातींचे भौगोलिक क्षेत्र हे काही 
>>>> जिल्ह्यांपुरातेच मर्यादित आहे, बहुतांश जमाती या वैयक्तिकरित्या 
>>>> प्रामुख्याने 
>>>> प्रत्येकी एक किंवा दोन जिल्ह्यांतीलच ठराविक दुर्गम अलिप्त, आणि पृथक 
>>>> भौगोलिक 
>>>> क्षेत्रांत वसलेल्या आहेत, त्याउलट धनगर समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर 
>>>> विखुरलेला आहे, त्यामुळे त्यांचा भौगोलिक प्रदेश हा पृथक (isolated) म्हणताच 
>>>> येऊ शकत नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्र हा काही पृथक (isolated) प्रदेश ठरू 
>>>> शकत नाही.
>>>>
>>>> ३) आर्थिक स्थिती
>>>>
>>>> आर्थिक स्थितीचे अचूक आकडे मिळत नाहीत, मात्र काही सरकारी अथवा संशोधन 
>>>> संस्थांची प्रकाशित झालेली आकडेवारी ग्राह्य धरता येऊ शकते.
>>>>
>>>> धनगरांच्या आर्थिक सुबत्तेविषयी माहिती देण्यासाठी एक संदर्भ देतो.
>>>>
>>>> Indian Veterinary Research Institute, Izatnagar आणि Central Avian 
>>>> Research Institute, Izatnagar यांनी केलेला एका सामाजिक आर्थिक अभ्यासमालेचे 
>>>> निष्कर्ष सादर करतो. सदर निष्कर्ष हे Journal of Recent Advances in 
>>>> agriculture या अभ्यासपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. (पूर्ण संदर्भ पुढील 
>>>> प्रमाणे : Socio Economic Profile of Sheep Reared Dhangar Pastoralists of 
>>>> Maharashtra, India, by Patil D. S., Meena H. R., Tripathi H., Kumar S. and 
>>>> Singh D.P., in J. Rec. Adv. Agri. 2012, vol. 1(3): pages 84-91)
>>>>
>>>> वरील अभ्यास निरीक्षणानुसार सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत 
>>>> प्रत्येक धनगर कुटुंबाकडे सरासरी ६९.४८ इतक्या मेंढ्या, आणि २० इतक्या शेळ्या 
>>>> एवढी संपत्ती स्वत:च्या मालकीची होती, आणि ही एक दोन नव्हे तर परीक्षण 
>>>> केलेल्या प्रत्येक कुटुंबाची सरासरी आहे हे विशेष. याव्यतिरिक्त घोडे आणि 
>>>> म्हशी यांचीही उपलब्धता प्रत्येक कुटुंबाकडे उल्लेखनीय संख्येत आहे. याच 
>>>> अभ्यासमालेत असे निदर्शनास आले आहे की एकूण ७३% धनगर कुटुंबांचे वार्षिक 
>>>> उत्पन्न हे ६०००० रुपयांहून अधिक होते. (म्हणजे दरमहा ५००० रुपयांहून अधिक) 
>>>> तर 
>>>> भूमिहीन लोकांची संख्या केवळ १४% होती.
>>>>
>>>> याउलट STATISTICAL PROFILE OF SCHEDULED TRIBES IN INDIA 2010 या जनजातिय 
>>>> कार्य मंत्रालय भारत सरकार, (MINISTRY OF TRIBAL AFFAIRS) यांच्या 
>>>> अहवालानुसार 
>>>> महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ५६.६% आदिवासी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत 
>>>> आहेत. तर २००६-१० च्या दरम्यान करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ४० % हून 
>>>> अधिक आदिवासी लोकसंख्या भूमिहीन होती. या आर्थिक स्थितीच्या आकड्यांवरून हे 
>>>> स्पष्ट होते की सामाजिक दृष्ट्याच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या देखील धनगर हे 
>>>> अनुसूचित जमातींपेक्षा वेगळे आणि अधिक पुढारलेले आहेत,
>>>>
>>>> ४) ऐतिहासिक राजकीय आणि सामाजिक स्थिती
>>>>
>>>> धनगरांचा इतिहास पाहिल्यास पुढील बाबी समोर येतात, विजयनगर साम्राज्याची 
>>>> स्थापना धनगरांनी केली होती. धनगरांनीच होयसाळ, होळकर, राष्ट्रकुट, मौर्य आणि 
>>>> पल्लव या इतिहासातील मोठ्या राजसत्ता स्थापन केल्या आहेत. प्रसिद्ध कवी 
>>>> कालिदास आणि कनकदास हेदेखील धनगर होते. थोडक्यात असे लक्षात येते की धनगरांनी 
>>>> इतिहासात राजसत्ता उपभोगल्या असून, त्यांची सामाजिक स्थिती देखील उत्कर्षाची 
>>>> राहिली आहे. (संदर्भ: http://www.dhangar.org/ 
>>>> <http://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.dhangar.org%2F&h=aAQE4MMtz&enc=AZMMneluraawMZZevRimUl3avnLbog0ZsiMpROF0gFXqJM4TVeI009OGcMifMJoIaSDsgoStm7RvrzhS8MW0mdn4jOgLurbVK6I2NHFvTLVKEW5_OUEKgEObYqBy5o4Pw9yz5HC-8bgGt9nbqQ2RmBmiGyaNV2HCq-8pVgsPmWEPZw&s=1>
>>>> )
>>>>
>>>> त्याउलट आदिवासी जमातींचा इतिहास पाहिला तर अगदी थेट महाभारतीय काळातही 
>>>> उपेक्षित असलेल्या एकलव्याच्या उदाहरणावरून त्यांच्या ऐतिहासिक दुर्लक्षित, 
>>>> उपेक्षित आणि पृथक सामाजिक परिस्थितीची कल्पना येते.
