खर आहे घोटे साहेब.....आता आदिवासीच्या आरक्षण घेवून काही बोगस आदिवासी आदिवासी म्हणून नोकरी करायला निघाले आहे....पिचड साहेब त्याना का विरोध करत नाही ! मग कुठे जाते आदिवासी अस्मिता त्यांची ? कुठे गेले होते तेव्हा ???? On Jul 30, 2015 9:26 AM, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <ay...@adiyuva.in> wrote:
> आम्ही नक्षलवादीच का व्हावे ...? > > “ आम्हाला नक्षलवादी बनवू नका ” अश्या आशयाच्या मथळ्यातील बातम्या आज अनेक > वृत्तपत्रांमधून झळकल्यात, हे विधान आहे माजी मंत्री तसेच आदिवासींचे नेते मा. > मधुकर पिचड यांचे ....! खरं तर आम्हाला नक्षलवादी बनवू नका हे वाक्य वाचताच > माझ्यातील ज्वलंतपणा अधिक भडकायला पाहिजे होता, मात्र तसा काही प्रकार घडला > नाही , धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण दिले तर आदिवासी समाजात घरोघरी > नक्षलवादी दिसतील ....! असे मी अनेकवेळा एकले आहे शिवाय मी अनेक वर्षापासून > नक्षलवाद या विषयावर पुस्तके वाचतोय , नक्षलवाद अभ्यासतोय , नक्षलवादी > कारवायांमधून सन्यास घेऊन समाजात आता चांगले जीवनमान जगणाऱ्या काही लोकांनाही > भेटलोय , आता पुन्हा कधीही नक्षलवादी मार्गावर जाणार नाही असे परखड मत त्यांनी > व्यक्त केले आहे , मग धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण मिळाले तर किती लोक > नक्षलवादी चळवळीत येतील यासाठी धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील > अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांशी आज संपर्क साधला आणि त्यांचे मत जाणून घेतले . > सर्वांचेच हे म्हणणे झाले कि “ कायदा आहे , आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे > आणि कायदा कुणी मोडून धनगर समाजाला आरक्षण देत असेल तर त्याला लोकशाही > मार्गाने उत्तर द्यायला आम्ही सहकुटुंब तयार आहोत ...! मग मुख्य प्रश्न आहे > ...! नक्षलवादी होणार कोण ? बरं येथे प्रतेक आदिवासी माणसाला वाटेल कि मी > नक्षलवादी व्हावे ....! पण जरा नक्षलवाद या शब्दाचा अर्थ तरी माहित आहे का > ...? मित्रांनो नक्षलवाद म्हटले कि आदिवासी समाजाकडे पाहिले जाते नक्षलवाद हीच > आदिवासी समाजाची ओळख झालीय गिरीजन , वनवासी ,जंगली आणि आता नक्षलवादी , मा. > मधुकर पिचड साहेबांचे अगदी बरोबर आहे कि “ आम्हाला नक्षलवादी करू नका ” पण आज > प्रत्येक आदिवासी घरात एक नक्षलवादी आहे हि किती लोकांना माहित आहे आपल्याला > नक्षलवादी म्हणजे हातात AK 47 बंदूक , कमरेला हेंड ग्रीनेड , आठ दहा मेगजीन हा > पेहराव म्हणजे तुम्हाला नक्षलवादी वाटत असेल तर तुम्ही चुकताय , नक्षलवाद > अभ्यासायची प्रत्येकाला गरज आहे असे मला वाटते .! नक्षलवाद म्हणजे फक्त > गोळीबार ,बॉंबब्लास्ट नाही, ती एक चळवळ आहे ....आणि हि चळवळ आरक्षण या शुल्लक > शब्दासाठी तयार झालेली नाही , हि चळवळ तयार झालीय ती आदिवासी परंपरा , > संस्कृती , वनसंपदा वाचवण्यासाठी , वनांचे रक्षण कार्यासाठी आदिवासींच्या > जमिनी वाचवण्यासाठी आणि आदिवासींचे शोषण थांबवण्यासाठी , आपण काय करतोय “ > आरक्षणाचे ” सरक्षण आणि त्यासाठी मी हातात बंदूक घेऊ ...मला लेखणी दिलीय , ती > लेखणी अगदी बंदूकीसारखे काम करतेय ..त्याच लेखणीच्या धाकाने मी अनेकांना > वाकवलेय आणि झुकवलेय, माझ्यावर बंदुका काढून देखील दुसऱ्या दिवशी माझी माफी > मागणारी पिल्लावळ मी पाहिलीय ....हरसूल दंगलीचे वृत्त प्रसिद्ध होताच “ > तुमच्याकडचे पुरावे आम्हाला द्या , तपास कामात मदत करा ” म्हणणाऱ्या पोलीस > अधिकाऱ्यांना “ तुम्ही मला पगार द्याल का ? ” असे मी त्यांना उलट विचारू शकलो > ते केवळ लेखणीच्या बळावर ...! मग विचार करा माझ्या लेखणीत तेव्हडीच ताकत आहे > तर मी नक्षलवादी नाही का ? आज आदिवासी समाज्यातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात > समाज्याच्या मुख्य प्रवाहात आलाय ..प्रत्येकाला बदल हवाय ..