आपले मानसं सामाजिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्याना  फ़क्त मलाई खाता येते ते
कोणत्यातरी पक्षाचे विकत घेतलेले अंड कुटलेले सांड आहेत

2015-07-31 0:36 GMT+05:30 Abhijit Bule <abhijit.b...@gmail.com>:

> आज केवळ पिचड साहेबच नाही तर सर्व च आदिवासी नेते केवळ "आदिवसिंचा राजकीय
> चेहरा" यापालिकडे नाहीत..
>
> बोगसांच्या विरोधात औरंगाबादेत केस सुरु असताना एकाही आदिवासी लोकप्रतिनिधीची
> मदत न होणे हे त्याचेच प्रतिक..!
>
> अन त्यांचे वजन फ़क्त निवडणूक काळा पुरता त्यापुढे जैसे थे च...!!!
> On 30 Jul 2015 9:55 pm, "john padvi" <john.pa...@gmail.com> wrote:
>
>> खर आहे घोटे साहेब.....आता आदिवासीच्या आरक्षण घेवून काही बोगस आदिवासी
>> आदिवासी म्हणून नोकरी करायला निघाले आहे....पिचड साहेब त्याना का विरोध करत
>> नाही ! मग कुठे जाते आदिवासी अस्मिता त्यांची ? कुठे गेले होते तेव्हा ????
>> On Jul 30, 2015 9:26 AM, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <ay...@adiyuva.in>
>> wrote:
>>
>>>   आम्ही नक्षलवादीच का व्हावे ...?
>>>
>>> “ आम्हाला नक्षलवादी बनवू नका ” अश्या आशयाच्या मथळ्यातील बातम्या आज अनेक
>>> वृत्तपत्रांमधून झळकल्यात, हे विधान आहे माजी मंत्री तसेच आदिवासींचे नेते मा.
>>> मधुकर पिचड यांचे ....! खरं तर आम्हाला नक्षलवादी बनवू नका हे वाक्य वाचताच
>>> माझ्यातील ज्वलंतपणा अधिक भडकायला पाहिजे होता, मात्र तसा काही प्रकार घडला
>>> नाही , धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण दिले तर आदिवासी समाजात घरोघरी
>>> नक्षलवादी दिसतील ....! असे मी अनेकवेळा एकले आहे शिवाय मी अनेक वर्षापासून
>>> नक्षलवाद या विषयावर पुस्तके वाचतोय , नक्षलवाद अभ्यासतोय , नक्षलवादी
>>> कारवायांमधून सन्यास घेऊन समाजात आता चांगले जीवनमान जगणाऱ्या काही लोकांनाही
>>> भेटलोय , आता पुन्हा कधीही नक्षलवादी मार्गावर जाणार नाही असे परखड मत त्यांनी
>>> व्यक्त केले आहे , मग धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण मिळाले तर किती लोक
>>> नक्षलवादी चळवळीत येतील यासाठी धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील
>>> अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांशी आज संपर्क साधला आणि त्यांचे मत जाणून घेतले .
>>> सर्वांचेच हे म्हणणे झाले कि “ कायदा आहे , आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे
>>> आणि कायदा कुणी मोडून धनगर समाजाला आरक्षण देत असेल तर त्याला लोकशाही
>>> मार्गाने उत्तर द्यायला आम्ही सहकुटुंब तयार आहोत ...!  मग  मुख्य प्रश्न आहे
>>> ...! नक्षलवादी होणार कोण ? बरं येथे प्रतेक आदिवासी माणसाला वाटेल कि मी
>>> नक्षलवादी व्हावे ....! पण जरा नक्षलवाद या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का
>>> ...? मित्रांनो नक्षलवाद म्हटले कि आदिवासी समाजाकडे पाहिले जाते नक्षलवाद हीच
>>> आदिवासी समाजाची ओळख झालीय गिरीजन , वनवासी ,जंगली आणि आता नक्षलवादी , मा.