>>>>
>>>> आणि म्हणूनच धनगर हे अनुसूचित जमातींपासून पूर्णत: वेगळे ठरतात.
>>>>
>>>>
>>>>
>>>> Rahul C Bhangare
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>> On Saturday, July 26, 2014 9:12:37 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>> Shakti wrote:
>>>>>
>>>>> Sign online petition : Click here 
>>>>> <http://www.change.org/en-IN/petitions/the-governor-of-maharashtra-stop-including-non-tribals-into-st-for-political-benefits#news>
>>>>>
>>>>>
>>>>> धनगर जातीचे लोक केवळ नामसाधर्म्याच्या आधारावर आदिवासींचे आरक्षण मिळवू 
>>>>> पाहत आहेत. पण त्यांचा नामसाधर्म्याचा दावा देखील किती पोकळ आहे ते बघा.
>>>>>
>>>>> पहिला मुद्दा : ते सांगतात की धनगर (Dhangar) या नावाचे इंग्रजी स्पेलिंग 
>>>>> (Dhangad) असे झाले आहे.
>>>>>
>>>>> प्रतिवाद : धनगर (Dhangar) चे स्पेलिंग चुकले असे एकवेळ मानले तरी त्याचा 
>>>>> अर्थ असा की या नावाच्या जातीचे नाव मराठीत अथवा त्या जातीच्या बोलीभाषेतही 
>>>>> उच्चारानुसार 'धनगड' असे असायला हवे. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाच्या सुचीत 
>>>>> असलेल्या या जातीचे खरे नाव "धांगड" असे आहे, आणि तीही "ओरांव" या आदिवासी 
>>>>> जातीची उपजात आहे. जे आरक्षण आहे ते 'धांगड' या उपजातीस आहे. आणि 'धांगड' व 
>>>>> 'धनगर' या मूळ नावांत कितीही जीभ ताणून पाहिले तरीही उच्चारानुसार दुरान्वये 
>>>>> ही साधर्म्य आढळत नाही. धनगर म्हणतात की इंग्रजीत 'र'(R) च्या जागी 'ड' (D) 
>>>>> असे लिहिले जाते. हा एक मोठाच जावईशोध म्हणावा लागेल. हे खरे आहे की 
>>>>> इंग्रजीत 
>>>>> 'र' आणि 'ड' यांचा बदल होतो, परंतु हा बदल नेहमी 'ड' चा 'र' असा होतो तो 
>>>>> कधीही 
>>>>> 'र' चा 'ड' होत नाही. (उदाहरणार्थ 'साडी' हा शब्द 'सारी' (Sari) असा होतो, 
>>>>> 'अनाडी' हा शब्द 'अनारी' (Anari) असा होतो, परंतु नारी हा शब्द कधीही नाडी 
>>>>> असा 
>>>>> होत नाही, वारी हा शब्द कधीही वाडी असा होत नाही. धारवाड हे Dharwar लिहिता 
>>>>> येऊ शकते मात्र कारवार हे कधीही Karwad (कारवाड) असे लिहिले जाऊ शकत नाही. 
>>>>> अशी 
>>>>> अनेको उदाहरणे देता येतील) मग जर इंग्रजीचे स्पेलिंग चुकले असेलच तर धनगड 
>>>>> (Dhangad) चे धनगर (Dhangar) होऊ शकते मात्र कधीही धनगर (Dhangar) चे धनगड/ 
>>>>> धांगड (Dhangad) असे होऊ शकत नाही. आणि त्यामुळे धनगर बांधवांचा दावा की 
>>>>> 'धनगर'चे स्पेलिंग Dhangad असे लिहिले गेले आहे हा तांत्रिकदृष्ट्या देखील 
>>>>> सपशेल फोल ठरतो. आणि म्हणूनच आपल्या धनगर बांधवांचे असे "र-ड-णे" हे 
>>>>> हास्यास्पदच ठरते.
>>>>>
>>>>> 'र' च्या उच्चारणात येणाऱ्या दुर्बलतेला 'रॉटासिजम' असे म्हणतात. हा अनेक 
>>>>> भाषांत आहे. आयरिश आणि स्कॉटिश भाषेत 'र' आणि 'न' यांचा बदल होतो. स्पॅनिश 
>>>>> भाषेत 'र' चा उच्चार 'ट' असा होतो. म्हणजे इंग्रजांऐवजी स्पेनने भारतावर 
>>>>> राज्य 
>>>>> केले असते तर धनगरांच्या डोक्यात ही कल्पनाही आली नसती.
