ज्या नेत्यांना आपण निवडून देतो ते आपल्या समाजाची कामे तेवढ्याच जबाबदारीने
करत नाही.
पहिले समाज नंतर पक्ष असे करण्या ऐवजी पहिला पक्ष मग वाटले तर समाज कारण ५
वर्ष चिंता नाही आणि तो पर्यंत समाज हि विसरून जाईल किवा थकून मागे पडणार नाही
व स्वतःच आपले solution काढेल.

2015-07-30 15:12 GMT+05:30 john padvi <john.pa...@gmail.com>:

> खर आहे घोटे साहेब.....आता आदिवासीच्या आरक्षण घेवून काही बोगस आदिवासी
> आदिवासी म्हणून नोकरी करायला निघाले आहे....पिचड साहेब त्याना का विरोध करत
> नाही ! मग कुठे जाते आदिवासी अस्मिता त्यांची ? कुठे गेले होते तेव्हा ????
> On Jul 30, 2015 9:26 AM, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <ay...@adiyuva.in>
> wrote:
>
>>   आम्ही नक्षलवादीच का व्हावे ...?
>>
>> “ आम्हाला नक्षलवादी बनवू नका ” अश्या आशयाच्या मथळ्यातील बातम्या आज अनेक
>> वृत्तपत्रांमधून झळकल्यात, हे विधान आहे माजी मंत्री तसेच आदिवासींचे नेते मा.
>> मधुकर पिचड यांचे ....! खरं तर आम्हाला नक्षलवादी बनवू नका हे वाक्य वाचताच
>> माझ्यातील ज्वलंतपणा अधिक भडकायला पाहिजे होता, मात्र तसा काही प्रकार घडला
>> नाही , धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण दिले तर आदिवासी समाजात घरोघरी
>> नक्षलवादी दिसतील ....! असे मी अनेकवेळा एकले आहे शिवाय मी अनेक वर्षापासून
>> नक्षलवाद या विषयावर पुस्तके वाचतोय , नक्षलवाद अभ्यासतोय , नक्षलवादी
>> कारवायांमधून सन्यास घेऊन समाजात आता चांगले जीवनमान जगणाऱ्या काही लोकांनाही
>> भेटलोय , आता पुन्हा कधीही नक्षलवादी मार्गावर जाणार नाही असे परखड मत त्यांनी
>> व्यक्त केले आहे , मग धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण मिळाले तर किती लोक
>> नक्षलवादी चळवळीत येतील यासाठी धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील
>> अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांशी आज संपर्क साधला आणि त्यांचे मत जाणून घेतले .
>> सर्वांचेच हे म्हणणे झाले कि “ कायदा आहे , आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे
>> आणि कायदा कुणी मोडून धनगर समाजाला आरक्षण देत असेल तर त्याला लोकशाही
>> मार्गाने उत्तर द्यायला आम्ही सहकुटुंब तयार आहोत ...!  मग  मुख्य प्रश्न आहे
>> ...! नक्षलवादी होणार कोण ? बरं येथे प्रतेक आदिवासी माणसाला वाटेल कि मी
>> नक्षलवादी व्हावे ....! पण जरा नक्षलवाद या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का
>> ...? मित्रांनो नक्षलवाद म्हटले कि आदिवासी समाजाकडे पाहिले जाते नक्षलवाद हीच
>> आदिवासी समाजाची ओळख झालीय गिरीजन , वनवासी ,जंगली आणि आता नक्षलवादी , मा.
