हरामखोरांनो आयुषच्या व्यासपिठावर चर्चेसाठी गणपतिपेक्षा महत्वाचा , आदिवासी 
समाजाचा मुद्दा सापडत नाहीं का ? आदिवासी समाजाचे सर्व प्रश्न व संस्कृतिची चर्चा 
करुन संपली असेल तर मी.अँडमीन आयुषचे हे पोर्टल बंद करा !!

-----Original Message-----
From: "चेतन   Chetan" <chetan...@gmail.com>
Sent: ‎07-‎09-‎2014 11:02 PM
To: "adiyuva@googlegroups.com" <adiyuva@googlegroups.com>; "AYUSH Adivasi Yuva 
Shakti" <adiy...@gmail.com>
Subject: AYUSH | गणपतीबाप्पा आणि ‘मोर’ या

गणपतीबाप्पा आणि ‘मोर’ या
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/41882026.cms
मंगला सामंत
गणपतीच्या जयजयकारात 'मोरया' हे संबोधन मोठ्या जोशात उच्चारलं जातं. पण मोरया या 
संबोधनाचा नेमका अर्थ काय? त्यामागे प्राच‌ीन भारतीय मातृसंस्कृती कशी दडलेली आहे, 
त्याचा वेध घेणारा लेख... 

गणेश चतुर्थीला स्वागताला आणि अनंत चतुर्दशीला निरोप देताना, गणपतीला उद्देशून आपण 
'गणपतीबाप्पा मोरया' अशी हाक देत असतो. अशी हाक का दिली जाते? त्यामागचं रहस्य 
काय? हे जाणून घेताना, भारताच्या प्राचीन मातृसंस्कृतीतील पुरावे, अवशेष तपासावे 
लागतात. कारण गणपती म्हणजे 'गणाची प्रमुख' (पती) ही संकल्पना मातृसंस्कृतीतून पुढे 
आलेली आहे. भारतातील प्राचीन-अतिप्राचीन संस्कृती ही मातृप्रधान होती, हे आता 
सर्वमान्य झालेलं सत्य आहे. 

अपत्यसंभवामध्ये पुरुषाचंही योगदान असतं, हे सत्य स्त्री-पुरुषास ठाऊक नसण्याचा 
काळ हजारो वर्षांचा होता. तोपर्यंत मूल जन्माला घालणारी माता ही आपोआपच टोळीबाबत 
निर्णय घेणारी, अन्नपदार्थ वाटून देणारी, औषधोपचार करणारी, अरिष्टापासून वाचवणारी 
अशी प्रमुख मानली जात होती. संस्कृतमध्ये 'मा' म्हणजे वाटप करणे यावरून 'माता' असं 
संबोधन स्त्रीला आणि 'दोहन' म्हणजे दूध काढणे यावरून 'दुहिता' हे संबोधन त्या 
मातेच्या कन्येला आहे. या वस्तुस्थितीतून पुढे स्त्री-प्रधान टोळी-अवस्था उदयाला 
आली. या मातृप्रधान टोळ्या प्रथमार्धात जगात सर्वत्र होत्या. परंतु त्या काळात 
भटक्या, शिकारी अवस्थेतील जंगली पुरुष-टोळ्यासुद्धा जगात सर्वत्र होत्या. 
त्यांच्या हल्ल्यात जगातील अनेक मातृटोळ्या प्राथमिक अवस्थेतच नष्ट झाल्या. 
भारतामध्ये मात्र मातृटोळ्यांचं रूपांतर एका रचनाबद्ध अशा संस्कृतीत झालेलं आढळतं. 
त्याचे पुरावे आपले प्राचीन वाङ्मय, महाकाव्यं, पुराणकथा, उत्खननातील अवशेष, 
मातृदेवतांचं पूजन, धार्मिक रीती, परंपरा, अंधश्रद्धा या सर्वांमधून, आणि 
त्याचप्रमाणे आजच्या आदिवासीच्या चालीरीतीतून, या मातृसंस्कृतीची पावलं स्पष्टपणे 
दिसतात. 