>>>>>
>>>>> दुसरा मुद्दा : धनगर म्हणतात की त्यांस छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये 
>>>>> धनवार (dhanwar) या नावाने आरक्षण मिळाले असून तेथील धनवार व महाराष्ट्रातील 
>>>>> धनगर हे एकच आहेत.
>>>>>
>>>>> प्रतिवाद : पहिल्या मुद्द्यात दावा केलेली Dhangad (धांगड) आणि छत्तीसगड 
>>>>> व मध्यप्रदेश येथील Dhanwar (धनवार) या दोन्ही वेगवेगळ्या जमाती आहेत. 
>>>>> धनगरांचा नेमका दावा 'धांगड' वर आहे की 'धनवार'वर आहे हे त्यांचे त्यांनाच 
>>>>> पुरेसे स्पष्ट नाही. धनवार आणि धनगर या जातींत संस्कृती, चालीरीती, धार्मिक 
>>>>> परंपरा, देवदैवते, भाषा, पेहराव यापैकी काहीही समान नाही. मग ते एक कसे 
>>>>> ठरतील? 
>>>>> आता धनगर बांधवांचा असा तर दावा नाही ना की इंग्रजीत g चा सुद्धा w होतो, 
>>>>> कारण 
>>>>> त्याशिवाय Dhangar चे Dhanwar होऊ शकत नाही.
>>>>>
>>>>> २०१३ साली धनवार या जातीशी नामसाधर्म्य साधणारी दोन जातीनामे 
>>>>> छत्तीसगडमध्ये अनुसूचित जमातींत सामील करण्यास हिरवा कंदील मिळाला. ती दोन 
>>>>> नावे धनुवार/धनुहार अशी आहेत. दोन्ही शब्दांत 'न' या अक्षरास उकार आहे, 
>>>>> त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुद्धा धनगर अनुसूचित जमातींत येऊ शकत नाहीत. 
>>>>> कारण 
>>>>> धनगर या शब्दात उकार नाहीच. त्यामुळे त्यांत नामसाधर्म्य देखील आढळत नाही.
>>>>>
>>>>> बहुदा आपले धनगर बांधव अनुसूचित जमातीची कलम ३४२ नुसार केलेली व्याख्याच 
>>>>> वाचायला विसरले असावेत. त्यात स्पष्ट लिहिले आहे की अनुसूचित जमाती केवळ 
>>>>> त्यांनाच म्हणता येईल की ज्यांत १) आदिम वैशिष्ट्ये असतील, २) त्यांची वेगळी 
>>>>> वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असेल, ३) ते भौगोलिक दृष्ट्या पृथक असतील म्हणजेच 
>>>>> त्यांच्या वास्तव्याचा प्रदेश हा निश्चित आणि दुर्गम असेल, ४) ते इतर 
>>>>> जमातींत 
>>>>> मिसळण्यास कचरत असतील.
>>>>>
>>>>> यापैकी मुद्धा २ म्हणजे वेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती ही एक व्यापक 
>>>>> व्याख्या आहे आणि भारतातील सर्वच जातींची आणि धर्मांची संस्कृती ही वेगळी 
>>>>> आणि 
>>>>> वैशिष्ट्यपूर्ण आहे. (उदाहरणार्थ ब्राम्हण, जैन, पारसी, मुस्लिम, शीख या 
>>>>> सगळ्यांची संस्कृती ही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.) पण म्हणून याचा अर्थ 
>>>>> असा नाही की ते सुद्धा अनुसूचित जमाती ठरण्यास पात्र आहेत.
>>>>>
>>>>> मग बाकीचे मुद्दे पहिले तर असे लक्षात येते की धनगर या जातीत कोणतीही 
>>>>> आदिम वैशिष्ट्ये नाहीत. ते भौगोलिक दृष्ट्या अजिबात पृथक नाहीत. (पृथक 
>>>>> भौगोलिक 
>>>>> क्षेत्र हे अनुसूचित जमातींचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.) उलट 
>>>>> त्यांची 
>>>>> वस्तीस्थाने ही नेहमी बदलत राहतात, त्यामुळे त्यांना मिळालेले भटक्या जमाती 
>>>>> हे 
>>>>> आरक्षणच योग्य आहे. धनगर दुर्गम भागात वास्तव्य करीत नाहीत, त्यांचे 
>>>>> वास्तव्य 
>>>>> हे कायम नागरी वस्तींत असते. ते इतर जमातींत व्यवहारासाठी मिसळण्यास कचरत 
>>>>> नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे धनगर हे अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.
>>>>>
>>>>>
>>>>> Rahul C Bhangare
>>>>>
>>>>

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/a37024a7-baab-4e3c-890d-9c6135102954%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to