>>> मधुकर पिचड साहेबांचे अगदी बरोबर आहे कि “ आम्हाला नक्षलवादी करू नका ” पण आज
>>> प्रत्येक आदिवासी घरात एक नक्षलवादी आहे हि किती लोकांना माहित आहे आपल्याला
>>> नक्षलवादी म्हणजे हातात AK 47 बंदूक , कमरेला हेंड ग्रीनेड , आठ दहा मेगजीन हा
>>> पेहराव म्हणजे तुम्हाला नक्षलवादी वाटत असेल तर तुम्ही चुकताय , नक्षलवाद
>>> अभ्यासायची प्रत्येकाला गरज आहे असे मला वाटते .! नक्षलवाद म्हणजे फक्त
>>> गोळीबार ,बॉंबब्लास्ट नाही, ती एक चळवळ आहे ....आणि हि चळवळ आरक्षण या शुल्लक
>>> शब्दासाठी तयार झालेली नाही , हि चळवळ तयार झालीय ती आदिवासी परंपरा ,
>>> संस्कृती , वनसंपदा वाचवण्यासाठी , वनांचे रक्षण कार्यासाठी आदिवासींच्या
>>> जमिनी वाचवण्यासाठी आणि आदिवासींचे शोषण थांबवण्यासाठी , आपण काय करतोय “
>>> आरक्षणाचे ” सरक्षण आणि त्यासाठी मी हातात बंदूक घेऊ ...मला लेखणी दिलीय , ती
>>> लेखणी अगदी बंदूकीसारखे काम करतेय ..त्याच लेखणीच्या धाकाने मी अनेकांना
>>> वाकवलेय आणि झुकवलेय, माझ्यावर बंदुका काढून देखील दुसऱ्या दिवशी माझी माफी
>>> मागणारी पिल्लावळ मी पाहिलीय ....हरसूल दंगलीचे वृत्त प्रसिद्ध होताच “
>>> तुमच्याकडचे पुरावे आम्हाला द्या , तपास कामात मदत करा ” म्हणणाऱ्या पोलीस
>>> अधिकाऱ्यांना  “ तुम्ही मला पगार द्याल का ? ” असे मी त्यांना उलट विचारू शकलो
>>> ते केवळ लेखणीच्या बळावर ...! मग विचार करा माझ्या लेखणीत तेव्हडीच ताकत आहे
>>> तर मी नक्षलवादी नाही का ? आज आदिवासी समाज्यातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात
>>> समाज्याच्या मुख्य प्रवाहात आलाय ..प्रत्येकाला बदल हवाय ..समाज सुधारला
>>> पाहिजे असे प्रत्येकाला वाटते , म्हणून तर आज कुणाचाही राजकीय आश्रय न घेता
>>> आंदोलने उभी राहत आहेत त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे “ नंदुरबार येथील
>>> आदिवासी मुलीची आणि समाजाची  फेसबुक वरून झालेली बदनामी ” आणि त्याच्या
>>> विरोधात केलेला एल्गार . महाराष्ट्रातील हे  पहिले बिगर राजकीय आंदोलन पाहून
>>> खरच मी आदिवासी असल्याचा मला गर्व झाला . प्रत्येकाला आपले हक्क कर्तव्य
>>> समजायला लागलेत , हरसूल मध्ये  व्यवस्स्थेच्या आणि प्रस्थापितांच्या विरोधातील
>>> भडका झाल्याने दंगल झाली त्याला नक्षलवाद म्हणता येईल पण आरक्षण वाचवण्यासाठी
>>> बंदुका हातात  घ्यायच्या ? आम्ही आमच्या आरक्षण ,आणि संरक्षणासाठी ज्या आमच्या
>>> नेत्यांना राजकारणात आणून साहेब केले आहे त्यांनी आमचा विकास करण्याऐवजी,
>>> आमच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याऐवजी आमच्याच हातात बंदूक दयायची असेल तर
>>> तुम्ही येऊ नका आणि आमचे नेतृत्वही करू नका ....! मा. मधुकर पिचड साहेबासारखेच
>>> ,वसंत पुरके , पद्माकर वळवी , विजयकुमार गावित ,अश्या  अनेक आदिवासी नेत्यांनी
>>> अश्याच घोषणा गेल्या एक वर्षाभरापासून सुरु केल्या आहेत आजही आमच्या नेत्यांना
>>> सामान्य जनतेची गरज भासत असेल तर तुमची पॉलीटीकल पावर संपली का ...! कि ती
>>> पावर फक्त तुमचे खिसे भरायला आहे . आज आदिवासींचे २६ आमदार जर प्रस्थापित
>>> सत्तेच्या विरोधात जाणार नसतील तर सामान्य जनता काय करील ....! आणि आमच्या
>>> हातात बंदुका देऊन तुम्ही काय साधणार ...! आमच्याच माता पोरक्या होतील , आमचीच
>>> माती आम्हाला सामाऊन घेईल , कित्तेकांच्या बायका विधवांचं जगणं जगतील . यात
>>> किती नेते सहभागी असतील किती नेत्यांचे कुटुंब यात सहभागी होतील हा मोठा
>>> प्रश्न आहे ...! “ शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरात , आपल्याकडे का नको
>>> ...! नेत्यांच्या पोरांनी युवा नेता ,भाऊ , दादा , आमदार , डॉक्टर , इंजिनियर
>>> , मोठमोठे व्यवसायिक होत आहेत आणि आम्ही नक्षलवादी व्हायचे हे मला पचत नाही .