>> मधुकर पिचड साहेबांचे अगदी बरोबर आहे कि “ आम्हाला नक्षलवादी करू नका ” पण आज
>> प्रत्येक आदिवासी घरात एक नक्षलवादी आहे हि किती लोकांना माहित आहे आपल्याला
>> नक्षलवादी म्हणजे हातात AK 47 बंदूक , कमरेला हेंड ग्रीनेड , आठ दहा मेगजीन हा
>> पेहराव म्हणजे तुम्हाला नक्षलवादी वाटत असेल तर तुम्ही चुकताय , नक्षलवाद
>> अभ्यासायची प्रत्येकाला गरज आहे असे मला वाटते .! नक्षलवाद म्हणजे फक्त
>> गोळीबार ,बॉंबब्लास्ट नाही, ती एक चळवळ आहे ....आणि हि चळवळ आरक्षण या शुल्लक
>> शब्दासाठी तयार झालेली नाही , हि चळवळ तयार झालीय ती आदिवासी परंपरा ,
>> संस्कृती , वनसंपदा वाचवण्यासाठी , वनांचे रक्षण कार्यासाठी आदिवासींच्या
>> जमिनी वाचवण्यासाठी आणि आदिवासींचे शोषण थांबवण्यासाठी , आपण काय करतोय “
>> आरक्षणाचे ” सरक्षण आणि त्यासाठी मी हातात बंदूक घेऊ ...मला लेखणी दिलीय , ती
>> लेखणी अगदी बंदूकीसारखे काम करतेय ..त्याच लेखणीच्या धाकाने मी अनेकांना
>> वाकवलेय आणि झुकवलेय, माझ्यावर बंदुका काढून देखील दुसऱ्या दिवशी माझी माफी
>> मागणारी पिल्लावळ मी पाहिलीय ....हरसूल दंगलीचे वृत्त प्रसिद्ध होताच “
>> तुमच्याकडचे पुरावे आम्हाला द्या , तपास कामात मदत करा ” म्हणणाऱ्या पोलीस
>> अधिकाऱ्यांना  “ तुम्ही मला पगार द्याल का ? ” असे मी त्यांना उलट विचारू शकलो
>> ते केवळ लेखणीच्या बळावर ...! मग विचार करा माझ्या लेखणीत तेव्हडीच ताकत आहे
>> तर मी नक्षलवादी नाही का ? आज आदिवासी समाज्यातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात
>> समाज्याच्या मुख्य प्रवाहात आलाय ..प्रत्येकाला बदल हवाय ..समाज सुधारला
>> पाहिजे असे प्रत्येकाला वाटते , म्हणून तर आज कुणाचाही राजकीय आश्रय न घेता
>> आंदोलने उभी राहत आहेत त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे “ नंदुरबार येथील
>> आदिवासी मुलीची आणि समाजाची  फेसबुक वरून झालेली बदनामी ” आणि त्याच्या
>> विरोधात केलेला एल्गार . महाराष्ट्रातील हे  पहिले बिगर राजकीय आंदोलन पाहून
>> खरच मी आदिवासी असल्याचा मला गर्व झाला . प्रत्येकाला आपले हक्क कर्तव्य
>> समजायला लागलेत , हरसूल मध्ये  व्यवस्स्थेच्या आणि प्रस्थापितांच्या विरोधातील
>> भडका झाल्याने दंगल झाली त्याला नक्षलवाद म्हणता येईल पण आरक्षण वाचवण्यासाठी
>> बंदुका हातात  घ्यायच्या ? आम्ही आमच्या आरक्षण ,आणि संरक्षणासाठी ज्या आमच्या
>> नेत्यांना राजकारणात आणून साहेब केले आहे त्यांनी आमचा विकास करण्याऐवजी,
>> आमच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याऐवजी आमच्याच हातात बंदूक दयायची असेल तर
>> तुम्ही येऊ नका आणि आमचे नेतृत्वही करू नका ....! मा. मधुकर पिचड साहेबासारखेच
>> ,वसंत पुरके , पद्माकर वळवी , विजयकुमार गावित ,अश्या  अनेक आदिवासी नेत्यांनी
>> अश्याच घोषणा गेल्या एक वर्षाभरापासून सुरु केल्या आहेत आजही आमच्या नेत्यांना
>> सामान्य जनतेची गरज भासत असेल तर तुमची पॉलीटीकल पावर संपली का ...! कि ती
>> पावर फक्त तुमचे खिसे भरायला आहे . आज आदिवासींचे २६ आमदार जर प्रस्थापित
>> सत्तेच्या विरोधात जाणार नसतील तर सामान्य जनता काय करील ....! आणि आमच्या
>> हातात बंदुका देऊन तुम्ही काय साधणार ...! आमच्याच माता पोरक्या होतील , आमचीच
>> माती आम्हाला सामाऊन घेईल , कित्तेकांच्या बायका विधवांचं जगणं जगतील . यात
>> किती नेते सहभागी असतील किती नेत्यांचे कुटुंब यात सहभागी होतील हा मोठा
>> प्रश्न आहे ...! “ शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरात , आपल्याकडे का नको
>> ...! नेत्यांच्या पोरांनी युवा नेता ,भाऊ , दादा , आमदार , डॉक्टर , इंजिनियर
>> , मोठमोठे व्यवसायिक होत आहेत आणि आम्ही नक्षलवादी व्हायचे हे मला पचत नाही .