जगातील सर्व मातृटोळ्यांचं प्राथमिक वैशिष्ट्य म्हणजे भाषा बोलता येत नसल्यामुळे, 
आणि वस्त्राचा शोध लागला नसल्यामुळे टोळी सदस्यांना एकमेकांना ओळखता येण्यासाठी, 
विविध पशु, पक्षी, वनस्पती यांच्या खुणांनी, म्हणजे त्यांची पिसे, शिंगे, शेपट्या, 
मुखवटे अशी चिन्हे धारण करून वावरणे, हा एकमेव पर्याय होता. भारतीय संस्कृतीत 
मत्स्य, कच्छ, वराह, वृषभ, महिष, नाग, मोर, गरुड, हंस, जटायू, वानर वगैरे नावांनी 
अशा मातृगण-जमातींचे उल्लेख सापडतात. रामायण काळातील जटायू किंवा वानर यासुद्धा 
त्या प्राण्यांचे मुखवटे धारण करणाऱ्या जमाती होत्या. मातृटोळ्यांना 
पशु-पक्ष्यांच्या ह्या चिन्हामुळे एकसंधता आली. त्यांची सुरक्षितता वाढली. 
त्यांच्या एकत्र राहण्याला अर्थपूर्णता आली. हळूहळू या चिन्हांवरून मातृटोळ्या 
ओळखल्या जाऊ लागल्या. अखेरीस ती त्यांची कुलचिन्हे होऊन गेली. पुढे भाषा विकसित 
होण्यात अनेक शतके गेली. तोपर्यंत कुलचिन्हांवरील विश्वास टोळ्यांच्या 
श्रद्धेमध्ये बदलला. भाषेच्या विकासात मातेला संबोधन आले. तसे दितीवरून दैत्यगण, 
दनुमातेचे दानव, अदितीचे आदित्य, कपिलेचे कपिलेय अशी संबोधनं मातृगणांना आली, तरी 
कुलचिन्हांवरील श्रद्धा, त्यांची गणातील प्रतिष्ठापना, पूजन यामध्ये बदल झाला 
नाही. टोळ्यांमधील चांगल्या घटना, दुर्घटना किंवा युद्धसंघर्षाचे प्रसंग, विजय 
मिरवणुका यामध्ये आपापली कुलचिन्हं मिरवत न्यायची परंपरा गण-जीवनातही तशीच टिकून 
होती, कारण त्याशिवाय त्या गणाचा सहभाग समजता येत नसे. आजच्या काळात परिषदेसाठी 
येणारे राष्ट्रप्रमुख जसे त्यांच्या राष्ट्रीय पोशाखात असतात, किंवा क्रीडा 
स्पर्धेसाठी राष्ट्रं आपापला ध्वज मिरवत आणतात, तेच काम ही कुलचिन्हं करीत होती. 
काही ठिकाणी कुलचिन्हांचा उल्लेख 'वाहन' असाही आहे. याबाबत संशोधक असं मानतात की, 
जेव्हा दोन मातृगणांमध्ये संघर्ष होत असे, तेव्हा ज्या गणाचा पराभव होई, त्याचं 
कुलचिन्ह हे विजेत्या गणाचं वाहन (मांडलिक) म्हटलं जात असे. विजेत्या गणाची प्रमुख 
(पती) माता ही पराभूत गणाचे चिन्ह वाहनासारखे मिरवत आणि दौडत विजयी सभेमध्ये येत 
असे. याबाबत डॉ. धर्मानंद कोसंबी काही निरीक्षणं मांडतात. महाराष्ट्र क्षेत्रातील 
ठाणे जिल्हा परिसरात प्राचीन काळात जो संघर्ष झाला, त्यामध्ये, मातंग (हत्ती) 
गणाने मूषक (उंदीर) गणाचा पराभव करून मूषकांना जंगलपट्टीबाहेर हाकललं. या 
विजयानंतर मातंग गणाची गणपती-माता हत्तीचा मुख‍वटा लावून, मुषकाला वाहन बनवून 
मिरवणुकीने आली. दोन गणांमधील हा संघर्ष दीर्घकाळ आणि तीव्रपणे झालेला दिसतो. 
म्हणून पुढेही या विजयाची आठवण घरोघरी गणपती मूषक वाहनासह वाजत-गाजत आणून चालू 
ठेवली गेली. साधारणपणे, इ.स.पूर्व सुमारे २ ते ३ हजार वर्षांपर्यंत लोखंडी 
नांगराचा शोध लागण्यापूर्वी, मातांनी 'गणपती' बनून आणि वाहन घेऊन मिरवणुकीने 
निघावे, अशी प्रथा चालू होती. दुर्गेने महिषासुराचा पराभव केला, म्हणून ती महिष 
वाहनावरून येते, हे आपल्याला माहीत आहेच. त्याचबरोबर, वैष्णवी गरुडावरून येते, 
माहेश्वरी बैलावरून येते वगैरे उल्लेख भारतीय संस्कृतीत फक्त स्त्रियांबाबत 
सापडतात. 

नांगराच्या शोधानंतर मात्र शेती उद्योगात जी मोठी क्रांती आली, त्यामध्ये शेती जी 
विळ्या-कोयत्याने स्त्रियांकडून होत होती, ती पुरुषाहाती गेली. फळे, भाजी, 
कंदमुळांऐवजी अमाप धान्य पिकू लागलं. जमीनदारी उदयास येऊन, पुरुष जमिनीचा व धान्य 
उत्पादनाचा मालक झाल्यामुळे, स्त्री-वारसाऐवजी पुरुष-वारसाचा प्रश्न ऐरणीवर आला. 
आणि इथेच विवाह प्रथेचा चंचुप्रवेश झाला. मातेकडून मुलीकडे जाणारा वारसा हक्क आणि 
त्याकरिता विवाहाची नसणारी गरज, हाच संस्कार शेकडो शतके रूढ होता. पितृसंस्कृतीचे 
समर्थक जमीनदार आणि राज्यकर्ते यांना हा संस्कार पुसून टाकण्यासाठी बरेच प्रयास 
करावे लागले. त्यातून देव-दानव संग्राम, रामायण आणि महाभारत हे मोठे संघर्ष, मजबूत 
मातृसंस्कृती उखडण्यासाठी, भारतीय उपखंडात होऊन गेले. मातृसंस्कृतीतील अवैवाहिक 
स्त्री-पुरुष संबंध पद्धतीची, जमीनदार-राज्यकर्त्यांनी मोठीच धास्ती घेतलेली होती. 
ज्या रीतींमुळे त्यांचं पितृत्व धोक्यात येत होतं, त्या रीतींचा नायनाट करायला 
हवा, हे त्यांनी ताडलं. त्यामुळे 'स्त्री-पुरुष मुक्त संबंध हे नैतिक नाहीत' हा 
नवा संस्कार रूढ करण्यासाठी या आक्रमकांनी भारतात हजारो वर्षे स्थिर असलेल्या 
मातृसंस्कृतीवर धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक अशा सर्व बाजूंनी हल्ले 
करण्याचे राजकारण-धोरण जन्माला घातले. उदा. तत्कालीन राज्यांच्या स्त्री-शासक�

[The entire original message is not included.]

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/540d57a0.a8e9420a.2453.ffff9511%40mx.google.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to