>>> आज ज्याचे विचार “जहाल” तो “नक्षलवादी” हे समीकरण आहे. नेभळट लोकांनी या
>>> मार्गावर येवू नये आणि कुणी नेता आमचे नेतृत्व करूण स्वतंत्र नकसलवादी दलम
>>> काढत असेल आणि स्वता पुढे होऊन हातात AK 47 घेऊन निघत असेल तर मी आजच त्या
>>> दलमचा मुख्य कमांडो म्हणून हातातील लेखणी बाजूला ठेवून AK 47 उचलायला तयार आहे
>>> . मी मा.पिचड साहेबांच्या वक्तव्याला विरोध करत नाही पण आम्ही प्रत्येक वेळी
>>>  नक्षलवादीच का व्हावे...? जे नक्सलवादीचळवळीत आहेत त्यांनाच आजून
>>> मानसन्मानाने जगता येईना त्यांनाच सरकार मुख्य प्रवाहात घ्यायला वेगवेगळी
>>> ऑपरेशन राबवतंय आणि आम्ही हातात बंदुका घेतल्या तर सरकार आमचे स्वागत करेल का
>>> ...? धनगर आरक्षणासाठी आमच्या २६ आमदारांनी एकत्र येवून प्रत्येकी २ लाख रुपये
>>> जमा केले आणि तसी याचिका दाखल केली तर कायद्याची कोणतीही लढाई ते जिंकतील पण
>>> नाही निवडणुकीत निवडून येण्यासाठी १०/२० कोटी रुपये वाटतील आणि समाज्याच्या
>>> कामासाठी २ लाख खर्च करायला यांच्या जीवावर येते आणि आम्ही आरक्षण वाचवायला
>>> नक्षलवादी व्हावे ....? माझे मत सर्वांनाच पटणार नाही हे पण नक्की ..आणि
>>> ज्यांना पटणार नाही त्यांनीही नोकरी व्यवसाय सोडून आरक्षण वाचवण्यासाठी
>>> नक्षलवादी चळवळीत यावे सर्वांचे स्वागत आहे ...! तुमच्यासारखे सहकारी असले तर
>>> सर्वात पहिला गोळीबार मी करील यात शंकाच नाही .
>>>
>>>   विजयकुमार घोटे
>>>   ०९६२३७०१७०९
>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuNeH0sGm9B_nrQ19TDamgUACjAJ9FcwWWYaDh2h6o%2BGA%40mail.gmail.com
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuNeH0sGm9B_nrQ19TDamgUACjAJ9FcwWWYaDh2h6o%2BGA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADRm0sKZA0KUnUzP20maPvTei9nRruqPdahswG-UajS3fgosQQ%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADRm0sKZA0KUnUzP20maPvTei9nRruqPdahswG-UajS3fgosQQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAGH_QihRHgmFSKdCEb_%3D4tEvf71%2BSNtRQv4L0gC09XtRcYaeKA%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAGH_QihRHgmFSKdCEb_%3D4tEvf71%2BSNtRQv4L0gC09XtRcYaeKA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAgR8nemysKGNH0vPcCf8RTfhNcuKNc21%2BiyLExP-i21CVzTSQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to