समाज सुधारला > पाहिजे असे प्रत्येकाला वाटते , म्हणून तर आज कुणाचाही राजकीय आश्रय न घेता > आंदोलने उभी राहत आहेत त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे “ नंदुरबार येथील > आदिवासी मुलीची आणि समाजाची फेसबुक वरून झालेली बदनामी ” आणि त्याच्या > विरोधात केलेला एल्गार . महाराष्ट्रातील हे पहिले बिगर राजकीय आंदोलन पाहून > खरच मी आदिवासी असल्याचा मला गर्व झाला . प्रत्येकाला आपले हक्क कर्तव्य > समजायला लागलेत , हरसूल मध्ये व्यवस्स्थेच्या आणि प्रस्थापितांच्या विरोधातील > भडका झाल्याने दंगल झाली त्याला नक्षलवाद म्हणता येईल पण आरक्षण वाचवण्यासाठी > बंदुका हातात घ्यायच्या ? आम्ही आमच्या आरक्षण ,आणि संरक्षणासाठी ज्या आमच्या > नेत्यांना राजकारणात आणून साहेब केले आहे त्यांनी आमचा विकास करण्याऐवजी, > आमच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याऐवजी आमच्याच हातात बंदूक दयायची असेल तर > तुम्ही येऊ नका आणि आमचे नेतृत्वही करू नका ....! मा. मधुकर पिचड साहेबासारखेच > ,वसंत पुरके , पद्माकर वळवी , विजयकुमार गावित ,अश्या अनेक आदिवासी नेत्यांनी > अश्याच घोषणा गेल्या एक वर्षाभरापासून सुरु केल्या आहेत आजही आमच्या नेत्यांना > सामान्य जनतेची गरज भासत असेल तर तुमची पॉलीटीकल पावर संपली का ...! कि ती > पावर फक्त तुमचे खिसे भरायला आहे . आज आदिवासींचे २६ आमदार जर प्रस्थापित > सत्तेच्या विरोधात जाणार नसतील तर सामान्य जनता काय करील ....! आणि आमच्या > हातात बंदुका देऊन तुम्ही काय साधणार ...! आमच्याच माता पोरक्या होतील , आमचीच > माती आम्हाला सामाऊन घेईल , कित्तेकांच्या बायका विधवांचं जगणं जगतील . यात > किती नेते सहभागी असतील किती नेत्यांचे कुटुंब यात सहभागी होतील हा मोठा > प्रश्न आहे ...! “ शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरात , आपल्याकडे का नको > ...! नेत्यांच्या पोरांनी युवा नेता ,भाऊ , दादा , आमदार , डॉक्टर , इंजिनियर > , मोठमोठे व्यवसायिक होत आहेत आणि आम्ही नक्षलवादी व्हायचे हे मला पचत नाही . > आज ज्याचे विचार “जहाल” तो “नक्षलवादी” हे समीकरण आहे. नेभळट लोकांनी या > मार्गावर येवू नये आणि कुणी नेता आमचे नेतृत्व करूण स्वतंत्र नकसलवादी दलम > काढत असेल आणि स्वता पुढे होऊन हातात AK 47 घेऊन निघत असेल तर मी आजच त्या > दलमचा मुख्य कमांडो म्हणून हातातील लेखणी बाजूला ठेवून AK 47 उचलायला तयार आहे > . मी मा.पिचड साहेबांच्या वक्तव्याला विरोध करत नाही पण आम्ही प्रत्येक वेळी > नक्षलवादीच का व्हावे...? जे नक्सलवादीचळवळीत आहेत त्यांनाच आजून > मानसन्मानाने जगता येईना त्यांनाच सरकार मुख्य प्रवाहात घ्यायला वेगवेगळी > ऑपरेशन राबवतंय आणि आम्ही हातात बंदुका घेतल्या तर सरकार आमचे स्वागत करेल का > ...? धनगर आरक्षणासाठी आमच्या २६ आमदारांनी एकत्र येवून प्रत्येकी २ लाख रुपये > जमा केले आणि तसी याचिका दाखल केली तर कायद्याची कोणतीही लढाई ते जिंकतील पण > नाही निवडणुकीत निवडून येण्यासाठी १०/२० कोटी रुपये वाटतील आणि समाज्याच्या > कामासाठी २ लाख खर्च करायला यांच्या जीवावर येते आणि आम्ही आरक्षण वाचवायला > नक्षलवादी व्हावे ....? माझे मत सर्वांनाच पटणार नाही हे पण नक्की ..आणि > ज्यांना पटणार नाही त्यांनीही नोकरी व्यवसाय सोडून आरक्षण वाचवण्यासाठी > नक्षलवादी चळवळीत यावे सर्वांचे स्वागत आहे ...! तुमच्यासारखे सहकारी असले तर > सर्वात पहिला गोळीबार मी करील यात शंकाच नाही . > > विजयकुमार घोटे > ०९६२३७०१७०९ > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuNeH0sGm9B_nrQ19TDamgUACjAJ9FcwWWYaDh2h6o%2BGA%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuNeH0sGm9B_nrQ19TDamgUACjAJ9FcwWWYaDh2h6o%2BGA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADRm0sKZA0KUnUzP20maPvTei9nRruqPdahswG-UajS3fgosQQ%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.