>> आज ज्याचे विचार “जहाल” तो “नक्षलवादी” हे समीकरण आहे. नेभळट लोकांनी या
>> मार्गावर येवू नये आणि कुणी नेता आमचे नेतृत्व करूण स्वतंत्र नकसलवादी दलम
>> काढत असेल आणि स्वता पुढे होऊन हातात AK 47 घेऊन निघत असेल तर मी आजच त्या
>> दलमचा मुख्य कमांडो म्हणून हातातील लेखणी बाजूला ठेवून AK 47 उचलायला तयार आहे
>> . मी मा.पिचड साहेबांच्या वक्तव्याला विरोध करत नाही पण आम्ही प्रत्येक वेळी
>>  नक्षलवादीच का व्हावे...? जे नक्सलवादीचळवळीत आहेत त्यांनाच आजून
>> मानसन्मानाने जगता येईना त्यांनाच सरकार मुख्य प्रवाहात घ्यायला वेगवेगळी
>> ऑपरेशन राबवतंय आणि आम्ही हातात बंदुका घेतल्या तर सरकार आमचे स्वागत करेल का
>> ...? धनगर आरक्षणासाठी आमच्या २६ आमदारांनी एकत्र येवून प्रत्येकी २ लाख रुपये
>> जमा केले आणि तसी याचिका दाखल केली तर कायद्याची कोणतीही लढाई ते जिंकतील पण
>> नाही निवडणुकीत निवडून येण्यासाठी १०/२० कोटी रुपये वाटतील आणि समाज्याच्या
>> कामासाठी २ लाख खर्च करायला यांच्या जीवावर येते आणि आम्ही आरक्षण वाचवायला
>> नक्षलवादी व्हावे ....? माझे मत सर्वांनाच पटणार नाही हे पण नक्की ..आणि
>> ज्यांना पटणार नाही त्यांनीही नोकरी व्यवसाय सोडून आरक्षण वाचवण्यासाठी
>> नक्षलवादी चळवळीत यावे सर्वांचे स्वागत आहे ...! तुमच्यासारखे सहकारी असले तर
>> सर्वात पहिला गोळीबार मी करील यात शंकाच नाही .
>>
>>   विजयकुमार घोटे
>>   ०९६२३७०१७०९
>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuNeH0sGm9B_nrQ19TDamgUACjAJ9FcwWWYaDh2h6o%2BGA%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuNeH0sGm9B_nrQ19TDamgUACjAJ9FcwWWYaDh2h6o%2BGA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADRm0sKZA0KUnUzP20maPvTei9nRruqPdahswG-UajS3fgosQQ%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADRm0sKZA0KUnUzP20maPvTei9nRruqPdahswG-UajS3fgosQQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>



-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: chet...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2SyAEytOd_8JeAqFc59jCTDy5F%3DE%3DVDph4ECE53s1ZaCw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to