very well said......and i am now sure that all the protest by students  on
the calling by mla/mps are just to satisfy their ego/thirst and to feel
their gone presence and nothing else...

as vijaykumarji and me too think that our leaders can fight our every case
by their own and they must its their duty bt ......& our money can be used
for other purpose.....but when that day will come who knows.

2015-07-30 9:26 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:

>   आम्ही नक्षलवादीच का व्हावे ...?
>
> “ आम्हाला नक्षलवादी बनवू नका ” अश्या आशयाच्या मथळ्यातील बातम्या आज अनेक
> वृत्तपत्रांमधून झळकल्यात, हे विधान आहे माजी मंत्री तसेच आदिवासींचे नेते मा.
> मधुकर पिचड यांचे ....! खरं तर आम्हाला नक्षलवादी बनवू नका हे वाक्य वाचताच
> माझ्यातील ज्वलंतपणा अधिक भडकायला पाहिजे होता, मात्र तसा काही प्रकार घडला
> नाही , धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण दिले तर आदिवासी समाजात घरोघरी
> नक्षलवादी दिसतील ....! असे मी अनेकवेळा एकले आहे शिवाय मी अनेक वर्षापासून
> नक्षलवाद या विषयावर पुस्तके वाचतोय , नक्षलवाद अभ्यासतोय , नक्षलवादी
> कारवायांमधून सन्यास घेऊन समाजात आता चांगले जीवनमान जगणाऱ्या काही लोकांनाही
> भेटलोय , आता पुन्हा कधीही नक्षलवादी मार्गावर जाणार नाही असे परखड मत त्यांनी
> व्यक्त केले आहे , मग धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण मिळाले तर किती लोक
> नक्षलवादी चळवळीत येतील यासाठी धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील
> अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांशी आज संपर्क साधला आणि त्यांचे मत जाणून घेतले .
> सर्वांचेच हे म्हणणे झाले कि “ कायदा आहे , आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे
> आणि कायदा कुणी मोडून धनगर समाजाला आरक्षण देत असेल तर त्याला लोकशाही
> मार्गाने उत्तर द्यायला आम्ही सहकुटुंब तयार आहोत ...!  मग  मुख्य प्रश्न आहे
> ...! नक्षलवादी होणार कोण ? बरं येथे प्रतेक आदिवासी माणसाला वाटेल कि मी
> नक्षलवादी व्हावे ....! पण जरा नक्षलवाद या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का
> ...? मित्रांनो नक्षलवाद म्हटले कि आदिवासी समाजाकडे पाहिले जाते नक्षलवाद हीच
> आदिवासी समाजाची ओळख झालीय गिरीजन , वनवासी ,जंगली आणि आता नक्षलवादी , मा.
> मधुकर पिचड साहेबांचे अगदी बरोबर आहे कि “ आम्हाला नक्षलवादी करू नका ” पण आज
> प्रत्येक आदिवासी घरात एक नक्षलवादी आहे हि किती लोकांना माहित आहे आपल्याला
> नक्षलवादी म्हणजे हातात AK 47 बंदूक , कमरेला हेंड ग्रीनेड , आठ दहा मेगजीन हा
> पेहराव म्हणजे तुम्हाला नक्षलवादी वाटत असेल तर तुम्ही चुकताय , नक्षलवाद
> अभ्यासायची प्रत्येकाला गरज आहे असे मला वाटते .! नक्षलवाद म्हणजे फक्त
> गोळीबार ,बॉंबब्लास्ट नाही, ती एक चळवळ आहे ....आणि हि चळवळ आरक्षण या शुल्लक
> शब्दासाठी तयार झालेली नाही , हि चळवळ तयार झालीय ती आदिवासी परंपरा ,
> संस्कृती , वनसंपदा वाचवण्यासाठी , वनांचे रक्षण कार्यासाठी आदिवासींच्या
> जमिनी वाचवण्यासाठी आणि आदिवासींचे शोषण थांबवण्यासाठी , आपण काय करतोय “
> आरक्षणाचे ” सरक्षण आणि त्यासाठी मी हातात बंदूक घेऊ ...मला लेखणी दिलीय , ती
> लेखणी अगदी बंदूकीसारखे काम करतेय ..त्याच लेखणीच्या धाकाने मी अनेकांना
> वाकवलेय आणि झुकवलेय, माझ्यावर बंदुका काढून देखील दुसऱ्या दिवशी माझी माफी
> मागणारी पिल्लावळ मी पाहिलीय ....हरसूल दंगलीचे वृत्त प्रसिद्ध होताच “
> तुमच्याकडचे पुरावे आम्हाला द्या , तपास कामात मदत करा ” म्हणणाऱ्या पोलीस
> अधिकाऱ्यांना  “ तुम्ही मला पगार द्याल का ? ” असे मी त्यांना उलट विचारू शकलो
> ते केवळ लेखणीच्या बळावर ...! मग विचार करा माझ्या लेखणीत तेव्हडीच ताकत आहे
> तर मी नक्षलवादी नाही का ? आज आदिवासी समाज्यातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात
> समाज्याच्या मुख्य प्रवाहात आलाय ..प्रत्येकाला बदल हवाय ..समाज सुधारला
> पाहिजे असे प्रत्येकाला वाटते , म्हणून तर आज कुणाचाही राजकीय आश्रय न घेता
> आंदोलने उभी राहत आहेत त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे “ नंदुरबार येथील
> आदिवासी मुलीची आणि समाजाची  फेसबुक वरून झालेली बदनामी ” आणि त्याच्या
> विरोधात केलेला एल्गार . महाराष्ट्रातील हे  पहिले बिगर राजकीय आंदोलन पाहून
> खरच मी आदिवासी असल्याचा मला गर्व झाला . प्रत्येकाला आपले हक्क कर्तव्य
> समजायला लागलेत , हरसूल मध्ये  व्यवस्स्थेच्या आणि प्रस्थापितांच्या विरोधातील
> भडका झाल्याने दंगल झाली त्याला नक्षलवाद म्हणता येईल पण आरक्षण वाचवण्यासाठी
> बंदुका हातात  घ्यायच्या ? आम्ही आमच्या आरक्षण ,आणि संरक्षणासाठी ज्या आमच्या
> नेत्यांना राजकारणात आणून साहेब केले आहे त्यांनी आमचा विकास करण्याऐवजी,
> आमच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याऐवजी आमच्याच हातात बंदूक दयायची असेल तर
> तुम्ही येऊ नका आणि आमचे नेतृत्वही करू नका ....! मा. मधुकर पिचड साहेबासारखेच
> ,वसंत पुरके , पद्माकर वळवी , विजयकुमार गावित ,अश्या  अनेक आदिवासी नेत्यांनी
> अश्याच घोषणा गेल्या एक वर्षाभरापासून सुरु केल्या आहेत आजही आमच्या नेत्यांना
> सामान्य जनतेची गरज भासत असेल तर तुमची पॉलीटीकल पावर संपली का ...! कि ती
> पावर फक्त तुमचे खिसे भरायला आहे . आज आदिवासींचे २६ आमदार जर प्रस्थापित
> सत्तेच्या विरोधात जाणार नसतील तर सामान्य जनता काय करील ....! आणि आमच्या
> हातात बंदुका देऊन तुम्ही काय साधणार ...! आमच्याच माता पोरक्या होतील , आमचीच
> माती आम्हाला सामाऊन घेईल , कित्तेकांच्या बायका विधवांचं जगणं जगतील . यात
> किती नेते सहभागी असतील किती नेत्यांचे कुटुंब यात सहभागी होतील हा मोठा
> प्रश्न आहे ...! “ शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरात , आपल्याकडे का नको
> ...! नेत्यांच्या पोरांनी युवा नेता ,भाऊ , दादा , आमदार , डॉक्टर , इंजिनियर
> , मोठमोठे व्यवसायिक होत आहेत आणि आम्ही नक्षलवादी व्हायचे हे मला पचत नाही .
> आज ज्याचे विचार “जहाल” तो “नक्षलवादी” हे समीकरण आहे. नेभळट लोकांनी या
> मार्गावर येवू नये आणि कुणी नेता आमचे नेतृत्व करूण स्वतंत्र नकसलवादी दलम
> काढत असेल आणि स्वता पुढे होऊन हातात AK 47 घेऊन निघत असेल तर मी आजच त्या
> दलमचा मुख्य कमांडो म्हणून हातातील लेखणी बाजूला ठेवून AK 47 उचलायला तयार आहे
> . मी मा.पिचड साहेबांच्या वक्तव्याला विरोध करत नाही पण आम्ही प्रत्येक वेळी
>  नक्षलवादीच का व्हावे...? जे नक्सलवादीचळवळीत आहेत त्यांनाच आजून
> मानसन्मानाने जगता येईना त्यांनाच सरकार मुख्य प्रवाहात घ्यायला वेगवेगळी
> ऑपरेशन राबवतंय आणि आम्ही हातात बंदुका घेतल्या तर सरकार आमचे स्वागत करेल का
> ...? धनगर आरक्षणासाठी आमच्या २६ आमदारांनी एकत्र येवून प्रत्येकी २ लाख रुपये
> जमा केले आणि तसी याचिका दाखल केली तर कायद्याची कोणतीही लढाई ते जिंकतील पण
> नाही निवडणुकीत निवडून येण्यासाठी १०/२० कोटी रुपये वाटतील आणि समाज्याच्या
> कामासाठी २ लाख खर्च करायला यांच्या जीवावर येते आणि आम्ही आरक्षण वाचवायला
> नक्षलवादी व्हावे ....? माझे मत सर्वांनाच पटणार नाही हे पण नक्की ..आणि
> ज्यांना पटणार नाही त्यांनीही नोकरी व्यवसाय सोडून आरक्षण वाचवण्यासाठी
> नक्षलवादी चळवळीत यावे सर्वांचे स्वागत आहे ...! तुमच्यासारखे सहकारी असले तर
> सर्वात पहिला गोळीबार मी करील यात शंकाच नाही .
>
>   विजयकुमार घोटे
>   ०९६२३७०१७०९
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuNeH0sGm9B_nrQ19TDamgUACjAJ9FcwWWYaDh2h6o%2BGA%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuNeH0sGm9B_nrQ19TDamgUACjAJ9FcwWWYaDh2h6o%2BGA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADzvKY3Yww9Ha1tuLz8omwW5WS2kSHKQsymxkMpd50YFb6_5yA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to